दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

तुमचे २६ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

वेळ किती भर्रकन पुढे सरकतो, नाही का? तुमचे बाळ ६ महिन्यांच्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे आणि तुम्ही बाळामध्ये विकासाची विविध चिन्हे आता पहात असाल. तुमचे बाळ आजूबाजूच्या वातावरणातील गोष्टींचे झपाट्याने आकलन करू लागेल. तुमचे बाळ आता २६ आठवड्यांचे झाले आहे आणि पालक म्हणून ह्या आणि ह्यापुढील आठवड्यात तुम्हाला त्याचे वाढीचे महत्वाचे टप्पे आणि विकास ह्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मग वाट कसली बघताय? २६ आठवड्यांच्या तुमच्या बाळाच्या विकासाविषयी जाणून घेण्यासाठी खाली स्क्रोल करा.

तुमच्या २६ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमच्या २६ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

आहार देणे

२६ व्या आठवड्यात आपल्या बाळासाठी घन पदार्थ (सुरुवातीला अर्ध घन पदार्थ ठीक आहेत ) सुरु करणे ठीक आहे. हा संक्रमणाचा काळ आहे त्यामुळे स्तनपानापासून नवीन अन्नपदार्थांसाठी पचनप्रणाली अजूनही समायोजित होत आहे. अशा प्रकारे, जर तुम्हाला बाळाच्या शौचामध्ये न पचलेल्या अन्नाचे तुकडे आढळले तर काळजीचे काही कारण नाही. या काळात तुमच्या बाळाला बद्धकोष्ठता सुद्धा होऊ शकते. बाळाच्या पचनसंस्थेत झालेल्या बदलामुळे असे होऊ शकते. आहारात पपई, सुके प्लम फळ, गाजर आणि पालक सारख्या फायबर-समृध्द पदार्थांची ओळख करुन आपण या परिस्थितीवर उपाय करू शकता. तुम्ही तुमच्या बाळाला पाण्याची ओळख देखील करून देऊ शकता. बाळाला पाणी देण्यापूर्वी पाणी उकळले आहे ह्याची खात्री करा कारण बाळाची रोगप्रतिकारशक्ती अजूनही विकसित होत आहे. तुम्ही बाळाला सिप्पी कप वापरण्यास शिकवू शकता जेणेकरून कमीत कमी पाणी सांडेल. जर तुमचे बाळ अजूनही घनपदार्थ घेत नसेल तर निराश होऊ नका तो आज ना उद्या नक्की घन आहार घेण्यास सुरुवात करेल. बाळाला जबरदस्तीने भरवू नका कारण बाळ जिभेच्या साहाय्याने अन्न पुन्हा बाहेर काढू शकेल.

बाळाची झोप

काही २६ आठवड्यांची बाळे दीर्घ कालावधीसाठी झोपी जातात, तर असे बरेच लोक आहेत जे कदाचित इतके भाग्यवान नसतील. दात येणे आणि रात्रीचे दूध पिण्यास उठणे यासारख्या अनेक घटकांमुळे विचलित केलेली झोप असू शकते. कृपया लक्षात घ्या की रात्रीच्या वेळी आपल्या बाळाला कमीतकमी एकदा स्तनपान देणे अगदी शक्य आहे. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की या वेळी किमान ७८% मुले रात्री उठतात.

तुमच्या २६ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स

तुम्ही तुमच्या छोट्या बाळाची कशी काळजी घेऊ शकता ते इथे दिलेले आहे

चाचण्या आणि लसीकरण

ह्या काळात दिल्या जाणाऱ्या लसींमध्ये खालील लसी समाविष्ट आहेत

खेळ आणि क्रियाकलाप

येथे काही खेळ आणि क्रियाकलाप आहेत जे तुम्ही तुमच्या लहान मुलास गुंतवून ठेवण्यासाठी करून बघू शकता

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

पुढील बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घ्या: प्रत्येक बाळाचा त्याच्या स्वत: च्या गतीने विकास होतो. म्हणून, जर तुमच्या बाळाचा वरीलप्रमाणे विकास होत नसेल तर काळजी करू नका. तो नक्की तिथे पोहोचेल! तोपर्यंत तुमच्या बाळासोबतचा प्रत्येक क्षण साजरा करा आणि बाळासोबतचा हा वेळ मौल्यवान बनवा! मागील आठवडा: तुमचे २५ आठवड्यांचे बाळ - विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी पुढील आठवडा: तुमचे २७ आठवड्यांचे बाळ - विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved