आरोग्य

बाळे आणि छोट्या मुलांना होणाऱ्या सर्दी खोकल्यावर १४ घरगुती उपाय

सर्दी आणि फ्लू हा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना सर्दी आणि फ्लूची जास्तीची औषधे दिली जाऊ शकत नाहीत, म्हणूनच लहान बाळे आणि मुलांच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपायांचा वापर केला जाऊ शकतो. हे सर्व उपाय एकाच वेळी न वापरण्याचा सल्ला दिला जातो. तसेच आपल्या मुलास कुठल्याही घटकाची ऍलर्जी तर नाही ना हे लक्षात घेणे जरुरीचे आहे. तसेच, हे उपाय करण्याआधी तुमच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते आणि हे उपाय करण्यापूर्वी तुमच्या बाळाचे वय लक्षात घेणे सुद्धा गरजेचे आहे.

व्हिडिओः बाळे आणि लहान मुलांमधील सर्दी खोकल्यावर ८ घरगुती उपाय

https://youtu.be/zanqD5nAG0M उपायांविषयी जाणून घेण्याआधी सर्दी आणि खोकल्याची लक्षणे माहित असणे आवश्यक आहे.

बाळांमध्ये सर्दी आणि फ्लूची लक्षणे

आपल्या बाळाला सर्दी झाल्यावर त्यावर उपाय करण्यासाठी लक्षणे जाणून घेतल्याने मदत होते. त्यासाठी खालील लक्षणांवर तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे.
  1. थोडे वाहणारे नाक
  2. सौम्य खोकला
  3. घसा खवखवणे
  4. चोंदलेले  नाक
  5. भूक कमी होणे
  6. अस्वस्थता
  7. हलका ताप
मुलांच्या सर्दीवर उपचार करण्याआधी पालकांनी सर्वात प्रथम त्यांना आरामदायक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून त्यांना बरे वाटेल. तापामुळे निर्जलीकरण (डिहायड्रेशन) होते. बाळाला नेहमीच तहान लागत नाही किंवा द्रवपदार्थ घ्यावेसे वाटत नाहीत. तथापि, आपण त्याला अधिक द्रवपदार्थाचे सेवन करण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. निर्जलीकरणाची (डिहायड्रेशनची) लक्षणे शोधा आणि त्यानुसार आपल्या बाळाला द्रवपदार्थ द्या. ३ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये निर्जलीकरणाची काही चिन्हे अशी आहेतः चला मुलांच्या सर्दी आणि फ्लूवर उपचार करण्यासाठी काही घरगुती उपचारांवर एक नजर टाकूया.

बाळे आणि छोट्या मुलांना होणाऱ्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय

हे घरगुती उपचार सुरक्षित, कोमल आणि प्रभावी आहेत. जेव्हा मुलांना सर्दी किंवा फ्लूचा त्रास होत असेल तेव्हा त्यांना ह्या उपचारांमुळे बरे वाटण्यास मदत होते.

१. स्तनपान

आईच्या दुधात अँटीबॉडी असतात त्यामुळे शरीर सर्दी आणि फ्लू विषाणूंसह सर्व प्रकारच्या जंतू व विषाणूंसाठी रोगप्रतिकारक बनते. तसेच, आईच्या दुधामुळे सजलीकरण सुद्धा होते. नवजात मुलांमध्ये फ्लूसाठी  हा एक उत्तम नैसर्गिक उपचार आहे. ज्या मुलांना इतर कोणत्याही औषधाची आवश्यकता नसते अशा ६ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांना स्तनपान दिले जाऊ शकते.

२. लसूण आणि ओवा

लसूण आणि ओवा ही खोकला आणि सर्दीसाठी चांगली औषधे आहेत कारण त्यात अँटीबॅक्टेरिअल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत. हे मिश्रण मुलांच्या सर्दीसाठी उत्कृष्ट औषधी वनस्पतींपैकी एक आहे. २ लसूण पाकळ्या आणि १ चमचा ओवा घ्या आणि कोरडा भाजून घ्या. एकदा थंड झाल्यावर ते मलमलच्या कपड्यात ठेवा आणि घट्ट बांधून घ्या. ही थैली बाळाच्या बिछान्यापासून (बिछान्यावर किंवा अंथरुणावर नाही) सुरक्षित अंतरावर ठेवा जेणेकरून तो सुगंध बाळाला आराम देईल. असे केल्याने सर्दीमुळे बाळाला निर्माण होणारा अडथळा दूर करण्यास मदत होईल. तसेच , बाळाच्या पायाच्या तळव्यांवर ही पुरचुंडी चोळू शकता.

३. पाणिकूरा

पाणिकूरा ही बारमाही वनस्पती आहे. ही वनस्पती दक्षिण भारतात आढळते. ह्या वनस्पतीची पाने सुगंधी असतात ही पाने तुम्ही स्टोव्ह टॉपवर गरम करू शकता आणि डिहायड्रेट करू शकता. एकदा थंड झाल्यावर तुम्ही बाळाच्या कपाळावर ही पाने ठेवू शकता. डिहायड्रेटेड पाने बाळाच्या शरीरातून ओलावा शोषून घेतात आणि सर्दी आणि खोकल्यापासून मुक्त होण्यास मदत करतात. बाळाच्या श्वसनलिकेतून थुंकी काढून टाकण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते.

४. लसूण आणि ओवा घातलेले  मोहरीचे तेल

मोहरीचे तेल, लसूण आणि ओव्यामध्ये अँटीबॅक्टेरिअल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत. ह्यामुळे कफ कमी होतो आणि बाळाला आरामदायक वाटते. १/४ कप मोहरीचे तेल गरम करून त्यात लसूण आणि लवंगाच्या दोन पाकळ्या घाला. एकदा ते तपकिरी झाले की काढून घ्या. ह्या तेलाने बाळाच्या छातीवर आणि तळव्यांना मालिश करा.

५. केशर टिळा

ही पेस्ट बाळाच्या कपाळावरील पाणी शोषून घेण्यास मदत करते आणि आराम प्रदान करते. केशर पेस्ट बनवा आणि आपल्या बाळाच्या पायाच्या तळव्यांवर आणि कपाळावर लावा.

६. सुकी भाजलेली हळद

अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने हळद सर्दी पासून मुक्त होण्यास मदत करू शकते. कोरडी हळद स्टिक स्टोव्हवर जाळून घ्या आणि नंतर थोडे पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट बाळाच्या नाकपुड्यांवर लावल्यास आराम मिळू शकेल. बाळाच्या नाकाच्या आत पेस्ट जाणार नाही ह्याची काळजी घ्या.

७. गाजराचा रस

गाजरांमध्ये आवश्यक ती पोषणमूल्ये आणि जीवनसत्त्वे असतात. ही पोषणमूल्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. लहान मुलांच्या सर्दीवर उपचार करण्यासाठी हा एक उत्तम घरगुती उपचार आहे. वाफवलेले गाजर मॅश करून त्यामध्ये पाणी घालून पातळ करून ६ महिने किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिले जाऊ शकते. जी लहान मुले ताज्या फळांचे रस पचवू शकतात त्यांना तुम्ही ताज्या गाजराचा रस देऊ शकता.

८. रॉक सॉल्ट घातलेले मोहरीचे तेल

मोहरीचे तेल लावल्यास घशातील कफ कमी होण्यास मदत होते. १ ते २ मोठे चमचे कोमट मोहरीचे तेल घ्या आणि त्यात अर्धा चमचा रॉक सॉल्ट घाला. ह्या तेलाने बाळाच्या छातीवर आणि मागच्या बाजूस हळूवारपणे मालिश करा आणि बाळाला उबदार वाटावे म्हणून सुती कापडाने झाका.

९. सलाईन

आपल्या मुलांना सर्दीपासून थोडा आराम मिळविण्यासाठी नाकात सलाईनच्या थेंब घालणे हा एक जलद आणि सुरक्षित पर्याय आहे. हे थेंब घालण्यासाठी तुम्ही एखादा ड्रॉपर वापरू शकता. मग श्लेष्मा काढून टाकण्यासाठी अनुनासिक सक्शन बल्ब वापरा.

१०. ह्युमिडिफायर

ह्युमिडीफायरमुळे कोरड्या हवेत ओलावा येऊन खोकला आणि सर्दीपासून थोडा आराम मिळण्यास मदत होते. झोपेत असतानाच मुलाच्या खोलीत एक ह्युमिडिफायर वापरला जाऊ शकतो. ह्युमिडीफायर नियमितपणे स्वच्छ करत आहात ना याची खात्री करा नाहीतर बुरशी आणि बॅक्टेरिया वाढल्याने त्याचा तुमच्या मुलाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

११. स्टीम थेरपी

गरम शॉवर सुरु करा आणि काही स्टीम बाथरूममध्ये जमा होऊ द्या. आपल्या बाळाला १० ते १५ मिनिटे वाफेमध्ये बसवा. वाफ श्लेष्मा सैल करते आणि बाळाला कफापासून मुक्त करते. ह्या उपचारापूर्वी आणि नंतर आपल्या बाळाला पुरेसे हायड्रेट केले आहे याची खात्री करा कारण ह्या प्रक्रियेदरम्यान बाळ बरेच द्रवपदार्थ गमावेल.

१२. मध घालून लिंबू पाणी

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे सर्दीपासून बचाव करण्यासाठी प्रभावी आहे. एका ग्लासमध्ये कोमट पाण्यात थोडासा लिंबाचा रस पिळून घ्या आणि चवीसाठी मध घाला. हा उपाय मोठ्या  मुलांसाठी उपयुक्त आहे ज्यांना वेगवेगळ्या घटकांशी ओळख करून दिली गेली आहे.

१३. गुळण्या

सर्दी व घसा खवखवण्यापासून आराम मिळण्यासाठी मोठी मुले मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करू शकतात. गुळण्या केल्यामुळे श्लेष्मा कमी होते आणि सूज सुद्धा कमी होण्यास मदत होते. दिवसा काही वेळा बाळाला गुळण्या करण्यास सांगा.

१४. आपल्या मुलाचे डोके उंचावर ठेवा

रात्री झोपेत असताना बाळाचे शरीर दुरुस्त होण्यासाठी काम करीत असते, म्हणूनच संसर्ग कमी होण्याकरिता अखंड झोप आवश्यक आहे. आपल्या मुलाचे डोके उंचावर ठेवल्यास श्लेष्मा पुन्हा शरीरात जातो आणि त्यामुळे बाळ अगदी सहजपणे श्वास घेऊ शकते. टॉवेलची गुंडाळी करून बाळाच्या डोक्याखाली ठेवा त्यामुळे बाळाचे डोके वर उचलले जाते. तुम्ही मऊ उशी सुद्धा वापरू शकता. उशीची उंची खूप जास्त नाही ना ह्याकडे लक्ष द्या नाहीतर खूप उंच उशी असल्यास बाळाला मानेचा त्रास होऊ शकतो. आपण या उपायांचे अनुसरण करता तेव्हा आपल्या बाळाला इतर समस्या उद्भवणार नाहीत याची खात्री करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात घेण्याची देखील आवश्यकता आहे. तुम्ही काय खबरदारी घेतली पाहिजे ते पाहू या.

बाळे आणि लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर खालील खबरदारी घेणे आवश्यक आहे

असे असतानाही, तसेच ह्या उपाययोजना करूनही तुमच्या बाळाच्या तब्येतीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नसली तर तुम्ही त्याला त्वरित बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन जायला हवे. आपण कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे जाणून घेऊयात.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

घरगुती उपचार वापरताना आपण खाली दिलेल्या लक्षणांसाठी आपल्या मुलाचे निरीक्षण देखील केले पाहिजे. लक्षणे टिकून राहिल्यास तुम्ही तुमच्या लहान मुलास ताबडतोब डॉक्टरकडे न्यावे. वरील सर्व लक्षणे सामान्य सर्दी व्यतिरिक्त इतर कशाचेही संकेत देत  असतील तर त्यासाठी त्वरित वैद्यकीय मदत घेण्याची आवश्यकता असते. वर नमूद केलेले उपाय तुम्हाला सर्दीपासून आराम देण्यास मदत करतील. तुम्ही 'ट्रायल अँड एरर' पद्धतीने तुमचे बाळ कोणत्या उपचारासाठी सर्वोत्तम प्रतिसाद देते हे पाहू शकता. एकदा तुमच्या मुलाचा सर्दी खोकला बरा झाला की तो पुन्हा होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. आणखी वाचा: लहान मुलांच्या तापासाठी १४ सर्वोत्तम घरगुती उपाय मुलांना होणाऱ्या खोकल्यावर २८ सुरक्षित घरगुती उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved