दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

तुमच्या १२ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या कदाचित लक्षात आले असेल की प्रत्येक महिन्याला किंबहुना प्रत्येक आठवड्याला तुमच्या बाळाच्या शरीरात खूप बदल होत असतात. बाळाची शारीरिक वाढ आणि विकासाच्या दृष्टीने ही खूप अचंबित करणारी प्रक्रिया आहे. तुमचे बाळ आता इकडे तिकडे दुडूदुडू धावू लागते. त्यांची संपूर्ण स्वरक्षमता वापरून ते 'आई' अशी हाक मारू. लागेल. जर बाळ अजूनही रांगत असेल तर काळजी करण्याचे काहीही कारण नाही. तुमचे बाळ लवकरच चालायला लागेल आणि धावू लागेल.

बाळाची वाढ

तुमच्या बाळाची शारीरिक वाढ होताना बाळाचा स्वतःचा वेग असेल आणि प्रत्येक महिन्याला तुमच्यासाठी नवीन आश्चर्य बाळ घेऊन येणार आहे आणि नवीन गोष्टींची तुम्ही वाट पाहणार आहात.

बाळाचा विकास

तुमचे बाळ विकासाच्या १२ महिन्यांच्या टप्प्यावर पोहोचले आहे. ह्या टप्प्यावर बाळाला मूलभूत सूचना समजतात आणि बाळ थोडेसे चालू शकते. बाळ कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतर ओळखीचे चेहरे ओळखू शकते तसेच आवडीच्या गोष्टींकडे आनंदाने बोट दाखवते. बाळाची बडबड अखंड चालू राहते तसेच आजूबाजूच्या जगाचा बाळ अखंड शोध घेत राहते. आता आणखी विकासाचे टप्पे बाळ पार करणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तयार रहा. तुमचे बाळ आता हळूहळू चालू लागले आहे आणि बाळामधील होणाऱ्या ह्या बदलांसाठी तुम्ही खूप उत्सुक आहात. बाळाची बडबड आता नुसती बडबड राहिली नसून त्याचे अर्थपूर्ण शब्द आणि वाक्यांमध्ये रूपांतर झाले आहे. बाळाचे रांगण्याचे रूपांतर छोटी छोटी पावले टाकण्यात झाले आहे. तुमच्या ११ महिन्यांच्या बाळाकडून तुम्ही पुढील विकासाचे टप्पे अपेक्षित धरू शकता. तुमचे बाळ चालू लागेल परंतु जवळ असणाऱ्या गोष्टींचा आधार घेऊन ते चालू लागेल. जर त्यांना स्वतःहून चालायचे नसेल तरी सुद्धा हरकत नाही. बाळ लवकरच स्वतःचे स्वतः चालू लागेल. बाळाचे बोबडे बोल आता लवकरच प्रश्न उत्तरे होतील आणि ते मोठ्या माणसांसारखे व्यक्त होणे असेल. आपण यशस्वीरीत्या टप्पा पार केला आहात! तुमचे बाळ आता १२ महिन्यांचे झाले आहे आणि त्याचा तुम्हाला अभिमान आहे. तुम्ही तुमच्या बाळाचे बाटलीने दूध पिणे हळूहळू बंद केले पाहिजे आणि मोठ्या माणसांसारखे बाळासाठी आता जेवणाच्या पर्यायांचा विचार केला पाहिजे. फक्त झोपताना बाळाला बाटलीने दूध दिले तर चालेल परंतु हळू हळू कपने दूध पिण्याची बाळाला सवय लावली पाहिजे आणि झोपताना बाळासाठी गोष्टी वाचल्यास बाळाला मजा येईल. बाळाच्या बोलण्याचा विचार केल्यास बाळाचे बोलणे आता अर्थपूर्ण शब्दांमध्ये रूपांतरित झालेले असेल होणं ना? बाळाच्या बडबडीला प्रोत्साहन द्या. बाळाच्या तोंडातून येणाऱ्या प्रत्येक आवाजाला प्रतिक्रिया द्या आणि प्रोत्साहित करा. हो तुमचे बाळ आता चालू लागले आहे. बाळाचे वजन आता त्यांच्या जन्माच्या वजनाच्या तिप्पट झाले आहे. बाळाच्या वजनात वाढ झाली आहे आणि बाळाच्या पायांचे स्नायू मजबूत झाले आहेत. साधारणपणे वयाच्या १२ ते १३ महिन्यादरम्यान बाळ पहिले पाऊल टाकते. बाळाचा शब्दसंग्रह विकसित झाला आहे आणि तुम्ही "आई बागेत जात आहे " असे म्हणण्याऐवजी " मी बागेत जात आहे" अशा शब्दप्रयोगांचा वापर केला पाहिजे. तुमचे बाळ वर्षाचे होण्यास आता फक्त एक आठवड्याचा कालावधी आहे आणि तुम्ही तुमच्या बाळाचे स्तनपान सोडवण्याचा प्रयत्न करीत आहात, त्याला चालण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी प्रोत्साहन देत आहात. त्यांना बाटली सोडणे कठीण जाईल परंतु तुम्ही दुधामध्ये पाणी घालून नंतर हळूहळू बाळाला कप ची सवय लावा. लक्षात ठेवा त्यांची सगळी ऊर्जा कारणी लागण्यासाठी त्यांना दिवसभर सक्रिय ठेवा. तुमचे बाळ आता खूप सक्रिय झाल्यामुळे त्यास खूप आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. उदा: तुमचे बाळ आणि कुटुंबातील तुमचा सदस्य असलेला कुत्रा दूर ठेवले पाहिजेत. कॉटचे दांडे झोका म्हणून वापरेल.

बाळाचे आरोग्य

तुमच्या बाळाचे वजन वाढले आहे आणि बाळाच्या स्नायू मजबूत झाले आहेत त्यामुळे त्यांच्या छोट्याशा शरीराला पेलण्याची ताकद बाळाला येते. बरीच बाळे ह्या टप्प्यावर २५ सेमी इतकी वाढतात. बाळ ह्या कालावधीत सक्रिय असल्यामुळे त्यांचे वजन कमी होते आणि ते चांगले आहे. बाळ उंच आणि बारीक होते कारण ह्या काळात बाळाचा खूप व्यायाम होतो.

बाळाच्या विकासाचे टप्पे - १२ महिने

तीन प्रकारच्या विकासावर तुमचे लक्ष असले पाहिजे - आकलन, शारीरिक आणि सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे

वर्तणूक

तुमच्या लक्षात येईल की ह्या वयात आई दूर गेली की बाळ चिंतीत होते. त्यांना आजूबाजूच्या गोष्टींचा अभ्यास करायचा असतो तसेच त्यांना तुम्ही दूर तर जाणार नाही ना ह्याची चिंता सुद्धा वाटत राहते. काही बाळे ही खूप लाजाळू असतात तर काही लगेच मिसळतात. तुमच्या बाळाला खूप जास्त जबरदस्ती करू नका, त्यांना पाहिजे तेवढा वेळ घेऊ द्या. काही वेळा बाळ चिडचिड करते कारण त्यांना नवीन झोपेच्या वेळापत्रकानुसार स्वतःला समायोजित करावे लागते तसेच बाटली सोडण्याचाही बाळाला त्रास होतो. बऱ्याच वेळेला बाळाला विशिष्ट पदार्थच आवडतात.

१२ महिन्यांच्या बाळाचे क्रियाकलाप

क्रियाकल्पांमुळे बाळाचे वेगवेगळे कौशल्य वाढते आणि त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला मजा वाटते

१२ महिन्यांच्या बाळाची काळजी

तुमच्या बाळाची पथ्ये वाढीच्या प्रत्येक बदलत असतात आणि १२ महिन्याच्या वाढीचा टप्पा हा काही ह्यास अपवाद नाही. तुमच्या बाळाच्या नवीन रूपाचा तुम्हाला सामना करावा लागेल कारण बाळाला नवीन गोष्टी खाण्यासाठी हव्या असतील कारण बाळाचे बाटलीने दूध पिणे बंद झाले असेल तसेच बाळाचा दिनक्रम सुद्धा बदलेला असेल कारण त्यांना लक्षात येईल की नुसते झोपून राहण्यापेक्षा जगात खूप काही गोष्टी नवीन शिकण्यासारख्या आहेत. बाळाच्या पायांना संरक्षण मिळावे म्हणून नवीन शूज आणण्याची सुद्धा गरज निर्माण झाली आहे, लक्षात ठेवा की मऊ टाचेच्या किंवा लाईट व आवाजाचे शूज बाळासाठी घेणे चांगले त्यामुळे बाळाला आणखी चालण्यासाठी प्रोत्साहन मिळते! पुनहा मानसशास्त्राचा अभ्यास इथे सुरु होतो. आता बाळ सगळ्या प्रकारचे नवीन अन्नपदार्थ खात असते आणि त्यांचे दात आता ठळक दिसू लागतात. बाळाचे दात मऊ ब्रश ने घासण्यास सुरुवात करणे चांगले किंवा त्यासाठी मऊ आणि स्वच्छ कापड वापरले तरी चालेल. तसेच तुमच्या बाळाची दंतवैद्यांशी पहिली भेट ठरवून ठेवा.

बाळाला भरवणे

ह्या काळात तुम्ही स्तनपानाऐवजी बाळाला फॉर्मुला किंवा गाईचे दूध देऊ शकता. कमी चरबीचे दूध वापरू नका कारण बाळाला वाढीसाठी चरबीची गरज असते. ह्याचा संदर्भ तुमच्या बाळाच्या मेंदूच्या आणि शरीराच्या विकासाशी आहे. आधी सांगितल्याप्रमाणे ह्या काळात बाळाची बाटली बंद करून कप वापरण्यास सुरुवात करू शकता आणि तुमच्या डॉक्टरांशी बोलून बाळाला प्युरी किंवा घनपदार्थ सुद्धा देऊ शकता. बाळाला भरवण्याची वेळ ही खूप मजेशीर आणि तुमचे बाळ त्याची वाट बघू लागते. बाळाला तोंडात टाकायला थोडा नाश्ता दिला तर परिस्थिती आणखी चांगली होते. आता तुमचे बाळ मोठे अन्नपदार्थ खाऊ लागते त्यामुळे बाळाच्या घशात काही अडकणार तर नाही ना ह्यावर जेवणाच्या वेळी लक्ष दिले पाहिजे. मध हा एक अन्नपदार्थाचा पर्याय आहे.

बाळाची झोप

तुमचे बाळ आधीपेक्षा कमी वेळ झोपेल. त्यांची झोप तर कमी होतेच पण त्यांना नवीन गोष्टी जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते, कारण बाळाने नुकतीच चालण्यास सुरुवात केलेली असते. अजिबात काळजी करू नका कारण हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे आणि ही त्यांची टॉडलर बनण्याकडे वाटचाल सुरु असून त्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठी हे गरजेचे आहे. आधीप्रमाणे बाळ सकाळी झोपणार नाही आणि तुम्हाला तुमचा दिनक्रम नीट आखून बाळाला अधिक क्रियाकलाप दिले पाहिजेत ज्या त्यांच्या नवीन दिनक्रमासाठी योग्य असतील. बाळ २ वर्षांचे होईपर्यंत त्यांना १४ तासांची झोप मिळाली पाहिजे. तुमच्या बाळाला २ वर्षांचे होईपर्यंत ९० मिनिटे किंवा ३ तासांची झोप मिळणे आवश्यक आहे कारण त्यांना दिवसातून तेवढा आराम मिळणे गरजेचे आहे. तसेच आता इथूनपुढे तुम्हाला थोडा वेळ स्वतःसाठी आणि आरामासाठी मिळणार आहे.

पालकांसाठी टिप्स

पालकत्वाच्या प्रवासात दिशा मिळण्यासाठी काही टिप्स महत्वाच्या आहेत कारण तुमच्या १ वर्षाच्या बाळाच्या प्रगतीस प्रोत्साहन मिळावे म्हणून तुम्हाला काही गोष्टी केल्या पाहिजेत. इथे काही टिप्स दिल्या आहेत त्या तुमच्या पालकत्वाच्या प्रवासात तुम्हाला उपयोगी पडतील. तुमच्या लहान बाळाचा नवीन प्रवास सुरु झाला आहे आणि ते ह्या नवीन जगात रुळत आहे. लवकरच, तुमच्या आयुष्यात एक छोटासा सदस्य असणार आहे जो त्यांच्या गरजा आणि मागण्या तुम्हाला सांगणार आहे आणि अनेक मार्गानी तुमच्याबद्दल वाटणारी आपुलकी दर्शवणार आहे. ह्या टप्प्याचा आनंद घ्या आणि तुमच्या बाळाची काळजी घेताना वरील गोष्टी जरूर विचारात घ्या.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved