आहार आणि पोषण

गरोदरपणात लसूण खाणे – फायदे,धोके आणि रेसिपी

लसूण ही एक औषधी वनस्पती आहे. लसणाची लागवड जगभरात केली जाते. लसूण बऱ्याच पाककृतींमध्ये वापरला जाणारा एक घटक आहे. लसणामुळे फक्त पदार्थाची चव वाढत नाही तर लसणाचे औषधी फायदे देखील आहेत. पण लसणाचा गर्भवती स्त्रीला फायदा होतो का? जाणून घेऊयात! उच्च रक्तदाब आणि रक्ताभिसरण यासारख्या गर्भधारणेशी संबंधित काही समस्यांवर उपचार करण्यासाठी लसूण उपयोगी असतो. पण जर तुम्ही गरोदर असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात लसणाचे प्रमाण किती असावे ह्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. लसूण किंवा इतर कोणतेही अन्नपदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर तसेच तुमच्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो, त्यामुळे तुमच्या गरोदरपणाच्या आहारात कोणतेही नवीन अन्न किंवा औषधी वनस्पती समाविष्ट करण्यापूर्वी तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.

गरोदरपणात लसूण खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात मध्यम प्रमाणात लसणाचे सेवन केल्यास ते फायदेशीर असते. विशेषतः गरोदरपणाच्या  पहिल्या तिमाहीसाठी हे खरे आहे. तुम्ही बनवलेल्या कोणत्याही पदार्थामध्ये  सूण घालायचा असल्यास,  जास्त प्रमाणात घालू नका कारण गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत जास्त लसूण खाल्ल्याने गर्भाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत तुमच्या आहारात लसणाचा समावेश करताना तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण ह्या काळात जास्त लसूण खाल्ल्याने तुमची रक्तदाबाची पातळी कमी होऊ शकते आणि तुमचे रक्त पातळ होऊ शकते. म्हणून, तुम्ही किती प्रमाणात लसूण खाल्ला पाहिजे ह्याविषयी डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या.

गरोदर असताना तुम्ही किती लसूण खाऊ शकता?

गरोदर महिला दररोज ताज्या लसणाच्या दोन ते चार पाकळ्या खाऊ शकतात. म्हणजेच साधारणपणे ६०० ते १२०० मिग्रॅ लसणाच्या अर्क होय. गरोदरपणात, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर सुमारे ०.०३  ते ०.१२ मिली इतके लसणाचे इसेन्शिअल ऑइल वापरू शकता.

गरोदर असताना लसूण खाण्याचे फायदे

गरोदरपणाच्या आहारात लसणाचा समावेश विविध कारणांसाठी केला जातो

1. कोलेस्टेरॉलची पातळी आणि हृदयाच्या समस्यांचा धोका कमी होण्यासाठी मदत होते

हृदयाच्या समस्यांवर लसूण हा एक सुप्रसिद्ध उपाय आहे. गरोदरपणात लसूण खाल्ल्याने आरोग्यविषयक  गुंतागुंत होण्याची शक्यता कमी होते. लसूण ठेचलेल्या किंवा चिरलेल्या स्वरूपात असतो आणि त्यात ऍलिसिन हा घटक असतो त्यामुळे  कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहण्यास मदत होते.

2. कर्करोगापासून बचाव

लसणाचे सेवन केल्याने कर्करोग, विशेषतः आतड्याचा कर्करोग होण्यापासून बचाव होतो. लसूण आणि कांदे  खाल्ल्याने पोट आणि अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.

3. संक्रमणाचा धोका कमी होतो

लसूण असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि विविध आजारांशी लढण्यास मदत होते. आपल्या आहारात लसणाचा समावेश करून, तुम्ही संक्रमण आणि सर्दी किंवा फ्लूचा सामना करू शकता आणि आपल्या बाळाला निरोगी ठेवू शकता.

4. त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यास मदत होऊ शकते

लसणातील अँटी-मायक्रोबियल गुणधर्म त्वचेच्या संसर्गावर किंवा तोंडाच्या संसर्गावरही एक आदर्श उपाय ठरतो. लसणाचा स्थानिक वापरामुळे आराम मिळतो.

5. केस गळती टाळण्यासाठी लसणाची मदत होऊ शकते

लसणामध्ये सल्फरवर आधारित ऍलिसिन हे संयुग भरपूर प्रमाणात असते. सल्फर केसगळती रोखण्यासाठी आणि नवीन केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जाते.

6. थकवा कमी होतो

गर्भवती महिलांमध्ये थकवा येण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी देखील लसणाचा उपयोग होतो. गरोदरपणात थकवा येणे ही एक सामान्य समस्या आहे परंतु लसूण खाल्ल्याने थकवा कमी होण्यास मदत होऊ शकते. गरोदरपणात लसूण खाल्ल्याने चक्कर येणे आणि उलट्या होणे यापासून आराम मिळतो.

भरपूर लसूण असलेले अन्न खाण्याचे दुष्परिणाम

लसणाचे अनेक फायदे असूनही, जास्त प्रमाणात लसणाचे सेवन केल्यास, गर्भवती स्त्रियांमध्ये काही दुष्परिणाम उद्भवू शकतात. गरोदरपणात लसूण जास्त खाण्याचे काही दुष्परिणाम येथे दिलेले आहेत. गरोदरपणात लसूण खाल्ल्याने गर्भपात होऊ शकतो असा बऱ्याच जणींचा विश्वास आहे. एखाद्या स्त्रीने लसणाचे सेवन जास्त प्रमाणात केल्यास लसणाच्या काही गुणधर्मांमुळे गर्भपात होऊ शकतो.

गर्भवती महिलांसाठी लसणाच्या पौष्टिक पाककृती

तुमच्या गरोदरपणाच्या आहारात लसणाचा थोडासा समावेश करणे आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकते. पदार्थांमध्ये लसूण घालण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला लसूण खाण्यास मान्यता दिल्यास, तुम्ही खाली दिलेल्या पाककृती करून पाहू शकता.

१. लसूण घालून फ्लॉवरचे सूप

लसूण घालून फ्लॉवरचे सूप घेतल्यास भूक वाढण्यास मदत होऊ शकते. हे आरोग्यदायी शाकाहारी सूप तुम्ही झटपट बनवू शकता
साहित्य कृती
  1. कढईत थोडे तेल गरम करून त्यात लसूण घाला. त्याचा वेगळा सुगंध येईपर्यंत किंवा सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत ढवळा. गॅस बंद करा. एका भांड्यात घालून बाजूला ठेवा.
  2. चिकन रस्सा एका खोलगट भांड्यात घ्या. त्यातफ्लॉवर, थाईम, मीठ आणि काळी मिरी घाला. फ्लॉवर मऊ होईपर्यंत हे मिश्रण १५ मिनिटे उकळू द्या. थोडा वेळ थंड होऊ द्या.
  3. मिश्रण ब्लेंडर मध्ये घाला आणि गुळगुळीत प्युरीमध्ये मिसळा.
  4. भाजलेले लसूण आणि थाईमने सजवा आणि आनंद घ्या.

२. स्नो मटार आणि लसूण

हा पदार्थ लहान मुले आणि प्रौढांना खूप आवडतो, ही डिश तुम्ही साईड डिश म्हणून खाऊ शकता. तुम्ही ही डिश कमी वेळात तयार करू शकता आणि गरोदरपणात त्याचा आनंद घेऊ शकता.
साहित्य कृती
  1. एका खोल भांड्यात थोडे पाणी उकळून घ्या आणि त्यातमटार, मीठ आणि थोडे तेल घाला. साधारण एक मिनिट शिजू द्या आणि बाजूला ठेवा.
  2. एका पॅनमध्ये, किसलेला लसूण तळून घ्या आणि त्यात उकडलेला मटार घाला. थोडे मीठ आणि तिळाचे तेल घालून तळून घ्या.
  3. तळलेले मटार एका प्लेटमध्ये घ्या आणि भाजलेल्या तीळांनी सजवा.

३. मध आणि लसूण घालून केलेले चिकन

मध आणि लसूण घालून केलेले चिकन स्वादिष्ट लागते आणि आपण ते तुम्ही भातासोबत खाऊ शकता .
साहित्य कृती
  1. ओव्हन २०० डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम करा.
  2. मध, लसूण, आले आणि सोया सॉस चांगले मिसळेपर्यंत फेटून घ्या.
  3. एका भांड्यात चिकनच्या मांड्या घ्या आणि वरील मिश्रण त्यावर ओता. एक तास किंवा जास्त वेळ मॅरीनेट होऊ द्या.
  4. सुमारे २० मिनिटे ओव्हनमध्ये ठेवा. त्यावर मध लसूण मिश्रण लावा आणि पुन्हा शिजवा.
  5. तुम्ही हेचिकन भात किंवा भाज्यांसोबत खाऊ शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. मी गरोदर असताना जास्त लसूण खाल्ल्यास काय होईल?

गरोदरपणात कमी प्रमाणात लसणाचे सेवन केल्यास ते खूप फायदेशीर ठरू शकते. गरोदरपणात लसूण जास्त खाल्ल्याने तुमच्या पचनक्रियेला त्रास होऊ शकतो आणि तुमचे पोट खराब होऊ शकते. जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्यामुळे रक्तदाब कमी होणे, रक्त पातळ होणे इत्यादी काही गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात.

२. मी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्यास काय होईल?

कच्चा लसूण रिकाम्या पोटी खाल्ल्याने कोणतीही समस्या उद्भवत नाही. खरं तर, रक्तदाब कमी करण्यास आणि सर्दी किंवा संक्रमण होण्याचा धोका कमी करण्यास लसणाची मदत होते. लसूण हा अनेक आरोग्यविषयक समस्यांवर जुना उपाय आहे. गरोदरपणात देखील लसूण खाणे फायदेशीर असल्याचे सिद्ध झालेले आहे. परंतु लसणाचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे अपेक्षित आहे. गरोदरपणात लसणाचे सेवन आपल्या आहाराचा भाग बनवण्यापूर्वी त्याचे फायदे आणि दुष्परिणाम याबद्दल आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा. आणखी वाचा: गरोदरपणात कांदा खाणे सुरक्षित आहे का गरोदरपणात भेंडी (ओकरा) खाणे चांगले आहे का
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved