Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home टॉडलर (१-३ वर्षे) दर-महिन्याला-होणारा-बाळाचा-विकास २४ महिने (२ वर्षे) वयाच्या बाळाची वाढ आणि विकास

२४ महिने (२ वर्षे) वयाच्या बाळाची वाढ आणि विकास

२४ महिने (२ वर्षे) वयाच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या बाळाच्या वाढदिवसाच्या केकवर दोन मेणबत्त्या आहेत! तुम्ही कदाचित लहान मुलांच्या वाढीच्या टेरिबल टूह्या टप्प्याविषयी विचार करीत असाल. तुमचे २ वर्षांचे मूल आता अधिक स्वतंत्र असल्याने तुमच्यासाठी हा टप्पा आव्हानात्मक असणार आहे ह्यात काही शंका नाही. तुमच्या मुलाची कौशल्ये आणि कल्पनाशक्ती वाढत आहे. तो स्वतः एक वेगळी व्यक्ती बनत आहे.

व्हिडिओ: तुमच्या २४ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमचे २४ महिन्यांचे मूल तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही. त्यामुळे काही वेळेला तुम्हाला निराशा येऊ शकते. पण एक पालक म्हणून तुम्ही थोडे निवांत राहिल्यास ते तुमच्यासाठी आणि बाळासाठी चांगले आहे.

तुमचे २ वर्षांचे मूल तुमच्यासोबत असल्यास कोणताही क्षण तुम्हाला कंटाळवाणा होत नाही. तीन ते चार शब्द एकत्र करून तो वाक्य तयार करतो. त्याची सततची बडबड तुम्हाला खिळवून ठेवेल. तुम्ही आता तुमच्या मुलासोबत अर्थपूर्ण संभाषण देखील करू शकता.

२ वर्षे वयाच्या मुलाचा विकास

बाळ दोन वर्षांचे झाल्यावर तो महत्वपूर्ण विकासाचे टप्पे पार करू शकतो. परंतु २ वर्षाच्या मुलांच्या वाढीचे टप्पे म्हणजे सामान्य मार्गदर्शक तत्वे आहेत आणि कोणत्याही प्रकारे वाढीचा निश्चित नमुना त्याद्वारे समजत नाही. प्रत्येक मुलाला प्रगतीसाठी आणि विकासाचे टप्पे पार करण्यासाठी स्वतःचा वेळ लागू शकतो. त्यामुळे, जर तो अपेक्षित टप्पे पार करत नाही असे वाटत असेल तर पालकांनी विनाकारण चिंता करू नये.

शारीरिक विकास

ह्या वयात तुमचे मूल समन्वय साधण्यास शिकेल. अनेक गोष्टी करण्यासाठी ते मोटार कौशल्ये वापरण्यास शिकते. आपल्या मुलाचे वजन योग्य आहे किंवा नाही ह्याची बहुतेक पालक काळजी करू लागतात. सरासरी २ वर्षांच्या मुलाचे वजन सुमारे २३ ते २८ पौंड असू शकते. २ वर्षाच्या मुलामध्ये काही शारीरिक बदल दिसून येतात:

  • तो सहजतेने पायऱ्या चढू आणि उतरू लागेल
  • तो कुठल्याही अडचणीशिवाय चालू लागेल
  • तो एका पायावर उभे राहून स्वतःचा समतोल राखू लागेल. ह्यामुळे त्याला चढण्यास मदत होते
  • तो स्क्रिबलिंग सुरू करू शकतो किंवा एकच रेषा काढू शकतो
  • तो अंगठा आणि बोटांमध्ये क्रेयॉन पकडू शकतो
  • ब्लॉक्स एकावर एक रचून तो टॉवर तयार करू शकतो
  • थोडी मदत घेऊन तो कपडे घालू शकतो

शारीरिक विकास

सामाजिक आणि भावनिक विकास

तुमचे मूल आता त्याचे मित्रमैत्रिणी किंवा भावंडांसोबत गोष्टी शेअर करण्यास तयार नसेल. जरी त्याचा मित्र किंवा मैत्रीण त्याच्या आसपास खेळात असला तरी सुद्धा तो स्वतःचे एकटे खेळण्यास प्राधान्य देईल. खाली दिल्याप्रमाणे सामाजिक आणि भावनिक विकास २ वर्षांच्या बाळामध्ये दिसू शकतो.

  • ह्या वयात तुमचे लहान मूल एखाद्या मोठ्या मुलासारखे वागू लागेल त्याच वेळेला बाळासारखे वागण्याची इच्छा सुद्धा त्याच्यामध्ये जागृत होईल. असा भावनांमध्ये होणारा बदल हे ह्या वयाचे वैशिष्ट्य आहे. जर त्याच्या दिनचर्येत बदल झाला असेल किंवा त्याला तुमचे लक्ष आणि प्रेम हवे असेल तर असे होऊ शकते
  • तुमच्या बाळाला लिंगभेदांची जाणीव होऊ शकते. उदाहरणार्थ, एखादा मुलगा त्याच्या वडिलांचे अनुकरण करू शकतो उदा: चालणे आणि कपडे घालण्याची पद्धत वगैरे. मुली त्यांच्या आईची कॉपी करतात आणि लिपस्टिक लावण्याचा प्रयत्न करतात
  • काहीवेळा मुले समान लिंग रोल मॉडेलचे अनुकरण करत नाहीत आणि ते सामान्य आहे. लहान मुले, नैसर्गिकरित्या जिज्ञासू असल्याने त्यांना बर्‍याच गोष्टींचा प्रयोग करायला आवडते
  • तुमच्या बाळाला तुमच्यापासून दूर राहण्याची काळजी वाटत नाही
  • तुमच्या बाळाचा काही वेळा भावनिक उद्रेक होऊ शकतो

संज्ञानात्मक आणि भाषा विकास

ह्या वयात तुमचे बाळ फुगे किंवा कुत्रा यांसारख्या पुस्तकात दिसणाऱ्या परिचित गोष्टी दाखवू शकेल. संज्ञानात्मक आणि भाषा विकासाची काही वैशिष्ट्ये अशी असू शकतात:

  • तुमच्या बाळाला गोष्टींची क्रमवारी लावायला आणि त्यांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये व्यवस्थित लावायला आवडेल
  • वेगवेगळे शब्द वापरून तो वाक्य तयार करू लागतो
  • त्याला त्याची स्वतःची जाणीव निर्माण होते आणि तो त्याच्या आवडीनिवडीबद्दल बोलू शकतो
  • तो साध्या सूचना समजून घेऊन त्याचे पालन करू लागतो
  • तो प्रत्येक गोष्टीला काअसे विचारू लागतो. कारण त्याला खरे स्पष्टीकरण हवे असते. इतर वेळी तो काह्या प्रश्नाचा वापर करतो कारण त्याला त्याचे कुतूहल कसे व्यक्त करावे हे माहित नसते
  • तुमच्या बाळाला आधी किंवा नंतर, चांगले किंवा वाईट इत्यादी संकल्पना कळू शकतात

वर्तणूक

ह्या वयात लहान मुलांना सर्व गोष्टी त्यांच्या मनासारख्या हव्या असतात त्या तश्या झाल्या नाहीत तर ही मुले निराश होतात. मुले सतत कुरबुर करत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. त्यांना एखाद्या गोष्टीसाठी नकार दिल्यास त्यांना ते आवडत नाही.

कधीकधी मुले थकल्यामुळे किंवा भूक लागल्याने ओरडतात. ह्या दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिल्यास त्याची रडण्याची समस्या सुटू शकते. काहीवेळा मुलांना तणाव जाणवू शकतो किंवा तुमचे लक्ष हवे असते. त्यांना मिठी मारल्याने किंवा सांत्वन केल्याने रडणे थांबू शकते. तुम्ही तुमच्या बाळासोबत काही मनोरंजक खेळ खेळून त्यास विचलित करण्याचा प्रयत्न देखील करू शकता. काही रोमांचक क्रियाकलापांमध्ये तुम्ही त्याचे लक्ष गुंतवू शकता त्यामुळे त्याचे मन विचलित होऊ शकते.

वर्तणूक

दोन वर्षांचे लहान मूल सहसा त्याच्या पालकांच्या अधिकाराची आणि गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे, त्याच्या कुरबुरींकडे सारखे लक्ष न देणे चांगले. असे कठीण प्रसंग हाताळताना नम्र परंतु खंबीर राहण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्या मुलाचे ओरडणे कायम राहिल्यास त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यास काम होऊ शकते.

अन्न आणि पोषण

२ वर्षांच्या बाळासाठी, अन्न मजेदार बनू शकते. आता तुमचे मूल सगळ्यांसोबत जेवायला बसू शकते. स्वतःचे स्वतः चमच्याने खाणे तुमच्या बाळासाठी रोमांचकारी असू शकते. त्यामुळे तो सगळीकडे पसारा आणि घाण करू शकतो परंतु त्याला स्वतःच्या हाताने खाऊ द्या.

तुमच्या मुलाचे दात येऊ लागले आहेत याचा अर्थ त्याचे चघळण्याचे कौशल्य अधिक चांगले असण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलाला खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी लागू शकतात उदा: एखाद्या वेळेला भरपूर खाणे आणि नंतर थोडे खाणे इत्यादी. जेव्हा तुमच्या मुलाची खाण्याची इच्छा नसते तेव्हा त्याला जबरदस्तीने खायला देणे टाळा. तुमच्या मुलाला फळाचा एक भाग किंवा चीजचा तुकडा यासारखा पौष्टिक नाश्ता देणे उपयुक्त ठरू शकते. तुम्ही गाजर, काकडी किंवा टोमॅटोचे तुकडे यांसारख्या कच्च्या भाज्या देखील वापरून पाहू शकता.

जर तुमचे मूल खाण्यास त्रास देत असेल तर बाळाचा आहार कल्पक बनण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, त्याला गाजराच्या काड्यांसारख्या कच्च्या भाज्या पौष्टिक डिप्ससोबत द्या, रोल बनवण्यासाठी चविष्ट स्प्रेड वापरा, दूध, फळे आणि दह्यापासून बनवलेले हेल्दी स्मूदी द्या, सँडविच तयार करण्यासाठी प्राणी, फुलांचे आकार देण्यासाठी कुकी कटर वापरा.

झोप

ह्या वयापर्यंत, तुमचे बाळ पाळण्यातून स्वतःच्या पलंगावर जाण्यासाठी तयार असते. संक्रमण,हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने होऊ शकते. तुमच्या मुलाला ह्या बदलाचा सामना करण्यासाठी वेळ लागू शकतो. सवय होण्यासाठी तुम्ही दिवसा त्याला त्याच्या अंथरुणावर झोपू देऊन सुरुवात करू शकता. त्याला त्याचे आवडते बेडशीट बेडवर अंथरण्यास सांगा आणि त्यामध्ये त्याला गुंतवा. त्याची काही आवडती खेळणी बेडवर ठेवा.

तुमचे बाळ बिछान्यावर झोपलेले असताना तुम्हाला त्याच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटत असल्यास, तुम्ही त्याच्या बेडरूमच्या दारावर पायऱ्यांचे गेट बसवू शकता. तुमच्या बाळाने बेडवरून पडू नये म्हणून तुम्ही बेड गार्ड किंवा सेफ्टी रेल देखील लावू शकता.

खेळ आणि उपक्रम

तुमच्या बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ, भाषा आणि परस्परसंवाद ह्यांचा समावेश असलेले क्रियाकलाप फायदेशीर ठरू शकतात. खेळणी लपवणे, खेळणी तयार करणे, बॉल पकडणे यासारखे उपक्रम केवळ मनोरंजकच नसून विविध कौशल्ये शिकण्याचे साधनही असू शकतात.

खेळ आणि उपक्रम

तुमच्या बाळाची ऊर्जा केंद्रित करण्यासाठी त्याला मैदानी खेळ खेळू द्या. त्याला अनेकदा उद्यानात फिरायला घेऊन जा. त्याला वाटेत अनेक मनोरंजक गोष्टी दिसू शकतात. त्यामुळे त्याची जागरूकता वाढते.

जर तुम्हाला तुमच्या बाळाला अधिक सहजतेने इतरांसोबत गोष्टी शेअर करण्यासाठी प्रोत्साहित करायचे असेल तर तुम्ही त्याला त्याची वेळ येईपर्यंत वाट पाहण्यास शिकवा. उदाहरणार्थ, तुम्ही चित्र एकत्र रंगविण्यासाठी सुचवू शकता आणि नंतर रंग देण्यासाठी त्याचा नंबर येण्याची वाट पाहू देऊ शकता. तुमच्या मुलाला नाचणे, गाणे, आणि उड्या मारणे देखील आवडेल.

पालकांसाठी टिप्स

तुमच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ह्या विषयी तसेच त्याच्या विकासाविषयी काही टिप्स खाली दिलेल्या आहेत

  • तुमचे मूल आता पॉटी ट्रेनिंग घेण्यास तयार असू शकते. त्याच्या कलाने घ्या आणि हळूहळू त्याला ते शिकवा
  • तुम्ही तुमच्या लहान मुलाशी सतत संवाद साधणे महत्वाचे आहे. त्यामुळे त्याला त्याचा शब्दसंग्रह वाढवण्यास आणि भाषेवर अधिक चांगले प्रभुत्व येण्यास मदत होईल
  • तुमच्या बाळाला पोषक आहार द्या. त्याच्या आहारात विविधता असू द्या. उदाहरणार्थ, जर तुमच्या बाळाला साध्या इडल्यांची सवय असेल तर बदल म्हणून भाज्या घालून इडल्या करा किंवा रवा इडली करून पहा
  • जर तुमच्या बाळाला दूध पिण्याची आवड नसेल तर मासे, दही, चीज यांसारखे पर्यायी प्रकार त्याला द्या
  • कधीतरी तुम्हाला अस्वस्थ वाटणे सामान्य आहे परंतु आपल्या मुलाला सहन करण्याचा प्रयत्न करा. तुमची शांतता तुम्हाला कठीण प्रसंगांमधून सोडवण्यास मदत करू शकते

पालकांसाठी टिप्सखालील परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या

तुम्ही तुमच्या बाळाची उंची आणि वजन मोजण्यासाठी नियमित अंतराने डॉक्टरांना भेटू शकता. तुमच्या बाळाची वाढ आणि आहाराविषयी तुम्हाला असलेल्या कोणत्याही समस्यांबद्दल तुम्ही चर्चा करू शकता. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा तुम्हाला असलेल्या कुठल्याही शंकांचे निरसन वेळेवर करून घेणे चांगले.

टेरिबल टूहा बाळाच्या वाढीतील एक रोमांचक टप्पा आहे. तुमचे २ वर्षांचे मूल सतत सक्रिय असते कारण ते त्याच्या सभोवतालचे जग सक्रियपणे एक्सप्लोर करत असते. पालक म्हणून तुम्ही त्याला योग्य समर्थन आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. विविध क्रियाकलापांमध्ये त्याला सामावून घेऊन त्याला भरपूर प्रेम द्या.

मागील आठवडा: २३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article