अन्य

राष्ट्रीय कन्या दिवस २०२२: तारीख, महत्व आणि तुम्ही तो कसा साजरा करु शकता ह्याविषयी माहिती

आपल्या मुलांचे कौतुक करण्यासाठी आपल्याला काही कारण लागत नाही. 'राष्ट्रीय कन्या दिवस' सुद्धा हे सुद्धा त्यापैकीच एक कारण आहे. आपल्या लाडक्या लेकीचा सन्मान करण्यासाठी आणि तिच्यावरचे तुमचे प्रेम व काळजी व्यक्त करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात हा दिवस साजरा केला जातो.

कन्या दिन म्हणजे काय?

आपण मातृदिन व पितृदिन साजरा करतो त्याप्रमाणेच मुलींचा सन्मान करण्यासाठी कन्या दिन साजरा केला जातो. भारतात कन्यादिन सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी साजरा केला जातो. ह्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये हा दिवस २५ सप्टेंबर ला साजरा केला जाणार आहे.

कन्या दिन का साजरा केला जातो?

मुलगी आपल्या आयुष्यात असल्याबद्दल तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कन्यादिन साजरा केला जातो. भारतासारख्या देशात जिथे मुलांना प्राधान्य दिले जाते तिथे मुलीही तितक्याच प्रेम आणि काळजीसाठी पात्र असतात असे उदाहरण ह्याद्वारे सेट केले जाते. तुमची मुलगी तुमच्यासाठी किती मौल्यवान आहे याची स्वतःला आणि जगाला आठवण करून देण्याचा हा दिवस आहे.

कन्या दिन साजरा करण्यामागचा इतिहास

पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुलींना मुलांपेक्षा कमी दर्जा दिला जातो. या विसंगतीमुळे मुलांचा दर्जा वाढतो आणि मुलींच्या आत्मविश्वासाला तडा बसतो. नेहमी कनिष्ठ दाखवले गेल्यामुळे, मुले ज्या गोष्टी करतात त्या आपण करू शकत नाही असे मुलींना वाटू लागते. ही समस्या भारतात इतकी जास्त आहे की, संपूर्ण इतिहासात स्त्रियांकडून पुत्र जन्माची अपेक्षा ठेवली जाते. यामुळे केवळ स्त्रियांच्या संख्येवर परिणाम झाला नाही, तर प्रगतीच्या बाबतीत सुद्धा स्त्रिया पुरुषांच्या एक पाऊल मागे राहिल्या.

जगभरातील आणि भारतातील अनेक सरकारी यंत्रणांनी मुलींची उन्नती करण्याची गरज ओळखली आहे जेणेकरून लोकांना हे समजेल की मुली मुलांपेक्षा कमी नाहीत. काण्यदिनाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंबाला एकत्र येण्यास आणि घरातील मुलींसोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळते.

कन्या दिन साजरा करण्यासाठी मनोरंजक कल्पना

तुमच्या मुलीला स्पेशल वाटण्यासाठी तुम्ही काय करायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे. परंतु, येथे कन्यादिन साजरा करण्याच्या कल्पना दिलेल्या आहेत त्यापासून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता.

. बाहेर जेवायला जा

दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण किंवा रविवारची ब्रंच डेट इत्यादी आयोजित करा. त्यामुळे तुम्हाला मुलीसोबत बसून थोडा वेळ घालवता येईल. तुम्ही तिच्याशी तिच्या इच्छा आकांक्षांबद्दल बोलू शकता आणि तिला खरोखर जाणून घेऊ शकता. ह्यानंतर कदाचित तुम्ही दर रविवारी तिला बाहेर घेऊन जाऊ शकाल.

. तिला काहीतरी भेट द्या

तुमच्या मुलीला आवडणारी वस्तू तिला भेट द्या. तिला संगीत आवडते का? मग तिला एक वाद्य द्या. तिला खेळात रस असेल तर तिला क्रीडा वर्गांसाठी साइन अप करा. शेवटी, तिला जे हवे आहे ते देणे महत्वाचे आहे.

. सुट्टीवर जा

तिला तिच्या नेहमीच्या रुटीन मधून बाहेर काढा आणि तिला नवीन ठिकाणी न्या. तुम्ही खास तुमच्या मुलींसाठी लहान कौटुंबिक सहल काढू शकता. आणि त्या दरम्यान तिला आवडतील अशा गोष्टी करू शकता.

. केक करा किंवा घरी छानसा स्वयंपाक करा

तिच्या आवडीचा स्वयंपाक तुम्ही स्वतः करणे हे प्रेम व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम आहे. तिच्या आवडीचे पदार्थ करा किंवा तिच्यासाठी केक तयार करा. किंवा दोन्ही करा. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा बोलवू शकता आणि छोटा समारंभ करू शकता.

. तिच्यासाठी खरेदी करा

तिला खरेदीसाठी बाहेर न्या आणि तिला तिच्या आवडीची गोष्ट घेण्यास सांगा. फक्त कपडेच नाही तर एखादे पुस्तक, वाद्य किंवा तुमच्या बजेट मध्ये बसणारी कोणतीही गोष्ट तिला निवडण्यास सांगा. तुमच्या दोघींमधला बंध अधिक घट्ट होण्यासाठी ह्यासारखा दुसरा मार्ग नाही.

. आपल्या लाडक्या लेकीसाठी वेळ काढा

आपल्या लाडक्या लेकीसाठी वेळ काढा. ती तुमच्यासाठी किती स्पेशल आहे हे तिला सांगा. तिच्याससोबत सर्व आठवणी शेअर करा. दोघी एकत्र बसून जुने फोटो पहा.

तुमची मुलगी तुमच्यासाठी मौल्यवान आहे आणि तो आनंद साजरा करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट अश्या कारणाची गरज नसते. तिच्यासाठी हा दिवस राखून ठेवा. तिचे खूप लाड करा आणि तिच्यासाठी हा दिवस खूप विशेष पद्धतीने साजरा करा.

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved