गर्भधारणेचे टप्पे

गरोदरपणाची तिसरी तिमाही: लक्षणे, शरीरात होणारे बदल आणि आहार

जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते तेव्हा तिच्यासाठी ती जगातील सर्वात सुंदर भावना असते. चेहऱ्यावर तेज आणि आनंद असतो. पोटाचा आकार वाढू लागतो. स्त्री जेव्हा गरोदरपणाच्या तिसर्‍या तिमाहीत म्हणजेच गरोदरपणाच्या २८ व्या आठवड्यात प्रवेश करते तेव्हा तिला खूप आनंद होतो. परंतु त्याच वेळी चिंता सुद्धा वाटू शकते. पण काळजी करण्याची गरज नाही कारण हा मार्गदर्शक लेख तुमच्या सर्व शंका आणि चिंता दूर करण्यात मदत करेल.

तिसरी तिमाही म्हणजे काय?

गरोदरपणाचे संपूर्ण नऊ महिने, म्हणजे सुमारे ४० आठवडे सहसा तीन तिमाह्यांमध्ये विभागले जातात. तिसर्‍या तिमाहीमध्ये गरोदरपणाच्या २८ व्या ते ४० व्या आठवड्याचा समावेश होतो. सोप्या शब्दात सांगायचे तर, हे गरोदरपणाचे शेवटचे तीन महिने असतात आणि त्यामुळे ते सर्वात निर्णायक असतात.

गरोदरपणाची तिसरी तिमाही स्त्रीसाठी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आव्हानात्मक असू शकते. कारण बाळाच्या वाढीचा हा अंतिम टप्पा असतो. सर्वसाधारणपणे, बाळाचा विकास ३७ व्या आठवड्याअखेर संपलेला असतो आणि त्यानंतर, तुम्ही कधीही आई होऊ शकता. ह्या कालावधीत तुम्ही काय करू शकता आणि काय अपेक्षित आहे हे जाणून घेणे खरोखर आवश्यक आहे.

तिसऱ्या तिमाहीतील गरोदरपणाची लक्षणे

गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये जास्तीत जास्त काळजी आणि खबरदारी घेणे आवश्यक आहे. स्त्रीला वेदना जाणवू शकतात आणि शरीराच्या काही भागात सूज देखील येऊ शकते. तिला चिंता वाटू लागते.

परंतु गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये प्रवेश करताना खालील लक्षणांकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

गर्भाचा विकास

तिसरी तिमाही सुरु होताना, तुमचे बाळ आधीच मोठे झालेले असेल. तिसऱ्या तिमाहीत गर्भाचे वजन वाढते. गरोदरपणाच्या २८ व्या आठवड्यात गर्भ सुमारे अडीच पौंड आणि सोळा इंच लांब आणि ४० व्या आठवड्यात सुमारे सहा ते नऊ पौंड आणि एकोणीस ते बावीस इंच लांब असू शकतो.

हा बदल तुम्हाला गोंधळात टाकू शकतो, परंतु संपूर्ण गरोदरपणात बाळाची वाढ अशा प्रकारे होते. तिसऱ्या तिमाहीत गर्भाच्या विकासाचे टप्पे जाणून घेण्यासाठी वाचा.

शरीरातील बदल

तिसऱ्या तिमाहीमध्ये तुमच्या पोटाचा आकार वाढू लागतो त्यासोबतच शरीरात इतर अनेक बदल घडू लागतात. शरीरात होणारे बदल खालीलप्रमाणे -

वजनातील वाढ

तिसऱ्या तिमाहीच्या महत्वाच्या काळात वजनाची वाढ वेगाने होते. ह्या काळात तुमच्या बाळाचे वजन जास्तीत जास्त वेगाने वाढते. संशोधनानुसार, साधारणपणे २७ व्या आठवड्यात बाळाचे वजन सुमारे २ पौंड असते आणि ३२ व्या आठवड्यात ३ ते ४ पौंड असते. गरोदरपणाच्या शेवटी किंवा ४० व्या आठवड्यापर्यंत, बाळाचे वजन ६ ते १० पौंडांपर्यंत बदलू शकते.

बाळाच्या वाढलेल्या वजनासोबतच तुमच्या शरीराचे वजन वाढण्यासाठी इतरही काही घटक कारणीभूत असतात आणि ते पुढीलप्रमाणे: शरीरातील द्रवपदार्थ, गर्भजल, गर्भाशयाचा वाढलेला आकार आणि रक्ताचे वाढलेले प्रमाण इत्यादी. ह्याच कारणांमुळे पहिल्या दोन तिमाह्यांमध्ये डॉक्टर तंदुरुस्त राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात जेणेकरुन तिसऱ्या तिमाहीमध्ये संपूर्ण शरीराचे वजन सहन करणे सोपे होईल. सक्रिय राहून हालचाल करत राहणे हाच ह्यावरील उपाय आहे.

तुम्ही करून बघू शकता असे व्यायामप्रकार

४० आठवड्यांच्या काळात ज्या स्त्रिया व्यायाम करतात त्यांचे आरोग्य चांगले राहते, वजन नियंत्रित राहते आणि मूड चांगला राहतो. कमी ते मध्यम तीव्रतेच्या व्यायामाची शिफारस डॉक्टर नेहमीच करतात. परंतु ते करताना सुरक्षितता लक्षात घेतली पाहिजे. गर्भावस्थेच्या तिस-या तिमाहीत सुरू ठेवता येणारे व्यायाम खालीलप्रमाणे आहेत:

तुमच्यासाठी आणि बाळासाठी सर्वोत्तम सल्ला तुमचे डॉक्टर देऊ शकतात. स्त्रीरोगतज्ञांनी परवानगी दिल्यानंतरच व्यायाम करावेत.

चाचण्या आणि स्कॅन

तिसरी तिमाही म्हणजे गरोदरपणातील शेवटचे तीन महिने, ह्या कालावधीत अत्यंत काळजी घेण्याची आणि लक्ष देण्याची गरज असते. त्यासाठी सांगितलेल्या चाचण्या करून घेणे आणि डॉक्टरांना वेळोवेळी भेट देणे आवश्यक असते. खाली काही चाचण्या आणि स्कॅन्स आहेत जे तुम्हाला करून घेणे आवश्यक आहेत.

तिसऱ्या तिमाही मधील आहार

संपूर्ण गरोदरपणात निरोगी आहार राखणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. पौष्टिक आहार घेतल्याने तुम्हाला निरोगी राहण्यास आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये प्रवेश करण्यास मदत होईल. तुम्हाला तुम्ही काय खावे आणि काय खाऊ नये हे माहित असले पाहिजे, कारण ते तुमच्या बाळाच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि तुम्ही तडजोड करू शकत नाही.

खाण्यासाठी पदार्थ

टाळले पाहिजेत असे पदार्थ

शेवटच्या तिमाहीतील कामांची यादी

गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील काळजी महत्वाची आहे आणि तिसर्‍या तिमाहीत आरोग्य चांगले राहण्यासाठी खालील गोष्टी करणे महत्वाचे आहे,

तिसऱ्या तिमाहीत घ्यावयाची खबरदारी

तुमच्या गरोदरपणाच्या तिसर्‍या तिमाहीमध्ये घ्यायची महत्त्वाची खबरदारी महिन्यानुसार विभागली गेली आहे जेणेकरून तुम्ही सहजपणे फॉलोअप करू शकता.

गरोदरपणाचा ७ वा महिना

गरोदरपणाचा ८ वा महिना

गरोदरपणाचा ९ वा महिना

ह्या लक्षणांकडे लक्ष देऊन सावध रहा

कधीकधी गुंतागुंत किंवा इतर अज्ञात कारणांमुळे, तुम्हाला गरोदरपणात जोखीम निर्माण होऊ शकते. कोणत्या टप्प्यावर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे हे पाहण्यासाठी खालील लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे:

तिसऱ्या तिमाहीतील अस्वस्थतेला सामोरे जाण्यासाठी काही टिप्स -

तिसऱ्या तिमाहीमध्ये वजन वाढल्यामुळे किंवा हार्मोनल बदलांमुळे अस्वस्थता येऊ शकते. तिसर्‍या तिमाहीतील अस्वस्थतेचा सामना करण्यास मदत करण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत:

तिसऱ्या तिमाहीचा कालावधी संवेदनशील असतो. ह्या मार्गदर्शकपर लेखामध्ये गरोदरपणाच्या २८ ते ४० व्या आठवड्यासाठी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे अशी सर्व माहिती दिलेली आहे. एकाच वेळी उत्साही आणि चिंताग्रस्त वाटत आहे का? काळजी करू नका, जेव्हा नवीन आनंद एका सुंदर बाळाच्या रूपात तुमच्या जीवनात प्रवेश करेल तेव्हा सर्वकाही ठीक होईल.

आणखी वाचा:

गर्भधारणेची तिसरी तिमाही – गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यातील प्रणयाचा आनंद गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी कराव्यात आणि टाळाव्यात?

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved