गर्भधारणेचे आठवडे

गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात दर आठवड्याला होणारे बदल

तुम्ही हा लेख वाचत आहात म्हणजेच तुम्ही गर्भवती आहात असे आम्ही समजतो. गरोदरपणातील ह्या नऊ महिन्यांमध्ये तुमच्यामध्ये अनेक बदल होतील. होय, तुम्ही गरोदर आहात आणि लवकरच आई होणार आहात हे तुम्ही स्वीकारलेले आहे. ह्या नऊ महिन्यांमध्ये तुमच्या शरीरात होणारे बदल तुम्हाला त्यासाठी तयार करतील. गर्भधारणा होणे ही आयुष्यातील एक मोठी गोष्ट आहे. कदाचित जीवनाला कलाटणी देणारी ही घटना आहे. ह्या काळात तुमच्या शरीरात कोणकोणते बदल होतील ते जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. म्हणूनच गरोदरपणाच्या प्रत्येक आठवड्याला तुमच्या शरीरात होणारे बदल आम्ही ह्या लेखामध्ये दिलेले आहेत.

गरोदरपणात होणारे शारीरिक बदल

स्त्रीमध्ये होणाऱ्या शारीरिक बदलांवरून ती स्त्री गरोदर आहे कि नाही हे समजते. जर तुम्ही गरोदर असाल, तर तुम्हाला खाली नमूद केलेली लक्षणे नक्कीच जाणवली असतील. पण जर तुम्हाला ती जाणवली नसतील तर तुम्ही खालील लक्षणांवर लक्ष ठेवा. जर तुम्ही आधी हे बदल अनुभवलेले नसतील तर हे बदल गर्भधारणेची स्पष्ट चिन्हे आहेत!

वर नमूद केलेली सामान्य लक्षणे शरीरातील इतर आरोग्य समस्यांचे सूचक असू शकतात. जरी तुम्ही एकाच वेळी ही सर्व लक्षणे अनुभवत असलात तरीसुद्धा तुम्ही गर्भवती असू शकता. तुम्ही गर्भवती आहात किंवा नाही ह्याची खात्री करण्यासाठी घरगुती गर्भधारणा चाचणी घेणे आवश्यक आहे.

गर्भवती महिलेमध्ये होणारे शारीरिक बदल - प्रत्येक आठवड्याला होणाऱ्या बदलांचे विश्लेषण

तुमच्या प्रसूतीची तारीख तुमच्या शेवटच्या मासिक पाळीच्या दिवसापासून मोजली जाईल. अवघ्या ४० आठवड्यांत, तुमचे शरीर बाळाच्या जन्मासाठी तयार होईल. गरोदरपणात तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक आठवड्याला काय बदल होतात ते पाहूया.

१ ला आठवडा

जर तुम्ही एक आठवड्यांच्या गर्भवती असाल तर अजूनही गर्भधारणेच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. शुक्राणू आणि स्त्रीबीजा चा संयोग गरोदरपणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यांच्या दरम्यान होतो. ह्या कालावधीत दोन अंडाशयांपैकी कोणतेही एक अंडाशय परिपक्व होते आणि स्त्रीबीज सोडले जाते. जर दोन्ही अंडाशयांमधून स्त्रीबीज सोडले गेले, तर तुम्हाला एकसारखे नसलेली जुळी मुले होऊ शकतात. ह्याच आठवड्यात तुम्ही पूरक औषधे घेण्यास सुरुवात करता. ह्या आठवड्यात स्त्रीबीज बीजवाहिनी मधून खाली जाते आणि शुक्राणूंची प्रतीक्षा करते.

२ रा आठवडा

गरोदरपणाच्या दुसऱ्या आठवड्यात ओव्यूलेशन होते. यशस्वी गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी दुस-या आठवड्याच्या दोन किंवा तीन दिवस आधी संभोग करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. शरीरातील ग्रंथी इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके तयार करतात म्हणून स्तन चमकू लागतात. संप्रेरकांमध्ये वाढ होते आणि स्तन कोमल होतात.

[आणखी वाचा: गर्भधारणा: २रा आठवडा]

३ रा आठवडा

शुक्राणूंचा स्त्रीबीजांशी संयोग होतो आणि २०० दशलक्ष प्रतिस्पर्ध्यांमधून एका शुक्राणूचा स्त्रीबीजाशी संयोग होतो. ह्या टप्प्यावर स्त्रीबीज युग्मज बनते आणि बंद होते. त्यानंतर इतर शुक्राणूंचा स्त्रीबीजामध्ये प्रवेश होत नाही. ह्या टप्प्यावर जरी भौतिक बदल होत नसले तरी सुद्धा ह्या टप्प्यावर जैविक स्तरावरील बदल नक्कीच होत असतात. केंद्रक युग्मजासोबत संयोग पावते आणि त्या युग्मजाला लिंग आणि अनुवांशिक वैशिष्ट्ये देते. ह्यामध्ये डोळे आणि केसांचा रंग तसेच इतर २०० समान अनुवांशिक-निर्धारित वैशिष्ट्यांचा समावेश होतो.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ३रा आठवडा]

४ था आठवडा

गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात होणारे शारीरिक बदल या टप्प्यावर दिसू लागतात. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात दिसणारे काही शारीरिक बदल म्हणजे स्तनाना सूज येणे, स्तन दुखणे, थकवा येणे, वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे आणि मळमळ होणे इत्यादी आहेत. नाळ तयार होण्यास सुरुवात होते आणि फलित अंड्याचे गर्भाशयात रोपण होते. त्यामुळे हलका रक्तस्त्राव होतो. चाचणी एका आठवड्यानंतर केली पाहिजे कारण मासिक पाळी संपल्याच्या पहिल्याच दिवशी खोट्या-नकारात्मक चाचण्या केल्या जातात.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ४था आठवडा]

५ वा आठवडा

भ्रूण तयार होण्यास सुरुवात होते आणि तो दाण्याएवढा वाढतो. ह्या आठवड्यापासून गर्भाचा मेंदू, इतर अवयव आणि रक्तवाहिन्यांमध्ये बदल होतो आणि विकास होतो. बाळाच्या पाठीवर एक खोबणी तयार होते आणि नंतर ती न्यूरल ट्यूब मध्ये विकसित होते. हि ट्यूब नंतर बाळाच्या पाठीचा कणा बनते.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ५वा आठवडा]

६ वा आठवडा

न्यूरल ट्यूब पाठीचा कणा बनते. हृदय गर्भाला अधिक रक्तपुरवठा करू लागते. गर्भाचा सी-ह्या अद्याक्षराचा आकार अधिक स्पष्ट होतो. तुम्हाला मळमळ आणि थकवा येण्याची अधिक शक्यता असते. हार्मोनल पातळीतील बदलांमुळे तुमचा रक्तदाब देखील कमी होऊ शकतो. गर्भ एका संरक्षक आवरणाने वेढला जातो आणि अंड्यातील पिवळा बलक पिशवीशी संलग्न होतो. व्यायाम केल्याने तुम्हाला तणावाचा सामना करण्यास आणि काही प्रमाणात आराम मिळण्यास मदत होईल. ह्या कालावधीत, गर्भवती महिलांना पुरेसे फॉलिक ऍसिड मिळणे आवश्यक आहे. गर्भाच्या पाठीचा कणा आणि मेंदूच्या वाढीसाठी ते खूप महत्वाचे आहे. फॉलिक ऍसिडच्या कमतरतेमुळे गंभीर जन्मजात दोष होऊ शकतात त्याला न्यूरल ट्यूब दोष म्हणतात. गरोदरपणात दररोज ६०० मायक्रोग्रॅम फोलेट मिळणे आवश्यक आहे.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ६वा आठवडा]

७ वा आठवडा

मॉर्निंग सिकनेस आता वाढू लागतो. गर्भाचा मेंदू आणि चेहरा तयार होऊ लागतो आणि आकार घेऊ लागतो. बाळाच्या डोळ्यांचा पडदा विकसित होतो, नाकपुड्या तयार होतात आणि हात पॅडलच्या आकारासारखे बनू लागतात. गर्भाशयाच्या मुखाजवळील श्लेष्मा जाड होतो आणि गर्भाशयाचे मुख बंद होते. हाताची आणि पायाची बोटे तयार होतात. भ्रूणाची ब्रेनवेव्ह चिन्हे दिसू लागतात. तुम्हाला मनस्थितीतील बदल, विक्षिप्तपणा आणि आजारी असल्याचा अनुभव येईल. हे एक चांगले चिन्ह आहे कारण त्यामुळे तुमची गरोदरपणातील संप्रेरकांची पातळी योग्य आहे हे सूचित होते.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ७वा आठवडा]

८ वा आठवडा

आठव्या आठवड्यापासून भ्रूणातील ब्रेनवेव्ह ऍक्टिव्हिटी सुरू होण्याची चिन्हे दिसतात. जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा ओटीपोटात तीव्र वेदना होऊ शकतात. डॉक्टर अल्ट्रासाऊंड इमेजिंगद्वारे हृदयाचे ठोके किंवा गर्भाच्या क्रियाकलापांची चिन्हे तपासतात. एकदा भ्रूणाचे रोपण झाल्यानंतर, गर्भपात होण्याची शक्यता २% पर्यंत कमी होते आणि ह्या दिवसापासून प्रसूती दिनांक मोजला जातो. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत, तुम्हाला रक्तस्त्राव होऊ शकतो.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ८वा आठवडा]

९ वा आठवडा

९ व्या आठवड्यात, गर्भ विकसित होईल. परिणामी, तुम्हाला तुमच्या मूत्राशयावर दबाव जाणवू शकतो. लघवीची गळती होऊ शकते. ह्या आठवड्यात, बाळाचे हृदय आणि पापण्या विकसित होतील. त्याच्या केसांची मुळे आणि स्तनाग्रे देखील तयार होतील. तुमचे बाळ यापुढे भ्रूण राहणार नाही, तो एक गर्भ असेल. गरोदरपणाचा ९ वा आठवडा हा बाळाचे हात आणि पाय यांच्या विकासासाठी एक महत्वाचा काळ आहे. तुमच्या लहान मुलाचे यकृत, पित्ताशय , प्लीहा आणि ऍड्रिनल ग्लॅण्डस देखील विकसित होऊ लागल्या आहेत. जसजसे बाळाची श्वसन प्रणाली विकसित होते, तसतसे बाळ श्वासाद्वारे गर्भजल आत घेते आणि बाहेर टाकते त्यामुळे बाळाला उचकी येऊ शकते. डायाफ्रामच्या चांगल्या विकासासाठी हे महत्वाचे आहे. तुम्हाला आणखी काही महिने गर्भाशयातील बाळाची उचकी जाणवणार नाही. तुम्हाला डिहायड्रेटेड वाटू शकते - बहुतेक डॉक्टरांच्या मते गरोदरपणातील हा सर्वात अवघड काळ आहे. ह्या आठवड्यात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ९वा आठवडा]

१० वा आठवडा

१० व्या आठवड्यानंतर, तुमच्या बाळाचे जवळजवळ सर्व महत्वाचे अवयव पूर्णपणे विकसित होतील आणि सुरळीत कार्य करण्यास सुरवात करतील. तुमच्या बाळाला अधिकृतपणे आता 'भ्रूण' म्हटले जाईल. बाळाची कूर्चा आणि हाडे तयार होत राहतील तसेच बाळाचे जननेंद्रिय सुद्धा तयार होईल. गर्भाचे डोळे अधिक स्पष्ट होतील. गर्भाला नाळेमधून ऑक्सिजन मिळेल आणि गर्भाशयातील बाळाच्या श्वासोच्छवासाच्या हालचाली अधूनमधून लक्षात येऊ लागतील.

[आणखी वाचा: गर्भधारणा: १०वा आठवडा]

११ वा आठवडा

११व्या आठवड्यापर्यंत, गर्भ श्वास घेऊ शकतो, अंगठा चोखू शकतो आणि उसासे घेऊ शकतो. ह्या काळात बाळाच्या चेहऱ्याचा विकास सुरु राहतो. गर्भाचे डोके शरीरापेक्षा मोठे असते. ११व्या आठवड्यात अन्नपदार्थांची जास्त लालसा दिसून येते. तुम्हाला लोणच्यासारख्या अन्नाशी संबंधित नसलेल्या गोष्टींची लालसा वाटू शकते. हे लक्षण तुमच्या आहारातील कमतरता दर्शवू शकते. फोलेट, तंतुमय पदार्थ आणि लोहाचे सेवन करणे आवश्यक आहे.

पहिल्या तिमाहीतील ११ आणि १३ आठवड्याच्या दरम्यान केले जाणारे अल्ट्रासाऊंड तसेच न्यूकल ट्रान्सलुसेंसी चाचणीद्वारे गुणसूत्रातील विकृती तपासल्या जातील.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ११वा आठवडा]

१२ वा आठवडा

आता तुमच्या बाळाची लांबी ३ इंच आहे आणि पुढे ती आणखी वाढेल. तुमच्या बाळाचा चेहरा अधिक मानवी दिसेल आणि बाळाचे वजन अर्धा औंस म्हणजे सुमारे १४ ग्रॅम असेल आणि डोक्याचा घेर २ ते २ १/४ इंच इतक्या लांबीचा असेल. गर्भाचा आकार लिंबाएवढा असेल. बाळाच्या शरीराची वाढ होत राहील. शरीराच्या इतर अवयवांच्या वाढीच्या प्रमाणाप्रमाणे डोक्याच्या वाढीचा दर मंदावेल. भ्रूण आता सरळ स्थितीमध्ये असेल. तुम्हाला शौचास त्रास होऊ शकतो. तसेच तुमच्या पोटात वायू वाढून आणि हृदय गती वाढू शकते. तुमच्या गर्भाशयाच्या वाढत्या आकाराला सामावून घेण्यासाठी तुमचे नितंब रुंद होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. वाढत्या गर्भाशयाच्या आकारामुळे ओटीपोटावर दाब येतो.

[आणखी वाचा: गर्भधारणा: १२वा आठवडा]

१३ वा आठवडा

तुम्ही आणि तुमच्या बाळाने पहिली तिमाही यशस्वीरीत्या पूर्ण केलेली आहे. अभिनंदन! तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या दुस-या तिमाहीत प्रवेश करताच तुमच्या शरीरात वेगाने बदल होऊ लागतील. निरोगी खाणे आणि भरपूर द्रवपदार्थ घेणे आता महत्वाचे आहे. तुम्हाला थोडे बरे वाटेल कारण मळमळ आणि मॉर्निंग सिकनेस कमी होईल. ह्या टप्प्यावर गर्भवती महिलांना हलकी योगासने आणि पोहण्याचा व्यायाम करायला सांगितला जातो. बाळाला उचक्या लागण्यास सुरुवात होईल त्यामुळे डायफ्रॅम जवळील मार्ग साफ होण्यास मदत होते तसेच श्वासोच्छवासाचे कार्य सुलभ होते. बाळाच्या मूत्रपिंडाचे कार्य सुरू होते आणि अस्थिमज्जा विविध रोगांशी लढण्यासाठी पांढऱ्या रक्तपेशींचे उत्पादन सुरू करते. स्वादुपिंड, पित्त मूत्राशय आणि थायरॉईड देखील या आठवड्यात विकसित होतील.

[आणखी वाचा: गर्भधारणा: १३वा आठवडा]

१४ वा आठवडा

ह्या काळात तुमच्या बाळाचे अवयव कार्य करण्यास सुरवात करतील. तुम्ही अल्ट्रासाऊंड स्कॅनद्वारे बाळाच्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये पाहू शकाल. बाळाचे आतडे विकसित होऊ लागेल आणि इन्सुलिनचे उत्पादन सुरू होईल. तुम्ही तुमच्या बाळाच्या पाय मारण्याचा पहिल्यांदाच अनुभव घेऊ शकता. बाळाच्या पाय मारण्याच्या प्रक्रियेला 'क्विकनिंग' असेही म्हणतात. गरोदरपणाच्या साधारणपणे १६-१८ आठवड्यांच्या आसपास बाळाचे पाय मारणे जाणवू लागते. परंतु ज्या स्त्रियांनी आधी बाळाला जन्म दिला आहे त्यांचे स्नायू अधिक आरामशीर असतात. त्यांच्यासाठी, गर्भाची हालचाल कधीकधी १४ आठवड्यांपर्यंत जाणवते. बाळाच्या चेहऱ्याचे स्नायू विकसित होतात. ह्या आठवड्यादरम्यान, तुमचे डॉक्टर तुमच्या बाळामध्ये स्पायना बिफिडा आणि एडवर्ड सिंड्रोम सारखे न्यूरल ट्यूब दोष तपासण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यास सांगू शकतात.

[आणखी वाचा: गर्भधारणा: १४वा आठवडा]

१५ वा आठवडा

ह्या टप्प्यावर रक्तातील प्रथिने आणि डाऊन सिंड्रोम किंवा अनुवांशिक दोषांची चिन्हे तपासण्यासाठी चाचण्या केल्या जातात. पुरुषांच्या तुलनेत स्त्री भ्रूण अधिक तोंडाची हालचाल करताना दिसतात. गर्भाची लांबी सुमारे ५ इंच आणि वजन २ औंस इतके असते. बेंबीच्या जागेवर एक मोठा उंचवटा दिसून येतो. तुम्हाला तुमच्या ओटीपोटाजवळील भागात सराव कळा देखील जाणवू लागतात. जर तुम्हाला एका तासाला चारपेक्षा जास्त काळ कळा जाणवत असतील आणि योनीतून श्लेष्माचा वारंवार स्त्राव होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.

[आणखी वाचा: गर्भधारणा: १५वा आठवडा]

१६ वा आठवडा

वाढीचा वेग वाढू लागतो आणि त्यानंतर हाडांची निर्मिती होते. तुमच्या गरोदरपणाच्या पुढील कालावधीत तुम्हाला दर आठवड्याला एक पौंड म्हणजे ०.४५४ इतके वजन वाढताना दिसेल, तुमच्या ओटीपोटाजवळील भाग मजबूत होईल. ह्या काळापर्यंत तुमच्या बाळाची हालचाल अधिक ठळक होण्याची चिन्हे देखील तुम्हाला दिसून येतील.

[आणखी वाचा: गर्भधारणा: १६वा आठवडा]

१७ वा आठवडा

तुम्हाला स्वप्ने पडू लागतात आणि बऱ्याचदा ती विचित्र असतात. ही स्वप्ने बाळंतपण आणि पालकत्वासंबंधीची चिंता किंवा काळजी ह्यामुळे पडतात आणि ती पूर्णपणे सामान्य आहे. ह्या काळात, बाळाचे वजन आता नाळेपेक्षा जास्त असेल. बाळाच्या शरीरात उष्णता निर्माण करणारी तपकिरी चरबी जमा होईल. तुमच्या स्तनांचा आकार आणखी वाढेल. तुमचे स्तन संवेदनशील, कोमल बनतील आणि कधीकधी ते दुखू लागतील. गरोदरपणाचे तेज तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागेल. ते रक्ताभिसरण वाढल्याचे लक्षण आहे. ह्या आठवड्यापासून ते साधारणपणे २२ व्या आठवड्यापर्यंत तुम्हाला बाळाच्या पाय मारण्याचा अनुभव येऊ शकतो. नाळेचे कार्य आता पूर्णपणे सुरळीत सुरु होते. विषारी पदार्थ काढून टाकताना नाळ पोषकद्रव्ये शोषून घेते आणि वितरित करते.

[आणखी वाचा: गर्भधारणा: १७वा आठवडा]

१८ वा आठवडा

बाळाचे लिंग निश्चित करण्यासाठी ह्या टप्प्यावर अधिक अल्ट्रासाऊंड चाचण्या केल्या जाऊ शकतात. तथापि, डॉक्टर आपल्याला याबद्दल माहिती देऊ शकत नाहीत. गर्भाशयातील बाळाचे पाय मारणे अधिक जाणवू लागते आणि बाळ काही विशिष्ट आवाजांवर प्रतिक्रिया देऊ शकते. बाळाच्या डोळ्याचा पडदा विकसित होईल आणि प्रकाशासाठी संवेदनशील होईल. बाळ स्थिती बदलू शकते आणि अगदी पाय दुमडून घेऊ शकते. दात तयार होणे आणि चरबी जमा होणे देखील सुरू होते. पाय, कंबर आणि इतर स्नायूंमध्ये देखील वेदना जाणवतील.

[आणखी वाचा: गर्भधारणा: १८वा आठवडा]

१९ वा आठवडा

तुमच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये बाळाने अम्नीओटिक सॅकचा पडदा धरून ठेवला आहे असे दिसेल. तसेच बाळ अंगठे चोखताना किंवा गर्भाशयात हालचाल करत असल्याची चित्रे दिसून येतील. जर बाळ मुलगी असेल, तर तिच्या शरीरात लहान ग्रंथी तयार होण्यास सुरूवात होईल. तुमच्या आनुवांशिक सामग्रीपैकी निम्मा भाग तिच्या आत तयार होईल. तुम्ही बी-व्हिटॅमिन आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थ खा कारण बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी ते आवश्यक असतात.

[आणखी वाचा: गर्भधारणा: १९वा आठवडा]

२० वा आठवडा

तुमचे गर्भाशय तुमच्या बरगडीच्या पिंजऱ्याच्या दिशेने दर आठवड्याला १ सेंटीमीटर वेगाने वाढेल. ह्या काळात स्त्रिया प्रसुतीचे तंत्र शिकण्यासाठी प्रसूती वर्गात प्रवेश घेतात. तुमची मनःस्थिती सुद्धा आता खूप सुधारेल कारण तुम्ही तुमच्या बाळाला जन्म देण्याच्या अर्ध्या मार्गावर आहात. गर्भाशयातून गर्भामध्ये रोगप्रतिकार शक्ती हस्तांतरित केली जाते.

[आणखी वाचा: गर्भधारणा: २०वा आठवडा]

२१ वा आठवडा

तुमचे वय ३५ किंवा त्याहून अधिक असल्यास किंवा तुम्हाला मधुमेह आणि इतर जुनाट आजार असल्यास, गरोदरपणात होणाऱ्या शारीरिक बदलांकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. गरोदरपणाच्या तिसर्‍या तिमाहीपासून एक्लॅम्पसियाचा धोका असण्याची चिन्हे दिसू लागतात. ह्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही दररोज चालले पाहिजे आणि आराम केला पाहिजे.

[आणखी वाचा: गर्भधारणा: २१वा आठवडा]

२२ वा आठवडा

तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात आहात. २२ व्या आठवड्यात, तुमच्या बाळाच्या मेंदूचा वेगाने विकास होईल. तुम्हाला ह्या कालावधीत मूळव्याध आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. योनीभोवती यीस्ट संसर्ग होणे तसेच वारंवार योनीतून स्त्राव होणे ही ह्या आठवड्यात शरीरामध्ये दिसणारी सामान्य चिन्हे आहेत. 'डोचिंग' टाळावे. योनीतून स्त्राव होणे लालसरपणा, खाज सुटणे आणि योनीला दुर्गंधी येणे ही लक्षणे दिसू शकतात. बाळाचे अवयव पूर्णपणे विकसित होतात आणि नाळेद्वारे बाळाला ऑक्सिजन आणि इतर पोषक तत्वांचा पुरवठा केला जातो.

[आणखी वाचा: गर्भधारणा: २२वा आठवडा]

२३ वा आठवडा

तुमच्या बाळाचे डोळे आता तयार होतील पण रंगद्रव्यांच्या कमतरतेमुळे डोळ्यांना कोणताही रंग येणार नाही. तुमचे डॉक्टर तुम्हाला लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला देऊ शकतात.

[आणखी वाचा: गर्भधारणा: २३वा आठवडा]

२४ वा आठवडा

ह्या आठवड्यात तुम्हाला छातीत जळजळ जाणवेल. छातीत जळजळ होणे हे तुमच्या बाळाच्या डोक्यावरील केस वाढण्याचे संकेत आहेत. तुम्हाला छातीत जळजळ होत नसल्यास, तुमच्या बाळाला टक्कल असण्याची शक्यता आहे. स्नायू दुखणे, पाय दुखणे, थकवा आणि चक्कर येणे हे इतर शारीरिक बदल तुम्हाला ह्या आठवड्यात जाणवू शकतात.

[आणखी वाचा: गर्भधारणा: २४वा आठवडा]

२५ वा आठवडा

बाळाच्या जन्मानंतर पुनर्प्राप्ती प्रक्रिया वाढविण्यासाठी ह्या टप्प्यावर व्यायाम खूप महत्वाचा आहे. तुमच्या बाळाचे नियमित झोपेचे रुटीन असेल आणि त्याच्या नाकपुड्या उघडल्या जातील. बाळाच्या फुफ्फुसात ‘सर्फॅक्टंट’ तयार होईल आणि त्यामुळे बाळाच्या फुफ्फुसाच्या आत असलेल्या लहान हवेच्या पिशव्या चांगल्या श्वासोच्छवासासाठी उघडल्या जातील. तुमची पाठ, नितंब आणि पाय दुखू शकतात. ह्या काळात तुम्हाला थकवा जाणवू लागतो तसेच चक्कर सुद्धा येऊ शकते.

[आणखी वाचा: गर्भधारणा: २५वा आठवडा]

२६ वा आठवडा

या काळात बाळाची श्रवण प्रणाली विकसित होईल आणि बाळ आवाजाना चांगला प्रतिसाद देईल. झोपेच्या वेळी तुम्हाला अस्वस्थता जाणवेल. पाठीऐवजी कुशीवर झोपा कारण पाठीवर झोपल्याने गर्भाशयाच्या मुख्य धमनीच्या स्थितीमुळे बाळाला रक्तपुरवठा थांबतो. तुम्हाला तुमच्या पोटाजवळ स्ट्रेच मार्क्स दिसू शकतात.

[आणखी वाचा: गर्भधारणा: २६वा आठवडा]

२७ वा आठवडा

तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत आहात आणि पाठदुखीचा सामना करण्यासाठी तुम्ही आता तयार असले पाहिजे. ह्या काळात, तुम्हाला तीव्र पाठदुखी जाणवू शकते. तुम्हाला सायटिकाच्या वेदनांचा अनुभव येऊ शकतो. उचलणे, वाकणे आणि चालणे यामुळे वेदना वाढतात आणि अम्नीओटिक द्रवपदार्थाचे प्रमाण कमी होते. बोटे आणि गुडघ्यांची टोके आणि बाळ हालचाल करते तेव्हा हाडांच्या कडा दिसू शकतात. तुमच्या हृदयाची गती वाढू शकते.

[आणखी वाचा: गर्भधारणा: २७वा आठवडा]

२८ वा आठवडा

तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या तिसर्‍या तिमाहीत असताना, सराव कळा अनुभवण्यासाठी तयार रहा. ह्या सरावकळा म्हणजे ओटीपोटातील स्नायूंना घट्ट करणाऱ्या संवेदना आहेत. तुमचे वजन वाढेल आणि बाळाच्या शरीरातील चरबीचे प्रमाण २ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढेल. उष्ण हवामानात किंवा जास्त वेळ उभे राहणे टाळा कारण त्यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते. तुम्हाला कमी रक्तदाबाचा त्रास देखील होऊ शकतो. भरपूर पाणी प्या आणि जर तुम्ही उन्हाळ्यात गरोदर असाल तर जास्त वेळा घराबाहेर पडू नका. तुमच्या पोटाचा आकारही वाढेल आणि त्यामुळे तुम्हाला अस्वस्थता जाणवेल. ह्या काळात तुमच्या पायात पेटके येऊन पाय दुखण्याची शक्यता वाढेल.

[आणखी वाचा: गर्भधारणा: २८वा आठवडा]

२९ वा आठवडा

२९ व्या आठवड्यात वारंवार बाथरूमला जाणे आणि झोप येणे सामान्य आहे. तुमच्या बाळाची श्वासोच्छवासाची प्रणाली आणि अवयवांची कार्ये आता पूर्णपणे विकसित होतील आणि त्यांना श्वासोच्छवासासाठी कोणत्याही मदतीची आवश्यकता नसेल. प्रोलॅक्टिनचे उत्पादन वाढते आणि तुमचे स्तन कोलोस्ट्रम तयार करण्यास सुरवात करतात. बाळाच्या ऍड्रिनल ग्लॅण्डस एस्ट्रिओल तयार करतात.

[आणखी वाचा: गर्भधारणा: २९वा आठवडा]

३० वा आठवडा

तुमचे गर्भाशय वाढत राहील आणि त्यामुळे तुमच्या डायफ्रॅमवर दाब पडेल. तसेच तुम्हाला धाप लागण्याची शक्यता आहे. श्वास घेण्यास त्रास होणे आणि मूत्राशयावर दबाव येणे ह्यामुळे वारंवार लघवी होऊ शकते. तुम्ही तुमचे प्रसूती वर्ग सुरू ठेवावे. ते ३६ व्या आठवड्यात संपले पाहिजेत असे पहा.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ३०वा आठवडा]

३१ वा आठवडा

तुमच्या बाळाची जसजशी वाढ होईल तसे तुमचे पोट आणखी वाढेल. प्रत्येक तासाला १० वेळा पाय मारणे हे गर्भाशयातील बाळाच्या निरोगी वाढीचे लक्षण आहे. जर तुम्हाला बाळाची हालचाल जाणवली नाही तर बाळाला ताजे, नैसर्गिक फळ किंवा भाज्यांचा एक ग्लास रस द्यावा.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ३१वा आठवडा]

३२ वा आठवडा

आतापर्यंत, तुमच्या बाळाच्या पाच ज्ञानेंद्रियांचा पूर्ण विकास होईल. तुमच्या बाळाला झोपेच्या वेळी आरईएम चक्रांचा अनुभव येईल. त्याच्या श्वासोच्छवासाच्या हालचाली तुमच्या गर्भाशयात तीव्र होतील. त्याची ह्या जगात येण्याची तयारी सुरु होईल.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ३२वा आठवडा]

३३ वा आठवडा

बाळाचे डोके खाली येते हे बाळाच्या जन्माच्या तयारीची सुरुवात झाली आहे हे सूचित करते. ह्या स्थितीमुळे मेंदूला जास्त रक्तपुरवठा होतो. तुम्हाला ओटीपोटात अधिक आकुंचन जाणवू शकते.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ३३वा आठवडा]

३४ वा आठवडा

पोटावर प्रकाश पडल्यावर बाळाच्या डोळ्यांची बुबुळे प्रतिसाद देतात. ती प्रसरण पावतात आणि संकुचित होतात. ह्या आठवड्यात तुमचे बाळ तुमच्या गर्भाशयात खूप झोपेल कारण त्याचा मेंदू सतत विकसित होत असतो. बाळाला झोपेच्या वेळी 'आरईएम सायकल' चा अधिक सखोल अनुभव येईल आणि त्याला स्वप्नेही पडू लागतील.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ३४वा आठवडा]

३५ वा आठवडा

बाळाचा आकार आता अंदाजे १६ ते २० इंच इतका झालेला असेल आणि बाळ आता जन्म घेण्यास तयार आहे. या आठवड्यात बाळाची मज्जासंस्था आणि रोगप्रतिकारक प्रणाली परिपक्व होते. बाळाचे वाढलेले वजन आता तुम्हाला जाणवू लागेल. आजूबाजूला फिरताना किंवा सामान्य, दैनंदिन कामे करताना तुम्हाला विश्रांती घेण्याची आणि थोडा वेळ बसण्याची गरज भासू शकते. ३५ व्या आठवड्यापासून पुढील दोन आठवडे, तुमची ग्रूप बी स्ट्रेप्टोकोकससाठी चाचणी केली जाईल. हे जिवाणू योनीमध्ये असतात आणि बाळाला संसर्ग पसरवण्यास सक्षम असतात. चाचणीमध्ये सामान्यत: गुदाशयात कापसाच्या पट्टीने हलके दाब दिला जातो.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ३५वा आठवडा]

३६ वा आठवडा

तुमच्या बाळाच्या हालचाली आत्तापर्यंत मंदावल्या असतील आणि तुमच्या गर्भाच्या हालचाली दिवसातून २० वेळा होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला काळजी वाटत असेल तर तुम्ही एक ग्लास संत्र्याचा रस पिऊन एका कुशीवर झोपू शकता. असे केल्याने बाळास उठण्यास आणि हालचाल करण्यास मदत होईल.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ३६वा आठवडा]

३७ वा आठवडा

बाळाच्या आतड्यात मेकोनियम निर्माण होईल. प्रसूतीनंतर बाळ बाहेरच्या जगात आल्यावर पहिल्यांदा शौचास होण्यास त्यामुळे मदत होईल. गर्भाचा आकार आता सुमारे २० ते २१ इंच असेल. बाळाचे वजन ६ ते ७ पौंड म्हणजेच सुमारे २.७ ते ३.१ किलो असेल. तुमचे बाळ प्रसूतीच्या तयारीच्या दृष्टीने श्वास घेण्याचा देखील सराव करू शकते. तुमच्या स्तनातून कोलोस्ट्रम बाहेर पडू लागेल आणि तुमच्या बाळाचा तो पौष्टिक स्रोत असेल. तुम्हाला त्यामुळे पोट फुगलेले वाटेल.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ३७वा आठवडा]

३८ वा आठवडा

लॅनुगो, म्हणजेच तुमच्या बाळाच्या शरीरावरील लव आता नाहीशी होईल. तुमचे बाळ आता पूर्ण विकसित झालेले असेल. तथापि, मेंदूतील कनेक्शन अजूनही तयार होत राहतील, ही प्रक्रिया बाळाच्या जन्मानंतर सुद्धा सुरू राहील. तुमच्या बाळाची नखे वाढू लागतात आणि हातापायांच्या बोटांच्या टोकापर्यंत पोहोचू शकतात. पाठ आणि मानदुखीचा वारंवार त्रास होणे सामान्य आहे. गतिशीलता कमी होणे देखील सामान्य आहे. वाढलेल्या थकव्यामुळे तुम्हाला हा काळ कठीण वाटेल. लवकर बरे वाटावे म्हणून थोडे थोडे पौष्टिक अन्न वारंवार खा.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ३८वा आठवडा]

३९ वा आठवडा

तुमच्या बाळाचे वजन आता ६ ते १० पौंड म्हणजेच सुमारे २.७ ते - .५ किलो असेल आणि आकारानुसार लांबी १७ ते २३ इंच असेल. तुमचे बाळ अधिक न्यूरल कनेक्शन विकसित करत राहील. बाळाच्या केसांची वाढ होईल आणि वजन वाढेल. तुम्ही शेवटच्या आठवड्यात प्रवेश करण्यापूर्वी काही आठवडे आधी प्रसूती रजा घेण्याचा विचार करू शकता. आराम करा, चित्रपट पहा. बरे वाटण्यासाठी हात-गुडघे ताणून पेल्विक टिल्टिंग व्यायाम करा.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ३९वा आठवडा]

४० वा आठवडा

४० व्या आठवड्यापासून तुमचे बाळ जन्मासाठी तयार होईल. जर तुमच्या बाळाचा जन्म अजूनही झालेला झाला नसेल किंवा या आठवड्यात प्रसूती झाली नसेल, तर डॉक्टर आणखी दोन आठवडे तुमच्यावर लक्ष ठेवतील. गर्भारपणाचा कालावधी ह्या टप्प्यावर संपतो परंतु तो सुरु राहिल्यास, त्यास 'पोस्ट-डेट' म्हटले जाते. तुमच्या प्रसूतीची तारीख लवकरच जवळ येईल आणि तुमच्या हातात तुमचे बाळ असेल.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ४०वा आठवडा]

४१ वा आठवडा

जर तुमच्या बाळाचा अजून जन्म झाला नसेल, तर तुमचे डॉक्टर तुमच्याशी प्रसूतीबद्दल बोलतील. ४२ व्या आठवड्यापर्यंत गर्भवती स्त्रीची प्रसूती न झाल्यास ते आई आणि बाळ दोघांसाठी असुरक्षित मानले जाते.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ४१वा आठवडा]

४२ वा आठवडा

जर तुमचे बाळ आत्तापर्यंत जन्माला आलेले नसेल, तर तुमचे डॉक्टर तुम्हाला प्रसूतीसाठी प्रवृत्त करतील. त्यासाठी डॉक्टर एकतर सी-सेक्शन किंवा योनीतून प्रसूती सुचवतील. जर तुमच्या गर्भाशयाचे मुख मऊ झालेले नसेल तर, डॉक्टर त्यासाठी हॉर्मोन्सचे इंजेक्शन देऊन यांत्रिकरित्या प्रसूती करतील. पडदा काढणे आणि फाटणे यासारख्या प्रक्रिया वापरल्या जातात. लेबर इंडक्शनच्या सामान्य पद्धतींमध्ये योनिमार्गाचे आकुंचन सुरू करण्यासाठी ऑक्सिटोसिन सारखी औषधे वापरली जातात. मॅन्युअल लेबर इंडक्शन पद्धती वापरूनही योनीचे आकुंचन होत नसल्यास, बाळाला जन्म देण्यासाठी सी-सेक्शन प्रक्रियेची गरज भासू शकते.

[आणखी वाचा: गर्भधारणा: ४२वा आठवडा]

एकदा तुमच्या बाळाचा जन्म झाल्यावर, तुम्ही तुमचा आहार, व्यायाम आणि पोषण इत्यादींवर लक्ष ठेवून पुनर्प्राप्ती करणे महत्वाचे आहे. यशस्वी गर्भधारणा आणि सुलभ प्रसूती होण्यासाठी तुम्ही धूम्रपान, अंमली पदार्थांचे सेवन आणि मद्यपान टाळावे.

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved