दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

तुमचे ३९ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

लहान मुलांची वाढ खूप वेगाने होत असते. तुम्हाला त्यांच्या विकासाचा कुठलाही टप्पा चुकवायचा नसतो. तुमच्या बाळाच्या जन्मापासून, प्रत्येक आठवड्यात त्याच्यामध्ये एक नवीन छोटासा बदल होतो आणि एक नवीन विकासाचा टप्पा आढळून येतो. लहान बाळे जन्मानंतर जेव्हा डोळे उघडतात तेव्हापासून, जवळजवळ प्रत्येक आठवड्यात ते विकासाचे नवीन टप्पे गाठतात. उदाहरणार्थ, लहान बाळे आपल्या हातापायांची हालचाल करू लागतात किंवा अंगठा चोखू लागतात. ३९ व्या आठवड्यात तुमचे बाळ कसे विकसित होते हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

तुमच्या ३९ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमच्या ३९-आठवडयाच्या बाळाने जन्मापासून आतापर्यंत गर्भाशयाच्या बाहेर बराच काळ घालवलेला आहे आणि बाळ सभोवतालच्या गोष्टी पाहण्यास आणि ऐकण्यास शिकत आहे. बाळाचे विश्व आणि अनुभव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. ह्या काळात बाळाची हालचाल वाढेल. ह्या अवस्थेत बाळासाठी संवाद आणि भाषा देखील खूप महत्वाचे असतील. तुमचे बाळ आता तुम्हाला समजून घेण्यास सुरुवात करेल म्हणून दिवसभर बाळाशी गप्पा मारत रहा. तुम्ही कुठे जात आहात किंवा काय करत आहात हे बाळाला सांगा. बाळ तुम्हाला ओळखू लागेल. आता तुमचे बाळ दिवसभर तुमच्याशी बोलत राहील. तुम्ही काय करत आहात किंवा कुठे जात आहात हे बाळाला सांगा. बाळ तुमचे बोलणे ऐकून वेगवेगळे शब्द शिकेल आणि संवाद साधण्यासाठी ह्या शब्दांचा वापर करेल. आंघोळ करणे, खाणे, पिणे आणि झोपणे हा तुमच्या ३९ वर्षांच्या बाळाचा नित्यक्रम असेल. बाळ चित्रे असलेल्या पुस्तकांचा आनंद घेऊ लागेल. बाळाला काय आवडते ते तो दाखवेल आणि तुम्हाला त्याचे नाव सांगायला लावेल. परंतु सध्या बसायला शिकणे, रांगणे आणि स्वतःचे स्वतः उभे राहणे ह्या गोष्टींमध्ये बाळ रमेल.

आणखी वाचा: तुमच्या ९ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या ३९ - आठवड्याच्या बाळाचे विकासात्मक टप्पे

खाली तुमच्या ३९ आठवड्यांच्या बाळाच्या विकासाचे काही टप्पे दिलेले आहेत

आणखी वाचा: ९ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

बाळाला आहार देणे

तुमचे बाळ ३९ -आठवडयांचे असताना बाळाला स्तनपान करणे कठीण काम असू शकते. तुमचे बाळ दिवसा गोधळलेले आणि चिडचिड करत असते. त्यामुळे रात्री जास्त स्तनपान होते. काहीवेळा, दात येताना तोंडात काही वेळा सूज येते त्यामुळे बाळ स्तनपान नीट घेत नाही. ह्याच काळात बाळ बोटानी चिमटा काढू लागेल. त्यामुळे स्तनपान घेताना बाळ तुमच्या स्तनाला किंवा मानेला चिमटा काढेल आणि तुमच्या त्वचेवर त्याच्या लाल खुणा उमटतील. बाळ तुमचे केस ओढेल किंवा चेहऱ्यावर नखांनी टोचेल. तुम्ही बाळाला स्तनपान देताना गळ्यात घालण्यासाठी नेकल्सचा वापर करू शकता त्यामुळे तुम्हाला त्रास देण्याऐवजी बाळ त्या माळेशी खेळेल. जेव्हा तुमचे बाळ तुमच्या स्तनाग्रांशी खेळू लागते तेव्हा तुम्हाला त्याला तसे न करण्यापासून परावृत्त करण्याची गरज असते. अशा संधी बाळाला देणे टाळा. तुमचे बाळ ३९ आठवड्यांत जास्त सक्रिय असते आणि त्यामुळे खाताना त्याचे लक्ष विचलित होईल. जेवण्याऐवजी भांडी खेळणे बाळाला आवडेल. तुमच्या बाळाला पुरेसे खायला मिळत नाही याची काळजी करू नका. बाळ जसजसे मोठे होईल तसतसे तो तुमच्या स्तनांमधून जास्त दूध ओढेल आणि रात्रीचे स्तनपान दिवसा कोणत्याही आहाराची कमतरता भरून काढू शकते. ३९ व्या आठवड्यात सुद्धा, तुमच्या बाळासाठी स्तनपान हे अजूनही प्राथमिक अन्न आहे आणि त्याला खूप कमी प्रमाणात घन पदार्थ दिले जाऊ शकतात.

आणखी वाचा: ९ महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय

बाळाचे झोपणे

३९ व्या आठवड्यांत, बाळ आधार घेऊन उभे राहू शकते. जर तुमचे बाळ खाटेवर झोपले असेल, तर खात्री करा की ती उभी राहण्यासाठी स्वत:ला खेचून घेईल आणि जेव्हा ती पुन्हा खाली बसू शकणार नाही तेव्हा तुम्हाला उठवेल. तुमच्या बाळाला जोपर्यंत ती पुन्हा एकटी बसू शकत नाही तोपर्यंत तुम्हाला या अवस्थेतून पहावे लागेल. तिला दिवसा उभ्या स्थितीतून बसण्यास मदत केल्याने हा टप्पा जलद जाण्यास मदत होऊ शकते. झोपण्याच्या पिशव्या किंवा इतर बेडिंग कॉटमध्ये ठेवण्याची खात्री करा जे तुमच्या बाळाच्या पायांमध्ये सहजासहजी अडकणार नाहीत जर तिने खाटांच्या रेलिंगच्या बाजूने ‘क्रूज’ करण्याचे ठरवले. जे बाळ आपल्या पालकांसोबत अंथरुणावर झोपतात ते खेळण्याची वेळ ठरवल्याशिवाय उभे राहण्याची शक्यता कमी असते. मंद दिवेठेवून बाळासाठी अंगाईगीत गेल्यास रात्रीच्या वेळेला बाळ खेळणार नाही आणि लवकर झोपी जाईल.

तुमच्या ३९ - आठवड्याच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

तुमच्या ३९ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत

चाचण्या आणि लसीकरण

३९ आठवड्यात, तुमच्या बाळाला डॉक्टरांकडे नियमित तपासणी करावी लागेल, त्यामध्ये काही चाचण्या आणि लसीकरण समाविष्ट असेल:

. चाचण्या

शारीरिक तपासणीचा भाग म्हणून डॉक्टर तुमच्या बाळाची उंची, वजन आणि डोक्याचा घेर मोजतील. इतर चाचण्यांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी तपासण्यासाठी रक्त तपासणी, शिसे (आवश्यक असल्यास) आणि एकदा दात येऊ लागल्यावर फ्लोराइड वार्निश चाचणी यांचा समावेश होतो.

. लसीकरण

तुमचे डॉक्टर तुम्हाला इन्फ्लूएंझा लस घेण्यास सांगतील, आणि ते तुमच्या बाळाला फ्लूच्या हंगामात वर्षातून एकदा आणि पहिल्या वर्षी दोनदा घ्यावे लागेल.

खेळ आणि उपक्रम

तुमच्या ३९ आठवड्याच्या बाळाच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत खेळू शकता असे काही खेळ येथे आहेत:

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

लसीकरण आणि चाचण्यांबाबत तुम्ही डॉक्टरांशी सल्लामसलत करू शकता. ह्या चाचण्या तुमच्या बाळाला ९ व्या महिन्यांत कराव्या लागतील. तुमच्या ३९-आठवड्याच्या बाळाच्या विकासाबाबत तुम्हाला खालील परिस्थतीतीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो.

३९-आठवड्याच्या बाळाच्या वाढीमध्ये मोटार विकासासोबत भाषा आणि संप्रेषण विकासाचा समावेश होतो. त्यामुळे तुमच्या बाळाशी बोलत राहणे, वेगवेगळ्या गोष्टी बाळाला दाखवणे आणि बाळासाठी वाचणे सुरू ठेवा.

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved