खाणे

बाळाला अन्नपदार्थ देताना – किती प्रमाणात आणि कसे द्यावेत?

मातृत्वासोबत मिळणाऱ्या आनंदाबरोबरच, बाळाला वाढवतानाचे असे बरेच पैलू आहेत जे तुम्हाला आश्चर्यचकित करतात. बाळाला अन्नपदार्थ योग्य प्रमाणात भरवले पाहिजेत. बाळाला खूप जास्त प्रमाणात आणि खूप कमी प्रमाणात अन्नपदार्थ भरवणे ह्या दोन्हीमध्ये एक सीमारेषा आहे. ह्या लेखात आम्ही त्याविषयी सर्व माहिती दिलेली आहे. नवजात बाळापासून ते आपली छोटी राजकन्या किंवा राजकुमाराला खायला घालताना कुठे थांबायचे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

पहिल्या वर्षी बाळाचा आहार

आई म्हणून आपल्याला कराव्या लागणाऱ्या बर्‍याच कामांपैकी, आपले मूल आनंदी आणि निरोगी ठेवणे हे आपल्या अजेंड्यावर आहे. जे अन्न आपल्या बाळाला निरोगी, मजबूत आणि आनंदी बनवते असे अन्न बाळाला दिले पाहिजे. तथापि, त्याचे प्रमाण किती असावे, काय खायला द्यावे तसेच बाळाला आहार कधी द्यावा हे देखील अत्यंत महत्त्वाचे मानले पाहिजे. म्हणूनच आम्ही बाळाला आहार देण्याच्या कृतीचा एक योग्य अभ्यासक्रम तयार केला आहे जो आपल्या बाळाचे वय एक वर्षे इतके होईपर्यंत तुम्ही त्याचे अनुसरण करू शकता.

वय - ० ते ४ महिने

४ महिन्यांपर्यंतच्या मुलांना, स्तनपान तसेच फॉर्म्युला हे दोन पर्याय आहेत. त्यापैकी चांगला पर्याय कोणता हे जाणून घेण्याआधी, वाढीसाठी ते किती आवश्यक आहे ते सुद्धा पाहूया. ज्या मातांनी स्तनपान करणे निवडले आहे त्यांनी 'ऑन-डिमांड फीडिंग' पध्दतीसाठी स्वतःला तयार केले पाहिजे, विशेषत: पहिल्या काही महिन्यांमध्ये ह्याचे पालन केले पाहिजे. हा कोणताही कठोर आणि वेगवान नियम नसला तरीही, असे आढळून आले आहे की ज्या मुलांना स्तनपान दिले आहे त्यांची भूक भागण्यासाठी किमान ८ ते १० वेळा बाळाला दूध दिले पाहिजे. तसेच, बाळाला कुठल्याही प्रकारचे पोषण कमी पडू नये म्हणून प्रत्येक दोन तासांनी खायला घालण्याचे लक्षात ठेवा. दिवसातून तीन तासांपेक्षा जास्त वेळा खायला घालू नका. ज्या मातांनी फॉर्मुला देण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी बाळाला जास्त दूध पाजले जाणार नाही ना ह्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण बाळाला जास्त प्रमाणात दूध पाजले जाण्याचा धोका असतो. फॉर्मुला दूध पचायला जड असल्या कारणामुळे तुम्ही बाळाला ६ -८ वेळेपेक्षा जास्त वेळा ते देत नाही आहात ना ह्याबाबत सावधगिरी बाळगा. तसेच प्रत्येक ३ ते ४ तासांनी बाळाला ते देत रहा. तथापि, तुमचे मूल जसजसे मोठे होत जाईल तसतसे ते जास्त झोपी जाते. खरं तर, तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यापर्यंत दूध देण्याच्या वेळा आपोआप कमी होतील कारण बाळाला स्तनपान फक्त ६-८ वेळा द्यावे लागेल तर फॉर्मुला घेणाऱ्या बाळाला ते ५-६ वेळा द्यावे लागेल आणि ते दर ४-५ तासांनी दिले जाईल.

वय - ४ ते ६ महिने

आपल्या बाळासाठी हा काळ थोडा वेगळा असू शकतो. खरं तर, बर्‍याच जणांसाठी हे अवघड असल्याचे सिद्ध होऊ शकते कारण मातांनी बाळाच्या आहारात घन पदार्थ घालायचे की नाही याबद्दल नीट विचार करणे आवश्यक आहे. ज्या माता स्तनपान देऊ इच्छितात त्यांनी आपल्या बाळाला दिवसातून ६ वेळा पेक्षा जास्त वेळा स्तनपान न देणे चांगले. आधी नमूद केल्याप्रमाणे, स्तनपान हे मागणीनुसार असल्याने प्रत्यके बाळाला ते किती वेळा दिले जाऊ शकते ह्याची संख्या वेगवेगळी असू शकते. फॉर्मुला घेणाऱ्या बाळांना दिवसातून ५ वेळा पेक्षा जास्त वेळा फॉर्मुला न देण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही बाळाला घनपदार्थ देत असाल तर आपले बाळ खरोखर यासाठी तयार आहे का ते शोधा सुरवातीस ,तुमच्या बाळाला घन पदार्थ र घेण्यामध्ये स निर्माण झाला पाहिजे तसेच त्यासाठी त्यांचे वजन योग्य प्रमाणात वाढणे आवश्यक आहे. तसेच बाळाला उंच खुर्चीवर मान ताठ करून बसता आले पाहिजे. घनपदार्थांची निवड करताना, धान्यांपासून सुरूवात करा. ओट्सचे जाडे भरडे पीठ आणि लोह असलेले सीरिअल्स हे सुरुवात करण्यासाठी उत्कृष्ट पर्याय आहेत. सीरिअल तुमच्या फॉर्मुल्यामध्ये किंवा स्तनपानाच्या दुधामध्ये मिसळून दिल्यास तो एक चांगला पर्याय आहे. -६ चमच्यांपेक्षा जास्त फॉर्मुला घेऊ नका कारण सुरुवातीला ते जास्त होईल. नंतर दूध आणि फॉर्मुला कमी घेऊन त्यामध्ये जास्त सीरिअल्स घालून बघा आणि बाळ त्याला कशी प्रतिक्रिया देते ते बघा. आठवडे जसजसे पुढे सरकतात तसतसे आपल्या बाळास दररोज एक नवीन अन्नपदार्थ द्या. तृणधान्यांनंतर, भाज्या व फळे देण्याचा प्रयत्न करा. शक्यतो उकडलेल्या भाज्या घेऊन बाळ त्यास कसा प्रतिसाद देते ते पहा. बाळाला कुठल्या अन्नपदार्थांची ऍलर्जी तर नाही ना ह्याकडे लक्ष द्या.

वय - ६ ते ८ महिने

जर तुमच्या मुलाने पदार्थांना चांगला प्रतिसाद दिला असेल तर तुमच्या मुलाला निरनिराळे घनपदार्थ प्युरी करून किंवा मऊ शिजवून द्या. प्युरी केलेल्या भाज्या किंवा फळे बाळाच्या वाढत्या गरज लक्षात घेऊन बाळाला दिल्या पाहिजेत. त्यासोबतच चांगल्या परिणामांसाठी बाळाला दिवसातून ३ वेळा सीरिअल देणे चांगले. तथापि, मातांनी स्तनपान किंवा फॉर्म्युला आहारात ठेवला पाहिजे आणि कमी प्रमाणात दिला पाहिजे. बाळांना स्तनपान देताना,दिवसातून ५-६ वेळेपेक्षा जास्त वेळा दूध किंवा फॉर्मुला न देण्याचा सल्ला दिला जातो. घन पदार्थांचे सेवन वाढत असल्याने, दुधाचे प्रमाण कमी होईल. फॉर्मुला घेणाऱ्या मुलांसाठी, वर नमूद केलेल्या कारणांसाठी दररोज काही आहार देणे पुरेसे असेल.

वय - ८ ते १० महिने

शिशु आहार देण्याच्या ८ व्या महिन्यापर्यंत, आपल्या बाळाच्या आहारात अधिक संयोजन आणि पोत असलेले पदार्थ असले पाहिजेत. एक गोष्ट म्हणजे, आता लहान मुलांना ज्यूस सुरक्षितपणे दिला जाऊ शकतो, जो एखाद्या लहान कपापेक्षा जास्त प्रमाणात मर्यादित नाही. पेअर, द्राक्षे किंवा सफरचंद इत्यादींपासून बनवलेला ताजा रस हा पौष्टिक मूल्ये आणि चव ह्या घटकांसाठी उत्कृष्ट पर्याय आहे. घन पदार्थांचे सेवन आता वाढतच राहणार आहे म्हणून, ज्या मातांनी आत्तापर्यंत स्तनपान दिले आहे किंवा फॉर्म्युला देण्याचा पर्याय निवडलेला आहे त्यांनी आता ते देण्याची वारंवारिता कमी केली तरी चालू शकेल. फॉर्मुला घेणाऱ्या मुलांना दिवसातून तो एकदाच देणे आवश्यक असते तर स्तनपान दररोज २ किंवा ३ वेळा दिले जाऊ शकते.

वय - १० ते १२ महिने

आणि अखेरीस, तुमचे मूल १ वर्षाचे होण्याआधीचे हे महत्वाचे महिने बघूयात. तुमच्या बाळाचे घनपदार्थांकडे संक्रमण होत असताना आपल्या बाळाची वाढीची चिन्हे शोधून बाळ वेगाने वाढत आहे हे सुनिश्चित होऊ शकते. एक तर, जे समोर आहे ते तोंडात घातले पाहिजे हे बाळाला अचानक समजू लागेल. जरी हे धोकादायक लक्षण वाटत असले तरी बाळाला वेगवेगळे घनपदार्थ आता खावेसे वाटत आहेत ह्याचे हे लक्षण आहे. तुमचे गोंडस बाळ आता खाताना चावण्याचे गोड हावभाव करू लागेल. बाळ आता जे दिसेल ते तोंडात घालू लागेल. तसेच वस्तू एका हातातून दुसऱ्या हातात नेऊ लागेल. ही सगळी लक्षणे बाळ मोठे होत असल्याची आहेत. जेव्हा मुले घनपदार्थ घेण्यास सुरुवात करतात तेव्हा खरे काम सुरु होते. विशिष्ट अन्नपदार्थांची ऍलर्जी, तसेच नीट न शिजवलेल्या भाज्या, प्रथिने किंवा जटिल खाद्यपदार्थांमुळे मुलांना गुदमरल्यासारखे होते किंवा अपचन होऊ शकते. तसेच प्रत्येक नवीन अन्नपदार्थाला तुमचे बाळ प्रतिसाद देईल असे नाही. थोड्या दिवसांच्या अंतराने ते पुन्हा देऊन पहा.

तुम्ही तुमच्या मुलाला कमी प्रमाणात किंवा अतिप्रमाणात खायला देत नाही ना ह्याची खात्री करण्यासाठी काही गोष्टी

बाळाला जास्त प्रमाणात अन्नपदार्थ भरवले जात नाहीत असे ढोबळ मानाने समजले जाते. परंतु अगदी सहजपणे बाळाला कमी किंवा जास्त प्रमाणात भरवले जाते. अधिक जाणून घेण्यासाठी खाली वाचा.

. आपल्या बाळाला अधिक खाण्याची इच्छा असल्याची चिन्हे

बाळाचे पोट नीट भरलेले नसल्यास आपले बाळ नक्की रडेल आणि विक्षिप्त होईल. अस्वस्थता, तोंड उघडे ठेवणे, बोटांनी आणि मुठ्या मारणे यासारख्या चिन्हे आपल्या बाळाला अधिक खाण्याची इच्छा असल्याचे दर्शवेल

. तुमच्या बाळाला पुरेसे अन्न मिळाले असल्याची चिन्हे

एक नैसर्गिक वृत्ती म्हणून, आपले बाळ तोंड बंद करेल, मान फिरवेल आणि जेव्हा बाळाचे पोट भरेल तेव्हा बाळ खायचे नाकारेल. आपल्या मुलाला आहार देताना आपल्या अंतःप्रेरणेचे अनुसरण करणे लक्षात ठेवा, तुमचे बाळ भुकेले राहणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी बाळाचे खाण्यापिण्याचे एक रुटीन असुद्या. आणखी वाचा: फॉर्म्युला फीडिंग विषयी सर्वकाही बाळाची ढेकर कशी काढावी?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved