दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

तुमचे ३४ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे बाळ आता अधिकृतपणे ३४ आठवड्यांचे आहे आणि तिची वाढ आता अगदी छान होत असेल. आता ती खेळणी पकडण्यासाठी तिच्या हातांचा वापर करीत आहे, तिच्या शरीराचे निरक्षण करताना सुद्धा ती हातांचा वापर करत असल्याचे तुम्ही बघत असाल. या आठवड्यापासून, तुम्ही तुमच्या छोट्या बाळाला बर्‍याच वेळा हसताना आणि जेवणाच्या वेळी त्याच्या प्लेटवरील अन्नपदार्थांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना पहाल. ती दररोज नवीन गोष्टी शिकत जाईल आणि तुम्हाला आश्चर्यचकित करेल. ३४ व्या आठवड्यात तुमच्या बाळाचा विकास कसा होईल हे तुम्ही जाणून घेऊ इच्छिता का? तर मग हा लेख वाचा!

३४ आठवड्यांच्या बाळाचा विकास

ह्या कालावधीत प्रत्येक आठवड्यागणिक बाळाची खूप वाढ होईल. तो रांगणे, ऐकणे, स्पर्श करणे आणि एक्सप्लोर कसे करावे हे शिकेल. तुमच्या मुलास त्याचा आसपासचा परिसर आणि खेळण्यांसह वेगवेगळ्या खाद्यपदार्थाची ओळख करुन देण्यासाठी हा आठवडा हा उत्कृष्ट काळ आहे.

३४ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

तुमच्या बाळाच्या वयाच्या ३४ व्या आठवड्यात तुम्हाला खालील विकासाचे टप्पे दिसतील

बाळाचा आहार

बाळाच्या आहाराविषयी बोलायचे झाले तर, तुमचे बाळ हळू हळू प्युरी आणि मॅश केलेल्या पदार्थांपासून घन पदार्थांपर्यंत संक्रमण करण्याचा प्रयत्न करेल. आपल्या छोट्या बाळाला जे हवे ते खाऊ देण्याची ही चांगली वेळ आहे परंतु बाळाचे स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध बंद करू नका. शेवटी बाळाला पोषणाची आवश्यकता आहे. तुमचे बाळ दिवसात तीनदा जेवण आणि तीनदा स्नॅक्स खात असेल. तुमच्या बाळाच्या शरीराची पुढील बाजू आणि संपूर्ण बाह्यांना झाकणारी एक स्मोक ऑन बेबी वाईप विकत घ्या. तो थुंकला किंवा ओकला तर त्यासाठी काहीवाईप्स जवळ बाजूला ठेवा. तुमच्या बाळाला नवीन कटलरीची ओळख करुन घेण्यास आवडेल आणि त्यासाठी तुम्हाला बाजारामध्ये भरपूर पर्याय सापडतील. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळासाठी प्लेट्स आणि कंटेनर खरेदी करीत असाल, तेव्हा त्याला सक्शन कप आहेत का पहा आणि ते पृष्ठभागावर व्यवस्थित चिकटल्याचे सुनिश्चित करा. तुमचे बाळ खूप हुशार आहे आणि सावधगिरी न बाळगल्यास भांडी व प्लेट्समधून सर्व काही सांडवून ठेवू शकेल. घरी पदार्थ, दही आणि लहान स्नॅक्स साठवण्यासाठी लहान सीलेबल कंटेनरचा एक सेट ठेवा. तुम्ही दुपारच्या जेवणासाठी सील केलेले लंच बॉक्स घेऊ शकता आणि त्याचा चांगला उपयोग होतो. जाता जाता स्नॅक्स आणि पदार्थ खाण्यासाठी, काही रिफिलिंग पाउच खरेदी करा. जेव्हा तुम्हाला घाईत अन्न पॅक करण्याची आवश्यकता असेल तेव्हा तुम्हाला त्याची आवश्यकता भासू शकेल. तुमचे बाळ स्वत: खाण्याचा प्रयत्न करेल आणि प्लेटमधील खाद्यपदार्थांपर्यंत स्वतः पोहोचण्यात रस दर्शवेल. तुम्ही बाळाला फिंगर फूड देऊ शकता पण बाळ ते खात असताना बाळावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे नाहीतर ते घशात अडकण्याची शक्यता असते. बाळाला देण्याआधी पदार्थ मऊ करण्यासाठी ते वाफवून आणि मॅश करून घ्या. सुरुवातीला बाळाला सीपी कप मधून द्रवपदार्थ घेणे अवघड जाईल आणि बाळ ते सांडवून ठेवेल. त्याची तयारी ठेवा आणि शांत रहा. तुम्ही तुमच्या बाळाला एक तिरकस, झाकण नसलेला सीपी कप देऊ शकता. जी बाळे खूप सांडवतात त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

बाळाची झोप

३४ व्या आठवड्यात तुमच्या बाळाची झोपेची पध्दत सहसा विस्कळीत स्वरूपाची असते कारण या वयात तो रांगायला शिकत असेल आणि बाळाला दात येण्यास सुद्धा सुरुवात झालेली असेल. बाळ छोटी झोप घेईल आणि बराच काळ जागे राहील. बाळ पूर्वीप्रमाणे कधी झोपेल असा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की रांगण्यास सुरुवात केल्यापासून त्यास तीन महिने लागतील. आम्ही शिफारस करतो की तुम्ही अगदी घड्याळाला चिकटून राहू नका. बाळाला झोप केव्हा येते ह्याकडे लक्ष द्या. बाळाच्या झोपेच्या नमुन्याप्रमाणे तुमचे काम आणि जीवनशैली ह्यांचे नियोजन करा.कारण ही संक्रमण अवस्था आहे.

३४ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स

काही बाळांचा विकास कमी गतीने होतो तर काही,बाळे विकासाच्या बाबतीत वेगवान असतात. काही सरासरी दराने विकसित होऊ शकतात. अनपेक्षित काळासाठी आणि वेगाने विकास होत असताना बाळावर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. पालकांसाठी ३४ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्याविषयक टिप्स

चाचण्या आणि लसीकरण

बाळाच्या विकासाच्या टप्प्याना उशीर झाल्यास किंवा काही इतर वैद्यकीय समस्या उद्भवल्यास खालील चाचण्या आणि लसीकरण करणे आवश्यक आहे. टीप: ३४ व्व्या आठवड्यात कोणतीही लस दिली जात नाही. जर एखादी लस चुकून द्यायची राहिली असेल तर ह्या आठवड्यात ती दिली जाऊ शकते. एमएमआर लस आठवडा पूर्ण झाल्यानंतर दिली जाते.

खेळ आणि क्रियाकलाप

या वयोगटातील मुलांसाठी आम्ही खालील खेळ आणि क्रियाकलापांची शिफारस करतो-

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

खालील परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या: प्रत्येक बाळ त्याच्या वेगाने वाढते. म्हणूनच तुमच्या बाळास त्याच्या वेगाने विकसित होऊ द्या. पालक म्हणून, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे धीर धरा आणि तुमच्या छोट्या बाळावर प्रेमाचा वर्षाव करा तसेच बाळाला अन्वेषण आणि विकासासाठी वेळ द्या. ह्या काळात संपूर्णपणे पालकत्वाचा आनंद लुटा. मागील आठवडा: तुमचे ३३ आठवड्यांचे बाळ - विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी पुढील आठवडा: तुमचे ३५ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved