दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

तुमचे २१ आठवड्याचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजीविषयक

२१ व्या आठवड्यात, तुमच्या बाळामध्ये काही रोमांचक बदल झालेले तुम्हाला दिसतील. आपले बाळ स्वतःचे स्वतः बसत आहे किंवा रांगण्याचा प्रयत्न करत आहे हे बघून तुम्हाला आनंद होईल. तुमचे बाळ कदाचित तुम्हाला प्रतिसाद देईल किंवा तुमच्याबद्दल प्रेम व्यक्त करेल. तुमचे बाळ तुम्ही त्याला घ्यावे म्हणून हात उंचावेल आणि तुम्ही त्याला घेतल्यानंतर तुम्हाला घट्ट मिठी मारेल हा खरोखरच खूप हृदयस्पर्शी क्षण आहे. ह्या आठवड्यात, बहुतेक बाळे त्याच्या आजूबाजूच्या प्रौढांच्या कृती आणि शब्दांचे अनुकरण करण्यास सुरवात करतात. तुमच्या २१ आठवड्यांच्या बाळाने यापैकी काही चिन्हे आधीच दर्शविली आहेत का? आपल्या २१ आठवड्यांच्या बाळामध्ये दिसू शकतील असे विकासाचे आणि वाढीचे टप्पे शोधण्यासाठी हा लेख वाचा.

२१-आठवड्यांच्या बाळाचा विकास

२१ व्या आठवड्यात तुमच्या बाळामध्ये शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उल्लेखनीय प्रगती दिसू शकते. त्याचे वजन सुमारे १४ ते १६ पौंड असेल आणि त्याची श्रवणशक्ती आणि दृष्टी सुधारत जाईल. जेव्हा तुम्ही त्याचे नाव घ्याल तेव्हा तो तुमच्याकडे लक्ष देईल. तुमचे बाळ आनंद, चिंता, चिडचिडेपणा आणि कंटाळवाणेपणासारख्या अनेक भावना दर्शवू शकतो २१ व्या आठवड्यात, तुमचे लहान बाळ आईपासून विभक्त झाल्यामुळे अस्वस्थता देखील दाखवू शकेल. दुसर्‍याकडे गेल्यावर तुमचे बाळ रडण्यास सुरुवात करू शकते. जर तुमच्या बाळाच्या बाबतीत हे सामान्यपणे घडत असेल तर नवीन लोकांशी परिचित होण्यासाठी तुम्ही बाळाला पुरेसा वेळ दिला पाहिजे. तुमचे बाळ त्याचा पहिला शब्द आता कधीही बोलेल. तो बहुतेक वेळा ऐकत असलेल्या आवाजाची नक्कल करण्याचा प्रयत्न करेल. तुमचे २१ आठवड्यांचे बाळ विकासाचे कोणकोणते टप्पे गाठू शकेल ते पाहूया.

२१ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

प्रत्येक बाळ त्याच्या स्वत: च्या गतीने विकसित होते. तर, प्रत्येक बाळासाठी विकासात्मक टप्पे भिन्न असू शकतात. बहुतेक २१ आठवड्यांच्या बाळांचे येथे काही सामान्य विकासाचे टप्पे दिलेले आहेत:

बाळाचा आहार

तुमच्या बाळाची भूक वाढलेली पाहून तुम्हाला आनंद होईल. तुम्ही तुमच्या बाळाला शांत वातावरणात खायला देऊ शकता कारण त्याच्या सभोवतालच्या वातावरणात तो विचलित होण्याची शक्यता कमी असेल आणि चांगले खाऊ शकेल. या आठवड्यात आहार देण्याची पद्धत बदलू शकते. बाळाला खाताना किंवा दूध पिताना डुलकी येऊ शकते. बाळाची दूध पिण्याची वारंवारिता कमी होऊ शकते कारण बाळाला त्या वेळेस झोपायला आवडते. २१ व्या आठवड्यात बाळाच्या आहारात घन पदार्थांचा परिचय करून जाऊ शकतो. परंतु, बाळाला घनपदार्थांचा परिचय करून दिल्यावर सुद्धा तुम्ही बाळासाठी काही महिने स्तनपान सुरु ठेवणे आवश्यक आहे. या वयात जर बाळाला वेळेवर आणि हवे तसे स्तनपान दिले तर, बाळाच्या पौष्टिक गरजा भागवण्यासाठी स्तनपान पुरेसे आहे. लगेच घनपदार्थांची ओळख करून देण्याची घाई नाही. घनपदार्थ खाणे बाळे जास्त पसंत करीत असल्याने स्तनपान नाकारू शकतात.

बाळाची झोप

तुमच्या २१ आठवड्यांच्या बाळाच्या झोपेमध्ये बदल झालेले असूनही झोपेचे वेळापत्रक नियमित होऊ शकते. तुमच्या २१ आठवड्यांच्या बाळाच्या झोपेच्या नमुन्यांविषयी काही मुख्य मुद्दे येथे आहेतः जसे जसे तुमच्या बाळाचे वय वाढते, तसे तुम्हाला बाळाची काळजी वेगवेगळ्या प्रकारे घ्यावी लागेल. या आठवड्यादरम्यान, तुमच्या लहान बाळाकडे थोडे अधिक लक्ष देण्याची आणि धैर्याची आवश्यकता असेल. पुढच्या आठवड्यात तुमच्या बाळाचे आरोग्य निरोगी, आनंदी आणि वाढीसाठी तयार होण्यासाठी आपण कोणती काळजी घ्यावी? चला पाहूया.

तुमच्या २१ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

तुमच्या २१ आठवड्यांच्या बाळाचे संपूर्ण आरोग्य आणि योग्य वाढीसाठी या टिप्सचे अनुसरण करा: या टिप्स सोबत, तुम्ही तुमच्या बाळाचे लसीकरण वेळापत्रक अद्ययावत ठेवणे जरुरीचे आहे. त्याबद्दलही चर्चा करूया.

चाचण्या आणि लसीकरण

२१ आठवड्यांत जर तुमच्या बाळाच्या ४ महिन्यांच्या लसी द्यायच्या राहिल्या असतील तर तुमच्या डॉक्टरांशी भेटीची वेळ प्राधान्याने ठरवू शकता. तुमच्या बाळाला मोटर आणि संज्ञानात्मक कौशल्याची निर्मिती करणारे पुरेसे क्रियाकलाप मिळतील याची खात्री करणे हा बाळाची काळजी घेण्याचा आणखी एक भाग होय. लेखाच्या पुढील भागात, तुम्ही तुमच्या बाळासोबत खेळू शकाल असे खेळ आणि क्रियाकलाप यावर चर्चा करू.

खेळ आणि क्रियाकलाप

खेळ आणि क्रियाकलाप हे तुमच्या बाळामध्ये शारीरिक आणि मानसिक विकास घडवून आणतात आणि तुमच्या बाळामध्ये आणि तुमच्यामध्ये बंध निर्माण करण्यासाठी देखील मदत करतात. तुम्ही तुमच्या बाळासोबत आनंद घेऊ शकता असे काही खेळ आणि क्रियाकलाप ह्यांची यादी इथे दिलेली आहे. आपल्या लहान चिमुकल्याची काळजी घेण्याची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आपण डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा. डॉक्टरांच्या पुढच्या नियोजित भेटीच्या आधी बाळाला जर आरोग्यविषयक समस्या आल्या तर डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.

बालरोगतज्ञांचा सल्ला कधी घ्यावा?

२१ व्या आठवड्यात, तुमच्या बाळाची प्रतिकारशक्ती अद्याप पूर्ण विकसित झाली नाही. म्हणून, त्याला सामान्य सर्दी आणि फ्लूचा धोका असू शकतो. तुमच्या बाळाचे नाक सतत वाहत असेल, बाळाला ताप आलेला असेल किंवा तो सतत रडत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कधीकधी, बाळांना पोटशूळ होतो. आईच्या अंतःप्रेरणेचे पालन करणे आणि आपल्याला काहीतरी चुकीचे वाटत असल्यास बालरोगतज्ञांना कॉल / सल्ला घेणे चांगले आहे. तुमचे २१ आठवड्यांचे बाळ आता वेगाने विकसित होत आहे. हा प्रवास कंटाळवाणा असू शकतो, पण खात्रीने तो रोमांचक असेल. बाळासोबत तुमचा बंध आणखी घट्ट करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ त्याच्यासोबत घालवा कारण तो लवकरच मोठा होणार आहे. लक्षात ठेवा, मातृत्वाचा आनंद घेण्याची ही एक चांगली वेळ आहे! मागील आठवडा: तुमचे २० आठवड्यांचे बाळ - विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी पुढील आठवडा: तुमचे २२ आठवड्यांचे बाळ - विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved