लोकप्रिय माध्यमांमध्ये दाखवलेले गरोदरपणाचे चित्रण, कधीकधी वास्तविक जीवनातील मातृत्वाशी संबंधित अनेक गुंतागुंत कमी करते. असेच एक उदाहरण म्हणजे इतर सामान्य माणसांपेक्षा गरोदर स्त्रीला खूप भूक लागते असे चित्रण बरेचदा केले जाते. पिझ्झापासून कच्च्या लोणच्यापर्यंत सर्वकाही अगदी अधाशीपणे खाणाऱ्या ह्या गर्भवती स्त्रियांना बघितल्यावर खऱ्या जगातील गरोदर स्त्रियांना धक्का बसू शकतो. संपूर्ण आयुष्यात गरोदरपणाचा काळ म्हणजे हवे […]