गर्भारपण

गरोदरपणातील केसगळती – कारणे आणि प्रतिबंध

दररोज केस गळणे ही एक सामान्य घटना आहे. आपले केस सतत गळत असतात. धुतल्यावर आणि विंचरताना केस जास्त गळतात. केस वाढीच्या चक्रात, कोणत्याही वेळी, आपले सुमारे ९० % केस वाढत असतात, तर उर्वरित १० % केस विश्रांतीच्या स्थितीत असतात. गरोदरपणात, बहुतेक स्त्रियांचे केस दाट , चमकदार असतात आणि प्रसूतीनंतर केस गळतात. परंतु, काही स्त्रियांचे केस गरोदरपणात सुद्धा गळतात.  चला तर मग गरोदरपणातील केस गळतीबद्दल जाणून घेऊयात.

व्हिडिओ : गरोदरपणातील केस गळती - कारणे आणि प्रतिबंध

https://youtu.be/BZK_WsPkePg

गर्भारपण आणि केस गळती

तुमचे चमकदार केस पातळ होत असल्याचे आढळल्यास तुम्हाला काळजी वाटणे खूप स्वाभाविक आहे. परंतु काळजी करू नका कारण हा फक्त एक टप्पा आहे आणि तो सुद्धा संपणार आहे. गरोदरपणात, केसांची वाढलेली टक्केवारी दीर्घकाळ टिकते. ह्याचे कारण म्हणजे वाढलेली एस्ट्रोजेनची पातळी होय. ह्या संप्रेरकामुळे केस तसेच टिकून राहतात. अशा प्रकारे, आतापर्यंत गळून पडणारे केस दाट दिसतात. परंतु, प्रसूतीनंतर, इस्ट्रोजेनची पातळी सामान्य झाल्यावर, विश्रांती स्थितीत असलेले केस बाहेर पडतात, परिणामी केस गळणे वाढते.

गरोदरपणात केस गळणे असामान्य आहे का?

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात केस गळणे हे असामान्य नाही, परंतु प्रसूतीनंतर होणारी केसगळती सामान्य नाही. विश्रांतीच्या कालावधीत केसांच्या वाढीचे चक्र थांबल्यामुळे गर्भवती स्त्रिया सहसा दाट, अधिक सुंदर केसांचा आनंद घेतात. यामुळे केस गळण्याचे चक्र प्रसूती होईपर्यंत लांबते. परंतु काही वेळा,प्रत्येकाच्या तब्येतीनुसार गरोदरपणात केस गळू शकतात. कधीकधी संप्रेरकांमधील चढउतारांमुळे केस गळतात. डोक्याच्या कोणत्याही भागातून केस गळून पडू शकतात.  तुम्ही केस धुतल्यावर किंवा विंचरताना केस गळू शकतात. प्रसूतीनंतर ६ ते १२ महिन्यांच्या दरम्यान तुम्ही तुमच्या केसांच्या वाढीवर लक्ष ठेवावे. तीव्रता कायम राहिल्यास, केस गळणे हे गरोदरपणाचे लक्षण असू शकते आणि कदाचित तुमच्यात काही व्हिटॅमिनची कमतरता असल्यामुळे असे होत असावे. ह्या बाबतीत आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. हा लेख पुढे वाचून, तुम्ही गरोदरपणात केस गळण्याची संभाव्य कारणे शोधू शकता.

गरोदरपणात केस का गळतात?

साधारणपणे, गरोदर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन या संप्रेरकामुळे केस दाट होतात. हे संप्रेरक केस गळती रोखते. परंतु, सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत असे होईलच असे नाही. कारण काहींचे आरोग्यविषयक समस्यांमुळे  किंवा हार्मोनल असंतुलनाशी संबंधित भिन्न कारणांमुळे गरोदरपणात केस गळतात. बहुतेकदा, गरोदरपणात प्रोजेस्टेरॉन हार्मोन मोठ्या प्रमाणात  तयार होते, त्यामुळे कोरडेपणा येतो. यामुळे केस मुळांजवळ तुटू शकतात. तसेच, केस गळणे तुमच्या शरीरातील जीवनसत्वे किंवा खनिजांच्या कमतरतेमुळे असू शकते. इतर काही कारणांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या बंद करणे किंवा गर्भपात यासारख्या इतर परिस्थितींचा समावेश होतो.

गरोदरपणात केस गळण्याची कारणे कोणती?

'टेलोजन इफ्लुव्हियम' हा शब्द जास्त प्रमाणात केस गळण्याचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. केसगळतीची समस्या सामान्यतः गर्भधारणेनंतर एक ते पाच महिन्यांनी निर्माण होते . ही एक समस्या आहे आणि ती ४० ते ५०% गर्भवती स्त्रियांमध्ये आढळते . प्रसूतीनंतर ६ ते १२ महिन्यांत केस गळतीचे चक्र पूर्ववत होते. संप्रेरकांमधील अस्थिरता आणि काही शारीरिक बदल ह्यामुळे गरोदरपणात केसांचे नुकसान होऊ शकते . केसगळतीची काही संभाव्य कारणे खाली सूचीबद्ध आहेत:

१. पोषण नीट नसणे

गरोदर असताना तुमच्या शरीराला अधिक पोषणाची गरज असते. ह्याशिवाय, जर तुम्हाला पहिल्या तिमाहीत मळमळ होत असेल तर बहुतेक पोषक तत्वे नष्ट होतात. पौष्टिक आहार न घेतल्यामुळे अनेकदा केस गळतात. लोह, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे इत्यादींच्या कमतरतेमुळे देखील केस गळू लागतात. जीवनसत्वे जास्त प्रमाणात घेतल्याने देखील केस गळतात.

२. आजार

काही वेळा, गर्भवती स्त्रियांना गर्भावस्थेतील मधुमेह किंवा दाद (फंगल इन्फेक्शन) सारखे आजार होतात, त्यामुळे केस गळतात. उच्च रक्तदाब किंवा नैराश्यावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काही औषधांमुळे सुद्धा केस गळतात. असे झाल्यास, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

३. संप्रेरकांमधील बदल

संप्रेरकांमधील बदल हे  केसगळतीचे एक प्रमुख कारण आहे, कारण त्यामुळे केसांच्या नेहमीच्या वाढीच्या चक्रात व्यत्यय येतो. म्हणून केस जास्त गळतात. ह्या समस्येला “टेलोजन इफ्लुव्हियम” असेही म्हणतात. ही तात्पुरती स्थिती आहे आणि प्रसूतीनंतर काही महिन्यांनंतर पूर्ववत होते.

४. अनुवंशिकता

केस गळणे अनेक वेळा आनुवंशिक असते. गरोदरपणात जर तुमच्या आईची अशीच स्थिती असेल तर तुम्हाला या समस्येचा त्रास होण्याची दाट शक्यता आहे.

५. थायरॉईडची कमतरता

हायपोथायरॉईडीझम मध्ये शरीरातील थायरॉईडची पातळी कमी होते. हे संप्रेरक चयापचय, मानसिक आरोग्य, पाचन प्रक्रिया आणि केस आणि नखे यांचे नियमन करण्यासाठी जबाबदार असते. परिणामी, थायरॉईडची कमतरता हे तुमचे केस गळण्याचे कारण असू शकते.

६. पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम

पीसीओएस हा आजार हार्मोनल असंतुलनामुळे होतो. पीसीओएस मुळे स्त्रियांमध्ये पुरुष संप्रेरकांचे जास्त प्रमाणात उत्पादन होते. त्यामुळे स्त्रियांच्या केसांची जास्त वाढ होते आणि केस गळतात.

७. पुनरुत्पादक कारणे

गर्भनिरोधक गोळ्या किंवा इतर गर्भनिरोधक पद्धती बंद केल्याने अनेकदा केस गळतात असे आढळून आले आहे. गर्भपात, मृत जन्म आणि गर्भपात यामुळेही केस गळतात.

८. त्वचा रोग

बऱ्याच स्त्रियांना त्वचेच्या ऍलर्जीचा सामना करावा लागतो आणि त्याचा त्यांच्या डोक्याच्या त्वचेवर सुद्धा परिणाम होतो. ह्या समस्येमुळे केस पातळ होतात आणि गळू लागतात.

गरोदरपणात केस गळणे कसे नियंत्रित करावे?

गरोदरपणात किंवा नंतर केस गळणे ही मुख्य चिंता नाही, कारण ही स्थिती अल्पकाळ टिकते आणि प्रसूतीनंतर लवकरच ही परिस्थती सामान्य होते. परंतु आजारपण किंवा पौष्टिकतेची कमतरता यासारख्या समस्या असू शकतात. त्यामुळे केस गळतात.  केसगळतीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, कारण त्यामुळे आई आणि बाळाला हानी पोहोचू शकते. केसगळतीवर खाली काही उपाय दिलेले आहेत त्यामुळे केसगळती कमी होण्यास आणि केस निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.

१. तुमच्या केसांना तेल लावा

केसांना नियमित तेल लावणे तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आठवड्यातून दोनदा झोपण्यापूर्वी तेल लावल्याने केसांचे पोषण होण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या केसांना कोमट तेलाने मसाज देखील करू शकता. खोबरेल तेल, बदाम तेल, मोहरीचे तेल आणि ऑलिव्ह तेल हे काही उत्तम तेले आहेत.

२. हीट स्टाइलिंग टाळा

स्ट्रेटनिंग, ब्लो-ड्रायिंग आणि इतर केशरचना करण्यापेक्षा केसांचा नैसर्गिक प्रकार राखण्याचा प्रयत्न करा. तुमचे केस ओले असताना सौम्यपणे विंचरा आणि ओले केस सोडवण्यासाठी रुंद-दात असलेला कंगवा वापरा.

३. आहार निरोगी ठेवा

गर्भवती स्त्रीने स्वतःच्या आणि तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले अन्न खावे. अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स असलेल्या भाज्या आणि फळे खाण्यास सांगितले जाते. असा आहार घेतल्याने केस वाढतील आणि केसांच्या मुलांचे संरक्षण होईल. तसेच, तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी, ई, बी कॉम्प्लेक्स आणि झिंक मध्यम प्रमाणात द्या.

४. ध्यान करण्याचा प्रयत्न करा

गरोदरपणात केस गळण्याचे मुख्य कारण तणाव हे आहे. गर्भवती स्त्रीला प्रसूतीबद्दल आणि कोणत्याही संभाव्य नकारात्मक परिस्थितीबद्दल ताण येणे खूप स्वाभाविक आहे, परंतु तुम्ही गरोदरपणाच्या कालावधीत  तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा आणि फक्त चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला आनंद मिळेल अशा गोष्टी करा. श्वास घ्या, आराम करा आणि स्वतःला चिंता किंवा तणावापासून मुक्त करण्यासाठी ध्यान करण्याचा प्रयत्न करा.

५. रासायनिक उत्पादने टाळा

केसगळतीशी संबंधित सर्व समस्या सोडवण्याचा दावा करणारी केसांची उत्पादने तुम्हाला बाजारात आढळू शकतात, परंतु तुम्ही गरोदर असताना ही उत्पादने टाळणे चांगले. ही सौंदर्यप्रसाधने गर्भवती महिलांसाठी सुरक्षित नाहीत, कारण त्यात हानिकारक रसायने असू शकतात. तुम्ही फक्त बायोटिन आणि सिलिका असलेले शाम्पू आणि कंडिशनर वापरावे.

६. ओले केस विंचरू नका

काही स्त्रियांना आंघोळीनंतर लगेचच ओले केस विंचरण्याचीं सवय असते. हे टाळले पाहिजे. कारण केस ओले असताना केसांची मुळे खूप मऊ आणि नाजूक असतात. जर तुम्ही केस ओले असताना विंचरले तर खूप केस गळतात. केस नैसर्गिकरित्या कोरडे होण्याची वाट बघणे चांगले. हे केस कोरडे करण्यासाठी तुम्ही टॉवेल देखील वापरू शकता.

गरोदर स्त्रियांच्या केस गळतीवर उपचार करण्यासाठी घरगुती उपाय

गरोदर असताना बऱ्याच स्त्रियांचे केस गळतात. केसगळतीपासून बचाव करण्यासोबतच तुम्ही काही घरगुती उपाय देखील करून पाहू शकता. केसगळतीवर उपचार करण्यासाठी येथे काही प्रभावी उपाय आहेत:

१. कोमट तेलाने मसाज

एक सुप्रसिद्ध नैसर्गिक उपचार म्हणजे डोक्याचा मसाज. तुम्ही कोमट तेलाने तुमच्या केसांना मालिश करू शकता कारण त्यामुळे केस गळतीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. नारळ, बदाम, जोजोबा, ऑलिव्ह आणि मोहरीचे तेल हे केसांचे पोषण करण्यासाठी काही उत्तम पर्याय आहेत.

२. कोरफड जेल

त्वचेच्या विकारांवर उपचार करण्यासाठी कोरफड मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. कोरडेपणा आणि संसर्ग बरा करण्यासाठी तुम्ही तुमच्या केसांना कोरफडीचा गर लावू शकता त्यामुळे केस गळणे कमी होते.

३. नैसर्गिक उत्पादनांचा वापर

त्वचेच्या संसर्गामुळे किंवा डोक्याच्या त्वचेच्या ऍलर्जीमुळे केस गळू शकतात. नैसर्गिक उत्पादने सर्व प्रकारच्या त्वचेसाठी आणि अगदी संवेदनशील त्वचेसाठीही सुरक्षित असतात. अशी ऍलर्जी आणि संसर्ग  टाळण्यासाठी, केसांसाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादने वापरणे चांगले.

४. जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा कडुलिंब

कडुलिंब ही एक औषधी वनस्पती आहे. कडुलिंब त्वचेच्या संसर्गामुळे होणारे केस गळण्यास प्रभावी ठरते. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे अँटीबैक्टीरियल गुणधर्म आहेत. तुम्ही ताज्या कडुलिंबाच्या पानांची पेस्ट तुमच्या लावू शकता

५. आवळा

आवळा म्हणून ओळखली जाणारी भारतीय गूसबेरी केस गळतीसाठी सर्वोत्तम नैसर्गिक उपाय मानली जाते. तुम्ही आवळा पावडर पोटातून घेऊ शकता किंवा त्याच्या तेलाने केसांना मालिश करू शकता. केस मजबूत करण्यास आणि केस गळण्यास प्रतिबंध करण्यास आवळा मदत करते.

६. ताजे नारळाचे दूध

अर्धा कप ताजे नारळाचे दूध घ्या आणि आपल्या बोटांनी डोक्यावर मसाज करा. ते शोषून घेण्यासाठी २०  ते ३० मिनिटांचा कालावधी घ्या आणि नंतर हर्बल शैम्पू वापरून स्वच्छ धुवा. ह्यामुळे केसांचे पोषण होण्यास मदत होते.

७. लिंबाचा रस

एका फेटलेल्या अंड्यात एक चमचा लिंबाचा रस घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण आपल्या डोक्यावर  लावा, सुमारे ३० मिनिटे तसेच राहुग्य आणि स्वच्छ धुवा. ह्यामुळे केस गळणे कमी होण्यास मदत होते  आणि तुमचे केस रेशमी आणि दाट होतात

८. भिजवलेले मेथी दाणे

रात्रभर भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांची बारीक पेस्ट तयार करा. या पेस्टने केसांना मसाज करा आणि ३ ते ४ तासांनी केस धुवा. हे मिश्रण तुमच्या केसांना चमक देते आणि केसांची वाढ उत्तेजित करते.

९. अंडी, दही आणि ऑलिव्ह ऑइल

अंडी, दही आणि ऑलिव्ह ऑइल ह्या तीन घटकांचे मिश्रण तुमच्या केसांचे चांगले कंडीशनींग करू शकते. तुम्ही या तीन घटकांची समान प्रमाणात पेस्ट तयार करू शकता आणि आठवड्यातून एकदा तुमच्या केसांना लावू शकता.

गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर केसांची काळजी घेण्यासाठी टिप्स

तुमच्या गरोदरपणात केसगळतीचा अनुभव घेणारी तुम्ही एकमेव व्यक्ती नाही हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. काळजी करण्याऐवजी, प्रतिबंधात्मक उपाय आणि संभाव्य उपचार करून पहा. गरोदरपणात आणि नंतर केसांची काळजी घेण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या केसांची काळजी घेण्यास मदत करण्यासाठी येथे काही टिप्स आहेत. केस गळणे ही एक नैसर्गिक घटना आहे. गरोदरपणात आणि त्यानंतर सुद्धा केस गळणे हे सामान्य आहे. गरोदरपणाच्या नाजूक काळात तुमच्या केसांची विशेष काळजी घेतल्यास तुम्हाला या समस्येवर मात करण्यात नक्कीच मदत होईल. संदर्भ आणि संसाधने:  Healthline आणखी वाचा: गरोदरपणात केसात कोंडा होणे: कारणे आणि उपाय गरोदरपणातील मानेचे दुखणे: कारणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved