In this Article
ओट्स हा सर्व वयोगटातील लोकांसाठी पोषण मूल्य असलेला एक अत्यंत निरोगी स्त्रोत आहेत. विशेषतः लहान मुलांसाठी ओट्स चांगले असतात. ओट्स मध्ये उच्च दर्जाची प्रथिने आणि तंतुमय पदार्थ असतात, परंतु त्यामध्ये कमी प्रमाणात हानिकारक संतृप्त चरबी, कोलेस्टेरॉल आणि सोडियम सुद्धा असते. तसेच फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज, कॅल्शियम, लोह, सेलेनियम, जस्त आणि तांबे सारख्या सूक्ष्म पोषक घटकांनी ओट्स समृद्ध आहेत. ओट्स लहान मुलांना संपूर्ण पोषण देतात. ओट्स अनेक पाककृतींमध्ये वापरले जाऊ शकतात. आपल्या मुलाच्या आहारात ओट्सचा समावेश करणे सहसा तांदूळ किंवा गहू यासारख्या इतर धान्यांपेक्षा जास्त पसंत केले जाते कारण ओट्स मुळे लहान मुलांमधील बद्धकोष्ठता कमी होते. ह्या लेखामध्ये तुमच्यासाठी ओट्सच्या २५ स्वादिष्ट आणि सोप्या पाककृती दिलेल्या आहेत आणि त्या तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी करून बघू शकता.
आपल्या बाळासाठी या साध्या ओटमील पाककृती करून पहा. त्या तुम्हाला आवडतील.
शिफारस केलेले वय: १ वर्ष+
तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनिटे
साहित्य
कृती
सर्वात आधी, पाणी किंवा दूध उकळून घ्या आणि नंतर त्यात ओट्स, मिश्र धान्य पावडर व नट आणि बिया घाला. मिश्रण चांगले शिजेपर्यंत मध्यम आचेवर शिजवा, नंतर गॅस बंद करा. वेलची आणि गूळ पूड घाला. थंड होण्यापूर्वी चिमूटभर केशर पावडर घालून गॅस बंद करा. एक वर्षाखालील मुलांसाठी, तुम्ही मसाले आणि गूळ घालण्याऐवजी फ्रुट सिरप किंवा मध घालू शकता.
शिफारस केलेले वय: ६ महिने+
तयारीसाठी लागणारा वेळ: १०-१५ मिनिटे
साहित्य
कृती
एका पातेल्यात पाणी घ्या आणि त्यात सोललेली आणि चिरलेली फळे घालून ते झाकून ठेवा. फळे मऊ होईपर्यंत मंद आचेवर गरम करा, नंतर गॅस वरून पातेले बाजूला काढून ठेवा. एका वेगळ्या पॅनमध्ये, दुध चांगले उकळून घ्या आणि त्यात ओट्स घाला. ओट्स चांगले शिजू द्या, नंतर मऊ प्युरी तयार होईपर्यंत फळे घालून ब्लेंड करा. बाळांसाठी ही ओट्स रेसिपी स्वादिष्ट आणि पौष्टिक दोन्ही आहे!
शिफारस केलेले वय: ६ महिने+
तयारीसाठी लागणारा वेळ: १०-२० मिनिटे
८ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना ही डिश देऊ शकता.
साहित्य
कृती
पॅनमध्ये तेल घालून त्यामध्ये सर्व भाज्या एकत्र करा आणि त्या तांबूस होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. ओट्स दुधामध्ये शिजवून घ्या आणि नंतर भाज्यांमध्ये मिसळा आणि मिक्सरमध्ये घाला. मऊ प्युरी होईपर्यंत मिक्स करा.
शिफारस केलेले वय: १ वर्ष+
तयारीसाठी लागणारा वेळ: २० -२५ मिनिटे
पारंपरिक डोसा आणि ओट्स ह्यांचे संयोजन ह्या पाककृतींमध्ये आहे. एक वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी ही डिश योग्य आहे.
साहित्य
कृती
घट्ट बॅटर तयार होण्यासाठी ओट्स, तांदळाचे पीठ, जिरे, गाजरचे तुकडे, पाणी आणि दही एकत्र एका भांड्यात मिक्स करा. राईस ब्रान ऑइल पॅनला लावा आणि वरून बॅटर घाला. डोश्याच्या कडा मोकळ्या होईपर्यंत मध्यम आचेवर भाजून घ्या , नंतर दुसरी बाजू भाजून घ्या . मध किंवा गुळासोबत बाळाला खायला द्या.
शिफारस केलेले वय: ६ महिने+
तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनिटे
साहित्य
कृती
ओट्स दुधात मंद आचेवर मऊ होईपर्यंत शिजवा. नंतर ते एका भांड्यात काढून घ्या आणि त्यामध्ये आंब्याचा लगदा आणि मध मिसळा. सुसंगततेसाठी नीट ढवळून घ्या.
शिफारस केलेले वय: ६ महिने+
तयारीसाठी लागणारा वेळ: १०-१५ मिनिटे
साहित्य
कृती
ओट्स पाण्यात घालून शिजू द्या. ते शिजताना सतत ढवळत रहा. गॅस वरून काढून थंड होऊ द्या. शेवटी, केळ्याची पेस्ट आणि मध घालून चांगले मिक्स करा.
शिफारस केलेले वय: ६ महिने+
तयारीसाठी लागणारा वेळ: ५-१० मिनिटे
साहित्य
कृती
उकळत्या पाण्यात ओट्स घाला आणि मध्यम आचेवर शिजवा. गुठळ्या तयार होऊ नयेत म्हणून सतत ढवळत रहा. शिजल्यावर, सर्व्ह करण्यापूर्वी थंड होऊ द्या. लहान मुलांसाठी ही सर्वात सोपी ओट्स लापशीची पाककृती आहे.
शिफारस केलेले वय: ८ महिने+
तयारीसाठी लागणारा वेळ: १०-१५ मिनिटे
साहित्य
कृती
सर्व साहित्य मिक्सरमध्ये घाला आणि स्मूदी बनवण्यासाठी ते ब्लेंड करा. आणि स्मूदी तयार आहे!
शिफारस केलेले वय: १ वर्ष+
तयारीसाठी लागणारा वेळ: ३०-३५ मिनिटे
साहित्य
कृती
एका भांड्यात गव्हाचे पीठ, इन्स्टंट ओट्स आणि कोथिंबीर एकत्र करा. पाणी घालून हे मिश्रण चांगले मळून घ्या आणि सुमारे १० मिनिटे तसेच राहू द्या. ह्या कणकेची नेहमीप्रमाणे पोळी लाटून घ्या. ही पोळी मध आणि दह्यासोबत द्या.
शिफारस केलेले वय: १ वर्ष+
तयारीसाठी लागणारा वेळ: २० मिनिटे
साहित्य
कृती
तांबूस तपकीरी रंगाचे होईपर्यंत ओट्स बटरमध्ये भाजून घ्या. त्यामध्ये दूध आणि मध घाला, आणि नंतर मंद आचेवर सुमारे सहा मिनिटे शिजू द्या. संत्र्याचे काप साखर घालून वेगळे शिजवून घ्या. दोन्ही मिश्रण एका पॅनमध्ये एकत्र करा आणि ते घट्ट जेल होईपर्यंत उकळू द्या. ११. ओट्स पॅनकेक
शिफारस केलेले वय: १० महिने+
तयारीसाठी लागणारा वेळ: २५ मिनिटे
साहित्य
कृती
मीठ आणि बेकिंग पावडर ओट्स मध्ये मिक्स करावे. मिश्रणात दूध, ऑलिव्ह ऑईल, अंडी, व्हॅनिला आणि मध घाला. एकत्र होईपर्यंत ढवळत रहा. एका पॅनला ऑलिव्ह ऑइल लावा आणि पॅनकेक बॅटर त्यामध्ये ओता. तांबूस होईपर्यंत भाजून घ्या नंतर दुसऱ्या बाजूने पुन्हा असे करा. मध किंवा तुपासोबत पॅनकेक द्या.
शिफारस केलेले वय: ६महिने+
तयारीसाठी लागणारा वेळ: १०-१५ मिनिटे
साहित्य
कृती
चिरलेल्या भाज्या तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्या, नंतर ओट्स घाला आणि ते शिजू द्या. नंतर, सूप स्टॉक वेगळ्या भांड्यात उकळा. शेवटी, स्टॉक ओट्स भाज्यांच्या मिश्रणात मिसळा आणि आवश्यकतेनुसार मीठ घाला. बाळाला देण्यापूर्वी ते थंड होऊ द्या.
शिफारस केलेले वय: १ वर्ष+
तयारीसाठी लागणारा वेळ: १०-२० मिनिटे
साहित्य
कृती
ओव्हन १८० अंशांवर सेट करा. या दरम्यान, एक केळं कुस्करून घ्या आणि एका भांड्यामध्ये ओट्स आणि मध घेऊन त्यात हे कुस्करलेले केळं घाला. ह्या पिठाचे तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे आकार तयार करा आणि सुमारे दहा मिनिटे बेक करा.
शिफारस केलेले वय: १ वर्ष+
तयारीसाठी लागणारा वेळ: १०-२० मिनिटे
साहित्य
कृती
ओव्हन १८० डिग्री पर्यंत गरम करा. एका भाड्यात कॉर्नफ्लोर, बारीक केलेले ओट्स, मनुका, दालचिनी आणि बेकिंग सोडा एकत्र करा. आणि दुसऱ्या भांड्यात मिक्स राईस ब्रान ऑइल, सफरचंद प्युरी आणि अंडी घाला. शेवटी दोन्ही भांड्यातील घटक एकत्र करून पीठ तयार करा. आपल्या इच्छेनुसार आकार द्या आणि सुमारे दहा मिनिटे बेक करा.
शिफारस केलेले वय: ६ महिने+
तयारीसाठी लागणारा वेळ: १०-१५ मिनिटे
साहित्य
कृती
खजूर ओटमील स्मूदी बनवण्यासाठी आधी ओट्स आणि खजूर पेस्ट एकत्र करून पाण्यात सुमारे एक तास भिजवून ठेवा. नंतर सर्व्ह करण्यापूर्वी ते एका ग्राइंडरमध्ये मिक्स करून घ्या.
शिफारस केलेले वय: ६ महिने+
तयारीसाठी लागणारा वेळ: १०-२० मिनिटे
साहित्य
कृती
ओट्स दुधात काही तास भिजवून ठेवा. चिरलेली फळे आणि पाणी एका कढईत घ्या आणि मध्यम आचेवर सुमारे पाच मिनिटे शिजवा. गॅस वरून बाजूला ठेवा आणि लगदा तयार करण्यासाठी मॅश करा. आता त्यामध्ये भिजवलेले ओट्स आणि मनुका घाला. तुम्हाला हवे असल्यास मध आणि फळांच्या फोडी त्यामध्ये घाला.
शिफारस केलेले वय: १० महिने+
तयारीसाठी लागणारा वेळ: ५ मिनिटे
साहित्य
कृती
उन्हाळ्याच्या दिवसात आनंददायी नाश्त्यासाठी सर्व साहित्य एकत्र करा. त्याची चव वाढवण्यासाठी मध किंवा गूळ घाला.
शिफारस केलेले वय: ६ महिने+
तयारीसाठी लागणारा वेळ: २०-२५ मिनिटे
साहित्य
कृती
प्रेशर कुकरमध्ये थोडी हळद, तिखट, आणि तीळ घ्या आणि अर्धा मिनिट परतून घ्या . बेसन आणि ओट्स घालून चांगले मिक्स करा. शेवटी, हवे तसे पाणी आणि मीठ घालून सुमारे दहा मिनिटे शिजवा. दह्यासोबत सर्व्ह करा.
शिफारस केलेले वय: १ वर्ष+
तयारीसाठी लागणारा वेळ: १ तास
साहित्य
कृती
घट्ट बॅटर तयार करण्यासाठी सर्व साहित्य एकत्र करा. त्याचे तुम्हाला हवे तसे वेगवेगळे आकार तयार करा आणि एक तास फ्रीजमध्ये ठेवा. आपल्या बाळाला देण्यापूर्वी ते थोडे गरम करा.
शिफारस केलेले वय: १ वर्ष+
तयारीसाठी लागणारा वेळ: ३० मिनिटे
साहित्य
कसे बनवावे?
ओव्हन १८० डिग्री पर्यंत गरम करा. एका वाडग्यात सर्व साहित्य एकत्र करा, तयार झालेल्या पिठाच्या छोट्या चकत्या तयार करा आणि ओव्हनमध्ये ठेवा. सुमारे २० मिनिटे किंवा कुकीज सोनेरी होईपर्यंत ठेवा. सर्व्ह करण्यापूर्वी थंड होऊ द्या.
शिफारस केलेले वय: ६ महिने+
तयारीसाठी लागणारा वेळ: १०-१५ मिनिटे
साहित्य
कृती
शिजेपर्यंत मध्यम आचेवर दुधात ओट्स शिजवा. गॅस कमी करा आणि शिजवलेल्या ओट्समध्ये चिरलेले सफरचंद, लोणी, बदामाचे पीठ आणि मध घाला. चांगले मिक्स करा, आता ते थंड होऊ द्या आणि नंतर सर्व्ह करा.
शिफारस केलेले वय: ६ महिने+
तयारीसाठी लागणारा वेळ: १०-२० मिनिटे
साहित्य
कृती
सॉसपॅनमध्ये राईस ब्रान ऑइल गरम करा. अंडी फेटून एकसारखी करून घ्या, नंतर शिजवलेले ओट्स आणि भाज्या पॅनमध्ये घाला. मिश्रण पूर्णपणे शिजवून घ्या आणि नंतर ते थंड होऊ द्या.
शिफारस केलेले वय: ६ महिने+
तयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे
साहित्य
कृती
पाणी उकळून त्यात केळी, नारळ आणि ओट्स घाला. सुसंगत होईपर्यंत शिजू द्या. वरून दालचिनी पावडर घाला.
शिफारस केलेले वय: ६ महिने+
तयारीसाठी लागणारा वेळ: ५-१० मिनिटे
साहित्य
कृती
पाणी उकळून घ्या, नंतर ओट्स घाला आणि मंद आचेवर शिजवा. ओट्स शिजत असताना, गाजर पेस्ट घाला आणि एकसमान होईपर्यंत मिक्स करा. आपण चवीनुसार मीठ घालू शकता
शिफारस केलेले वय: १ वर्ष+
तयारीसाठी लागणारा वेळ: २० मिनिटे
साहित्य
कृती
पाणी उकळून घ्या आणि नंतर त्यात ओट्स घाला. ओट्स शिजत असताना हळद घाला आणि चांगले मिक्स करा. शेवटी, जिरे पावडर, मिरपूड आणि मिरची पावडर घाला आणि हलवा. ते थंड होऊ द्या आणि व्हेज प्युरी सोबत सर्व्ह करा.
ओट्स रेसिपी तयार करण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासाठी येथे काही महत्वाच्या टिप्स देत आहोत.
बाळ चार महिन्यांचे झाल्यानंतर तुम्ही बाळाला ओट्स देऊ शकता. परंतु , बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर डॉक्टर बाळाला घनपदार्थ सुरू करण्याची शिफारस करतात, त्यामुळे तुमच्या डॉक्टरांचा अगोदर सल्ला घ्या. बाजारात बरेचसे ओट्स सहजपणे उपलब्ध आहेत उदा: स्टील कट ओट्स, रोल्ड ओट्स, ओट ब्रान, ओट पीठ, ऑरगॅनिक ओटमील, इन्स्टंट ओट्स वगैरे. योग्य प्रकारच्या ओट्सची निवड, स्वयंपाक करणे, पचनक्षमता आणि पौष्टिक घटक इत्यादी अनेक घटकांवर अवलंबून असते. तथापि, आपल्या बाळाचे अन्न बनवण्यासाठी वापरली जाणारी सर्व उपकरणे, भांडी आणि खाद्य कटलरी काळजीपूर्वक निर्जंतुक करणे आवश्यक आहे. ह्याचे मुख्य कारण म्हणजे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती अद्याप पूर्णपणे विकसित झालेली नसते. ओटमील पाककृती तयार करण्यासाठी जर तुम्ही गाईचे दूध वापरत असाल आणि जर तुमच्या बाळाचे वय दहा महिन्यांपेक्षा कमी असेल तर गाईच्या दुधाऐवजी आईचे दूध वापरा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ह्या लेखात दिलेल्याच पाककृती तुम्ही केल्या पाहिजेत असे नाही. तुम्ही तुमच्या बाळाच्या गरजा आणि इच्छेनुसार साहित्य वापरून विविध पद्धतीने वेगवेगळ्या पाककृती करू शकता.
आणखी वाचा: बाळांसाठी पालकाची भाजी – फायदे आणि पाककृती बाळांसाठी जव (बार्ली): निवड कशी करावी, फायदे, पाककृती आणि बरेच काही