दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

तुमचे २७ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे बाळ आता २७ आठवड्यांचे आहे आणि वेगाने वाढत आहे. रात्रीच्या वेळी भूक लागल्यामुळे बाळ रडत जागे होते आणि त्याचे दुधाच्या मागणीचे प्रमाण वाढते. तुमच्या बाळाने २७ व्या आठवड्यात काय केले पाहिजे त्याविषयी सर्वकाही जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा

तुमच्या २७ आठवड्यांच्या बाळाचा विकास

हा टप्पा तुमच्या बाळासाठी एक व्यस्त काळ आहे. बाळ शारीरिक, सामाजिक, भावनिक आणि संज्ञानात्मक दृष्ट्या विकसित होत आहे. त्यांना काय हवे ह्याबद्दल त्यांना जाणीव होऊ लागेल आणि त्यांच्या मनाप्रमाणे झाले नाही तर ते राग दर्शवू शकतात. हालचाल कौशल्यावर त्यांचे शरीर दिवसरात्र काम करीत असते.

सत्तावीस आठवड्यांच्या बाळाचे वाढीचे टप्पे

बाळांचा वाढीचा वेग वेगवेगळा असतो आणि सर्व बाळे एकाच वेळी त्यांच्या विकासाच्या टप्प्यावर पोहोचत नाहीत आणि बर्‍याचदा तुम्हाला अपेक्षा सुद्दा करत नाही तेव्हा बाळ विकासाची लक्षणे दाखवण्यास सुरुवात करते. २७ व्या आठवड्यात काही बाळे बसू लागतात आणि काही रांगायला सुरुवात करतात. जर तुमच्या बाळामध्ये विकासाचे टप्पे उशिरा दिसत असतील तर काळजीचे काहीही कारण नाही कारण बाळाचा विकास बराच काळ होत राहतो. परंतु तुमच्या लक्षात काही समस्या आल्या तर तुमच्या बालरोगतज्ञांशी संपर्क साधा. इथे तुम्ही बाळाच्या कुठल्या विकासाची अपेक्षा करू शकता ते दिलेले आहे.

बाळाचा आहार

तुम्ही तुमच्या बाळाला, संकोच न करता घन पदार्थांचा परिचय देऊ शकता. पूर्वी ऍलर्जिक पदार्थाना उशीर केल्यास ऍलर्जीचा धोका कमी होतो असा विश्वास होता परंतु आताचे नवीन संशोधन अगदी उलट आहे. घन पदार्थ देण्यास सुरुवात होताच सामान्य ऍलर्जिक पदार्थ जसे की अंडी, शेंगदाणे, गहू, सोया, दुग्धजन्य पदार्थ, समुद्री अन्न इत्यादींची ओळख बाळाला करून दिली पाहिजे. शंगदाण्यांची ओळख नटबटर च्या माध्यमातृन सुरक्षितपणे केली जाऊ शकते तथापि मध, फास्ट फूड, गोड पदार्थ किंवा जंक फूड टाळले पाहिजे. तुमच्या बाळास तुमच्या कुटुंबात सामान्यत: वापरले जाणारे मसाले, औषधी वनस्पती आणि पदार्थांचा परिचय द्या आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र जेवण बनवण्याऐवजी बाळाच्या गरजा भागविण्यासाठी तुम्ही स्वतःहून काय जुळवून घेऊ शकता ते पहा.

बाळाची झोप

२७ आठवड्यांच्या बाळाला दिवसाची सुमारे १४-१५ तास झोप असणे आवश्यक आहे. संपूर्ण दिवसभर भावनिक निचरा किंवा थकवा आणि वेदनांमुळे बाळ रात्री झोपण्यास त्रास देते. दिवसभर त्यांची संवेदनाक्षम माहिती देखील जबरदस्त असू शकते आणि दिवस संपल्यानंतर त्यांना शांतता व आराम मिळण्याची आवश्यकता असते त्यामुळे बाळे चिडचिड करतात. दिवसभर त्यांच्या वर लक्ष ठेवत असताना, बाळ जास्त वेळ खेळले आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही त्यांना मदत करू शकता. संशोधनात असे दिसून आले आहे की कोणत्याही नवीन कार्यानंतर ३० मिनिटांची झोप घेतल्यास त्यांना पुढच्या वेळी नवीन गोष्टी लक्षात ठेवण्यास आणि लागू करण्यास मदत होऊ शकते.

२७ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स

चाचण्या आणि लसीकरण

शारीरिक चाचण्यांमध्ये हे समाविष्ट आहे: आपल्या बाळाच्या लसींमध्ये डीटीपी, पोलिओ, हिपॅटायटीस बी, न्यूमोकोकल आणि एचआयबी समाविष्ट आहेत आणि ते दोन किंवा तीन शॉट्समध्ये एकत्रितपणे दिले जातात. बाळांना रोटावायरस लसदेखील तोंडी दिली जाते.

खेळ आणि क्रियाकलाप

तुम्ही तुमच्या बाळासोबत खेळू शकता असे दोन मजेदार खेळ इथे दिलेले आहेत

. लपवा आणि खा

हा खेळ त्यांच्या उत्कृष्ट मोटर कौशल्यांचा विकास करतो आणि वस्तू स्थिरतेची भावना निर्माण करण्यास हा खेळ मदत करतो. या क्रियेसाठी तुम्हाला स्वच्छ टॉवेल, काही फिंगर फूड्स आणि काही अपारदर्शक कप आवश्यक आहे. तुमच्या बाळाला नाश्ता दाखवण्यापासून आणि टॉवेलने ते झाकून खेळास सुरुवात होते. नाश्ता शोधण्यासाठी बाळाला नाश्त्यावरील झाकण काढू द्या आणि थोड्या वेळापूर्वी ते पाहू शकले नाहीत ते स्नॅक्स अजूनही तिथेच आहे हे त्यांच्या लक्षात येऊ द्या. तुम्ही थोडा जादूगारासारखा खेळ सुद्धा करू शकता. स्नॅक्सला एका अपारदर्शक कपने झाकून ठेवा आणि त्याच्या पुढे दोन कप ठेवा. आता ते कप बदलत रहा आणि कप उचलून खाली त्यांना त्यांचा नाश्ता शोधू द्या.

. दि ग्रेट फॉल

बाळांना आश्चर्यकारक शेवट असलेले आणि हालचाल असलेले खेळ आवडतात. हा खेळ एकूण मोटर कौशल्ये विकसित करतो. कारण आणि परिणामाची भावना निर्माण करतो. घराच्या आत किंवा घराबाहेर किंवा लॉनवर मऊ रगवर, आपल्या गुडघे वर उचलून आपल्या पाठीवर झोपा. तुमचे बाळ तुमच्या पोटावर बसलेले असते आणि तुमच्या गुडघ्यांवर टेकते. त्यांना आपल्या हातांनी स्थिर ठेवा आणि हम्प्टी डम्प्टी सारखी गाणी म्हणताना एका बाजूने दुसर्‍या बाजूस डोलू द्या. प्रत्येक वेळी फॉलहा शब्द येतो तेव्हा एका बाजूला झुकून पुन्हा वर या. आवश्यक असल्यास सुरक्षिततेसाठी बाजूला काही उशा वापरा.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

आपल्याला पुढीलपैकी कोणतेही लक्षण दिसल्यास प्रत्येक बाळाचा त्याच्या स्वतःच्या वेगाने विकास होत असतो आणि अखेरीस बाळ विकासाच्या टप्प्यावर पोहोचतो. तुमचे बाळ तिथपर्यंत पोहोचलेले नसल्यास संयमाने त्याची प्रतीक्षा करा. यादरम्यान, पालकत्वाच्या प्रवासाचा आनंद घ्या. मागील आठवडा: तुमचे २६ आठवड्यांचे बाळ - विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी पुढील आठवडा: तुमचे २८ आठवड्यांचे बाळ - विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved