In this Article
- ढेकर म्हणजे काय?
- बाळ ढेकर का देते?
- ढेकर काढणे बाळासाठी महत्वाचे का आहे?
- बाळाची ढेकर कधी काढावी?
- बाळाची ढेकर कशी काढावी?
- तुम्ही बाळाची ढेकर किती वेळा काढू शकता?
- ढेकर काढताना बाळाला उलटी झाल्यास काय करावे?
- ढेकर काढताना बाळे का रडतात
- जर बाळ ढेकर काढत नसेल तर काय करावे?
- बाळाची ढेकर काढणे केव्हा थांबवले पाहिजे?
- बाळाची ढेकर काढतानाच्या काही उत्तम टिप्स
- तुम्ही वैद्यकीय सल्ला केव्हा घेतला पाहिजे?
बाळाला काय भरवावे ह्याच्याइतकंच बाळाला कसे भरवावे हे महत्वाचे आहे. बाळाला दूध पाजताना कसे धरावे इथपासून ढेकर काढण्यापर्यंत सगळ्या गोष्टी बाळाला पाजताना महत्वाच्या आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचं महत्व जाणून घेतल्यास बाळाला भरवण्याचे काम सोपे होईल. बाळ ढेकर देते कारण दूध पाजताना बाळ काही प्रमाणात हवा सुद्धा तोंडात घेते. तथापि काही कारणांमुळे हवेचे बुडबुडे बाळाच्या पचनसंस्थेपर्यंत पोहोचतात, त्यापैकी काही दिले आहेत.
ढेकर म्हणजे काय?
बाटलीने फॉम्युला दूध पिताना किंवा स्तनपान करताना बाळ हवा आत घेते. हे हवेचे बुडबुडे बाळाच्या पचनसंस्थेमध्ये अडकतात आणि त्यामुळे बाळ अस्वस्थ होते. ढेकर काढणे म्हणजे हा पंचनसंस्थेत अडकलेला वायू तोंडातून मुक्त करणे. तथापि पचनसंस्थेत वायू अडकण्याची अन्य काही कारणे सुद्धा आहेत.
खाली दिलेल्या ३ प्रकारे बाळ हवा आत घेते
१. बाळाला दूध पाजताना: बाटलीने दूध पिताना किंवा स्तनपान करताना बाळाला सतत दूध तोंडाने शोषून घ्यावे लागते, त्यादरम्यान बाळाच्या पचनसंस्थेत हवेचे बुडबुडे प्रवेश करू शकतात.
२. अन्नपदार्थ: ज्या बाळांना घनपदार्थांची सुरुवात केली आहे अशा बाळांसाठी हे लागू होते. काही अन्नपदार्थांमुळे आतड्यामध्ये पचनक्रियेदरम्यान वायू तयार होतो.
३. ऍलर्जी: काही पदार्थांची ऍलर्जी असल्यामुळे बाळाच्या पोटात वायू तयार होतो.
बाळ ढेकर का देते?
जेव्हा बाळाच्या पोटात हवेचे बुडबुडे अडकतात, तेव्हा बाळ अस्वस्थ होते. बाळाला पोट फुगल्यासारखे वाटते. त्यामुळे ह्यापासून सुटका करण्यासाठी आणि मदतीसाठी बाळ रडू लागते. त्यामुळे बाळ जरी अस्वस्थ नसले तरी ढेकर काढावी. ज्या बाळांना पोटाचे त्रास वारंवार होतात अशा बाळांसाठी ढेकर काढण्याने फायदा होतो. असा विश्वास आहे की आईचे दूध पिणाऱ्या बाळांना ढेकर काढण्याची जास्त गरज भासत नाही, कारण बाटलीने दूध पिणाऱ्या बाळांपेक्षा अंगावरचे दूध पिणारी बाळे, दूध पिताना कमी हवा आत घेतात. तथापि हे प्रत्येक बाळावर अवलंबून असते.
ढेकर काढणे बाळासाठी महत्वाचे का आहे?
पोटामध्ये अडकलेले हवेचे बुडबुडे काढण्यासाठी बाळाला मदत हवी असते. नवजात शिशूला ढेकर काढताना ते का महत्वाचं आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे.
- कॉलिक: खूप वायू पोटात अडकून राहिल्यामुळे बऱ्याच बाळांना कॉलिकचा त्रास होतो. हा त्रास असणारे बाळ रडून खूप त्रस्त होते. कॉलिकचा त्रास कमी होण्यासाठी तुम्ही बाळाला भरवल्यानंतर बाळाचा ढेकर काढणे महत्वाचे आहे.
- झोपेचा अभाव: काही वेळा, बाळाच्या आईची तक्रार असते की बाळ रात्रीचे झोपत नाही किंवा मध्ये मध्ये सारखे उठते. जर तुम्हाला असे वाटले की बाळाला बसवल्यावर बाळाला बरे वाटते, तर ह्याचा अर्थ असा की झोपवल्यावर बाळाच्या पोटात अडकलेल्या वायूमुळे बाळाला त्रास होत आहे.
- गुदमरण्याचा धोका: तुम्ही तुमच्या बाळाला पाजण्याआधी बाळाची ढेकर काढली पाहिजे त्यामुळे आत अडकलेली हवा मोकळी होते आणि बाळाचा गुदमरण्याचा धोका कमी होतो.
- बाळाचे आरोग्य आणि विकास: बाळाची ढेकर काढल्याने आई आणि बाळामध्ये जवळीक निर्माण होते आणि ते बाळाच्या विकासासाठी चांगले असते.
बाळाची ढेकर कधी काढावी?
पहिले ६ महिने बाळाला पाजल्याबरोबर लगेच ढेकर काढली पाहिजे. पहिले ६ महिने तुम्ही बाळाला १० किंवा १५ मिनिटे उभे धरू शकता. (काही वेळा ह्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागू शकतो)
बाळाने उलटी केल्यास काळजीचे काही कारण नाही कारण ते नैसर्गिक आहे आणि बाळांसाठी चांगले आहे.
बाळाची ढेकर कशी काढावी?
बाळाला लवकर ढेकर काढता यावी म्हणून तुम्हाला योग्य तंत्र माहित असणे जरुरीचे आहे. तुम्ही योग्यप्रकारे धरल्यास बाळाच्या पचनसंस्थेत अडकलेला वायू बाहेर निघेल. काही बाळे भरवल्यानंतर लगेच झोपी जातात त्यामुळे त्यांची ढेकर काढणे काही वेळा आव्हानात्मक होते. झोपलेल्या किंवा जागे असलेल्या बाळाची ढेकर काढण्याचे काही उत्तम मार्ग खाली दिले आहेत.
ढेकर काढण्यासाठी बाळाला कसे धरावे
पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बाळाला नीट धरणे. इथे काही मार्ग दिले आहेत जे तुम्हाला बाळाची ढेकर काढण्यास मदत करू शकतील.
१. तुमच्या छातीवर किंवा खांद्यावर धरून बाळाची ढेकर काढणे
- तुम्ही बसलेले असताना बाळाला तुमच्या छातीशी धरून बाळाची हनुवटी तुमच्या खांद्यावर टेकवा. तुमच्या खांद्यावर छोटा रुमाल किंवा कापड ठेवा जेणेकरून जर बाळाने उलटी केली तर तुमचे कपडे खराब होणार नाहीत. तुमच्या एका हाताने बाळाच्या पाठीला आधार द्या आणि पाठीवर हळू हळू थोपटा.
- जर तुमचे बाळ मान धरू लागले असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला अशाप्रकारे उंच धरा की बाळाची बेंबी तुमच्या खांद्यावर हलकेच दाबली गेली पाहिजे. त्यामुळे दाब निर्माण होऊन ढेकर बाहेर पडेल. बाळाच्या पाठीला तुमच्या एका हाताने आधार द्या आणि हळूहळू बाळाच्या पाठीवर थोपटा.
२. बाळाला मांडीवर घेऊन ढेकर काढणे
- बाळाला बिब लावा आणि बाळाला तुमच्या विरुद्ध दिशेला तोंड करून बसवा. बाळाला पुढून एका हाताने आधार द्या, तुमचा हात बाळाच्या छातीवर ठेवा आणि बोटांच्या साहाय्याने बाळाच्या हनुवटी आणि जबड्याला आधार द्या. बाळाला किंचित पुढे वाकवून तुमच्या दुसऱ्या हाताने अगदी हलकेच बाळाची पाठ चोळा.
- तुमच्या मांडीवर बीब ठेवा आणि बाळाला तुमच्या मांडीवर पालथे झोपवा. एका हाताने बाळाच्या हनुवटीला आधार द्या आणि बाळाच्या पाठीवर हलकेच थोपटा किंवा चोळा. बाळाचे डोके खूप खाली न वाकवण्याची काळजी घ्या. त्यामुळे बाळाच्या डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह होणार नाही.
३. तुम्ही चालताना बाळाची ढेकर काढणे
- जेव्हा बाळ मान धरू लागेल तेव्हा तुम्ही हे तंत्र वापरू शकता. तुम्ही तुमच्या बाळाला उभे धरू शकता. बाळाचे तोंड तुमच्या विरुद्ध दिशेला असू द्या. तुमचा एक हात बाळाच्या कुल्ल्यांखाली ठेवा आणि दुसरा हात बाळाच्या पोटाभोवती ठेवा जेणेकरून बाळाच्या पोटावर थोडा दाब येईल.
जर तुम्ही बाळास फॉर्मुला दूध देत असाल तर ६०-९० मिली दूध दिल्यानंतर बाळाची ढेकर काढा. जर तुम्ही बाळास स्तनपान देत असाल तर बाळाला दुसऱ्या स्तनावर घेण्याआधी बाळाची ढेकर काढून घ्या.
जर तुम्हाला बाळाला भरवल्यानंतर बाळाची ढेकर काढण्याचे योग्य तंत्र माहित करून घ्यायचे असेल तर तुम्ही बाळ झोपलेले असताना बाळाला खांद्यावर घेऊन हळूच पाठीवर चोळू शकता.
तुम्ही बाळाची ढेकर किती वेळा काढू शकता?
तुम्ही बाळाला किती वेळा भरवता ह्यावर ढेकर काढण्याची वारंवारिता अवलंबून असते.
- जर बाळाला गॅस होत असेल किंवा बाळ उलटी करत असेल तर ३० मिली बाटलीचे दूध पाजल्यानंतर बाळाची ढेकर काढा किंवा ५ मिनिटे स्तनपानानंतर बाळाची ढेकर काढू शकता.
- जर काही मिनिटे प्रयत्न करून सुद्धा बाळाने ढेकर काढली नाही तर तुम्ही ढेकर काढण्याचे तंत्र बदलू शकता.
ढेकर काढताना बाळाला उलटी झाल्यास काय करावे?
ढेकर काढण्याच्या तंत्रामुळे बाळ फॉर्मुला दूध किंवा स्तनपानाचे दूध उलटी करून बाहेर काढू शकते.
तुमच्या बाळाने उलटी केल्यास घ्यावयाची काळजी –
- जर बाळ बाटलीपासून किंवा स्तनापासून तोंड फिरवत असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला भरवणे थांबवले पाहिजे. जर बाळाला जास्त प्रमाणात भरवले तर बाळ ते थुंकून टाकण्याचा किंवा उलटी करण्याचा धोका असतो.
- बाळाला भरवल्यानंतर तुम्ही बाळाला उभे धरू शकता.
- जर तुमचे बाळ दूध पाजल्यानंतर ते तोंडातून बाहेर टाकत असेल तर तुम्ही दुधाचा प्रत्येक औन्स पाजल्यानंतर बाळाची ढेकर काढली पाहिजे.
- बाळाच्या पाठीवर तुम्ही वर्तुळाकार हात फिरवत राहा.
- जर तुम्ही बाळाला बाटलीने दूध पाजत असाल तर बाटलीच्या निपलचे छिद्र खूप लहान किंवा खूप मोठे नसावे.
ढेकर काढताना बाळे का रडतात
जेव्हा बाळ दूध किंवा फॉर्मुला पिताना खूप जास्त प्रमाणात हवा आत घेते, त्यामुळे बाळ अस्वस्थ होते आणि रडू लागते. बाळाने उलटी केल्यानंतर सुद्धा ते रडू लागते. (Gastrointestinal reflux )
बाळाला दूध पाजताना उभे धरून वारंवार ढेकर काढल्याने मदत होऊ शकते.
जर बाळ ढेकर काढत नसेल तर काय करावे?
बाळाला भरवताना आणि भरवून झाल्यावर नियमित अंतराने ढेकर काढावेत. तुम्ही बाळाचे ढेकर काढण्यासाठी वेगवेगळी तंत्र वापरू शकता. बाळाने ढेकर काढला नाही तरी हरकत नाही परंतु बाळाला उलटी होऊ नये. जर एकदा किंवा दोनदा उलटी झाली तर तरी काळजीचे कारण नाही. जर बाळ आनंदी आणि आरामदायी असेल तर बाळाने ढेकर काढली नाही तरी काळजीचे कारण नाही. त्यामुळे भरवल्यानंतर बाळ कसे आहे ह्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.
बाळाची ढेकर काढणे केव्हा थांबवले पाहिजे?
ढेकर काढायचे थांबवण्याचे असे काही विशिष्ट वय नाही, बाळाची पचनसंस्था विकसित होते आणि मग ढेकर काढायची गरज उरत नाही. जेव्हा बाळ २-३ वर्षांचे होते तेव्हा अगदी नियमित ढेकर काढण्याची गरज भासत नाही. जेव्हा बाळे बसायला लागतात आणि स्वतःचे स्वतः ढेकर काढतात.
बाळाची ढेकर काढतानाच्या काही उत्तम टिप्स
- बाळाकडे लक्ष ठेवा, बाळाला गॅस झाला आहे का हे लक्षात आल्यावर बाळाची ढेकर काढावी.
- बाळाची ढेकर साधारणपणे किती वेळा काढावी लागते ह्याची नोंद ठेवा.
- स्तनपान करणाऱ्या बाळांपेक्षा बाटलीने दूध पिणारी बाळे जास्त ढेकर काढतात. कारण दूध पिताना त्यांच्याकडून जास्त हवा शोषली जाते. परंतु प्रत्येक बाळाचे ढेकर काढण्याचे प्रमाण वेगळे असते.
- काही मिनिटे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा बाळाने ढेकर दिला नाही तर दुसरे तंत्र वापरून बघा. तरीसुद्धा बाळाने ढेकर दिला नाही तर बाळाला जबरदस्ती करू नका.
- जर बाळाला आरामदायी वाटत नसेल तर बाळाला ढेकर काढण्यासाठी जबरदस्ती करू नका.
- ढेकर काढताना बाळाच्या पाठीवर हलकेच चोळा.
- स्तनपान करताना बाळाने स्तनाग्रे नीट घट्ट तोंडात घेतली आहेत ना ते पहा.
- तसेच बाटलीने दूध पिणाऱ्या बाळांसाठी बाटलीचे निपल खूप जास्त मोठे किंवा लहान नाही ना ते पहा. त्यामुळे बाळाच्या पोटात जास्त हवा शोषली जाणार नाही.
- बाळाला एकदम शांत ठिकाणी दूध पाजले पाहिजे किंवा भरवले पाहिजे.
- ढेकर काढताना नाकातोंडातून दूध बाहेर येणे हे सामान्य आहे, पण उलटी झाली तर तुम्ही बालरोगतज्ञांशी संपर्क साधण्याची गरज आहे.
तुम्ही वैद्यकीय सल्ला केव्हा घेतला पाहिजे?
जर बाळाला १००.४ डिग्री पेक्षा जास्त ताप असेल तर, बाळाला जुलाब होत असतील तर, जर बाळाला शौचातून रक्त येत असेल तर किंवा बाळाला खूपच गॅस झाला असेल तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या.
निष्कर्ष: जर तुमच्या बाळाला गॅस झाला असेल परंतु ते नीट खात असेल तर काळजीचे काही कारण नाही. बाळाची पचनसंस्था अजून विकसित होत असते त्यामुळे बाळ ढेकर काढते. जर तुम्हाला डॉक्टरांची मदत घेण्याची गरज भासली तर जरूर घ्या.