आहार आणि पोषण

गरोदरपणात तुम्ही टाळले पाहिजेत असे १० भारतीय अन्नपदार्थ

    In this Article

गरोदरपण हा स्त्रियांसाठी एक नाजूक काळ असतो. गर्भवती स्त्रियांनी आपल्या मुलांच्या निरोगी वाढीसाठी पोषक अन्नपदार्थ खाणे जरुरीचे असते तसेच गर्भवती स्त्रियांना जंक फूड पूर्णपणे सोडण्यास सांगितले जाते. जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्हालाही जंक फूड सोडण्यास सांगितले गेले असेल आणि आपल्याला आवडत असलेले चविष्ठ पदार्थ कसे सोडायचे ह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल! अचानकपणे एकदम कॉफी, पिझ्झा, पास्ता सोडणे अवघड आहे, हो ना? पण तुम्ही ते करू शकता, विश्वास ठेवा! बरेचसे पदार्थ तुम्ही इतर वेळेला खाणे सुरक्षित असते परंतु गरोदरपणात ते खाणे सुरक्षित नसते.

भारतीय खाद्यपदार्थ जे गरोदरपणात हानिकारक असू शकतात

तुम्ही गरोदरपणात जे पदार्थ तोंडात टाकता ते बाळापर्यंत पोहोचणार .आहेत. त्यामुळे तुम्ही पोषक अन्नपदार्थांची निवड करणे आवश्यक आहे. तुमच्यासाठी जे चांगले पदार्थ असतील ते तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी चांगले असतीलच असे नाही. त्यामुळे योग्य निवड करा. हे पदार्थ गरोदरपणात खाणे टाळा आणि तुमच्या बाळाला सुरक्षित ठेवा.

. कच्ची पपई

  आपल्याला आधीच माहित आहे की गरोदरपणात पपई खाणे टाळले पाहिजे, परंतु असे का आहे हे आपल्याला माहिती आहे का? कच्ची किंवा अर्धवट पिकलेली पपई गरोदरपणात खाणे योग्य नाही. हिरव्या पपईमध्ये उच्च प्रमाणात लॅटेक्स असते, जे विशेषतः हानिकारक असू शकते कारण यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते, आणि गर्भपात होऊ शकतो. यात पपाइन आणि पेपसीन देखील आहे, जे गर्भाच्या विकासावर परिणाम करते त्यामुळे अनेक जन्म दोष उद्भवतात.

. तुळशीची पाने

  सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होत असताना आपण बर्‍याचदा तुळशीची पाने खातो. जर आपल्याला सर्दी किंवा खोकला असेल तर आपण तुळशीची पाने खाऊ शकता, परंतु ते मध्यम प्रमाणात खाऊ शकता. गरोदरपणात तुळशीची पाने खाण्यास पूर्णपणे सुरक्षित नाही, परंतु तुम्ही दिवसातून १-२ पाने खाऊ शकता.

. कोरफड रस

  कोरफड त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी प्रसिध्द आहे, परंतु गरोदरपणात ती हानिकारक असू शकते. कोरफड केवळ गर्भाशय आणि त्याच्या आकुंचनांवर परिणाम करत नाही. तर कोरफड रस गर्भासाठीसुद्धा फायदेशीर नाही. त्याच वेळी, कोरफड उलट्या आणि अतिसार सारख्या प्रतिक्रियांना देखील कारणीभूत ठरू शकते, ज्यामुळे शरीराच्या इलेक्ट्रोलाइटच्या पातळीत असंतुलन उद्भवू शकते.

. मेथीचा लाडू

  मेथी, हिंदीमध्ये मेथी दाना म्हणून ओळखले जाते आणि स्त्रीच्या बाळंतपणात दूध चांगले यावे म्हणून मेथीचे दाणे तिच्या आहाराचा एक मुख्य भाग बनतात. प्रसूतीनंतर महिलांना सहसा मेथीचे लाडू दिले जातात, परंतु गरोदरपणात ते खाणे टाळले पाहिजे कारण त्याचे आई आणि बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात.

. अननस

  प्रसूतीची तारीख जसजशी जवळ येते तसे स्त्रियांचा अननस खाण्याकडे कल वाढतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचा आहारात समावेश केलेला असल्यास ठीक आहे परंतु गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये अननस खाणे टाळले पाहिजे. अननसामध्ये ब्रोमेलिन एंझाइम असते त्यामुळे गर्भाशयाचे मुख मऊ होते आणि त्यामुळे प्रसूती कळा सुरु होण्यास मदत होते. त्यामुळे अकाली कळा सुरु होतात आणि गर्भपात होण्याची शक्यता वाढते.

. कच्ची अंडी

  अंडे तुम्ही वेगवेळ्या स्वरूपात खाऊ शकता तसेच ते चवदार देखील आहे. परंतु तुम्ही गरोदरपणात अंडे खाऊ शकता का? हो परंतु सगळ्या स्वरूपात नाही. तुम्ही उकडलेल्या अंड्यांचा समावेश तुमच्या गरोदरपणाच्या आहारात करू शकता. परंतु कच्ची अंडी तुम्ही कधीच खाऊ नका. कच्ची अंडी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरली जातात. कच्च्या अंड्यांमध्ये साल्मोनेला विषाणू असल्याची शक्यता असते आणि गरोदरपणात गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही गरोदरपणात कच्ची अंडी खाणे टाळले पाहिजे.

. खारट पदार्थ

खारट आणि मसालेदार पदार्थ चवदार असतात. गरोदरपणात ते खावेसे वाटतात. हे पदार्थ खाल्याने तुमच्या तोंडाला चव येईल आणि भूक मारली जाईल. परंतु जास्त मीठ असलेले पदार्थ टाळण्याची शिफारस केली जाते. ह्यामध्ये तुमच्या आवडीचे पदार्थ म्हणजेच सामोसा, भजी आणि वेफर्सचा सुद्धा समावेश होतो. खूप जास्त प्रमाणात मीठ असले की शरीरात पाणी जास्त धरून ठेवले जाते आणि ते खूपशा समस्यांचे मूळ आहे त्यामुळे ते टाळणे योग्य आहे.

. स्ट्रीट फूड

होय, आम्हाला माहित आहे की हे तुम्हाला आवडणार नाही, परंतु आपण आपल्या बाळाला आनंदी आणि सुरक्षित ठेवू इच्छित असल्यास, रस्त्यावरील पदार्थ खाणे टाळा. थोड्या काळासाठी, चाट आणि चायनीज खाणे विसरा. होय, गरोदरपणात तुम्हाला हे पदार्थ खावेसे वाटतील परंतु ते टाळले पाहिजेत कारण हे पदार्थ तयार करताना स्वच्छता आणि इतर आरोग्यविषयक प्रक्रियेचे पालन होत नाही. अशा प्रकारे स्ट्रीट फूड खाण्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला संसर्ग आणि रोगाचा धोका होऊ शकतो. तुमचे पोट अस्वस्थ होऊ शकते तसेच तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. स्ट्रीट फूड मसालेदार असते त्यामुळे तुम्ही ते टाळले पाहिजे. मसालेदार आहार घेतल्यामुळे तुमच्या पोटात जळजळ होऊ शकते म्हणून ते शक्य तितके खाणे टाळा.

. समुद्री अन्न

मांसामध्ये परजीवी व इतर सूक्ष्मजंतू असू शकतात. शिजवलेली फिश करी किंवा तळलेले मासे खाणे देखील टाळावे. होय, माश्यामध्ये गरोदरपणात स्त्रियांना आवश्यक असणारी अनेक महत्वाची पोषक तत्वे असतात परंतु ते खाण्यापासून स्वत: ला रोखले पाहिजे. समस्या माशाची नसून पाण्याची आहे. पाण्यामध्ये बरेचसे दूषित पदार्थ आणि पारा असतो. आणि हे पदार्थ माशाच्या शरीरात जातात. ते अपरिहार्यपणे तुमच्या शरीरात जातात आणि त्यामुळे खूप समस्या उद्भवू शकतात. कोळंबी, साल्मोन आणि कॅटफिश सारखे विशिष्ट प्रकारचे मासे सामान्यत: गर्भवती स्त्रियांसाठी सुरक्षित मानले जातात परंतु आपण त्यांना आपल्या आहाराचा एक भाग बनवण्यापूर्वी प्रथम आपल्या डॉक्टरांशी बोलून खात्री करुन घ्यावी.

१०. बडीशेप

बडीशेप मध्ये इस्ट्रोजेन सारखे कार्य करणारे आणि गर्भाशयाचे आकुंचन उत्तेजित करण्यासाठी ओळखले जाणारे फायटोएस्ट्रोजेनचे ट्रेस असल्याचे ज्ञात आहे. मेथीच्या दाण्यांप्रमाणेच प्रसूतीनंतर स्त्रियांना बडीशेप दिली जाते कारण त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढते तसेच गर्भाशय स्वच्छ होण्यास मदत होते. गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कमी प्रमाणात बडीशेप खाल्ली जाऊ शकते. जे खावेसे वाटते ते खाणे अशक्य झाल्याने तुम्ही नक्कीच दुःखी व्हाल. परंतु लक्षात ठेवा कि हे तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी करत आहात. हे काही भारतीय खाद्यपदार्थ आहेत जे तुम्ही तुमच्या गरोदरपणात खाऊ नयेत. परंतु असे बरेचसे खाद्यपदार्थ आहेत जे खाण्याची गरोदरपणात शिफारस केली जाते आणि ते चविष्ठ देखील असतात. तर त्याचा आनंद घ्या! निरोगी राहण्यावर आणि बाळाला सुरक्षित ठेवण्यावर लक्ष केंद्रित करा म्हणजे तुमचे बाळ सुद्धा निरोगी असेल! आणखी वाचा: गरोदर असताना पपई खाणे किती सुरक्षित आहे? गरोदरपणात सुकामेवा खाणे – फायदे आणि जोखीम
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved