आहार आणि पोषण

गरोदरपणात मका (कॉर्न) खाणे सुरक्षित आहे का?

गर्भवती आई आणि तिच्या बाळाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी गरोदरपणात पौष्टिक पदार्थ खाणे आवश्यक आहे. पण गरोदरपणात विशिष्ट अन्नपदार्थांची लालसा वाढू लागते. काही गरोदर स्त्रियांना मक्याचे दाणे खाण्याची इच्छा होते. पण हे सुरक्षित आहे का?  आम्ही ह्या लेखाद्वारे तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ.

मका (कॉर्न) बद्दल थोडे अधिक

मक्याला इंग्रजीमध्ये कॉर्न असे म्हणतात. हे एक लोकप्रिय अन्नधान्य आहे. मक्यामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे समृद्ध प्रमाणात असतात. मक्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी1, बी5, आहारातील तंतुमय पदार्थ आणि मॅग्नेशियम इत्यादींचा समावेश होतो. कॉर्न केवळ पौष्टिकच नाही तर ते खूप स्वादिष्ट देखील आहे. बर्‍याच गर्भवती स्त्रियांना गोड मक्याची रसाळ आणि कुरकुरीत चव आकर्षक वाटते.

गरोदरपणात कॉर्न खाण्याचे आरोग्य फायदे

गरोदरपणात कॉर्न खाण्याचे काही आरोग्यविषयक फायदे खालीलप्रमाणे आहेत.

1.बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो

कॉर्न फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे.  बद्धकोष्ठतेसारख्या पचनाच्या समस्या दूर करण्यास कॉर्न मुळे मदत होते.

2. नवजात दोषांचा धोका कमी करते

कॉर्नमध्ये फॉलिक ऍसिड असते, त्यामुळे बाळांमधील स्पिना बिफिडा सारख्या विकृतींचा धोका कमी होतो.

3. स्मरणशक्ती वाढते

गरोदरपणात कॉर्न खाल्ल्याने तुम्हाला यादी न करता सुद्धा किराणा सामान खरेदी करण्यास मदत होऊ शकते! तसेच ह्यामुळे गर्भाच्या मेंदूच्या विकासास देखील मदत होते.

4. बाळाचे डोळे निरोगी ठेवते

कॉर्न मध्ये ल्युटीन सारखे अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात आणि ते तुमच्या बाळाची दृष्टी सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावते.

5. कर्करोग प्रतिबंधित करते

तज्ञांचा असा विश्वास आहे की मक्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट स्तनाच्या कर्करोगासह काही प्रकारचे कर्करोग होण्यापासून रोखू शकतात.

6. ट्यूमरचा धोका कमी होतो

कॉर्नमध्ये फेर्युलिक ऍसिडसारखी फेनोलिक संयुगे असतात आणि त्यामुळे ट्यूमरचा धोका कमी होतो.

7. प्रतिकारशक्ती वाढवते

कॉर्न मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आहे.  त्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते, तुमची प्रतिकारशक्ती सुधारते आणि गरोदरपणात स्मरणशक्ती वाढवते.

8. चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते

गरोदरपणात कॉर्न हस्क ऑइलचे सेवन केल्याने प्लाझ्मा एलडीएल कमी होण्यास आणि शरीरात चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होते.

तुम्ही गरोदर असताना कॉर्न खाण्याचे काही धोके आहेत का?

गर्भवती महिलांसाठी कॉर्नचे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत यात शंका नाही. पण मक्याचे सेवन  जास्त प्रमाणात होणार नाही याची काळजी घ्यावी. कॉर्नमध्ये फॅटी ऍसिड असतात, त्यामुळे गर्भवती स्त्रियांना हृदयविकाराचा धोका असतो. काही गर्भवती स्त्रियांना कॉर्न खाल्ल्याने अपचनाचा त्रास होऊ शकतो.

या गोष्टी लक्षात ठेवा

खालील टिप्स लक्षात ठेवा. ह्या टिप्सचे पालन केल्यास तुम्हाला कॉर्नचे फायदे मिळतील:

कॉर्न योग्य प्रकारे शिजवण्यासाठी काही टिप्स

कॉर्न तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कॉर्न उकडणे. कॉर्नची भुशी काढून मोठ्या पॅनमध्ये ठेवा. पाणी आणि मीठ घालून पॅन झाकून ठेवा. ताजे कॉर्न उकळण्यासाठी फक्त 3-4 मिनिटे लागतात. कणीस जास्त शिजवू नका कारण त्यामुळे दाणे घट्ट होतील.

पाककृती

1. कॉर्न सूप

एखाद्या दिवशी खूप कंटाळा आलेला असेल गरम कॉर्न सूप हा एक चांगला पर्याय आहे. साहित्य: पद्धत:

2. कॉर्न चाट

या रेसिपीसह तुमच्या स्वत: च्या स्ट्रीट फूड-स्टाईल कॉर्न चाट घरी बनवा! साहित्य: पद्धत: तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या आहारात कॉर्नचा समावेश करावा. कॉर्नचा आनंद घेण्यासाठी तुम्ही ते वाफवून किंवा ग्रील करून खाऊ शकता. पुढच्या वेळी, जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही कॉर्न खाऊ शकता. आणखी वाचा:  गरोदरपणात मशरूम खाणे – सुरक्षित आहे की असुरक्षित गरोदरपणात काबुली चणे (छोले) खाणे – आरोग्यविषयक फायदे आणि दुष्परिणाम
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved