दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

तुमचे ४५ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमचे बाळ आता ४५ आठवड्यांचे झालेले आहे. म्हणजेच बाळाचे वय आता ११ महिने आणि २ आठवडे इतके आहे. तुमचे बाळ आता मोठे झाले आहे. त्याला त्याच्या आसपासच्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास अधिक रस आहे. तुम्ही मोठ्यांदा 'नाही' म्हणेपर्यंत तो त्याचा दुधाचा कप खाली आपटेल किंवा तुमचे केस ओढत राहील. ह्या वयात बाळाचे मोठ्यांदा रडणे, तुम्हाला चिकटून राहणे किंवा विक्षिप्तपणा ह्यासारख्या इतर गोष्टींकडे तुम्हाला लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु ह्या वयात बाळाचा आत्मविश्वास वाढलेला असेल आणि तो अधिक स्वतंत्र होईल. बाळ रांगू लागेल तसेच स्वतःचे स्वतः उभे राहू लागेल कदाचित चालायला देखील तो सुरुवात करेल. तुमच्या ४५ आठवड्यांच्या बाळाने आतापर्यंत टाळ्या वाजवण्यास सुरुवात केलेली असेल आणि तो चुंबन देण्यास शिकलेला असेल. तो तुम्हाला चुंबन देण्यासाठी त्याचे तोंड तुमच्या गालाजवळ आणू शकतो, परंतु सावध रहा कारण तो तुम्हाला चावू सुद्धा शकतो! या वयात बाळ काय करेल ह्याचा नक्की अंदाज बांधता येत नाही.

तुमच्या ४५ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमचे ४५-आठवड्याचे बाळ अनेकदा दोन गोष्टी करत असते आणि त्या करताना गोंधळलेले असते. पाहिलं म्हणजे बाळाचे तुमच्यावर लक्ष असते कारण त्याला विभक्त होण्याची चिंता असते तसेच त्याला आजूबाजूला फिरायचे असते आणि भोवतालच्या गोष्टींचा शोध घेण्याची तीव्र इच्छा असते. ह्या दोन्ही गरजा अगदी विरुद्ध असतात. परंतु सगळीकडे फिरत असताना तुम्ही आजूबाजूला आहात ना हे पाहण्यासाठी बाळ पुन्हा मागे येईल.

तुम्हाला पाहून त्याचा आत्मविश्वास वाढेल. परंतु तुम्ही तुमच्या जागेवर नसल्यास त्याला ते समजेल. तुमच्या बाळाला तुमच्यासोबत रंगीबेरंगी चित्रे असलेली पुस्तके वाचायला आवडतील आणि तो तुम्हाला पुस्तकातल्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवायला सुरुवात करेल. तसेच तुम्ही त्याच्यासाठी नेहमी पुस्तके वाचत असाल तर तो त्यांची नावे सुद्धा सांगेल. ह्या वयाच्या बाळांचे हात पाय गुटगुटीत असतील आणि पोट मोठे असेल परंतु पुढील काही महिन्यांमध्ये बाळाचे हातपाय बारीक होतील. त्यामुळे आत्ताच ह्या गुटगुटीत बाळासोबत तुम्हाला हवे तेवढे खेळून घ्या!

आणखी वाचा: तुमच्या १० महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या ४५ आठवड्यांच्या बाळाचे विकासात्मक टप्पे

४५ आठवड्यांच्या बाळांचे विकासाचे काही टप्पे खाली दिलेले आहेत ते तुम्ही ओळखू शकता

आणखी वाचा: १० महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

बाळाला आहार देणे

तुमचे ४५ -आठवड्याचे बाळ एक वर्ष पूर्ण करत आहे, म्हणून तुम्ही त्याचे स्तनपान सोडवण्याचा विचार कराल. जर तुम्हाला घाई नसेल तर तुम्ही तुम्हाला हवा तितका वेळ बाळाला स्तनपान देऊन त्याचा आनंद घेऊ शकता. स्तनपानातून बाळाला भरपूर पोषण मिळते तसेच स्तनपानामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बाळ एक वर्षाचे झाल्यावर त्याचे दूध सोडवायचे असेल तर तुमच्या स्तनांना आणि शरीराला ह्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी वेळ द्या. दर आठवड्याला स्तनपानाची एक वेळ कमी करणे हा एक पद्धतशीर दृष्टीकोन आहे. स्तनपान देण्याची योजना खाली दिलेली आहे:

जेव्हा तुम्ही बाळाचे स्तनपान सोडवता तेव्हा तुम्ही स्तनपानाच्या ऐवजी बाळाला दुसरे अन्नपदार्थ देता. तुमच्या स्तनांना सवय होण्यासाठी, सलगपणे स्तनपान न देणे टाळा. उदाहरणार्थ, तुम्ही एका आठवड्यात दुपारचे स्तनपान टाळू शकता आणि पुढील आठवड्यात रात्रीचे स्तनपान देणे थांबवू शकता. तुम्ही अशा वेळी स्तनपानाऐवजी बाळाला कपमधून अन्न आणि पाणी देऊ शकता. तसेच, तुम्ही स्तनपानाऐवजी बाळाला फॉर्मुला देऊन शांत करू शकता. जर तुम्ही हे पाळलेत तर रात्रीच्या वेळी सुद्धा बाळाला स्तनपान न घेण्याची सवय लागेल.

आणखी वाचा: १० महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय

बाळाची झोप

४५ आठवड्यांच्या बाळांना झोपेचा त्रास होतो. त्यामुळे तुमचे बाळ रात्रीच्या वेळी वारंवार स्तनपान घेऊ शकते. त्याला इंग्रजीमध्ये 'ब्रेस्ट स्लीपिंग' असे म्हणतात. हे बाळासाठी सकारात्मक तसेच आव्हानात्मक असू शकते. परंतु काही वेळा, तुमचे बाळ पुन्हा चांगले झोपेपर्यंत आत्मसमर्पण करणे हा सर्वोत्तम पर्याय असतो. जर तुम्ही या परिस्थितीत असाल, तर आधी स्वतःची काळजी घ्या आणि ताण कमी करा. कधीकधी मध्यरात्री, तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी तसेच तुमच्या शरीराची स्थिती आरामदायक होण्यास मदत करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या कुशीवर वळू शकता. हा कालावधी तीव्र असला तरी तो तात्पुरता आहे. एकदा तुमच्या बाळाने विकासाचा हा टप्पा पार केला कि, तुम्ही त्याला वेगळीकडे त्याच्या बिछान्यावर झोपवू शकता.

तुमच्या ४५ आठवड्यांच्या बाळासाठी काळजी घेण्यासाठी टिप्स

तुमच्या ४५ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी खाली काही टिप्स दिलेल्या आहेत:

चाचणी आणि लसीकरण

बाळ १० -११ महिन्यांचे झाल्यावर डॉक्टर सहसा तुमच्या बाळाची वैद्यकीय तपासणी करणार नाहीत.

. चाचण्या

तुमच्या बाळामध्ये ऍनिमियाची लक्षणे दिसत असल्यास, डॉक्टर त्याच्या रक्तातील हिमोग्लोबिन, लोह आणि शिसे यांची पातळी तपासण्यासाठी रक्त तपासून घेण्यास सांगू शकतात. डॉक्टर तुमच्या बाळाच्या विकासाचा मागोवा घेण्यासाठी त्याची उंची आणि वजन देखील मोजतील.

. लसीकरण

-१८ महिन्यांच्या दरम्यान, तुमच्या बाळाला हिपॅटायटीस बी लसीचा अंतिम डोस आणि आयपीव्ही (पोलिओ) लसीचा तिसरा डोस आवश्यक असेल. हे आजूबाजूचे वातावरण आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यावर अवलंबून असेल. त्याला डॉक्टरांनी शिफारस केलेल्या इन्फ्लूएंझा लसीची देखील आवश्यकता असू शकते.

खेळ आणि उपक्रम

खाली काही खेळ आणि क्रियाकलाप आहेत जे तुम्ही तुमच्या बाळासोबत खेळू शकता:

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

तुमच्या ४५ आठवड्यांच्या बाळाच्या विकासादरम्यान तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला खालील परिस्थितीत घ्यावा:

४५ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेणे तितकेसे सोपे नसते कारण बाळाची झोप नीट होत नाही त्यामुळे बाळ चिडचिड करते. बाळाच्या विकासाचा हा टप्पा पार करेपर्यंत बाळाला हाताळण्यासाठी तुम्ही वरील टिप्स फॉलो करू शकता.

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved