गर्भारपण

गरोदर असताना खाली वाकणे – योग्य आहे का? आणि सुरक्षितता टिप्स

गरोदरपणात, गरोदर स्त्रिया अनेक शारीरिक आणि भावनिक बदल अनुभवत असतात. आयुष्याच्या या विशेष टप्प्यावर तुम्हाला बऱ्याच सूचना आणि सल्ले दिले जातात. तुमच्या पोटात बाळ असताना खाली वाकणे योग्य आहे का हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडेल.

व्हिडिओ: गरोदरपणात खाली वाकणे सुरक्षित आहे का?

https://youtu.be/wGMHIDyqVp8

गरोदरपणात खाली वाकणे सुरक्षित आहे का?

जोपर्यंत बाळ तुमच्या गर्भाशयात सुरक्षित असते तोपर्यंत खाली वाकणे सुरक्षित मानले जाते. गर्भजलामुळे बाळ सुरक्षित राहते आणि जेव्हा तुम्ही खाली वाकता तेव्हा बाळाला त्याचे शरीर आणि हातपाय हलवता येतात. तुमच्या बाळाला दुखापत होण्याची शक्यता नसली तरी गर्भारपणाचे दिवस जसे पुढे सरकतात तसतसे खाली वाकल्यावर तुम्हाला अत्यंत अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे तुमच्या पाठीवरही ताण येऊ शकतो.

पहिल्या तिमाहीत खाली वाकणे

पहिल्या त्रैमासिकात, तुमचे शरीर अजूनही लवचिक असते आणि तुमचे बाळ खूप लहान असल्यामुळे  तुम्ही खाली वाकल्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. बाळाला हानी होण्यापासून वाचवण्यासाठी प्लेसेंटा आणि पोटाचे अस्तर ह्यांची देखील मदत होते. जोपर्यंत तुमचे डॉक्टर तुम्हाला पहिल्या तिमाहीत वाकणे टाळण्यास सांगत नाहीत, तोपर्यंत खाली वाकण्यास हरकत नसते.

तिसऱ्या तिमाहीत खाली वाकणे टाळण्याची कारणे

तिसऱ्या तिमाहीपर्यंत तुमच्या बाळाची वाढ होईल आणि तुमचे पोटही वाढेल. या टप्प्यावर पुढे वाकण्याचे काही संभाव्य धोके आहेत:

१. पडणे

पोटाचा आकार मोठा असल्यामुळे तुम्ही खाली वाकताना पडण्याची शक्यता असते. ह्या काळात बाळ खाली सरकलेले असते आणि शरीराचे गुरुत्वाकर्षण केंद्र बदलते. तुमचा तोल जाऊन तुम्ही खाली पडल्यास,ओटीपोटात दुखापत होऊ शकते, त्यामुळे प्लॅसेंटाला धक्का लागून रक्तस्त्राव आणि गर्भपात होण्याचीही शक्यता असते.

२. चक्कर येणे

पुढे वाकल्याने डोक्यात रक्त साचते, त्यामुळे तुम्हाला चक्कर येते आणि डोके हलके वाटते. गर्भारपणाच्या शेवटच्या तिमाहीत तोल जाणे धोकादायक आहे.

३. छातीत जळजळ

जेव्हा तुम्ही  खाली वाकता तेव्हा तुमच्या पोटावर दाब पडतो आणि त्यामुळे ऍसिड रिफ्लक्स होऊ शकते. छातीत जळजळ होऊ शकते. पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत वाहते, त्यामुळे तुमच्या जिभेला एक अप्रिय चव येते आणि अन्ननलिकेमध्ये जळजळ होते.

४. पाठीवर ताण येणे

गरोदरपणात पाठदुखी ही एक सामान्य समस्या आहे आणि पुढे वाकल्याने तुमच्या पाठीवर अतिरिक्त ताण पडतो. आणि ते तुमच्या कमकुवत अस्थिबंधनासाठी देखील वेदनादायक ठरू शकते.

गरोदरपणात खाली कसे वाकावे?

वाकण्याशिवाय पर्याय नसल्यास, या टिप्स लक्षात ठेवा: तुमचे शरीर पुढे वाकवण्याऐवजी तुमचे गुडघे पसरवा आणि खाली बसा.

गरोदरपणात शरीराची स्थिती (पोश्चर) चांगले राखण्यासाठी टिप्स

गरोदरपणात शरीराचे पोश्चर चांगले ठेवल्यास वेदना कमी करण्यास मदत होऊ शकते आणि त्याच वेळी, तुमच्या पाठीवरचा ताण कमी होऊ शकतो. तुम्ही ज्या प्रकारे उभे राहता, बसता, झोपता आणि गाडी चालवता त्यास तुमची शरीराची स्थिती (पोश्चर) म्हणतात. येथे काही टिप्स दिलेल्या आहेत.

१. उभे राह्तानाची स्थिती

आपले डोके, मान आणि पाठ एका सरळ रेषेत ठेवा. खांदे ताठ ठेवा. पाऊले एकाच दिशेला ठेवा आणि आपले वजन दोन्ही पायांवर सारखेच ठेवा. तुमच्या शरीरावर ताण पडू नये म्हणून कमी टाचांच्या पादत्राणांची निवड करा.

२. बसतानाची स्थिती

तुमचे खांदे आणि पाठीचा कणा ताठ ठेवा. तुमचे कुल्ले खुर्चीच्या सीटच्या मागील बाजूस स्पर्श करत असल्याची खात्री करा. तुमच्या पाठीच्या कण्याला आधार देण्यासाठी तुम्ही लहान, गुंडाळलेला टॉवेल वापरू शकता. बसलेल्या स्थितीतून उठताना,  हळू हळू आपले पाय सरळ करा आणि उभे रहा.

३. ड्रायव्हिंग करतानाची स्थिती

पाठीला आधार द्या आणि तुमचे गुडघे तुमच्या कूल्ह्यांच्या किंवा त्याहून वरच्या पातळीवर आहेत याची खात्री करा. तुमचे पोट स्टीयरिंग व्हीलपासून किमान १० इंच दूर राहिले पाहिजे अश्या पद्धतीने सीट ऍडजस्ट करा. तुमचे पाय सहजपणे ब्रेकपर्यंत पोहोचले पाहिजेत.

४. वस्तू उचलतानाची स्थिती

गरोदरपणात कोणतीही वस्तू उचलण्यापूर्वी तुमचे पाय जमिनीवर घट्ट ठेवल्याची खात्री करा. काहीतरी उचलण्यासाठी खाली वाकणे हे त्रासदायक असू शकते. तुम्ही वाकताना पुढीलप्रमाणे शरीराची स्थिती ठेवली पाहिजे - तुमची पाठ सरळ ठेवा आणि फक्त तुमचे गुडघे आणि नितंब वाकवा. जर एखादी वस्तू टेबलवर असेल तर ती प्रथम तुमच्या शरीराजवळ ओढा आणि नंतर उचला. गरोदरपणात जड वस्तू उचलणे टाळणे चांगले.

५. झोपतानाची स्थिती

पोटावर किंवा पाठीवर झोपणे टाळा. या स्थितींमुळे तुमच्या पाठीवर आणि हृदयावर ताण पडतो, याशिवाय नाळेला रक्तपुरवठा कमी होतो. डावीकडे झोपल्याने तुमच्या महत्त्वाच्या अवयवांमध्ये तसेच तुमच्या गर्भातील बाळाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो. तुमच्या गरोदरपणात आरामदायी झोपेसाठी उशा आणि पक्की गादी वापरा. गरोदर असताना खाली वाकणे शक्यतोवर टाळा. आवश्यक असल्यास आपल्या कुटुंबियांकडून किंवा मित्रमैत्रिणींकडून मदत घ्या. योग्य ती खबरदारी घ्या आणि अतिश्रम टाळा. गरोदरपणात तुम्ही खाली वाकलात तरीही तुम्ही स्वतःला आणि तुमच्या बाळाला सुरक्षित ठेवू शकता. अस्वीकरण: हा लेख केवळ एक मार्गदर्शक आहे आणि पात्र व्यावसायिकांच्या वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. आणखी वाचा: गरोदरपणात उन्हात बसणे सुरक्षित आहे का गरोदरपणात चालणे: फायदे, सुरक्षा आणि धोके
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved