बाळ

बाळाचे ओठ फुटणे: कारणे, लक्षणे आणि उपाय

हवामान बदलू लागताच तापमान आणि आर्द्रतेच्या पातळीत फरक पडतो. ह्या दिवसांमध्ये तुमच्या छोट्या बाळाची त्वचा आणि ओठ कोरडे पडू शकतात, आणि पुढे त्याचे रूपांतर ओठ फुटण्यामध्ये होते.

जर तुमच्या बाळाचे ओठ फुटले असतील तर ते चिंतेचे कारण आहे का?

लहान मुलांसाठी - विशेषत: नवजात मुलांसाठी - कोरडे ओठ नेहमीच चिंतेचे कारण असले पाहिजेत. जर जास्त काळ दुर्लक्ष केले तर कोरडे ओठ फुटू शकतात आणि त्यावर जखमा सुद्धा होऊ शकतात. बाळांचे ओठ फुटण्याचे प्रमुख कारण म्हणजे बाळाला सतत त्यांचे ओठ चोखण्याची सवय असते. तथापि, फुटलेले ओठ हे बाळांमधील डिहायड्रेशनचे प्रमुख लक्षण आहे. हवामानातील बदल आणि वाऱ्याच्या संपर्कात येण्यामुळे असे होऊ शकते, परंतु जर तुमचे मूल त्याच्या नाकापेक्षा तोंडातून श्वास घेण्यास प्रवृत्त होत असेल तर त्यामुळे देखील बाळाचे ओठ फुटू शकतात.

बाळांचे ओठ फुटण्याची कारणे काय आहेत?

बाळाच्या कोरड्या ओठांची कारणे वैयक्तिक सवयीपासून वातावरणातील स्थिती अशी वेगवेगळी असू शकतात.

. निर्जलीकरण (डिहायड्रेशन)

डिहायड्रेशनची कारणे दोन आहेत: एक मुख्यत: कोरडे हवामान आहे ज्यामुळे बाळाच्या त्वचेतून ओलावा बाहेर काढला जाऊ शकतो आणि दुसरे म्हणजे बाळाला सतत घाम येऊ शकेल असे हवामान. तसेच, बाळाला आवश्यक प्रमाणात दूध न मिळाल्यामुळे सुद्धा निर्जलीकरण होऊ शकते. यामुळे बाळाचे ओठ कोरडे होऊ शकतात. बाळांमधील निर्जलीकरणाची काही चिन्हे आहेत:

. पौष्टिकतेची कमतरता

बाळाचे फुटलेले ओठ हे बाळाचे सध्याचे पोषण पुरेसे नसल्याचे चिन्ह आहे. जर बाळाच्या शरीरात एखाद्या पोषामूल्याची कमतरता असल्याचे दिसून आले तर बाळाच्या ओठांमध्ये ओलावा रहात नाही. कमी प्रतिकारशक्ती असलेल्या मुलांमध्ये बऱ्याचदा हे तीव्रतेने होते.

. ऍलर्जी प्रतिक्रिया

संवेदनशील त्वचेवर लोशन किंवा क्रीम किंवा कपड्यामुळे सुद्धा ऍलर्जी प्रतिक्रिया येऊ शकते. जर आईने एखादी विशिष्ट चॅपस्टिक वापरली असेल आणि बाळाचे बऱ्याचदा चुंबन घेतले असेल तर बाळाला त्याची ऍलर्जी होऊ शकते.

. तोंडातून श्वास घेण्याची प्रवृत्ती

तोंडाने श्वासोच्छवास घेतल्यामुळे ओठांना बरीच हवा लागते. ही हवा किंवा वायू नेहमीच आपल्या मार्गावरील ओलावा शोषून घेते. एखाद्या आजारामुळे नाक चोंदलेले असल्यास बऱ्याचदा तोंडाने श्वासोच्छवास घेतला जातो आणि त्यामुळे ओठ फुटतात आणि बाळाला अस्वस्थता येते.

. हवामानातील चढउतार

नुकत्याच जन्माला आलेल्या बाळांना सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात असण्याची गरज असते, कारण त्यांच्या त्वचेला तीव्र हवामानाची सवय नसते. गरम उन्हाळा, थंड हिवाळा किंवा वादळी पावसामुळे प्रत्येक स्रोतापासून ओलावा शोषला जातो आणि बाळाचे ओठ फुटतात.

. ओठ चोखणे किंवा चाटणे

सुरुवातीच्या आठवड्यात एखादी गोष्ट बाळाची जोरदार प्रवृत्ती असते. त्यामुळे बाळे आपली जीभ सतत बाहेर काढून ओठ चोखत राहतात. बाळांच्या ओठावरील लाळ हळूहळू सुकते आणि ओठ कोरडे पडतात. असे सतत केल्याने ओठांना चिरा पडतात.

स्तनपानामुळे बाळांचे ओठ फुटतात का?

नवजात बाळांचा बराचसा काळ हा स्तनपानामध्ये जातो त्यामुळे स्तनपानाचा संबंध बाळाच्या ओठ फुटण्याशी लावला जाऊ शकतो. परंतु स्तनपानामुळे बाळाच्या ओठांना चिरा पडत नाहीत. उलट स्तनपानाच्या दुधामुळे फुटलेले ओठ बरे होण्यास मदत होते. जर बाळ योग्यरित्या स्तनांना लॅच झाले आणि त्याला दिवसभरात पुरेसे दूध मिळाले तर बाळाचे ओठ कोरडे पडण्याची शक्यता कमी होते.

बाळांचे ओठ फुटल्याची लक्षणे कोणती आहेत?

नवजात मुलांची ओठ फुटल्याची लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात:

तुमच्या बाळाच्या फुटलेल्या ओठांवर तुम्ही कसे उपचार करू शकता?

लहान मुलांच्या बाबतीत, तेथे काही उपाय आहेत. बाळाला लवकर आराम मिळावा आणि अस्वस्थता दूर व्हावी म्हणून तुम्ही हे उपाय वापरून बघू शकता.

. पेट्रोलियम जेली

लॅनोलिनपासून बनलेली पेट्रोलियम जेली, आपल्या लहान मुलाच्या ओठांसाठी एक चांगले मॉइश्चरायझर म्हणून कार्य करते, आणि भेगा लवकर बऱ्या करण्यास मदत करते. लॅनोलिनची उपस्थिती त्यास सौम्यपणा देते. आणि आपल्या मुलाने ओठ चाटल्यामुळे पेट्रोलियम जेली त्याच्या तोंडात गेली तरी ती अगदी सुरक्षित आहे. आपल्या बोटावर थोडी पेट्रोलियम जेली घ्या आणि हळू हळू आपल्या बाळाच्या ओठांवर लावा. रात्री झोपताना जेली लावा जेणेकरून ती जास्त वेळ टिकेल आणि ओठांना बरे होण्यासाठी आवश्यक वेळ मिळेल.

. नारळ तेल

जुना उपाय म्हणून, बरेच पालक हे तेल घरी सहज उपलब्ध असल्याने त्याची निवड करतात. तेलाचा मुख्य घटक म्हणजे लॉरीक ऍसिड बाळावर कोणताही दुष्परिणाम करीत नाही. आपले बोट निर्जंतुक करा आणि त्यावर थोडे तेल घाला. बाळाच्या ओठांवर घासू नका आणि बाळाचे ओठ कोरडे होतील तेव्हा ह्याची पुनरावृती करा.

. स्तनपान

फुटलेले ओठ बरे करण्याचा हा सर्वात सुरक्षित आणि सर्वात नैसर्गिक मार्ग आहे. आपल्या स्तनाग्रचा वापर करून हळुवारपणे बाळाच्या ओठांवर स्तनपानाचे दूध लावा किंवा तुमच्या बोटाने हळुवारपणे लावा. त्याच्या ओठांवर घासू नका. दुधामुळे ओठ हायड्रेट होऊ शकतात आणि हे नैसर्गिक घटक उपचारांना गती देतात.

तुमच्या बाळाचे ओठ खूप फुटलेले असल्यास काय करावे?

बाळाचे तीव्रपणे फुटलेले ओठ पौष्टिकतेची कमतरता किंवा व्हिटॅमिन ए चे अतिरिक्त सेवन देखील सूचित करतात (कोरड्या त्वचेला कारणीभूत ठरतात). अशी क्वचित उदाहरणे आहेत जिथे बाळांना कावासाकी रोगाचा संसर्ग होतो - ह्या स्थिती मध्ये बाळाच्या अंगाला सूज येऊन ताप येतो. ६ महिन्यांपासून २ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये ही स्थिती आढळून येते. तथापि, ह्या स्थितीमध्ये ओठ कोरडे होण्यासोबतच ताप येतो आणि डोळे लाल होतात. जर ही स्थिती दीर्घकाळ राहिली तर तुमच्या बाळाची तपासणी करून घ्या.

बाळांचे ओठ फुटणे कसे प्रतिबंधित करावे?

उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये ह्यासाठी काळजी घेणे चांगले. बाळांचे ओठ फुटू नयेत म्हणून घरात योग्य तापमान राखावे तसेच आवश्यक असल्यास एक ह्युमिडीफायर वापरावा. तसेच तुमच्या मुलास योग्य कपडे घाला आणि त्यास सूर्यप्रकाशापासून तसेच वाऱ्यापासून संरक्षित करा. तसेच तुम्ही बाळाला उष्ण हवामानात वरवर स्तनपान देत आहात ना ह्याची खात्री करा, तसे केल्याने बाळाचे हायड्रेशन चांगले होईल. ओठ फुटणे ही प्रौढांसाठी सामान्य स्थिती असू शकते. परंतु बाळाची त्वचा संवेदनशील असते. बाळाला तोंडाने दूध प्यावे लागत असल्याने त्याच्यासाठी हे खूप वेदनादायक आणि अस्वस्थ करणारे असू शकते. जेव्हा चिन्हे दिसतात त्या वेळेला योग्य मार्गाने उपचार केल्यास ही स्थिती अधिक गंभीर होण्यापासून बचाव होण्यास मदत होऊ शकते. आणखी वाचा: दाट केसांसाठी बाळाचे मुंडण करणे – हे खरे आहे की खोटे? बाळांसाठी नैसर्गिक सनस्क्रीन – ते का वापरावे आणि कसे तयार करावे?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved