दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

तुमचे २ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

शांत, उबदार आणि सुखावह अशा जगात राहण्याची सवय असताना अचानक, थंडी, उष्णता, वारा, गोंगाट आणि भूक ह्या जाणिवा एकाच वेळी अनुभवल्याची कल्पना करा. बाळ जन्माला आल्यावर असेच घडते. बाळ सुद्धा, गर्भाशयाबाहेर जगण्याचा आणि ह्या सगळ्या भिन्न गोष्टी काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. पालक म्हणून तुम्ही तुमच्या बाळासोबत सदैव रहा आणि बाळाचा विकास योग्य पद्धतीने होत आहे ना ह्यावर लक्ष ठेवू शकता.

२ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमच्या बाळाला तुम्हाला काही सांगायचे असेल तर संवादाचा एक प्राथमिक मार्ग म्हणजे रडणे. ह्या टप्प्यावर, लक्ष केंद्रित करण्यास आणि काहीतरी समजून घेण्यास सक्षम होण्यासाठी पूर्ण दृष्टी विकसित झालेली नसते. परंतु बाळांना मानवी चेहर्‍याबद्दल आकर्षण असते. आणि बाळाने सतत आपला चेहरा पाहणे महत्वाचे आहे. तसेच , बाळाला जवळ घेतल्यास, त्याला तुमचा स्पर्श होऊ दिल्यास ह्या सर्व गोष्टी बाळे लक्षात ठेवतात आणि आपला विश्वास वाढवतात आणि तुमचा संपूर्ण चेहरा माहिती नसूनसुद्धा बाळ तुम्हाला ओळखू लागते.

दोन आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

दुसर्‍या आठवड्यापर्यंत, नाळेचा लहानसा तुकडा सुकतो आणि खाली पडतो, ज्यामुळे बाळाच्या पोटाजवळ फक्त नाभीची गाठ पडते. म्हणूनच, तो तुकडा पडेपर्यंत नाभीच्या आजूबाजूच्या भाग सौम्यपणे आणि काळजीपूर्वक हाताळला पाहिजे. तुमच्या बाळाला आंघोळ घालणे महत्वाचे आहे परंतु नेहमीच्या पाण्याने भरलेल्या टबमधील आंघोळीऐवजी, बाळासाठी स्वच्छ आणि नाभी क्षेत्र सुरक्षित ठेवू शकणार्‍या स्पंज बाथची निवड करा. ह्या कालावधीत तुम्ही कदाचित दवाखान्यातून घरी आलेला असाल आणि दिनक्रम स्थापित करण्यामध्ये व्यग्र असाल. तुम्ही बाळासोबत बहुधा हॉस्पिटलच्या खोल्यांमध्ये आणि घरातच होतात. संपूर्ण वेळ घरातच राहिल्यामुळे तुम्हाला आणि बाळाला कंटाळा येऊ शकतो घरामागील अंगणात किंवा टेरेस मध्ये थोडा वेळ चाला किंवा फक्त काही क्षणांसाठी बाहेर पडा आणि आपल्या बाळासह मोकळा श्वास घ्या

दूध देणे

दोन आठवड्यांच्या वयात, बाळाला अन्न मिळवण्याचे प्राथमिक माध्यम म्हणजे स्तनपान होय. कधीकधी, स्तनपान देण्याच्या प्रक्रियेमुळे मातांना थोडा त्रास होऊ शकतो किंवा वेदना होऊ शकतात, कारण स्तनाग्र नेहमीच्या प्रसूतीच्या नंतरच्या तुलनेत अधिक संवेदनशील असतात. तथापि, स्तनपान देण्याची प्रक्रिया होणे महत्वाचे आहे, कारण बाळाला स्तनाची सवय लागणे सुरू होते आणि बाळाला लॅचिंग आणि स्थितीचे योग्य आकलन झाल्यास, तुमच्या स्तनांनाही आराम मिळेल. स्तनपानाची प्रक्रिया सुलभ होईल.
२ आठवड्यांच्या बाळाला लागणारे दुधाचे प्रमाण हे वाढ आणि वजनाप्रमाणे बदलू शकते. भूक लागण्याच्या वेळेसह समक्रमित होण्यासही स्तनांना थोडा वेळ लागेल. २ आठवड्याच्या कालावधीत बाळाचे दूध देण्याचे वेळापत्रक तयार करणे म्हणजे ते खूप लवकर होईल. त्यामुळे बाळाला जेव्हा भूक लागेल तेव्हा दूध देणे चांगले. त्यामुळे दूध तयार होण्याची प्रक्रिया जलद होते आणि आपल्या बाळाच्या वाढत्या आहारातील मागणीसाठी आपल्याला तयार ठेवते.

झोप

२ आठवड्यांच्या बाळासाठी, ह्या टप्प्यावर झोप आणि खाणे हे त्यांचे आयुष्य आहे. दिवसभर त्यांचे आलटून पालटून हेच रुटीन असते. तुमचे बाळ कदाचित भूक लागल्याने घाबरून रडत असेल, मग काही काळ जागे राहील , त्याच्या सभोवतालचे जग पाहिल आणि झोपी जाईल. कधीकधी, बाळाला पाजल्यानंतर सुद्धा बाळाची रडण्यास सुरवात होईल आणि तुम्हाला नक्की लक्षात येईल की त्याला काय त्रास आहे. त्याला शांत करण्यासाठी एकापेक्षा जास्त तंत्रांचा प्रयत्न करूनही बाळ शांत झाले नाही तर तुम्हाला आपण एक चांगली आई आहे की नाही असा प्रश्न पडेल. तथापि, आशा गमावून स्वतःबद्दल वाईट वाटून घेऊ नका. आपल्या बाळाला कवेत घ्या, बाळाच्या कानात थोडी बडबड करा, हळूवारपणे झुलवून किंवा आंघोळ घालून शांत करा आणि हे सुनिश्चित करा की आपल्या बाळाला पुन्हा झोपवा. झोपताना, तुमच्या बाळाला स्वतःचे क्रिब किंवा एक स्वतंत्र बेड असावा आणि तो सुद्धा तुमच्या शेजारीच असेल तर उत्तम. बाळ ठीक आहे की नाही हे तपासत राहण्याची आणि भूक लागल्यास त्याला दूध देण्याची सतत आवश्यकता असेल. बाळाला आपल्या जवळ ठेवणे दोघांसाठीही सुलभ होईल. झोपेच्या संपूर्ण कालावधीत, बाळ वेगवेगळ्या प्रकारचे आवाज करते. बाळ रडेल, बाळाला कंटाळा येईल किंवा बाळे विचित्र आवाज काढू शकतात, हे सर्व आपल्या बाळाच्या वाढीची सामान्य चिन्हे आहेत.

वागणूक

प्रत्येक मनुष्यप्राण्याप्रमाणे, प्रत्येक लहान बाळाची वागणूक वेगवेगळी असते. तथापि, त्यापैकी बहुतेक बाळे सामान्यत: भूक-झोपेच्या चक्रात येतात. हे कदाचित स्पष्ट दिसत नाही परंतु एक बाळ स्तनाला शोषून घेण्यासाठी त्याच्यात बरीच उर्जा वापरतो, त्यामुळे त्यांना स्तनपान मिळाल्यानंतर बाळ जवळजवळ लगेच झोपायला जाते. अकाली जन्मलेली मुलं इतरांपेक्षा जास्त वेळा झोपतात आणि डॉक्टर त्यांना जागे करण्याचा सल्ला देतात जेणेकरून त्यांना आवश्यक तो आहार पूर्णपणे मिळेल. काही वेळा, बाळांचे डोळे विस्फारलेले असतात आणि त्यांना कुतूहल असते. हि बाळे बराच काळ जागी असतात, आवाजाला प्रतिसाद देतात, चेहरे दिसतात तेव्हा सभोवताली पाहतात आणि हावभाव करण्याचा प्रयत्न करतात. स्तनपान करतानाही, त्यांचे डोळे खोलीतील कोणत्याही आवाजांकडे जाऊ शकतात. काही हालचाली किंवा चेहऱ्यावरील हावभाव कदाचित तुम्हाला स्वतःचे बालपण किंवा आपल्या जोडीदाराची आठवण करुन देतील. सतत किरकिर करणाऱ्या बाळामुळे तुम्हाला त्रासदायक वाटेल. तथापि, हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की बहुतेक बाळांमध्ये समान प्रवृत्ती असतात आणि मोठे होऊन त्यांचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व तयार होते.

२ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

चाचण्या आणि लसीकरण

बहुतेक चाचण्या आणि लसीकरण बाळाच्या पहिल्या आठवड्यातच केले जाते. ह्यामध्ये क्षय रोगाची बीसीजी लस, पोलिओसाठी आयपीव्ही आणि हिपॅटायटीस बीची लस ह्यांचा समावेश आहे. कोणत्याही कारणास्तव, ह्या लशी घेण्यास पहिल्या आठवड्यात उशीर झाला तर डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्यांचा पुढील आठवड्यात पाठपुरावा केला जाऊ शकतो. जर ते वेळापत्रकानुसार केले गेले असेल तर दुसरा आठवडा हा लसीकरणमुक्त आहे.

खेळ आणि क्रियाकलाप

जसे जसे आपल्या बाळाला त्याच्या सभोवतालच्या वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लागतो, त्यापैकी त्याला जाणवणारी आणि आठवणारी गोष्ट म्हणजे स्पर्श करण्याची भावना. त्याचे हात त्याच्या सभोवतालच्या विविध गोष्टी पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत राहतील आणि एखाद्या गोष्टीचा स्पर्श विशिष्ट का होतो हे समजेल. त्यामुळे केवळ वस्तू बाळांना अधिक चांगल्या प्रकारे समजल्या जातात असे नाही, परंतु ते काय पहात आहेत आणि एका विशिष्ट दिशेने जाण्यासाठी त्यांचे हात कसे नियंत्रित करू शकतात हे समजण्यास सुरवात होते. हाताने केलेल्या समन्वयाचा हा विकास बर्‍यापैकी होतो. तुम्ही भिन्न पोत असलेल्या विविध वस्तू वापरुन आपल्या बाळाबरोबर खेळू शकता. जसे की बाळासाठी योग्य असणारी प्लॅस्टिकची खेळणी, मखमली कापड, रेशीम स्कार्फ, छान मऊ ब्लँकेट, तुमचे केस इत्यादी असू शकते. तुमच्या बाळाला ह्या प्रत्येक गोष्टी, एका वेळी एक ह्या पद्धतीने पकडू द्या आणि त्याच्या प्रतिक्रियेचे निरीक्षण करा. त्याच्याशीही संवाद साधा आणि आपल्याला काय वाटते ते सांगत शब्द उच्चारत बाळाला हाक मारा. लहान बाळे स्वतःशी आणि एकमेकांशी होत असलेल्या भावनिक संप्रेषणामधून बरेच काही शिकतात. कधीकधी आपल्या बाळास ती वस्तू त्याच्या तोंडात घालण्याची इच्छा असू शकते आणि ती कशी वाटते हे पहा. जर ती वस्तू स्वच्छ असेल आणि बाळाला हानी पोहोचवत नसेल तर बाळाला ते करूद्या. काही वेळा, त्यामुळे बाळाला वस्तूचे आकलन चांगले होते.
तुमचे बाळ त्याच्या नवीन शोधामध्ये व्यस्त असताना तुम्ही बाळाला छान मालिश करून त्याला अधिक आरामदायक करू शकता. बाळाला अनुकूल मसाज तेल घ्या आणि उबदार होण्यासाठी तळहातावर चोळा. बाळाच्या पायपासून प्रारंभ करून, तुम्ही त्याच्याशी बोलत असताना हळूवारपणे मालिश करण्यास सुरवात करा. घोट्यांपासून सुरुवात करा आणि मांडी आणि नंतर पोटापर्यंत मालिश सुरू ठेवा. सौम्य आणि हळू हळू मालिश करण्यास सुरुवात करा कारण बाळाला काय होत आहे हे देखील ओळखण्यास मदत होईल. पोट आणि छातीच्या भागात, नाळेकडील भागात नाळ अद्याप खाली न पडल्यास सावधगिरी बाळगा. बाळाच्या डोळ्यात बघून त्याला शांत आणि व्यस्त ठेवण्यासाठी त्याच्याशी बोला. सुखदायक आवाजात बोलणे अत्यंत फायदेशीर आहे. जर आपले बाळ कोणत्याही क्षणी प्रतिकार करत असेल तर, मालिश करणे थांबवा आणि त्याला जवळ धरा जेणेकरून बाळ रडणार नाही

खालील परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या

खालील परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे

कावीळ

बर्‍याच बाळांना लहानपणी कावीळ होण्याचा त्रास होतो, परंतु स्तनपान देऊन किंवा काही विशिष्ट वैद्यकीय दिव्यांची मदत घेऊन काळजी घेतली जाऊ शकते. जर तुमच्या बाळाचा चेहरा आणि छातीचा रंग पिवळा असेल तर डॉक्टरांना त्वरित कळविणे महत्वाचे आहे.

बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठता ही आणखी एक समस्या आहे ज्यामुळे बर्‍याच बाळांना शौचास त्रास होतो. आतड्यांची हालचाल कमी असल्यास थोडेसे पाणी द्या किंवा वेगळा फॉर्मुला देऊन काळजी घेतली जाऊ शकते. ह्यापैकी कोणताही प्रयत्न करण्यापूर्वी, त्याबद्दल आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

शिंका येणे किंवा वाहणारे नाक

सर्वत्र प्रदूषित हवेमुळे किंवा अगदी धुळीच्या कणांमुळे, आपल्या बाळाला शिंका येणे सुरू होईल किंवा नाक वाहू शकेल. तीव्र झाल्यास मीठाच्या पाण्याचे नाकाचे थेंब वापरुन पहा.

त्वचेवरील पुरळ

तोंडातून सतत लाळ गळल्यामुळे बहुतेकदा पुरळ होऊ शकते. स्वच्छता राखल्यास ही पुरळ आपोआप नाहीशी होते. जर हे कायम राहिले किंवा आणखी वाढले तर ताबडतोब आपल्या डॉक्टरांना कॉल करा.

कोरडी त्वचा

बर्‍याच मुलांना त्वचा कोरडी असण्याची समस्या उद्भवते ह्याचे रसायन विरहीत बाळांचा साबण वापरुन सहज निराकरण करता येते. मॉइश्चरायझिंग लोशन वापरल्याने त्वचेचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

रिफ्लक्स

बाळ खूप वेळा दूध तोंडाबाहेर काढते. जेव्हा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात दूध पाजले जाते तेव्हा हे घडते. जर आपल्या मुलाचे अपेक्षेनुसार वजन वाढत राहिले आणि दूध किंवा अन्नपदार्थ अडकून बाळ गुदमरले नाही तर बाळाने दूध ओकणे सामान्य आहे. नेहमीपेक्षा थोड्या प्रमाणात दूध पाजणे आणि दूध पाजल्यानंतर प्रत्येक वेळेला ढेकर काढणे ह्याचे काळजीपूर्वक पालन केल्यास रिफ्लक्सची समस्या कमी होईल.

पाण्याने भरलेले डोळे

काही वेळा, बाळाच्या अश्रु नलिका अवरोधित केल्या जाऊ शकतात, त्यामुळे बाळाचे डोळे अधूनमधून पाण्याने भरतात. डोळ्याच्या संसर्गाची चिन्हे दिसत नसल्यास काळजी करण्याची ही स्थिती नाही. अशा परिस्थितीत आपले डॉक्टर बाळाच्या डोळ्यांसाठी सुरक्षित थेंबाची शिफारस करतात.

डायपर रॅश

डायपरमध्ये बाळाचे शौच बराच काळ तसेच राहिल्यास पुरळ होऊ शकतात. डायपरकडील भाग स्वच्छ ठेवून डायपर नियमितपणे बदला आणि तो भाग स्वच्छ राहील याची खात्री करुन घ्या.

श्वसन समस्या

खोकला आणि सर्दीमुळे एखाद्या लहान बाळालाही त्रास होऊ शकतो आणि त्यासाठी अत्याधुनिक औषधे आवश्यक नसतात. ताप वाढल्यास किंवा श्वासोच्छवासाची समस्या उद्भवल्यास, डॉक्टर त्याचे निराकरण करण्यासाठी योग्य उपाययोजना करतील. दुसऱ्या आठवड्यात, म्हणजेच अगदी काही दिवसांतच कदाचित आपल्या बाळाची बरीच वाढ झालेली असल्याचे आपल्याला वाटेल. वारंवार दूध पाजल्यानंतर आणि बाळाचे वजन वाढल्यावर, तुम्हाला हे समजेल की तुमचे बाळ निरोगी मूल होण्याच्या मार्गावर आहे आणि येणाऱ्या काळात तुम्ही त्याच्याबरोबर अद्भुत दिवसांचा आनंद घ्याल. मागील आठवडा: तुमचे १ आठवड्याचे बाळ - विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी पुढील आठवडा: तुमचे ३ आठवड्यांचे बाळ - विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved