गर्भारपण

गरोदर असताना लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे की नाही?

गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे की नाही आणि त्याचा बाळाच्या आरोग्यावर काही परिणाम होईल का, असे प्रश्न अनेक पालकांना पडतात . नुकत्याच आई झालेल्या स्त्रियांना देखील संप्रेरकांमध्ये होणारे बदल, थकवा आणि त्यांच्या दिसण्यातील बदल ह्यामुळे आत्मजागरुकता येते, त्यामुळे त्यांच्या लैंगिक इच्छेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. हा लेख तुम्हाला गरोदरपणातील लैंगिक संबंधांबद्दल आवश्यक असलेल्या सर्व माहितीसह मदत करेल. आम्ही ह्या लेखाच्या माध्यमातून ह्या विषयाच्या इतर पैलूंना देखील स्पर्श करू आणि काही वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे देऊ. अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे का?

तुमचे गर्भारपण निरोगी आणि सामान्य असल्यास, शेवटच्या तिमाहीपर्यंत लैंगिक संबंध ठेवणे पूर्णपणे सुरक्षित आहे. गरोदरपणात सेक्स करणे तुमच्या शरीरासाठी आणि नातेसंबंधासाठी चांगले असते. परंतु, जर तुमच्या डॉक्टरांनी तुमचे गरोदरपण उच्च जोखमीचे असल्याचे सांगितले असेल किंवा काही आरोग्यविषयक समस्यांमुळे लैंगिक संबंध टाळावेत असे सांगितले असेल तर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागणे आणि लैंगिक संबंधांपासून दूर राहणे चांगले आहे.

गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवणे केव्हा सुरक्षित नाही?

गर्भवती महिलेने लैंगिक संबंध कधी टाळावेत असा प्रश्न तुम्हाला पडत असेल,खालील परिस्थितीत तुमचे डॉक्टर गरोदरपणात लैंगिक संबंध टाळण्याचा सल्ला तुम्हाला देऊ शकतात. :

गरोदरपणामुळे तुमच्या लैंगिक जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो?

गरोदरपणामुळे तुमच्या लैंगिक जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. शरीरातील विविध हार्मोनल बदलांमुळे संपूर्ण गरोदरपणाच्या कालावधीत तुमची सेक्स ड्राइव्ह वाढू किंवा कमी होऊ शकते. संप्रेरकांच्या चढउतारांमुळे आणि दिसण्याबद्दल आत्म-जागरूकता ह्यामुळे अनेक स्त्रियांना कमी सेक्स ड्राइव्हचा अनुभव येऊ शकतो. परंतु, काही गर्भवती स्त्रियांनी त्यांची कामवासना वाढल्याची तक्रार केलेली आहे.

प्रत्येक तिमाहीमध्ये हार्मोनल चढउतारांचा स्त्रियांच्या सेक्स ड्राइव्हवर वेगळ्या प्रकारे परिणाम होतो. प्रत्येक तिमाहीमध्ये हा बदल कसा होतो यावर चर्चा करूया.

1. पहिली तिमाही:

पहिल्या तिमाहीत, स्त्रियांना मॉर्निंग सिकनेस, मूड बदलणे आणि थकवा येणे असा त्रास होऊ शकतो. त्यांना वारंवार लघवी करण्याची इच्छाही होते. ह्या सर्वांमुळे, हार्मोनल बदलांसह, कामवासना कमी होऊ शकते.

2. दुसरी तिमाही:

अनेक स्त्रिया गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये सेक्स करण्याची इच्छा वाढल्याची तक्रार करतात. मॉर्निंग सिकनेस आणि पहिल्या तिमाहीतील इतर अस्वस्थता सामान्यतः दुसऱ्या तिमाहीत जाणवत नाही. पोटाचा आकार अजूनही पुरेसा लहान आहे, त्यामुळे तुम्ही आरामात लैंगिक संबंध ठेऊ शकता. गरोदरपणात स्त्रियांमध्ये रक्ताचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे ओटीपोटात रक्ताभिसरण वाढते आणि योनीमार्गात रक्ताभिसरण होते. ह्यामुळे त्या भागातील संवेदना वाढू शकतात आणि स्त्रियांना कामोत्तेजना होण्यास अधिक सहजपणे मदत करू शकते

3. तिसरा तिमाही:

गरोदरपणाच्या तिसर्‍या तिमाहीत लैंगिक संबंध ठेवताना अनेक स्त्रिया कामवासना कमी झाल्याची तक्रार करतात. ह्याचे कारण म्हणजे पोटाचा आकार वाढल्यामुळे सेक्स पोझीशन्स घेताना अस्वस्थता वाटू शकते.. तुम्‍हाला लैंगिक संबंधातही कमी रस वाटू शकतो कारण तुम्‍हाला प्रसूतीची आणि मातृत्वाची काळजी वाटत असते कारण तुमची प्रसूतीची तारीख जवळ येत असते. या भावना पूर्णपणे सामान्य आहेत. स्त्रियांनी शेवटच्या तिमाहीत लैंगिक संबंधांपासून दूर राहणे असामान्य नाही.

ज्या स्त्रियांचे गर्भारपण निरोगी असते त्यांना गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवण्याचे काही फायदे आहेत का हे जाणून घ्यायचे असते. गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवण्याचे काही फायदे आहेत. ते काय आहेत ते जाणून घेऊया.

गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवण्याचे फायदे

सामान्य आणि निरोगी गरोदरपण असताना लैंगिक संबंध ठेवल्यास आई आणि बाळासाठी ते फायदेशीर ठरू शकते. गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवल्यास त्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत.

गरोदरपण निरोगी असल्यास लैंगिक संबंध ठेवल्यास जरी फायदा होत असेल तरी सुद्धा, त्यांच्यापैकी काहींना संभोगादरम्यान किंवा नंतर समस्या येऊ शकतात. गरोदरपणाशी संबंधित गुंतागुंत टाळण्यासाठी किंवा त्यांच्यावर ताबडतोब उपचार करून घेण्यासाठी तुमच्या जोडीदारासोबत लैंगिक संबंध ठेवण्याची तुमची इच्छा असल्यास तुमचे बदलणारे शरीर कोणत्या संभाव्य समस्यांमधून जाऊ शकते ह्याची तुम्हाला जाणीव असणे आवश्यक आहे.

गरोदरपणातील लैंगिक संबंधादरम्यान आणि नंतर उद्भवणाऱ्या समस्यांची लक्षणे

काही वेळा गरोदरपणात समागम करताना महिलांना आरोग्यविषयक समस्या येऊ शकतात. लैंगिक संबंध ठेवताना तुम्हाला नेहमीपेक्षा काही वेगळे दिसल्यास किंवा वेदना होत असल्यास, तुम्ही थांबावे आणि डॉक्टरांशी संपर्क साधावा. गरोदरपणातील लैंगिक संबंधाचे काही दुष्परिणाम आहेत आणि ते स्त्रिया अनुभवू शकतात. ह्यामध्ये रक्तस्त्राव किंवा डाग पडणे, गर्भाची वाढलेली क्रिया आणि गर्भाशयाचे आकुंचन इत्यादींचा समावेश होतो. या लक्षणांकडे लक्ष द्या. संभोगानंतर हलका रक्तस्त्राव होणे किंवा हलके डाग पडणे, पेटके येणे हे सामान्य आहे. परंतु, गरोदरपणातील लैंगिक संबंधांदरम्यान आणि नंतर आपल्याला यापैकी कोणतीही समस्या आढळल्यास तुम्ही स्त्रीरोगतज्ञांशी संपर्क साधू शकता:

गरोदरपणात सुरक्षितपणे लैंगिक संबंध ठेवण्याचे काही मार्ग आहे का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला शोधूया!

गरोदरपणात तुम्ही सुरक्षितपणे लैंगिक संबंध कसे ठेऊ शकता?

शारीरिक निर्बंध ही समस्या नसल्यास, गरोदरपणात सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी टाळल्या पाहिजेत. ते तुम्हाला आणि तुमच्या बाळाला अशा संक्रमणांपासून सुरक्षित ठेवतील त्यामुळे गरोदरपणात गुंतागुंत होऊ शकते.

जेव्हा तुम्ही सर्व आवश्यक खबरदारी घेता, तेव्हा गरोदरपणात संभोग करताना ह्या स्थिती तुम्ही करून पाहू शकता.

गरोदरपणातील लैंगिक संबंध - सुरक्षित लैंगिक स्थिती

येथे काही सुरक्षित आणि आरामदायक लैंगिक स्थिती दिलेल्या आहेत आणि त्या तुम्ही गरोदरपणात वापरून पाहू शकता.

तुम्ही गरोदरपणात ओरल सेक्स करू शकता का?

गरोदरपणात ओरल सेक्स करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. आधी सांगितल्याप्रमाणे, तुमचा जोडीदार योनीमध्ये हवा फुंकणार नाही याची खात्री करा. यामुळे एअर एम्बोलिझम नावाची स्थिती उद्भवू शकते. ही स्थिती तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. तसेच, तुमच्या पतीला सुद्धा एसटीडी असल्यास त्याच्यासोबत ओरल सेक्स टाळा.

गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवण्याची शिफारस केली जात नाही परंतु ते गर्भवती महिलेच्या आरोग्यावर अवलंबून असते. परंतु, गरोदरपणात तुम्ही जवळीकीचा आनंद घेऊ शकता असे इतर मार्ग आहेत.

इतर मार्गांनी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी जवळीक साधू शकता

तुम्हाला लैंगिक संबंधांमध्ये स्वारस्य नसल्यास, किंवा तुमच्या गरोदरपणातील आरोग्यामुळे तुम्ही सेक्स करू शकत नसल्यास, तुम्ही तुमच्या जोडीदाराशी जवळीक साधण्यासाठी खाली दिलेल्या काही कल्पना वापरून पाहू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

. सेक्स केल्याने प्रसूती होऊ शकते?

कोणत्याही वैज्ञानिक अभ्यासात लैंगिक संबंध ठेवल्याने प्रसूतीला चालना मिळते असे सांगितलेले नाही. परंतु, शेवटच्या तिमाहीत प्रसूतीस चालना मिळू शकते.वीर्यामध्ये प्रोस्टॅग्लॅंडिन असतात जे गर्भाशयाला मऊ करतात. तसेच, कामोत्तेजनामुळे ऑक्सिटोसिन संप्रेरक तयार होते आणि त्यामुळे प्रसूती होऊ शकते.

. गरोदरपणामुळे माझ्या जोडीदाराच्या सेक्स ड्राइव्हवर परिणाम होईल का?

तुमची गर्भावस्था तुमच्या जोडीदाराच्या सेक्स ड्राइव्हवर विविध कारणांमुळे परिणाम करू शकते. यामध्ये बाळाच्या उपस्थितीत लैंगिक संबंधांबद्दलची चिंता, आपल्या आणि बाळाच्या आरोग्याबद्दल चिंता आणि लैंगिक संबंधामुळे जन्मलेल्या बाळाला त्रास होऊ शकतो याबद्दलची चिंता इत्यादींचा समावेश असतो. एकमेकांशी उघडपणे संवाद साधणे आणि गरोदरपणात लैंगिक संबंधांबद्दल तुमच्या दोघांनाही काही समस्या असल्यास तज्ञांचा सल्ला घेणे चांगले.

. पहिल्या तिमाहीत सेक्स केल्याने गर्भपात होऊ शकतो का?

पहिल्या तिमाहीत सेक्स केल्याने गर्भपात होतो याचा कोणताही पुरावा नाही. बहुतेक गर्भपात पहिल्या तिमाहीमध्ये होतात, परंतु ते लिंगामुळे नव्हे तर गर्भातील गुणसूत्रातील विकृतींमुळे होतात.

गरोदरपणात लैंगिक संबंध पूर्णपणे सुरक्षित असतात. निरोगी गरोदरपणात ते आई आणि बाळासाठी फायदेशीर ठरू शकतात. परंतु, जर तुमची गर्भधारणा कठीण आणि उच्च जोखीम असलेली असेल तर तज्ञाचा सल्ला घेणे चांगले आहे. तुम्ही गरोदर असताना तुमच्या जोडीदाराशी तुमच्या आवडी-निवडीबद्दल प्रामाणिकपणे संवाद साधल्यास तुमचे लैंगिक जीवन समाधानकारक होऊ शकते. गरोदरपणात तुमचे लैंगिक जीवन अधिक परिपूर्ण करण्यासाठी या लेखातील टिप्स वापरा.

आणखी वाचा:

गर्भधारणेची तिसरी तिमाही – गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यातील प्रणयाचा आनंद गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये लैंगिक संबंध ठेवल्यास गर्भपात होऊ शकतो का?

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved