Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना योजना आणि तयारी अवरुद्ध संभोग – गर्भनिरोधक पद्धती

अवरुद्ध संभोग – गर्भनिरोधक पद्धती

अवरुद्ध संभोग – गर्भनिरोधक पद्धती

आधुनिक जोडप्यांसाठी गर्भनिरोधक आवश्यक आहेत, कारण अनियोजित गर्भधारणा फक्त धोकादायक नाही तर ती व्यवस्थापित करणे देखील कठीण जाऊ शकते. तसेच खर्चिक देखील असू शकते. आधुनिक काळात असंख्य प्रकारचे गर्भ निरोधक उपलब्ध आहेत. बाजारात अनेक संप्रेरक आधारित गर्भनिरोधक आहेत ते वापरल्यास तुम्हाला खरोखर तुमची इच्छा होईपर्यंत गर्भवती होता येणार नाही. अशी बरीचशी जोडपी आहेत, ज्यांना संप्रेरकांमध्ये असंतुलन नको असते. मग ते काय करतात? तर पुल आउट मेथडवापरतात !

पुल आउट मेथडम्हणजे काय?

पुलआउट मेथड, नावात सूचित केल्याप्रमाणे सामान्यत: लैंगिक संबंधांदरम्यान पुरुष जननेंद्रिय काढून घेण्याची पद्धत म्हणून ओळखले जाते. हे एक लैंगिक तंत्र आहे ज्यामध्ये पुरुष लैंगिक संभोगात व्यत्यय आणतो आणि स्त्रियाच्या शरीराबाहेर स्खलन होण्याआधी ताठ झालेले शिश्न योनीच्या बाहेर खेचतो. ह्या तंत्राद्वारे हे सुनिश्चित होते की पुरुषाचे शुक्राणू स्त्रीच्या स्त्रीबीजापर्यंत पोहोचत नाहीत आणि स्त्री गर्भवती होत नाही.

ही पद्धत कशी वापरायची?

पुलआउट मेथडमध्ये पुरुष लैंगिक संभोगाच्या वेळी शिश्न स्त्रीच्या योनीतून बाहेर काढत असतो आणि त्यामुळे स्खलन होण्यासाठी तात्पुरते ते बाहेर काढले जाते. कार्यक्षमतेने केल्यास, हे तंत्र नको असलेल्या गर्भधारणेची जोखीम कमी करते. हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की ही पद्धत प्रभावी होण्यासाठी पुरुषाने स्खलन होण्यापूर्वी शिश्न पूर्णपणे बाहेर काढले पाहिजे आणि स्त्रीच्या शरीरापासून दूर स्खलन केले पाहिजे.

आपल्यासाठी ही पद्धत उत्कृष्ट कशी करावी?

या तंत्रासाठी लैंगिक संभोगा दरम्यान पुरुष आणि स्त्री दोघांकडून बरेच नियंत्रण आणि इच्छाशक्ती आवश्यक आहे. तसेच मनुष्याला त्याच्या शरीराचे सखोल ज्ञान असणे देखील आवश्यक आहे. या पद्धती तुमच्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्यासाठी, तुम्ही नर आणि मादी च्या शरीराबद्दल विशेषत: पुरुषाच्या जननेंद्रियाबद्दल अधिक जाणून घेण्याची शिफारस केली जाते

पुल आउट मेथडचा वापर करण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्खलनाच्या जवळ पोहचत असल्याच्या भावना ओळखणे. या कारणासाठी पुरुषांना त्यांच्या जननेंद्रिय बद्दलची माहिती तपशीलवार वाचण्याची तसेच नियमितपणे हस्तमैथुनचा करण्याचा सराव करणे गरजेचे असते. हस्तमैथुन माणसाला संभोगाच्या वेळी वाटत असलेल्या विविध संवेदनांविषयी आरामदायक करते. तसेच ह्यामुळे आगामी स्खलन चक्र समजण्यास मदत होते. हे समजून घेतल्यास लैंगिक संबंधांदरम्यान धोक्याची सूचना म्हणून कार्य करेल. आणि स्खलन होण्यापूर्वी काही सेकंद पुरुष जननेंद्रिय पूर्णपणे बाहेर काढू शकेल. पुरुषाचे जननेंद्रिय आणि योनीचे शरीरशास्त्र समजणे देखील अत्यंत आवश्यक मानले जाते. त्यामुळे पुरुषाचे जननेंद्रिय सुरक्षितरित्या आणि वेदना होणार नाहीत अशा पद्धतीने बाहेर खेचता येईल.

ही पद्धती किती परिणामकारक असते?

संपूर्ण हमी देईल असे कोणतेही गर्भनिरोधक साधन नाही. गर्भनिरोधक २०% वेळा आणि कंडोम १५% वेळा अपयशी ठरतात. पुल आउट पद्धतीमुळे गर्भधारणेचे प्रमाण कमी होईल ह्याची खात्री होण्यासाठी पुरुषाने कुठल्याही परिस्थितीत उत्सर्ग होण्याआधी जननेंद्रिय बाहेर खेचले पाहिजे. यामुळे एक मूलभूत प्रश्न उद्भवतो: पुल आउट पद्धत परिणामकरीत्या कार्य करते का? उत्तर आहे: होय, परंतु वीर्याचा एक थेम्ब सुद्धा योनीमध्ये प्रवेश करता कामा नये. जरी एखाद्या सुद्धा शुक्राणूने प्रवेश केला तर गर्भधारणा होऊ शकते. हे सांगण्याची गरज नाही की हे तंत्र अपयशी ठरण्याची शक्यता असल्याने केवळ बॅकअप म्हणून वापरले पाहिजे. अशी शिफारस केली जाते की या तंत्राचा वापर गर्भनिरोधकांच्या इतर पद्धती जसे कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या आणि इतर गर्भनिरोधक साधनांसोबत केला पाहिजे. गर्भधारणेचा सर्वात कमी धोका सुनिश्चित करण्यासाठी, या सर्व पद्धती एकत्र वापरण्याची शिफारस केली जाते. ह्या पद्धतीमध्ये जोखीम जास्त असल्याने त्यासोबत इतर गर्भनिरोधक साधने वापरण्याचा सल्ला दिला जातो.

ही पद्धती किती परिणामकारक असते?

पुल आउट मेथडचे फायदे

गर्भनिरोधक साधन म्हणून हे तंत्र वापरण्याचे बरेच फायदे आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे

1.खर्च

ह्या तंत्रासाठी गर्भनिरोधक गोळ्या किंवा कॉन्डोम ह्या सारख्या कुठल्याच साधनांची गरज नसल्याने हे तंत्र फुकट आहे

2. अंधश्रद्धा

काही संस्कृती आणि धर्मांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या किंवा काँडोम्स वापरणे हे अनैतिक समजले जाते. हे तंत्र ज्यांना अन्य गर्भनिरोधक पद्धती वापरायची नसतात त्यांना शांत करण्याचे कार्य करते

3. रसायनांचा आभाव

कॉन्डोम किंवा गर्भनिरोधक गोळ्या वापरल्यास तुमच्या शरीराला रसायनांचा सामना करावा लागतो. ह्या पद्धतीमुळे रसायनांशी संपर्क येत नाही. नैसर्गिक गर्भनिरोधक साधनांमध्ये सुद्धा रसायनांशी संपर्काचा धोका असतो. हे एकमेव असे तंत्र आहे ज्यामध्ये रसायनांचा आभाव आहे

ह्या पद्धतीचे तोटे

इतर गर्भनिरोधक पद्धतींप्रमाणेच ह्या पद्धतीचे अनेक तोटे आहेत आणि ते म्हणजे

  • अयशस्वी होण्याचा उच्च धोका
  • लैंगिक संक्रमित रोग (एसटीडी) होण्याचा धोका आणि प्रसार
  • अकाली स्खलन किंवा अनियंत्रित स्खलन केव्हा होईल ह्याचा अंदाज बांधता येणे

ही पद्धती तुमच्या साठी योग्य आहे का?

हे तंत्र आपल्यासाठी गर्भनिरोधकाची योग्य पद्धत आहे किंवा नाही हे समजून घेण्यासाठी, त्यासह येणारे धोके समजून घेणे आवश्यक आहे. हे तंत्र गर्भनिरोधकाचे दुय्यम साधन म्हणून सूचविले जाते. ज्यांच्याकडे इतर गर्भनिरोधक पद्धतींना परवानगी नसते त्यांच्यासाठी हे तंत्र केवळ प्राथमिक गर्भनिरोधक म्हणून शिफारस केली जाते

पुल आऊट मेथडमुळे तुम्हाला लैंगिक संबंधांपासून पसरणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते का?

हे तंत्र एसटीडीपासून आपले संरक्षण करेल ह्याची हमी नाही. लैंगिक संबंधादरम्यान एसटीडीचा धोका कमी करण्यासाठी कॉन्डोम वापरण्याचा सल्ला दिला जातो.

जगभरात पुल आऊट मेथड ही गर्भनिरोधक पद्धती वापरली जाते. ही पद्धती तशी धोकादायक आहे आणि यशाची कुठलीही हमी देत नाही. ह्या सोबत इतर गर्भनिरोधक साधने वापरल्यास नको असलेल्या गर्भधारणेचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. हे तंत्र वापरताना जर तुम्ही कॉन्डोम वापरत नसाल तर तुम्ही नियमितपणे एसटीडी साठी तपासणी केली पाहिजे. जर त्याचे निदान लवकर झाले तर त्यावर शक्य तितके परिणामकारक उपचार करता येतात. हर्पिस आणि एड्स सारखे लैंगिक संबंधांमधून पसरणारे आजार बरे होऊ शकत नाहीत हे लक्षात ठेवले पाहिजे.

आणखी वाचा:

गर्भनिरोधक स्पंज – वापर, प्रभावीपणा, फायदे आणि बरंच काही
गर्भधारणा टाळण्यासाठी सुरक्षित काळाची गणना करण्याच्या पद्धती

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article