मोठी मुले (५-८ वर्षे)

तुमच्या लहान मुलाला स्वतंत्र बनवण्यासाठी १० परिणामकारक टिप्स

लहान मुले वक्तशीरपणा किंवा कृती समजून घेण्यासाठी खूप लहान असतात. पालकांनी ह्या गोष्टी त्यांना समजून सांगणे खूप महत्वाचे असते. तुमचे लहान मूल छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुमच्यावर अवलंबून असू शकते. तुम्ही त्याला जोपर्यंत स्वतःहून काही छोटी कामे करण्याचे, चुका करण्याचे आणि त्यातून शिकण्याचे स्वातंत्र्य देत नाही तोपर्यंत त्याला साध्या गोष्टींसाठी तुमची गरज भासू शकते. मुलाची वाढ होत असताना तुम्ही योग्य मार्गाने त्याला स्वावलंबी करणे गरजेचे असते, नाही तर त्याला ती शिक्षा वाटू शकते. पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला योग्य वळण लावू शकता आणि स्वतंत्र बनवू शकता.

लहान मुलांनी स्वतंत्र व्हायला का शिकले पाहिजे?

तुमचे मूल सध्या खूप लहान आहे, परंतु पुढे तो एक कार्यक्षम प्रौढ होईल. आयुष्याच्या सुरुवातीस काही जीवन कौशल्ये शिकणे त्याला प्रौढत्वाच्या गरजा हाताळण्यासाठी तयार करू शकते.

आपल्या मुलाला स्वतंत्र होण्यास कसे शिकवावे?

तुमचे मूल बालपणाचा आनंद घेत असताना तुमच्या मुलाला स्वतंत्र होण्यासाठी प्रशिक्षित करण्याचे अनेक मार्ग आहेत.

१. तो हाताळू शकेल अशा जबाबदाऱ्या त्याला द्या

तुमच्या मुलाने घराचे आर्थिक व्यवहार सुरू करण्याची आणि मोठे निर्णय घेण्याची गरज नाही. स्वातंत्र्याची सुरुवात छोट्या गोष्टींपासून व्हायला हवी आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाला मदत करू शकता. जर तुम्ही पिकनिकची योजना आखत असाल आणि तुमच्या मुलाला त्यात तुम्हाला मदत करण्याची इच्छा असेल, तर त्याला तुम्हाला लागणाऱ्या वस्तूंची यादी बनवणे, विकेंड ट्रीपसाठी स्वतःची बॅग पॅक करणे ह्यासारखी छोटी कामे द्या.

२. तुमच्या मुलाला सतत मार्गदर्शन करणे टाळा

बरेच पालक मुलांना सतत मार्गदर्शन करत असतात. मुलाने काहीतरी चूक केली असेल किंवा मूल  एखादे काम करण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घेत असेल तर त्याच्या कृतींमध्ये सतत हस्तक्षेप करतात. जेव्हा तुमचे मूल लहान असते, तेव्हा त्याला काही सूचना देऊन मार्गदर्शन करणे चांगले असते. सूचना दिल्यामुळे एखादे काम तुमचे मूल अधिक सोप्या पद्धतीने काम पूर्ण करु शकते. पण जसजसे तुमचे मूल मोठे होऊ लागते तसे त्याला मदत हवी असल्यास त्याला तुमच्याकडे येऊ द्या.

३. मर्यादित पर्यायांमधून निवड करण्यास सांगा

आपल्या मुलाला रेस्टॉरंटमध्ये काय खायला आवडेल हे विचारणे त्याच्यासाठी खूप जास्त होऊ शकते कारण रेस्टॉरंटचा मेनू खूप विस्तृत असतो. त्याऐवजी, असलेल्या मेनूमधून अनेक पर्याय निवडा आणि  निवडलेल्या पर्यायांमधून योग्य मेनू निवडण्यास सांगा. मर्यादित पर्यायांमधून त्याला निवड करणे सोपे जाईल.

४. तुमच्या मुलाला वेळोवेळी त्याचे स्वतःचे निर्णय घेऊ द्या

तुमचे मूल खेळण्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी तुम्ही त्याचा गृहपाठ करून घेण्यास प्राधान्य देऊ शकता. पण त्याला आधी खेळून मग गृहपाठ पूर्ण करायला जास्त आवडेल. तुमच्या मुलाला लहान गोष्टींमध्ये काही प्रमाणात स्वातंत्र्य द्या, उदा: संध्याकाळी काय घालायचे किंवा कोणता नाश्ता खावा हे त्याचे त्याला ठरवू द्या. आणि जोपर्यंत तो सर्व कामे पूर्ण करतो आहे तोपर्यंत तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये.

५. तुमच्या मुलाबद्दल सहानुभूती बाळगा

तुमचे मूल नुकतेच स्वतंत्र व्हायला शिकत आहे, त्यामुळे त्याच्यासाठी हे सोपे नाही. त्याला रागावणे टाळा.  जरी तो अगदी सोप्या गोष्टी करण्यात अयशस्वी झाला तरीही त्याला मदत करा. त्याच्यावर टीका करू नका.

६. अपयशाला मोठी समस्या बनवू नका

काही वेळेला तुमचे मूल एखाद्या गोष्टीत अयशस्वी होऊ शकते. साहजिकच तो निराश होईल. अश्या वेळी त्याचे सांत्वन करा. अपयश आले तरी काही हरकत नाही हे त्याला कळू द्या. त्याला त्या अपयशास तोंड देण्यास शिकवा. आणि पुन्हा प्रयत्न करण्यास सांगा.  तुमच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून तो पुन्हा अपयशी होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, त्याला त्याच्या चुकांमधून शिकू द्या. तुमचे मूल काय चांगले करू शकते हे त्याला कळूद्या, परंतु अपयश त्याच्याशी जोडू नका. यामुळे त्याच्या आत्मसन्मान कमी होऊ शकतो.

७. तुमच्या मुलाला स्वतंत्रपणे समस्या सोडवायला शिकवा

शाळा, भावंडे, मित्रमैत्रिणी यांच्याविषयी असलेल्या समस्या त्याच्या त्याला सोडवू द्या. त्यामध्ये तुम्ही त्याला मदत करू शकत नाही. गरज भासल्यास त्याला वेगळा दृष्टिकोन देऊन त्याचे मार्गदर्शन करा.

८. एक योग्य दिनचर्या तयार करा

मुलांनी क्रमाने विचार न केल्यास त्यांना स्वतःसाठी निर्णय घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यांच्यासाठी एक निश्चित दिनचर्या तयार करा. एखाद्या विशिष्ट दिवशी आणि विशिष्ट वेळी काय करण्याची गरज आहे हे आपल्या मुलाला कळले की, तो सर्व गोष्टी स्वतःहून करण्यास सुरुवात करेल.

९. वाटाघाटी शिकवा

अनेक मुले हारणे किंवा जिंकणे ह्यालाच जीवन मानतात. मुलांना तडजोड आणि वाटाघाटी करण्यास शिकवा. जेणेकरून तो त्याच्यासमोर मांडलेल्या परिस्थितीचा सर्वोत्तम उपयोग करू शकेल. त्याला पिकनिकचे ठिकाण किंवा पिकनिक लंच ह्या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्यास सांगा.  असे केल्याने त्याला स्वतःच्या आवडीनिवडीना सुद्धा प्राधान्य देता येईल.

१०. प्रोत्साहन देण्यास विसरू नका

जेव्हा तुमचे मूल सांगितलेल्या गोष्टी योग्य मार्गाने आणि स्वतःहून करते तेव्हा तुम्हाला त्याचा किती अभिमान वाटतो हे सांगण्यास अजिबात संकोच करू नका. तुमच्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य पद्धतीने आकार देण्यासाठी सकारात्मक अभिप्राय आवश्यक आहे आणि त्या संदर्भात पालकांचे त्यांच्या सोबत असणे खूप महत्वाचे असते. लहान मुलांना स्वतंत्र बनवणे आणि त्यांना स्वतःहून काही क्रियाकलाप करायला शिकवणे यात खूप फरक आहे. पण एकदा तुमच्या मुलाला शाळेतील वातावरणाची सवय झाली की तुम्ही त्याला स्वतःहून साधे उपक्रम करायला सांगू शकता. असे करून तुम्ही त्याला हळूहळू स्वतंत्र बनवू शकता. आणखी वाचा: हट्टी मुलांना हाताळण्याचे प्रभावी मार्ग मुलांना योग्य प्रकारे ‘ नाही ‘ कसे म्हणावे
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved