टॉडलर (१-३ वर्षे)

सुकन्या समृद्धी योजना – मुलींसाठी बचत खाते

सुकन्या समृद्धि योजना ही योजना भारत सरकारने जानेवारी २०१५ मध्ये सुरु केलेली एक योजना आहे. ही मुलींसाठीची बचत योजना आहे आणि बेटी बचाओ, बेटी पढाओयोजनेंतर्गत हा उपक्रम आहे

प्रधानमंत्री सुकन्या समृध्दी योजनेचा उद्देश काय आहे?

सुकन्या समृद्धिह्या शब्दाचा अर्थ मुलीची भरभराट हा आहे. दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीच्या पालकांना पैसे वाचवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना तयार केली गेली आहे. मुलींना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी,त्यांना उद्योजक म्हणून उभे राहता यावे म्हणून किंवा लग्नाचा खर्च भागविण्यासाठी आर्थिक पाया भक्कम होण्यासाठी ही योजना आहे.

खाते कसे उघडावे?

या योजनेअंतर्गत, दहा वर्षांपेक्षा कमी वयाची प्रत्येक मुलगी ह्या योजनेसाठी पात्र असते. जास्त व्याज दर आणि इतर अनेक सवलतीसह विशेष बचत खात्यासाठी १० वर्षांखालील मुलगी पात्र आहे. खाते १५ वर्षांसाठी ठेव प्राप्त होते आणि खाते उघडल्यापासून २१ वर्षांनी परिपक्व होते.

. खाते कोण उघडू शकते?

मुलगी दहा वर्षांपेक्षा लहान असेल तर मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक खाते उघडू शकतात. प्रत्येक पालक / कुटुंबासाठी फक्त दोन मुली मुलांसाठी खाती उघडता येतील. जुळे आणि तिळे ह्यास अपवाद आहे.

. पात्रता निकष

. आवश्यक कागदपत्रे

. निवास

ह्या योजनेचा लाभ घेणारी मुलगी योजनेच्या संपूर्ण कालावधीत भारताची रहिवासी असावी अशी अट घालण्यात आली आहे.

. लाभार्थ्याच्या नावाचे खाते

जरी पालक खात्यावर रक्कम भरत असले तरी केवळ मुलगीच सुकन्या समृध्दी योजना खात्याची (एसएसवायए) लाभार्थी असल्याचे समजते. जर मुलीचा अकाली मृत्यू झाला तर पालक, खाते उघडल्याच्या दिवसापासून उर्वरित शिल्लक रक्कम आणि जमा झालेल्या व्याजावर दावा करु शकतात.

. खाते उघडण्यासाठी प्राधिकृत बँका

एसएसवायए सर्व पोस्ट कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि काही अधिकृत खाजगी बँकांमध्ये उघडता येऊ शकते. एसएसवायए उघडण्यासाठी फॉर्म आरबीआयच्या वेबसाइटवरून डाउनलोड केला जाऊ शकतो. परंतु, हे खाते ऑनलाईन उघडता येत नसल्याने ते संबंधित शाखेत करावे लागेल. एसएसए अधिकृत बँकांची यादीः

सुकन्या समृद्धि योजना - सामान्य प्रश्न

येथे एसएसवायए बद्दल वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न आहेत जे आपल्याला योजनेच्या किरकोळ तपशीलांवर अधिक स्पष्टीकरण देतील.

. खाते बदलणे शक्य आहे का?

एसएसवायए एका बँकेतून दुसर्‍या बँकेत किंवा बँकेतून पोस्ट ऑफिसमध्ये किंवा उलट हस्तांतरित केले जाऊ शकते. खात्यातील लाभार्थीचे हस्तांतरण करता येणार नाही.

. किमान योगदान किती आहे?

एसएसवायएमध्ये किमान वार्षिक योगदान रु. २५० प्रतिवर्ष आणि त्यानंतर पुढील कोणतीही रक्कम रू. १०० च्या पटीत तुम्ही ठेवू शकता. जास्तीत जास्त ठेव १,५०,००० रुपये वार्षिक तुम्ही ठेवू शकता.

. दंड कधी आकारला जातो?

जर ठेवीदाराने २५० रुपयांचे किमान योगदान दिले नाही तर दंड आकारला जाईल. किमान योगदानासोबत रुपये ५० इतका दंड प्रतिवर्षी आकारला जाईल.

. वार्षिक व्याज किती आहे?

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी एसएसवायए खात्यासाठी व्याज दर ७.% आहे. दर आर्थिक वर्षाच्या शेवटी दर सुधारित केला जातो.

. मुदत कालावधी म्हणजे काय?

ठेवी १५ वर्षांसाठी केल्या जातात. ह्या खात्याचा कालावधी २१ वर्षांनी पूर्ण होतो. तथापि, जर मुलीने लग्नासाठी १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कधीही खाते बंद करण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर तिला परवानगी असेल त्यासाठी तिने अकाली खाते बंद करण्याच्या विनंतीसह अर्ज सादर केला तसेच तिचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नाही हे दर्शवणारा पुरावा तिने सोबत जोडणे आवश्यक आहे. नवीन नियम, २१ वर्षाच्या मुदतीनंतर सुद्धा खाते बंद न करण्यास परवानगी देतात. अशा खात्यांना व्याज मिळत राहील.

. अकाली पैसे काढण्याची परवानगी आहे का?

या कारणास्तव अकाली पैसे काढण्याची परवानगी आहे:

. कराचे फायदे काय आहेत?

गुंतवलेली मूलभूत रक्कम, व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम करमुक्त आहे. गुंतवणूकीच्या मूळ रकमेवरील कर कपातीचे फायदे रू. .५ लाख दर वर्षी इतके आहे. त्यासाठी प्राप्तिकर अधिनियम, ८० सी,१९६१ हा नियम लागू होतो.

योजनेचे फायदे व कमतरता

सुकन्या समृद्धि योजना ही मध्यम व निम्न वर्गासाठी सहज उपलब्ध बचत योजना म्हणून डिझाइन केली गेली आहे. ह्या योजनेचे अनेक फायदे आणि तोटे आहेत.

फायदे

कमतरता

सुकन्या समृद्धि योजनेच्या परिपक्वता मूल्याची गणना कशी करावी?

एसएसवायए वापरुन आपण वाचवू शकता त्या वार्षिक रकमेची गणना करण्यासाठी आपण टेबल वापरु शकता. लक्षात घ्या की मासिक गुंतवणूकीची रक्कम ही अंतिम वार्षिक रक्कम बदलू शकते, कारण या खात्यासाठी मासिक व्याज मोजले जाते.

. आपले स्वतःचे कॅल्क्युलेटर कसे तयार करावे

डेटा शीटवर बनविलेले कॅल्क्युलेटर वापरुन आपण आपल्या एसएसवायएच्या परिपक्वता मूल्याची गणना करू शकता. आपल्याला भरण्यासाठी आवश्यक असलेले स्तंभ खाली टेबलमध्ये दर्शविले आहेत.
मुलींचे वय खाते वय ठेव तारीखः ठेव रक्कम: वर्षाच्या अखेरीस मूळ रक्कम एकूण वार्षिक व्याज वर्षाच्या शेवटी एकूण रक्कम
डी ३ + जी २ इ २ + फ २
मुलींचे वय: मुलीचे वय प्रविष्ट करा खाते वय: खाते किती वर्षांपूर्वी उघडले आहे याची नोंद करा. ठेव तारीखः ज्या तारखेला आपण योजनेसाठी अंतिम रक्कम जमा केली ती तारीख. ठेव रक्कम: जमा केलेली ठेवीची रक्कम वर्षाच्या अखेरीस मूळ रक्कम: येथे, मागील वर्षाच्या अखेरीस एकूण रक्कम चालू वर्षात जमा केलेल्या रकमेमध्ये जोडली जाते. उदाहरणार्थ, दुसर्‍या ओळीत, सूत्र डी ३ + जी २ असेल. प्रत्येक ओळीवर नंबर वाढत जातो. एकूण वार्षिक व्याज: चालू दराने व्याज काढा आणि ते मुद्दल रकमेमध्ये जमा करा. वर्षाच्या शेवटी एकूण रक्कम: मुद्दल रक्कम आणि चालू वर्षाचे व्याज जोडा. ई २ + एफ २

कॅल्क्युलेटरचे फायदे

त्याच्या मर्यादा काय आहेत?

खाते कसे बंद करावे?

एसएसवायएची नुकतीच २०१५ मध्ये सुरुवात झाली होती, अद्याप कोणतीही अनामत रक्कम परिपक्वतेपर्यंत पोहोचली नाही आणि खाते बंद करण्याबाबत संभ्रम आहे.

. आपण खाते कधी बंद करू शकता?

एसएसवायए एक बचत खाते आहे आणि त्याप्रमाणे, सामान्य प्रकरणांमध्ये परिपक्वता येण्यापूर्वी ते बंद केले जाऊ शकत नाही. खाते उघडण्यापासून २१ वर्षांनी परिपक्व झाल्यावर खाते बंद केले जाऊ शकते. केवळ तीनच घटनांमध्ये खाते बंद केले जाऊ शकते

. खाते बंद करताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते?

२०२० पर्यंत ह्या योजनेबाबतचे कोणते अपडेट्स आहेत?

या योजनेला शासनाने उच्च प्राधान्य दिले असून यामध्ये बचत योजनांसाठी सर्वाधिक व्याज दर आहे. मध्यम आणि निम्न-उत्पन्न कुटुंबासाठी ही एक सहज उपलब्ध योजना आहे आणि येत्या काही दशकांत भारतातील मुलींच्या जीवनात खूप सुधारणा करण्याची क्षमता आहे. आणखी वाचा: भारतामध्ये मुलींच्या भविष्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना भारतात मुलींसाठी शासकीय योजनांची यादी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved