प्रीस्कूलर (३-५ वर्षे)

तुमच्या मुलांसाठी भारतीय स्वातंत्र्यदिनाविषयी मनोरंजक माहिती

भारतात दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध जाती, धर्म, आणि लिंगाचे लोक हा उत्सव साजरा करतात. परंतु या पिढीतील मुलांना भारताने स्वातंत्र्य कसे मिळवले हे माहित नाही - आपल्या मुलांना भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षाबद्दल बरेच काही शिकता येईल. भारतीय स्वातंत्र्यदिनाबद्दल तुमच्या मुलांना काही मनोरंजक तथ्ये माहिती होण्यासाठी हा लेख वाचा.

आपण स्वातंत्र्य दिन कधी आणि का साजरा करतो?

भारतीय जनता ब्रिटिश राजवटीच्या अधिपत्याखाली होती आणि म्हणून त्यांनी १९२९ मध्ये २६ जानेवारी १९३० रोजी ब्रिटिशांकडून पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, ब्रिटिशांना हे मान्य नव्हते आणि त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत भारतावर राज्य केले. १८ जुलै १९४७ रोजी ब्रिटीशांनी एक कायदा मंजूर केला होता ज्यामध्ये असे म्हटले होते की १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत एक स्वतंत्र देश बनेल आणि तो ब्रिटिश साम्राज्याचा भाग नसेल. अशा प्रकारे, भारताने नंतरच्या तारखेला स्वातंत्र्य मिळवले आणि तेव्हापासून, दरवर्षी १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी ही तारीख नंतरही लक्षात ठेवली गेली आणि नंतर १९५० मध्ये त्या तारखेला भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. स्वातंत्र्य दिन हा आमच्या नेत्यांनी दिलेल्या त्यागाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो जेणेकरून आपण एक सजग नागरिक म्हणून जगू शकू.

भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा इतिहास

१६०० व्या दशकात ब्रिटिश, व्यापारी म्हणून भारतात आले आणि त्यांना शक्तिशाली भारतीय सम्राट जहांगीरने व्यापाराचे अधिकार दिले. भारतावर तेव्हा मुघलांचे राज्य होते. मुघल साम्राज्य ब्रिटिशांसाठी खूप शक्तिशाली होते. जेव्हा मुघल साम्राज्याचे विघटन झाले तेव्हाच ब्रिटिशांनी भारताचे छोटे भाग जिंकण्यास सुरुवात केली. १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईपासून सुरुवात करून, ब्रिटिशांनी १८५७ पर्यंत संपूर्ण भारतात वेगाने विस्तार करण्यास सुरुवात केली. १८५७ मध्ये, भारतीय ब्रिटिशांना कंटाळले होते आणि संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर उठाव झाला. ह्या उठावामध्ये विविध पार्श्वभूमीचे भारतीय नेते ब्रिटिशांविरुद्ध लढले. ही स्वातंत्र्याची पहिली लढाई म्हणून प्रसिद्ध आहे आणि ब्रिटीशांनी यानंतर भारतातील इतर प्रदेशांमध्ये विस्तार करणे बंद केले. स्वातंत्र्य चळवळ असूनही ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले. स्वातंत्र्याच्या लढ्याने राष्ट्राला एकत्र आणले. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी ब्रिटिशांना भारत सोडून जाण्यास भाग पाडण्यासाठी अनेक हालचाली सुरू केल्या. १८४५ पर्यंत, दुसरे महायुद्ध झाल्यामुळे ब्रिटिश अर्थव्यवस्था नष्ट झाली होती. तथापि, ह्या आनंदाच्या दिवशी, भारत - पाकिस्तान फाळणी होऊन भारत देश विभागला गेला.

१५ ऑगस्ट हा दिवस भारतात मुले कसा साजरा करतात?

देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिन हा दिवस भारतातील राष्ट्रीय सुट्टीचा दिवस आहे. परंतु शाळांमध्ये हा दिवस एक किंवा दोन दिवस साजरा केला जातो. शाळांमध्ये, मुले देशभक्तीची गाणी गाऊन, भाषण वाचून आणि देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य करून भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतात. हम सब भारतीय हैं, वंदे मातरम, हम होंगे कामयाब अशी गाणी या दिवशी गायली जातात. भारताचा ध्वज फडकतो, मुले राष्ट्रगीत गातात. शेवटी मिठाई वाटली जाते. १५ ऑगस्टला प्रत्येक मुलाच्या हातात भारतीय ध्वज दिसतो. आजूबाजूच्या परिसरात मुले सायकल सुद्धा चालवतात. सायकलचा वेग जसा वाढतो तसा सायकलवर लावलेला झेंडा फडकत राहतो.

भारतीय स्वातंत्र्यदिनाबद्दलची रोचक माहिती

भारताच्या स्वातंत्र्यदिनाबद्दल काही छान छान तथ्ये येथे आहेत ती तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकता
भारतीय स्वातंत्र्यदिनाबद्दलच्या ह्या गोष्टी लोकांना फारशा माहिती नाहीत. आपल्या मुलाला हे सर्व सांगा जेणेकरून त्याला आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल माहिती होईल आणि तो राष्ट्राचा आदर करेल. जर आमच्याकडून स्वातंत्र्यदिनाबद्दल काही सांगायचे राहिले असेल तर टिप्पण्यांमध्ये कळवा! आणखी वाचा: मुलांसाठी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाच्या तयारीसाठी काही टिप्स मुलांसाठी सर्वात लोकप्रिय १० मराठी देशभक्तीपर गीते
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved