अन्य

होळी २०२३: तुमच्या प्रियजनांना होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कोट्स आणि शुभेच्छा संदेश

    In this Article

जेव्हा वसंत ऋतूचा बहर येतो तेव्हा सगळा परिसर उज्ज्वल आणि सुंदर होतो. रंगांच्या उत्सवाची ही वेळ असते. प्रत्येकजण बादलीमध्ये रंग तयार करून पिचकारीने उडवत असतो. दुकानांमध्ये अगदी दिसतील असे समोर वेगवेगळे रंग मांडून ठेवलेले असतात. मिठाईची दुकाने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मिठायांनी सजलेली असतात. असा हा रंगीबेरंगी आणि उत्साहाने भरलेला सण असतो. वाईटावर चांगल्या गोष्टींचाच विजय होतो हे दाखवण्यासाठी होळी साजरी केली जाते. असे म्हटले जाते की, हिरण्यकश्यपू राक्षसाने आपला मुलगा प्रल्हादला बहिण होलिकासमवेत बसवून जाळून खाक करण्याचा प्रयत्न केला. होलिकाकडे अग्नीपासून वाचण्याचे साधन होते. पण प्रल्हाद हा विष्णूभक्त असल्याने परमेश्वराच्या नावाचा जयघोष करतो आणि अग्नीपासून वाचतो. होलिका जळून खाक होते. सण साजरा करण्यासाठी रंग वापरले जातात कारण श्रीकृष्णाने राधा त्यांच्यासारखी दिसावी म्हणून राधेला रंग लावले होते.

होळीचा सण साजरा करताना जे प्रियजन दूर आहेत आणि वैयक्तिक रित्या येऊ शकत नाहीत अशांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी ह्या लेखात काही शुभेच्छा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे कोट्स आणि शब्द वापरून त्यांच्यापर्यंत रंग आणि प्रेम पाठवा.

तुमचे मित्र मैत्रिणी आणि कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी होळीचे खास कोट्स आणि संदेश

1. येथे काही खूप छान आणि प्रेमळ कोट्स आहेत जे तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांना शुभेच्छा देण्यासाठी पाठवू शकता

2. हा होळीचा सण रंगांसोबत तुमच्या आयुष्यात आनंद, शांती आणि प्रेम घेऊन येवो! होळीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा!

3. प्रेम आणि विश्वासाच्या रंगात न्हाऊन काढणारा होळीचा सण आला आहे! होळीच्या तुम्हाला खूप हार्दिक शुभेच्छा!

4. रंगांसह प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे होळी. तुम्हाला लावले गेलेले सर्व रंग प्रेमाचे आहेत. तुम्हाला होळीच्या शुभेच्छा!

5. नृत्य करा, गाणी म्हणा आणि आनंद घ्या! रंगांचा उत्सव जवळ आला आहे! होळीच्या शुभेच्छा!

6. आनंदाचे, मैत्रीचे, प्रेमाचे रंग घेऊन ही होळी येवो. होळीच्या तुम्हाला खूप हार्दिक शुभेच्छा!

7. आपल्या सुंदर नात्याचा रंग साजरा करत, मी तुम्हाला आणि तुमच्या परिवारास रंगीबेरंगी होळीच्या शुभेच्छा देतो.

8. देव तुमच्या जीवनाचा कॅनव्हास आनंद, प्रेम, आनंद, समृद्धी, चांगले आरोग्य आणि यश या रंगांनी रंगवू दे. तुम्हाला होळीच्या शुभेच्छा!

9. जीवन हा सर्वात रंगीबेरंगी उत्सव आहे, म्हणून होळीचा संपूर्ण दिवस आनंदाने घालवूयात. होळीच्या खूप शुभेच्छा!

10. सर्व नकारात्मकता जाळून टाकूया आणि जीवनात सकारात्मकता आणूया. उत्साही रंगांनी ही होळी साजरी करूयात. होळीच्या तुम्हाला खूप हार्दिक शुभेच्छा!

11. आपले बॉस आणि सहकाऱ्यांना पाठवण्यासाठी पुढील शुभेच्छा - तेजस्वी रंगानी तुमचे आयुष्य उजळून जावो. रंगांचा हा उत्सव आपणासाठी आनंदात जावो! होळीच्या शुभेच्छा!

12. आपण आनंद आणि रंग पसरवूया, उत्सव काळात आणि कायम आपणास शांती आणि आनंद मिळो!

13. खऱ्या आणि काळजी घेणाऱ्या नात्यात मोठमोठ्याने बोलण्याची गरज नाही, एक मर्मभाषी संदेश आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसा आहे. होळीच्या सणाचा आनंद घेऊयात. होळीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा!

14. एकत्र साजऱ्या केलेल्या होळीच्या सणाचे क्षण जपून ठेवूया. होळीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा!

15. राग, तिरस्कार टाकून देऊन प्रेम, आनंद वाटूया! होळीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा!

16. आपल्या शिक्षकांना होळीसाठी शुभेच्छा पाठवण्यासाठी हा एक विचारवंत संदेश आहे - होळी प्रत्येकाच्या जीवनात रंग पसरवते, परंतु शिक्षक आपल्या आयुष्यात खरे ज्ञान पसरवतात. सर होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

17. रंगांशिवाय फुले सुंदर दिसत नाहीत       आनंदाशिवाय आयुष्य दुःखी होईल       होळीच्या शुभेच्छा!

18. तुम्ही नेहमी निरोगी, समाधानी आणि आनंदी रहा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

19. तुम्ही तुमच्या परिवारासोबत रंगांचा आनंद घ्या आणि नृत्य करा, होळी जवळ आली आहे, ही आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट संधी आहे!

20. आनंद, सुख, शांती,आरोग्य घेउनी दुःख, निराशा दूर सारुनी होळीचा सण हा आला चला साजरा करूया, एकत्र येऊनी होळीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!

होळी सणादरम्यान आपण आपले वय, सांस्कृतिक फरक आणि समुदाय विसरतो. लोक एकत्र येतात आणि रंग लावून, मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करतात. परंपरेने, उत्सव तीन दिवस चालतो. आजकाल रासायनिक रंग बाजारात आलेले आहेत. त्यामुळे एकमेकांना रंग लावताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. रंग लावताना इतरांचा आदर करणे देखील आवश्यक आहे. आशा आहे की ही होळी आपल्यासाठी सुरक्षित आणि आनंददायी असेल. आनंद घेऊन येणाऱ्या ह्या रंगीबेरंगी उत्सवाच्या तुम्हाला शुभेच्छा!

आणखी वाचा:

लहान मुलांसाठी होळीच्या सणाविषयीची मनोरंजक तथ्ये होळीचा सण साजरा करताना तुमच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी टिप्स
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved