Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसूती सुलभ आणि सामान्य प्रसूतीसाठी १५ उपयुक्त टिप्स

सुलभ आणि सामान्य प्रसूतीसाठी १५ उपयुक्त टिप्स

सुलभ आणि सामान्य प्रसूतीसाठी १५ उपयुक्त टिप्स

बाळाचा जन्म हा आईच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा असतो. सहज आणि सुलभ प्रसूतीसाठी आई शांत आणि तणावमुक्त असली पाहिजे. गरोदरपणात आणि प्रसूतीच्या काळात तुम्हाला मदत करतील अशा काही टिप्स खाली दिलेल्या आहेत

व्हिडिओ: सुलभ प्रसूती आणि बाळाच्या जन्मासाठी ८ उपयुक्त टिप्स

सामान्य आणि सुलभ प्रसूतीसाठी काय कराल?

सामान्य आणि सुलभ प्रसूतीसाठी काय कराल?

. खजूर खा

अभ्यासातून असे दिसून आले आहे की खजूर खाणे सहज आणि जलद प्रसूतीसाठी फायदेशीर आहे. दिलेल्या प्रसूती तारखेच्या एक महिना आधी दररोज सुमारे ६० ते ८० ग्रॅम खजूर खाणे हे प्रसूतीच्या काळात फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. ह्याचे कारण म्हणजे खजूरामध्ये ऑक्सिटोसिनसारखे रासायनिक संयुग असते. हे संप्रेरक कळा सुरु होण्यास कारणीभूत असते. खजूरामुळे गर्भाशयाचे मुख उघडते. अशा प्रकारे सहज आणि जलद प्रसूतीच्या प्रक्रियेस खजूर खाल्ल्यास मदत होते हे सिद्ध झालेले आहे.

. दररोज स्क्वॅट्स करा

सामान्य प्रसूती होण्यासाठी प्रत्येक स्त्रीकरिता स्क्वॅट्स हा सर्वात फायदेशीर व्यायाम आहे. स्क्वॅट्स करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मेडिसीन बॉल वापरणे. हा बॉल पाठीच्या खालचा भाग आणि भिंत ह्यांच्या मध्ये ठेवावा. पायांची बोटे आणि गुडघे एकमेकांपासून दूर ठेवावेत. गरोदर स्त्रियांनी दररोज १५ स्क्वॅट्स करावेत.

. पुरेशी आणि नियमित झोप

सुलभ आणि जलद प्रसूती होण्यासाठी ही टीप सर्वात सोपी आणि प्रभावी आहे. आधी चर्चा केल्याप्रमाणे, प्रसूतीसारख्या तणावपूर्ण आणि महत्त्वाच्या घटनेसाठी गर्भवती महिलेने शांत असणे आवश्यक आहे. केवळ चांगली आणि पुरेशी विश्रांती घेतलेली व्यक्तीच ह्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकते. सामान्य आणि जलद प्रसूतीसाठी गर्भवती स्त्रीने दररोज किमान सात तास किंवा त्याहून अधिक तास झोपावे. आई आणि बाळ आरामशीर राहण्यासाठी, मऊ, त्वचेला अनुकूल उशा आणि रीक्लिनर बेड असल्यास झोप चांगली लागण्यास मदत होते.

. पाण्यातील प्रसूतीचा विचार करा

हे एक प्रभावी बाळंतपण तंत्र असू शकते कारण पाणी गर्भवती मातेला प्रसूती दरम्यान शांत करू शकते. पाणी तणावग्रस्त स्नायूंना शांत करते आणि गर्भाशयाचे तोंड उघडण्यास मदत करते. त्यामुळेच बहुतांश प्रमुख रुग्णालयांमध्ये पाण्यातील प्रसूतीसाठी तलाव आणि टब आहेत. बाळाचा बाहेरील जगात प्रवेश होण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे.

. प्रसूतीदरम्यान सरळ स्थितीत रहा

प्रसूतीच्या वेळी झोपून कळा देण्यापेक्षा बेडवर सरळ राहून कळा देणे चांगले. गुरुत्वाकर्षण आई आणि बाळासाठी फायदेशीर ठरू शकते कारण ते बाळाला प्रसूतीसाठी योग्य स्थितीत येण्यास मदत करू शकते. प्रसूतीदरम्यान सर्वोत्तम परिणाम मिळण्यासाठी गुडघे टेकणे, बसणे आणि उभे राहणे यासारख्या विविध पोझिशन्स देखील वापरल्या जाऊ शकतात. शरीराच्या हालचालीमुळे गर्भाशयाचे मुख उघडण्यास मदत होते तसेच बाळाचे डोके सहज बाहेर येण्यास मदत होते.

. पौष्टिक नाश्ता

जेव्हा तुम्ही प्रसूतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असता तेव्हा तुम्हाला भूक लागू शकते. भूक लागल्यास तुम्ही हलका नाश्ता खाऊ शकता. तेलकट किंवा स्निग्ध पदार्थ खाणे टाळा कारण त्यामुळे तुम्हाला छातीत जळजळ होईल तसेच त्यामुळे बाळंतपणाच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकेल. प्रसूतीदरम्यान तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्ही केळी किंवा सफरचंद यांसारखी फळे तसेच दही, स्मूदी इ.सारखे स्नॅक्स खाऊ शकता. इमर्जन्सी सीसेक्शन असल्यास देखील हे पदार्थ फायदेशीर आहेत.

. बाळाचा जन्म आणि त्याविषयी माहितीसाठी क्लास लावा

गरोदरपण हा पालकांसाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या श्रमाचा काळ आहे कारण त्यांना बऱ्याच नवीन गोष्टी शिकायच्या आहेत तसेच पालकत्वाच्या जबाबदाऱ्या समजून घ्यायच्या आहेत. म्हणूनच, सर्वकाही ठीक होण्यासाठी बाळाच्या जन्माच्या आधीच तयार असणे चांगले आहे. हा क्लास लावल्यास पालकांना तोंड द्याव्या लागणाऱ्या सर्व चिंता दूर होण्यास मदत होते आणि गर्भवती स्त्रीच्या पतीला किंवा नातेवाईकांना गर्भजल पिशवी फुटण्यापासून नाळ कापण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी तयार राहण्यास मदत होते. संपूर्ण प्रक्रिया सोपी आणि जलद करण्यासाठी हा क्लास लावल्यास फायदेशीर ठरू शकतो.

. श्वास घेण्याच्या तंत्राचा सराव करा

प्रसूती हा कोणत्याही स्त्रीसाठी अत्यंत वेदनादायी अनुभव असू शकतो. श्वासोच्छवासामुळे प्रसूती प्रक्रियेत असलेल्या स्त्रीला वेदना सहन करण्यास आणि बरे वाटण्यास मदत होते. श्वासोच्छवासामुळे लयबद्ध कळा देण्यास मदत होते. स्त्रीला अधिक कार्यक्षमतेने कळा देता येऊ शकतात. श्वासोच्छ्वासामुळे शरीरात पुरेसा ऑक्सिजन येतो आणि आईला कळांमुळे होत असलेल्या प्रचंड प्रसूती वेदना आणि पेटके सहन करणे सुसह्य होते.

. एक चांगली सपोर्ट टीम सोबत असुद्या

प्रसूतीच्या धकाधकीच्या परिस्थितीत, प्रत्येक होणाऱ्या आईला सकारात्मक पाठिंबा असणे महत्वाचे आहे. हे देखील लक्षात आले आहे की ज्या गरोदर स्त्रियांच्या सोबत प्रसूतीच्या वेळी मदत करण्यासाठी प्रशिक्षित महिला असते त्यांना एपिड्यूरल किंवा सीसेक्शनची आवश्यकता कमी असते. त्यांची सुलभ प्रसूती होते. ह्या जिव्हाळ्याच्या सुंदर क्षणी जोडप्याला सांत्वन देण्यासाठी योग्य असलेली स्त्री निवडली जावी म्हणून मुलाखत घेणे आवश्यक आहे.

१०. बाळाच्या जन्माच्या प्रक्रियेची चर्चा करा

तुम्ही प्रसूती ह्या विषयावर बरीच पुस्तके वाचली असतील, तरीही तुमच्या डॉक्टरांशी प्रसूती प्रक्रियेबद्दल चर्चा करणे चांगले असते. बाळाची स्थिती, तुमची शारीरिक स्थिती, तुम्हाला प्रसूतीदरम्यान वेदना औषधे घ्यायची आहेत की नाही, इत्यादी विविध घटकांवर तुमची प्रसूती योजना अवलंबून असते. प्रसूतीदरम्यान ही योजना अनपेक्षित कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, परंतु एक योजना तयार असणे चांगले असते. ह्यामुळे नवीन पालकांना बाळाच्या जन्माची प्रक्रिया समजून घेण्यास आणि कोणतेही प्रश्न विचारण्यास मदत होते.

११. तुमचे लक्ष दुसरीकडे विचलित करा

प्रथमच आई होणाऱ्या स्त्रीच्या प्रसूतीला वेळ लागू शकतो. बाळाला जन्म देण्यासाठी तिला १२ ते १५ तास लागू शकतात. ह्या कालावधीत लयबद्धपणे श्वास घेऊन आणि कळा देऊन आई थकू शकते. अंघोळ केल्याने किंवा गाणी ऐकल्याने आईचे लक्ष दुसरीकडे विचलित होते. शांत आणि बरे वाटण्यासाठी अश्या वेगवेगळ्या गोष्टी करून पहा. ह्यामुळे लवकर आणि सुलभ प्रसूती होण्यास मदत होते.

१२. मसाज

प्रसूती कळा देणाऱ्या स्त्रीला शरीराच्या खालील भागात मालिश केल्यास चांगले असते. ह्यामुळे मेंदूतील वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते. प्रसूती दरम्यान स्त्रीला होणारा त्रास सुद्धा ह्यामुळे कमी होण्यास मदत होते. तसेच, पतीने मालिश केल्यास मानसिकदृष्ट्या देखील सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे स्त्रीला तिच्याविषयी असलेली काळजी आणि पाठिंबा जाणवतो. ह्यामुळे प्रसूती लवकर होण्यास मदत होते.

१३. फिरायला जा

गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यात सहज प्रसूती होण्यासाठी स्क्वॅट्ससोबतच चालणे हा देखील एक उत्तम व्यायाम आहे. चालण्यामुळे बाळ गर्भाशयाच्या मुखाकडे सरकण्यास मदत होते. तसेच प्रसूतीची प्रक्रिया सुलभ होते. चालण्याने ऑक्सिटोसिनची निर्मिती होते असे संशोधनात दिसून आले आहे. त्यामुळे कळा येऊन प्रसूतीसाठी मदत होते. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या स्त्रियांनी चालणे आवश्यक आहे कारण चालणे काही स्क्वॅट्स करण्याइतके अवघड नाही.

१४. जीवनसत्त्वसमृद्ध पदार्थांचे सेवन करा

, बी, सी आणि ई सारखी जीवनसत्त्वे गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यात हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतात. कोणत्याही वैद्यकीय हस्तक्षेपाशिवाय जलद सामान्य प्रसूती होण्यासाठी गर्भाशयाला टोन करण्यासाठी ही जीवनसत्वे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. गर्भवती मातांसाठी व्हिटॅमिन के देखील आवश्यक आहे कारण ते रक्त गोठण्यास मदत करते तसेच जन्मानंतर रक्तस्त्राव होण्याची शक्यता कमी होते. हा रक्तस्त्राव झाल्यास आईसाठी ते घातक असू शकते. , बी, सी आणि ई ही जीवनसत्त्वे मिळण्यासाठी दररोज ताजी फळे किंवा व्हिटॅमिन सप्लिमेंट्स ह्यांचे नियमित सेवन केले पाहिजे. व्हिटॅमिन के मिळण्यासाठी पालकासारख्या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत.

१५. तंदुरुस्त रहा

सामान्य आणि सुलभ प्रसूतीसाठी गरोदरपणात तुम्ही तंदुरुस्त असणे महत्वाचे आहे. गर्भवती स्त्रियांनी त्यासाठी पोषक आहार आणि नियमित व्यायाम केला पाहिजे. गर्भवती महिलांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात काही विशिष्ट प्रकारच्या शारीरिक हालचाली केल्या पाहिजेत. ह्यामध्ये चालणे, योगासने, पोहणे इत्यादी व्यायामप्रकार असू शकतात.

ह्या १५ सोप्या टिप्सचे पालन केल्यास होणाऱ्या बाळाच्या पालकांसाठी बाळंतपणाचा अनुभव अधिक सोपा आणि मौल्यवान होतो आणि गोंडस बाळाचा ह्या जगात प्रवेश होतो.

आणखी वाचा:

तुम्ही लक्ष ठेवण्याची गरज असलेली प्रसूतीची लक्षणे
नॉर्मल प्रसूतीसाठी गरोदर असताना करावेत असे परिणामकारक व्यायामप्रकार

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article