गर्भधारणा होताना

वयाच्या ३५ नंतर गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत आहात का?

वयाच्या पस्तिशीनंतर गर्भवती होणे अनेक जोडप्यांसाठी एक आव्हान आहे. जितके वय जास्त तितकी स्त्रीबीजांची संख्या कमी हे अभ्यासाद्वारे दर्शवले गेले आहे. आपला प्रजनन दर वयाच्या ३०व्या वर्षापासूनच कमी होऊ लागतो. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो का की मूल होण्यासाठीचे प्रयत्न सोडून दत्तक घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली पाहिजे ? नाही! ३५व्या वर्षानंतर शरीर कसे कार्य करते आणि आनंदी गर्भारपणासाठी काय करावे ह्याची चर्चा आपण इथे करणार आहोत.

वयाचा प्रजननक्षमतेवर परिणाम होतो का?

होय वयाचा प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. वय जसे वाढते तसे मधुमेह आणि उच्चरक्तदाब ह्यासारख्या आजारांचा धोका वाढतो.

वयाच्या ३५ नंतर गरोदरपणात निर्माण होणारी गुंतागुंत

वेगवेगळ्या वैद्यकीय परिस्थितीमुळे ३५ नंतर गरोदरपणात निर्माण होणारे वेगवेगळे धोके विसरू नका. येथे तुम्हाला खालील घटकांबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे-

पस्तिशीनंतर निरोगी गर्भधारणा होण्यासाठी कोणत्या चाचण्या पूर्ण केल्या पाहिजेत?

जन्मपूर्व चाचणी आणि आरोग्याची तपासणी गर्भवती स्त्रियांनी प्राधान्याने करून घेतली पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका आणि तुम्ही गरोदरपणाच्या आधी आणि नंतर खालील चाचण्या केल्या असल्याचे सुनिश्चित करा गर्भधारणा पूर्व चाचण्या: यावेळी उद्भवणाऱ्या दोन मुख्य समस्या म्हणजे प्रजनन समस्या किंवा आहार / मानसिक आरोग्याची समस्या. अशा वेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून आरोग्यतपासणी करणे अत्यावश्यक आहे. गर्भधारणेपूर्वीची चाचणी करून घेतल्याने तुम्ही गर्भधारणेसाठी फिट आहे की नाही हे समजेल.

गर्भधारणेनंतरच्या चाचण्या:

अभिनंदन! तुम्ही गर्भवती आहात आणि आता गर्भधारणेनंतरच्या चाचण्या करण्याची वेळ आली आहे.

तुम्ही गरोदरपणातील समस्या कशा कमी करू शकता?

जर आपण ३५ नंतर गर्भधारणेचा प्रयत्न करीत असाल तर, गर्भारपणातील गुंतागुन कमी करण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता.

गर्भवती होण्यासाठी समस्या असलेल्या महिलांसाठी उपचार

खाली गर्भवती होण्यास त्रास झालेल्या महिलांसाठी उपचार दिले आहेत.
  1. आरोग्यदायी जीवनशैली: निरोगी वजन राखणे, ड्रग्स आणि अल्कोहोल टाळणे आणि निरोगी आहार घेणे आवश्यक आहे. हे पाळल्यास ते तुमच्या प्रजनन समस्येवर उपचार करू शकते आणि नैसर्गिकरित्या ३५ नंतर गर्भवती होणे सोपे करते. तुम्ही आणि तुमचा जोडीदार शारीरिकदृष्ट्या सक्रिय आहात याची खात्री करा.
  2. विश्रांती: आपल्या सर्वांचे आयुष्य व्यस्त असू शकते परंतु मानसिक आणि भावनिकरित्या आराम मिळण्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. ३५ नंतर निरोगी गर्भधारणाहोण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही महिलेसाठी हे नैसर्गिक उपचार आहेत. तुम्ही योग वर्ग, ताई ची, क्यूई गोंग करण्याचा प्रयत्न करू शकता आणि तसेच आर्ट थेरपी करून पाहू शकता.
  3. वैद्यकीय पद्धती: गर्भवती होण्यास त्रास होत असल्यास तुम्ही कृत्रिम रेतन, आयव्हीएफ आणि आयसीएसआय ह्या उपचारपद्धती वापरुन पाहू शकता. हार्मोन थेरपीची देखील शिफारस केली जाते. तथापि, हे लक्षात ठेवा की यापैकी कोणतीही पद्धत यशस्वी गर्भधारणा किंवा गरोदरपणाची हमी देत ​​नाही कारण वय आणि वैयक्तिक प्रोफाइलनुसार यशाचे दर वेगवेगळे असतात

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

निराशा येण्याआधी, कृपया लक्षात ठेवा की तुम्ही ३५ किंवा त्यापेक्षा मोठे असल्यास नैसर्गिकरित्या गर्भधारणेसाठी वेळ लागतो. बाळाचा विचार करण्याआधी जीवनशैली आणि सवयींमध्ये बदल करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणे जरुरीचे आहे. तुमच्या जोडीदारासोबत कोणत्याही प्रजनन समस्यांबद्दल चर्चा करा आणि कपल थेरपीला उपस्थित रहा (संबंधात समस्या येत असल्यास). त्यानंतर, गर्भवती होण्यापूर्वी प्रजनन तज्ञाशी संपर्क साधा आणि आता आपण गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्यास सज्ज आहात. ३५ नंतर गर्भवती होणे अशक्य नाही. खरं तर, तुम्ही निरोगी जीवनशैली आणि स्वत: ची चांगली काळजी घेतल्यास पस्तिशीनंतर गर्भधारणेची शक्यता वाढून ती सत्यात उतरेल. लवकर तयारीस सुरुवात करा. योग्य निर्णय घेतल्याबद्दल पुढे जाऊन तुम्ही स्वतःलाच शाबासकी द्याल! आणखी वाचा: अंतर्गर्भीय साधनांसाठी मार्गदर्शिका (आय.यु.डी.)
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved