गर्भारपण

गरोदरपणातील थायरॉइडची समस्या

गर्भधारणेची पुष्टी होताच तुमचे डॉक्टर तुम्हाला थायरॉईडची चाचणी करून घेण्यास सांगतील. तुम्ही बाळाचा विचार करत असलात तर आधी तुम्ही थायरॉइडची चाचणी करून घेणे गरजेचे आहे. गरोदरपणात थायरॉईड ही एक सामान्य स्थिती असली तरी, थायरॉईड आणि गरोदरपणाची नेहमीची लक्षणे ह्यामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. वजन वाढणे, थकवा जाणवणे, मूड बदलणे, विसरभोळेपणा आणि अगदी सूज येणे ही लक्षणे गरोदरपण आणि थायरॉईड दोन्ही मध्ये आढळतात. त्यामुळे तुमच्या गर्भारपणावर परिणाम होणार नाही अशा प्रकारे उपचार किंवा व्यवस्थापन करण्यासाठी थायरॉईडची कोणतीही लक्षणे आधीच ओळखणे महत्त्वाचे आहे. अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

थायरॉईड डिसऑर्डर म्हणजे काय?

एच-आकाराची थायरॉईड ग्रंथी आपल्या मानेच्या समोर, व्हॉइस बॉक्सच्या अगदी खाली ठेवली जाते. ही ग्रंथी सुमारे दोन इंच लांब असते आणि जवळजवळ वजनहीन आहे (औन्सपेक्षा कमी). ही ग्रंथी अंतःस्रावी प्रणालीचा अविभाज्य भाग बनते. तसेच ही ग्रंथी तुमच्या शरीरासाठी हार्मोन्स तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम करते. थायरॉईड ग्रंथी दोन प्रमुख संप्रेरके तयार करते, T3 (ट्रायिओडोथायरोनिन) आणि T4 (थायरॉक्सिन). थायरॉइडने तयार केलेले हार्मोन्स तुमच्या शरीरातील चयापचय आणि वजन, मेंदूचा विकास, श्वासोच्छवासाची कार्ये, शरीराचे तापमान आणि कोलेस्टेरॉलची पातळी यासारख्या इतर अनेक महत्त्वाच्या शारीरिक कार्यांवर नियंत्रण ठेवतात. गरोदरपणात थायरॉईडच्या पातळीचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे कारण त्याचा बाळावर (बौद्धिक क्षमतेसह) परिणाम होऊ शकतो.

गरोदरपणात जेव्हा स्त्री मूल जन्माला घालण्याच्या वयात असते तेव्हा थायरॉईड असणे सामान्य असते, परंतु त्याचे वेळीच निदान झाले नाही तर त्याचा परिणाम गरोदरपणानंतर वाढू शकतो. ह्या स्थितीचे वर्गीकरण हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम असे केले जाते. हायपरथायरॉईडीझम हा रक्तातील संप्रेरकांच्या उच्च पातळीमुळे होतो, तर हायपोथायरॉईडीझम हा रक्तातील थायरॉईड संप्रेरकांच्या पातळीत घट झाल्यामुळे होतो.

गरोदरपणाचा थायरॉईड कार्यावर कसा परिणाम होतो?

गरोदरपणात इस्ट्रोजेन आणि मानवी कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन (एचसीजी) ही दोन संप्रेरके तुमची थायरॉईड पातळी वाढवण्यासाठी जबाबदार असतात. थायरॉईड संप्रेरक बाळाच्या मेंदूच्या आणि मज्जासंस्थेच्या विकासात आणि तुम्ही गरोदर असताना तुमच्या आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

प्लेसेंटा एचसीजी बनवते आणि ते टीएसएच (थायरॉईड-उत्तेजक संप्रेरक) सारखे असते. ते थायरॉईडला अधिक संप्रेरक तयार करण्यासाठी उत्तेजित करते. इस्ट्रोजेन पातळी वाढल्याने थायरॉईड-बाइंडिंग ग्लोब्युलिन तयार होते. हे प्रथिन थायरॉईड संप्रेरकाला रक्तात प्रवास करण्यास मदत करते. पहिल्या तिमाहीत, तुमचे बाळ थायरॉईड संप्रेरकांच्या गरजांसाठी तुमच्यावर अवलंबून असते. ही संप्रेरके नाळेद्वारे बाळापर्यंत पोहोचतात. ही प्रक्रिया १२ आठवड्यांपर्यंत सुरु राहते. त्यानंतर बाळ स्वतःचे स्वतः थायरॉईड संप्रेरक तयार करण्यास सुरुवात करते.

थायरॉईडमुळे गरोदरपणात निर्माण होणारी कोणतीही समस्या जाणून घेण्यासाठी थायरॉईड कार्य चाचणी करून घेणे आवश्यक आहे. गरोदरपणात थायरॉईडचा आकार वाढतो, परंतु चाचणी करून घेण्यासाठी हे लक्षण पुरेसे नाही. गरोदरपणात थायरॉईडशी संबंधित समस्यांचे निदान करणे कठीण होऊ शकते कारण गरोदरपणाची लक्षणे थायरॉईडच्या लक्षणांसारखीच असतात. उदा: थायरॉईड संप्रेरक पातळी वाढणे, थकवा येणे आणि थायरॉईडचा आकार वाढणे.

चला दोन्ही परिस्थितींचा थोडा तपशीलवार विचार करूया.

गरोदरपणातील हायपरथायरॉईडीझम

जेव्हा अतिक्रियाशील अवयव मोठ्या प्रमाणात थायरॉईड संप्रेरक तयार करतो, तेव्हा त्या स्थितीला हायपरथायरॉईडीझम म्हणतात. गरोदरपणातील या स्थितीची कारणे, लक्षणे, निदान, उपचार इत्यादी जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

. गरोदरपणातील हायपरथायरॉईडीझमची कारणे

हायपरथायरॉईडीझम सामान्यत: ग्रेव्ह डिसीजमुळे होतो. हा एक स्वयंप्रतिकार विकार आहे, हा विकार झाल्यास रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःचे संरक्षण करण्याऐवजी स्वतःच्या पेशी आणि अवयवांवर हल्ला करते. विषारी एडेनोमा हे हायपरथायरॉईडीझमचे आणखी एक कारण आहे, ह्यामध्ये थायरॉईड ग्रंथीमध्ये वाढणारे नोड्यूल हार्मोन्स स्राव करू लागतात. यामुळे शरीरातील रासायनिक संतुलन बिघडते.

. कोणाला धोका आहे?

ज्या स्त्रियांमध्ये गरोदरपणापूर्वी हायपरथायरॉईडीझमचे निदान झाले आहे किंवा ज्यांना हायपरथायरॉईडीझमचा कौटुंबिक इतिहास आहे त्यांना त्यांच्या गरोदरपणात हा त्रास होण्याची शक्यता असते.

. लक्षणे

थकवा, मळमळ, उलट्या, हृदय गती वाढणे, भूक बदलणे, थायरॉईडची पातळी आणि थायरॉईडचा आकार वाढणे ही हायपरथायरॉईडीझमची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे आहेत. भुकेमध्ये बदल होणे आणि उष्णता सहन न होणे हे बदल देखील लक्षात येऊ शकतात.

. निदान

हायपरथायरॉईडीझमचे निदान करण्यासाठी तीन प्रमुख चाचण्या करून, गर्भवती महिलांमधील थायरॉइडच्या समस्येचे निदान करणे शक्य आहे:

. उपचार

TSH पातळी कमी असलेल्या सौम्य हायपरथायरॉईडीझमसाठी उपचार आवश्यक नाही, परंतु मुक्त T4 सामान्य आहे. गंभीर थायरॉईड विकाराच्या बाबतीत, डॉक्टर पहिल्या तिमाहीत कमी डोसमध्ये, प्रोपिलथिओरासिल (PTU) लिहून देतात. अँटी-थायरॉईड औषध, मेथिमाझोल आवश्यक असल्यास पहिल्या तिमाहीनंतर लिहून दिले जाते. रुग्ण औषधांना प्रतिसाद देत नाही अशा दुर्मिळ प्रकरणांमध्ये, थायरॉईडचा काही भाग काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया सुचवली जाऊ शकते. गर्भवती महिलांसाठी रेडिओएक्टिव्ह आयोडीन उपचारांची शिफारस केली जात नाही कारण यामुळे बाळाच्या थायरॉईड ग्रंथीला नुकसान होऊ शकते.

हायपरथायरॉईडीझमचा आई आणि बाळावर परिणाम होऊ शकतो का?

होय, हायपरथायरॉईडीझमचा परिणाम आई आणि बाळावर होऊ शकतो. प्रीक्लॅम्पसिया, अकाली जन्म, गर्भपात आणि आईमध्ये हायपरथायरॉईडची लक्षणे अचानक वाढण्याची शक्यता जास्त असते. तसेच, नवजात बाळाला जलद हृदय गतीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे हृदय विकार, कमी वजन वाढणे, जन्मतः बाळाचे वजन कमी असणे, चिडचिडेपणा इत्यादी लक्षणे दिसून येतात. थायरॉईड वाढल्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होण्याची शक्यता असते.

गरोदरपणातील हायपोथायरॉईडीझम

थायरॉक्सिन ह्या थायरॉईड संप्रेरकाची कमतरता, थायरॉईड ग्रंथीच्या कमी कार्यक्षमतेमुळे उद्भवते, ह्या स्थितीला हायपोथायरॉईडीझम म्हणतात.

. गरोदरपणातील हायपोथायरॉईडीझमची कारणे

रक्तातील थायरॉईड संप्रेरकांची कमी पातळी या स्थितीस कारणीभूत ठरते. ह्या स्थितीमध्ये थायरॉईड ग्रंथी अपर्याप्तपणे कार्य करते. थायरॉईड काढून टाकणे, स्थानिक गलगंड, आयोडीनची कमतरता, रेडिएशन थेरपी आणि पिट्यूटरी ग्रंथीशी संबंधित रोग ही त्याची इतर कारणे आहेत. गरोदरपणातील हायपोथायरॉईडीझम हाशिमोटो रोगामुळे देखील होतो. थायरॉईड ग्रंथीला सूज येण्याचा हा एक प्रकार आहे.

. कोणाला धोका असतो?

ज्या महिलांना हायपोथायरॉईडीझमचा कौटुंबिक इतिहास आहे किंवा भूतकाळात या स्थितीचे निदान झाले आहे त्यांना गरोदरपणात ही समस्या उद्भवण्याचा धोका असतो.

. लक्षणे

हायपोथायरॉईडीझमच्या सामान्य लक्षणांमध्ये चेहऱ्याला सूज येतो, थकवा आणि थंडी सहन होत नाही, वजन वाढणे, एकाग्रता कमी होणे, त्वचा घट्ट होणे किंवा ताणणे आणि ओटीपोटात अस्वस्थता येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. T4 ची कमी झालेली पातळी आणि उच्च TSH पातळी देखील हायपोथायरॉईडीझमचे सूचक आहेत.

. निदान

स्थितीची पुष्टी करण्यासाठी, वरीलपैकी कोणतीही लक्षणे तुमच्यामध्ये आढळल्यास डॉक्टर त्या लक्षणांची पुष्टी करण्यासाठी तुम्हाला FT3 (मुक्त T3) आणि FT4 (मुक्त T4) चाचण्या गरोदरपणात करून घेण्यास सांगतील कारण त्या अचूक असण्याची शक्यता जास्त आहे.

. उपचार

गरोदरपणात, हायपोथायरॉईडीझमचा उपचार थायरॉक्सिन, एक कृत्रिम थायरॉईड संप्रेरक वापरून केला जातो. थायरॉक्सिन हे आई आणि बाळासाठी फायदेशीर आहे आणि ज्या स्त्रियांना गरोदरपणापूर्वीपासून थायरॉईड आहे त्यांच्यासाठी सुद्धा सुरक्षित आहे. ज्या स्त्रियांना गरोदरपणाच्या आधीपासून ही समस्या असते त्यांनी थायरॉईड कार्य सुरळीत राखण्यासाठी त्यांच्या डॉक्टरांशी बोलून डोस वाढवावा.

हायपोथायरॉईडीझमचा आई आणि बाळावर परिणाम होऊ शकतो का?

हायपोथायरॉईडीझममुळे प्रीक्लॅम्पसिया, ऍनिमिया, गर्भाचा पोटात असताना मृत्यू होणे, गर्भपात आणि क्वचित प्रसंगी हृदयाची विफलता होऊ शकते. थायरॉईड संप्रेरके बाळाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असतात. पहिल्या तिमाहीमध्ये हायपोथायरॉईडीझमची समस्या उद्भवली तरी ती बाळाच्या विकासावर परिणाम करू शकते.

गरोदरपणात थायरॉईडची औषधे घेणे सुरक्षित आहे का?

होय, गर्भावस्थेदरम्यान थायरॉईडची औषधे घेणे सुरक्षित असते. खरं तर, गर्भवती असताना हायपोथायरॉईड किंवा हायपरथायरॉईड स्थितींवर उपचार न करणे असुरक्षित आहे. औषध घेतले पाहिजे आणि बारकाईने निरीक्षण केले पाहिजे. लिओथायरॉक्साईन हे थायरॉईड संप्रेरकाचे कृत्रिम स्वरूप आहे. ते बाळासाठी सुरक्षित आहे आणि सामान्यतः या स्थितीवर उपचार करण्यासाठी वापरले जाते.

हायपोथायरॉईडीझमसाठी आहार, पोषण आणि पूरक आहार

गरोदरपणात शरीराला मोठ्या प्रमाणात पोषक तत्वांची आवश्यकता असते कारण आई आणि बाळाच्या आरोग्यामध्ये संतुलन राखणे आवश्यक असते. ह्या कालावधीत, डॉक्टर गर्भवती स्त्रीला संतुलित आहाराचे पालन करण्यास सांगतात. तसेच प्रसवपूर्व जीवनसत्त्वे आणि आयोडीन-आधारित खनिज पूरक आहारातून आवश्यक पोषक तत्त्वे मिळत आहेत ना ह्याकडे लक्ष ठेवण्यास सांगतात.

हायपोथायरॉईडीझमचे निदान झालेल्या गर्भवती स्त्रियांनी रोजच्या आहारातून आयोडीन मिळत आहे ना ह्याची खात्री केली पाहिजे. आयोडीनयुक्त मिठाच्या ऐवजी सामान्य मीठ घेणे हा त्यावरचा एक उपाय आहे. पालक, मेथी आणि कोशिंबिरीची पाने यासारख्या हिरव्या भाज्या खाल्ल्याने मॅग्नेशियम मिळते, आणि ते थायरॉईडच्या कार्यासाठी आवश्यक असते. ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी रोगप्रतिकारक शक्तीसाठी उत्तम आहेत आणि त्यात अँटिऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे त्यांचा तुमच्या आहारात समावेश करा. आपल्या आहारात अंडी, अक्रोड, मशरूम आणि सॅल्मन सारख्या माशांचा समावेश करा. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि सेलेनियम हार्मोन्स नैसर्गिक पद्धतीने नियंत्रित करा. व्हिटॅमिन बी ६ विशेषतः गरोदरपणात फायदेशीर आहे.

गरोदरपणात थायरॉईडची समस्या कशी टाळाल?

थायरॉईड तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी नियंत्रित करतो आणि त्याची कमतरता असली की शरीराची गती मंदावते परिणामी थकवा, वजन वाढणे, केस गळणे आणि बरेच काही होते. थायरॉईड आणि गरोदरपणाच्या समस्यांचा तुमच्या शरीरावर आणि बाळावर परिणाम होण्यापासून तुम्ही कसे रोखू शकता ते येथे आहे:

गरोदरपणात हायपर आणि हायपोथायरॉईडीझमच्या लक्षणांचे पुनरावलोकन करत राहणे आवश्यक आहे, त्यासाठी टीएसएच पातळीची वारंवार चाचणी करणे आवश्यक आहे. तुम्हाला काही लक्षणे दिसल्यास तुमच्या डॉक्टरांशी बोला जेणेकरून सावधगिरीचे उपाय करता येतील. तुमची थायरॉईड पातळी तपासून घेतल्यास, गर्भारपण सुरक्षित आणि त्रासमुक्त होईल.

आणखी वाचा:

गरोदरपणातील ‘मोशन सिकनेस': कारणे आणि उपाय गरोदरपणात होणारा टॉन्सिलायटिस: कारणे, लक्षणे आणि घरगुती उपचार

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved