Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी प्रभावी उपाय

प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी प्रभावी उपाय

प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी प्रभावी उपाय

नुकत्याच आई झालेल्या असताना तुम्हाला पोटावरील स्ट्रेच मार्क्स बघून, जरी त्यांचा तुमच्या तब्येतीला काहीही त्रास नसला तरी सुद्धा थोडं नाराज व्हायला होतं. तुमच्या स्तनांवर आणि पोटावर प्रामुख्याने दिसत असले तरी काही वेळा ते मांड्या आणि हाताच्या वरच्या बाजूस सुद्धा दिसून येतात. लक्षात ठेवा, कालांतराने हे स्ट्रेच मार्क्स कमी होतात आणि त्यामुळे कायमसाठी कुठलेही नुकसान होत नाही.

गरोदरपणातील स्ट्रेच मार्क्स म्हणजे काय?

गरोदरपणानंतर लांब आणि अरुंद रेषा त्वचेवर दिसू लागतात त्यांना स्ट्रेच मार्क्स असे म्हणतात. गरोदरपणात, जसजशी बाळाची वाढ होते तसे स्त्रीचे वजन साधारणपणे १५ किलो वाढते. पोट, स्तन आणि नितंबाकडील भागात वजन जास्त वाढते त्यामुळे ह्या भागात स्ट्रेच मार्क्स विकसित होतात. पोटावर स्ट्रेच मार्क्स आढळणे सर्वात कॉमन असते. ह्याचे कारण म्हणजे त्वचेच्या वाढीपेक्षा बाळाची वाढ जलद गतीने होते आणि त्वचा ताणली गेल्यामुळे त्या भागातील त्वचा थोडी फाटते. जरी स्ट्रेच मार्क्स मुळे कुठलीही वैद्यकीय समस्या उद्भवत नसली तरी, गरोदरपणात आणि त्यानंतर सौंदर्याच्या दृष्टिकोनातून ते काळजीचे कारण ठरू शकते.

गरोदरपणानंतर स्ट्रेच मार्क्स येण्याची शक्यता

९०% पेक्षा जास्त गरोदर स्त्रियांना पोटावर स्ट्रेच मार्क्स येतात, विशेषकरून तिसऱ्या तिमाहीत ते दिसू लागतात. त्यामुळे निश्चितच तुम्ही एकट्या नाही आहात. गरोदरपणात स्त्रीचे वजन खूप जास्त वाढते (१५१८ किलो) आणि जर वजन वाढीचा हा दर खूप जास्त असेल तर बाळाच्या ह्या वाढणाऱ्या वजनाशी त्वचा जुळवून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात.

  • काही रिपोर्ट्स नुसार गरोदरपणात किंवा नंतर स्ट्रेच मार्क्स येणे हे आनुवंशिक असते. जर तुमच्या आईला ते असतील तर तुम्हाला ते येण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही आईला विचारून तुम्हाला ते येऊ शकतात का ह्याबाबतची खात्री करून घेऊ शकता.
  • तुमच्या त्वचेचा पोत आणि रंग ह्यानुसार स्ट्रेच मार्क्सचा रंग बदलू शकतो. गोऱ्या स्त्रियांना गुलाबी रंगाचे स्ट्रेच मार्क्स विकसित होतात आणि सावळ्या स्त्रियांना त्यांच्या त्वचेच्या रंगापेक्षा थोड्या हलक्या रंगाचे स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात.
  • ज्या स्त्रियांचा बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) जास्त असतो त्यांना कमी बीएमआय असलेल्या स्त्रियांपेक्षा जास्त स्ट्रेच मार्क्स दिसण्याची शक्यता असते.

तथापि, तुम्हाला स्ट्रेच मार्क्स येतील किंवा नाही ह्याविषयी अंदाज बांधणे कठीण आहे. कारण तुम्ही अशा स्त्रियांपैकी एक असू शकता ज्यांना अजिबात स्ट्रेच मार्क्स आलेले नसतात. बऱ्याच स्त्रिया असे सांगतात की त्यांनी स्ट्रेच मार्क्स येऊ नये म्हणून काहीही उपाय केले नसतात तरीही त्यांना हे नैसर्गिकरित्या येणारे स्ट्रेच मार्क्स येत नाहीत.

गरोदरपणानंतर स्ट्रेच मार्क्सची कारणे

शास्त्रीय दृष्ट्या सांगायचे झाले तर आपल्या त्वचेचे तीन थर असतात: हायपोडर्मिस किंवा सबक्युटॅनियस (सर्वात खालचा थर), डर्मिस ( मधला थर) आणि एपिडर्मिस (सर्वात वरचा थर). तुम्हाला दिसत असलेले हे स्ट्रेच मार्क्स हे डर्मिस मध्ये तयार होत असतात. जेव्हा वेगाने त्वचा ताणली जाते तेव्हा त्वचेची लवचिकता तपासली जाते. स्ट्रेच मार्क्स हे गारदारपणात अचानक वजन वाढल्याने किंवा तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळामुळे होतात. सर्वात वरच्या थराखाली असलेला डर्मिसचा थर फाटतो आणि त्याखाली असलेला त्वचेचा सर्वात आतील थर दिसू लागतो आणि स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात.

गरोदरपणात तुमचे वजन वाढल्यामुळे त्वचा ताणली गेल्यामुळे स्ट्रेच मार्क्स तयार होतात. लक्षात ठेवा, तुमचे शरीर बाळासाठी जास्तीत जास्त जागा तयार करीत असते आणि त्यामुळे सतत त्वचा ताणली जाते आणि त्यामुळे गरोदरपणात स्ट्रेच मार्क्स तयार होतात.

  • तुमचे वजन थॊड्या कालावधीत खुप जास्त वाढते, आणि त्यामुळे स्ट्रेच मार्क्स तयार होतात.
  • तुम्हाला एका पेक्षा जास्त बाळे होणार असतील तर त्यामुळे त्वचा खूप ताणली जाते आणि त्यामुळे स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात.
  • तुमच्या बाळाचा आकार जास्त असू शकतो.
  • तुमच्या त्वचेची लवचिकता कमी होते कारण तुमचे शरीर ह्या नाजूक काळात जास्त प्रमाणात कॉर्टिसोन ह्या संप्रेरकाची निर्मिती करीत असते.
  • कॉर्टिकोस्टिरॉईड क्रीम्स आणि लोशन्स लावल्याने सुद्धा तुमच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स दिसू शकतात. ही अँटीइन्फ्लमेटोरी औषधे तुमच्या डॉक्टरांनी संधिवात, त्वचाविकार किंवा दमा ह्या आजारांसाठी लिहून दिली असू शकतात.
  • गरोदरपणात तुमच्या शरीरात होणारे संप्रेरकांच्या बदलांमुळे सुद्धा स्ट्रेच मार्क्स उद्भवू शकतात.

प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्सना प्रतिबंध घालता येऊ शकतो का?

गरोदरपणात योग्य काळजी घेतल्यास स्ट्रेच मार्क्सना आळा घालता येतो. जीवनशैलीमध्ये काही बदल आणि त्वचेच्या काळजावर लक्ष केंद्रित केल्यास स्ट्रेच मार्क्स तयार होण्यास प्रतिबंध घालता येऊ शकतो.

  • तुम्ही तुमच्या बाळाला चांगले पोषण मिळावे म्हणून चांगला आहार घेत असतानाच त्वचेची लवचिकता वाढेल अशा पदार्थांचा सुद्धा तुमच्या आहारात समावेश करा. अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन इ आणि ए तसेच ओमेगा ३ मुळे स्ट्रेच मार्क्स तयार होत नाहीत. ह्यापैकी काही पदार्थांचा तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून आहारात समावेश तुम्ही करू शकता: लिंबूवर्गीय फळे जसे की संत्री, पालक, गाजर, रताळे आणि भोपळी मिरची
  • तुम्ही दिवसातुन कमीत कमी ८ ग्लास पाणी पिऊन स्वतःला सजलीत ठेवा. तुम्ही काकडी, योगर्ट आणि कलिंगड ह्यासारखा पोषक आहार घेऊन सुद्धा स्वतःला सजलीत ठेऊ शकता
  • गरोदरपणात योगा, स्ट्रेचेस, केगेल सारखे व्यायामप्रकार केल्यास तुमच्या त्वचेची लवचिकता पूर्ववत होईल आणि रक्ताभिसरण सुद्धा सुधारेल

गरोदरपणानंतर स्ट्रेच मार्क्स पासून सुटका कशी करून घ्याल?

बऱ्याच स्त्रियांना शरीरावरचे स्ट्रेच मार्क्स बघून ताण येतो. तर काही स्त्रिया आई झाल्यानंतर झालेला हा बदल आहे म्हणून स्वीकारतात. तथापि, नव्यानेच आई झालेल्या ह्या स्त्रियांना गरोदरपणानंतर , स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी काही उपाय आहे का हा प्रश्न पडतो.

अभ्यासाद्वारे असे दिसून आले आहे की, काही काळानंतर हे स्ट्रेच मार्क्स जातात किंवा कमी होतात आणि लक्षात येत नाहीत. जर तुम्हाला गरोदरपणाच्या आधी घालत होते तसे सर्व कपडे घालायचे असतील तर तुम्हाला त्यांच्यापासून सुटका करून घेतली पाहिजे आणि तुमचा आत्मविश्वास पुन्हा मिळवला पाहिजे. बाळाचा जन्म झाल्यानंतर स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी इंटरनेट वर खूप सल्ले आणि टिप्स तुम्हाला मिळू शकतील. स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी खाली काही घरगुती उपाय आणि उपचार दिले आहेत.

गरोदरपणातील स्ट्रेच मार्क्सवर घरगुती उपाय

गरोदरपणामुळे आईच्या शरीरात खूप बदल होतात, वाढलेले वजन आणि तुमच्या शरीराचा बदललेला आकार हे बदल अगदी सामान्य आहेत. गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात तेव्हा तुम्ही आई किंवा आजीला त्यावर उपाय विचारता. आई होणाऱ्या किंवा नुकत्याच आई झालेल्या स्त्रीसाठी स्ट्रेच मार्क्सवर काही घरगुती उपाय आहेत आणि त्यामुळे स्ट्रेच मार्क्स खूप कमी होतात. स्ट्रेच मार्क्ससाठी लोशन तयार करण्याच्या रेसिपींसाठी पुढे वाचा

गरोदरपणातील स्ट्रेच मार्क्सवर घरगुती उपाय

. घरी तयार केलेले मॉइश्चरायझर

तुमच्या त्वचेवर मॉइश्चरायझर लावल्याने तुमची त्वचा मऊ आणि कोमल होण्यास मदत होते आणि त्वचेची लवचिकता पूर्ववत होते. इथे मॉइश्चरायझर घरी तयार करण्याआधी तुमच्या त्वचेचा पोत ओळखणे जरुरीचे आहे. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर कोरफडीचा गर, ऑलिव्ह ऑइल आणि व्हीट जर्म ऑइल सारख्या प्रमाणात घेऊन मिक्स करा आणि स्ट्रेच मार्क्सवर त्याने मसाज करा. कोको बटर असलेले मॉइश्चरायझर वापरल्याने तुम्हाला कोरड्या त्वचेचा सामना करता येतो. तुमची त्वचा जर तेलकट असेल तर वरील मिश्रण मुलतानी माती सोबत वापरा.

. घरी तयार केलेले क्रीम

दोन चमचे बीवॅक्स, १ टेबलस्पून व्हिटॅमिन इ. तेल आणि अर्धा कप कोको बटर एकत्र करा. त्यामध्ये योग्य प्रमाणात व्हीट जर्म तेल किंवा ऍप्रिकॉट केर्नल तेल घातल्याने मदत होते. बीवॅक्स संपूर्णपणे वितळेपर्यंत हे मिश्रण उकळून घ्या. हे क्रीम एका बाटलीत ठेवून फ्रिजमध्ये ठेवा आणि दररोज वापरा.

. घरी तयार केलेले लोशन

पाव कप कोरफडीचा गर घ्या आणि त्यामध्ये अर्धा कप शुद्ध ऑलिव्ह ऑइल घ्या. त्यामध्ये सहा व्हिटॅमिन इ आणि चार व्हिटॅमिन ए कॅपशूल फोडून टाका. हे नैसर्गिक स्ट्रेच मार्क क्रीम एका काचेच्या भांड्यात किंवा बाटलीत ठेऊन फ्रिज मध्ये ठेवा आणि दररोज मसाज साठी वापरा.

. अल्फाल्फा

अल्फाल्फाच्या पानांमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात आणि त्यामुळे त्वचेतील विषारीद्रव्ये बाहेर टाकली जातात आणि तो व्हिटॅमिन इ, प्रथिने आणि अमिनो ऍसिड्सचा स्रोत आहे. हे सगळे गुणधर्म असल्याने गरोदरपणातील स्ट्रेच मार्क्सवर हे नैसर्गिकरित्या चांगले काम करते. ह्या पानांची पावडर कॅमोमाइल तेलात मिसळल्याने पेस्ट तयार होते आणि ती लावायला सोपी जाते. ही घरी केलेली पेस्ट दिवसातून दोनदा किंवा तीनदा लावू शकता आणि तुम्हाला दोन आठवड्यांमध्ये फरक दिसू लागेल.

. हळद आणि चंदन

गरोदरपणातील स्ट्रेच मार्क्सवर हळद आणि चंदन चांगले काम करतात कारण हळद आणि चंदन वापरल्याने त्वचा उजळते तसेच मऊ होते हे सर्वश्रुत आहे. खरखरीत पृष्ठभागावर थोडे पाणी घालून चंदन उगाळल्यास त्याची पेस्ट मिळते. तसेच ताजी हळद बारीक करून ह्या चंदनाच्या पेस्ट मध्ये मिक्स करून लावा. चांगल्या रिझल्ट्ससाठी पेस्ट वाळू द्या आणि मग धुवून टाका.

. ऍप्रिकॉट

ऍप्रिकॉटच्या बिया काढून टाका आणि त्याचे लहान तुकडे करा. नंतर मिक्सर मधून काढून त्याची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि २० मिनिटांसाठी तसेच ठेवा नंतर कोमट पाण्याने धुवून काढा.

. तुमचे शरीर सजलीत ठेवा

दिवसभरात कमीत कमी १०१२ ग्लास पाणी प्यायल्यास, तुमची त्वचा सजलीत, कोमल राहते आणि त्वचेची लवचिकता पूर्ववत होते आणि त्यामुळे स्ट्रेच मार्क्स रंगाने हलके होण्यास मदत होते. तुमची त्वचा सजलीत ठेवण्यासाठी हा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय आहे. तसेच शरीरातील टॉक्झिन्स सुद्धा बाहेर टाकले जातात. ह्या काळात कॉफी किंवा शीतपेये घेणे टाळा कारण त्यामुळे निर्जलीकरणाचा धोका असतो.

. तेलाची उपचारपद्धती

गरोदरपणात वापरावीत अशी बरीचशी तेलं आहेत आणि त्या तेलाने मसाज केल्यास स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत होते. स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी खालील तेलांचा महत्वाचा सहभाग आहे.

. ऑलिव्ह ऑइल

मृत त्वचेचा थर काढून टाकणे तसेच त्वचेला ओलावा देण्याच्या गुणधर्मांकरिता परिचित असलेले ऑलिव्ह ऑईल हे एक प्रभावी माध्यम आहे. ऑलिव्ह ऑइल मुळे रक्ताभिसरण सुधारते आणि तसेच ऑलिव्ह ऑइल लावल्यास त्वचा कमी प्रमाणात ताणली जाते. कोमट पाण्याने अंघोळ करण्याआधी स्ट्रेच मार्क्सवर मालिश करण्याची शिफारस केली जाते

१०. एरंडेल तेल

एरंडेल तेल स्ट्रेच मार्क्स वर लावताना वर्तुळाकारात मसाज करा त्यामुळे तेल आतपर्यंत जाईल. ५ ते १० मिनिटे असे करत रहा आता त्वचेवर प्लॅस्टिक कव्हर ठेवा आणि त्यावर गरम पाण्याची बाटली फिरवा. त्यामुळे तेल त्वचेपर्यंत पोहोचण्यास मदत होते. उष्णतेमुळे त्वचेची छिद्रे उघडण्यास मदत होते. परिणामकारक निकालांसाठी हे दररोज करा.

११. इसेन्शिअल ऑईल्स

लव्हेंडर किंवा रोझ ऑईलचे काही थेम्ब तुमच्या रोजच्या तेलात म्हणजेच ऑलिव्ह ऑइल किंवा एरण्डेल तेलात घाला आणि स्ट्रेच मार्क्स वर ३० मिनिटे मसाज करा. नियमित वापर केल्यास स्ट्रेच मार्क्सचा पोत आणि रंग ह्यामध्ये फरक पडतो.

बाळाच्या जन्मानंतर स्ट्रेच मार्क्स साठी पर्यायी उपचारपद्धती

डॉक्टर स्ट्रेच मार्क्स साठी वैद्यकीय उपचारपद्धतीपेक्षा नैसर्गिक उपाय करण्यास सांगतात. तथापि, तात्काळ निकालांची तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून खालील उपाय करू शकता

बाळाच्या जन्मानंतर स्ट्रेच मार्क्स साठी पर्यायी उपचारपद्धती

. स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी क्रीम्स

स्ट्रेच घालवणाऱ्या क्रीम्स स्ट्रेच मार्क्सचा भाग मऊ करतात आणि रंगद्रव्यांवर काम करतात. ह्या क्रीम मध्ये रेटिनॉल, कोलॅजिन, इलास्टीन, जोजोबा ऑइल, कोको बटर आणि शिया बटर तसेच व्हिटॅमिन इ ऑइल ह्यांचा समावेश होतो. व्हिटॅमिन इ ऑइल गरोदरपणानंतर स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी प्रभावी ठरतात.

. ट्रीटीनॉईन क्रीम

थोड्या कालावधीत स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी ट्रीटीनॉईन क्रीम प्रभावी असते. तुम्ही बाळाला स्तनपान देत नसाल तर हे क्रीम वापरावे कारण अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले आहे की हे क्रीम स्तनपानात शोषले जाऊ शकते.

. ग्लायकोलिक ऍसिड

ग्लायकोलिक ऍसिडमुळे त्वचेची लवचिकता सुधारते आणि कॉलेजेनची निर्मिती होते आणि त्यामुळे तुमच्या शरीरावरील स्ट्रेच मार्क्स कमी होतात. उपचारपद्धती सुरु करण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी ह्याबाबत सविस्तर चर्चा करणे चांगले.

. लेसर थेरपी

ज्यांना हा उपाय परवडतो आणि करून घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी लेसर थेरपी ही पटकन होणारी, परिणामकारक आणि थोडीशी महाग उपचारपद्धती आहे. ह्या उपचारपद्धतीने जुने आणि नवे दोन्ही प्रकारचे स्ट्रेच मार्क्स घालवता येतात. ह्या प्रक्रियेत त्वचेच्या पेशी काढल्या जातात, आणि छोटे छोटे तुकडे करून पेशींची निर्मिती सुधारली जाते. ह्या प्रक्रियेचे काही दुष्परिणाम होतात, जसे की त्वचा लाल होणे, खाजवणे आणि सूज येणे इत्यादी. हे परिणाम काही दिवस राहतात.

बाळाच्या जन्मानंतर स्ट्रेच मार्क्स नाहीसे होतात का?

त्वचा ताणली गेल्यामुळे शरीरावर स्ट्रेच मार्क्स येतात. ते त्वचेवरील फोडांसारखे संसर्गजन्य नसतात आणि त्यामुळे शरीरास कुठलाही त्रास होत नाही किंवा दुखत नाही. काही कालावधीनंतर, हे स्ट्रेच मार्क्स रंगाने हलके होतात आणि त्यांचा लाल किंवा गुलाबी रंग कालांतराने पांढरा होतो. जस जसा काळ पुढे सरकतो तसे हे स्ट्रेच मार्क्स आपोआप नाहीसे होतात.

स्ट्रेच मार्क्स गरोदरपणात नैसर्गिकरित्या येतात आणि बऱ्याच स्त्रियांना ह्या परिणामास सामोरे जावे लागते. एका रात्रीतून स्ट्रेच मार्क्स गायब होण्याची कुठलीही जादू नाही. प्रसूतीनंतरच्या स्ट्रेच मार्क्सवरील सर्वोत्तम उपचारपद्धतीचा (वरती वर्णन केलेल्या) परिणाम दिसण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे, तुम्ही त्यावर कायमचा उपाय पहात असाल तर तुम्हाला वाट पाहावी लागेल. संतुलित आहार, वजनातील वाढ नियंत्रित ठेवल्यास तसेच तुमचे शरीर सजलीत ठेवल्यास बाळाच्या जन्मानंतर स्ट्रेच मार्क्स दूर ठेवणे शक्य आहे.

आणखी वाचा:

प्रसूतीनंतरचे लैंगिक संबंध – किती वेळ वाट पहावी?
प्रसूतीनंतर खावेत असे २० भारतीय अन्नपदार्थ

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article