गर्भारपण

गरोदरपणात घाम येणे

गर्भवती महिलेच्या शरीरात असंख्य बदल होत असतात. एकीकडे, शरीरात होणारे बरेच बदल जाणवत नाहीत. दुसरीकडे, काही बदल दिसून येतात आणि स्त्रीच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल घडवून आणतात. खूप घाम येणे हा एक असा शारीरिक बदल आहे ज्याचा अनुभव गर्भवती महिलेस येतो.

घाम येणे हे गर्भधारणेचे पूर्वलक्षण आहे का?

मूड सविंग्ज, स्तनांमध्ये सूज येणे आणि तीव्र थकवा येणे ह्या गर्भधारणेच्या लक्षणांसारखेच घाम येणे हे गर्भधारणेचे लक्षण आहे. गरोदरपणात हातापायांना घाम येणे सामान्य आहे, कारण संप्रेरकांच्या पातळीत वारंवार बदल होत असतात आणि नवीन हार्मोन्समुळे हॉट फ्लॅशेसचा त्रास होऊ शकतो.

गर्भवती असताना घाम येण्याची कारणे

गरोदरपणात स्त्रियांना जास्त घाम येतो. विशेषतः रात्रीच्या वेळी घाम जास्त प्रमाणात येतो. गर्भवती महिलांमध्ये जास्त घाम येण्याची कारणे इथे दिलेली आहेत;.
  1. हार्मोन्समधील बदलः गरोदरपणात शरीरात हॉर्मोन्सच्या पातळीत बरीच चढ उतार होत असते आणि त्यामुळेच जास्त प्रमाणात घाम येतो.
  2. औषधे: ताप, मळमळ आणि नैराश्यासाठी औषधे घेतल्यास शरीराच्या तापमानात बदल होऊ शकतात आणि विशेषत: रात्रीच्या वेळी घाम येणे हा ह्या औषधांचा दुष्परिणाम असू शकतो.
  3. रक्तप्रवाहात वाढ: गरोदरपणात, तुमच्या रक्तातील प्लाझ्माची पातळी खूप वाढते, आणि त्वचेच्या पृष्ठभागावर जास्त प्रमाणात रक्तपुरवठा होतो. शरीराच्या तपणात होणारी वाढ हे अति घामाचे कारण असू शकते.
  4. तणावास कारणीभूत क्रियाकलाप: व्यायामासारख्या बर्‍याच हालचाली केल्यामुळे अति घाम येऊ शकतो.
  5. संक्रमण आणि आजार: गरोदरपणात घाम येण्याचे आणखी एक कारण म्हणजे संक्रमण किंवा आजारपण असू शकते. हॉजकिनचा लिम्फोमा हा कर्करोगाचा एक प्रकार आहे जो लसीका प्रणालीत गरोदरपणात विकसित होतो.
  6. थायरॉईड ग्रंथीतील बदलः गर्भवती महिलेच्या शरीरात होणाऱ्या हॉर्मोन्स मधील बदलांमुळे थायरॉईड संप्रेरकाची पातळी वाढू शकते. ही परिस्थिती अत्यधिक घामाचे कारण असू शकते.
  7. मसालेदार अन्न आणि चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक पदार्थ हे शरीरातील चयापचय दर वाढवतात आणि त्यामुळे घाम येतो.

रात्रीचा हायपरहाइड्रोसिस किंवा रात्रीचा घाम कशामुळे येतो?

गरोदरपणात हॉर्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे रात्री झोपताना जास्त घाम येऊ शकतो. ही स्थिती रात्रीचा हायपरहाइड्रोसिस म्हणून ओळखली जाते आणि स्त्रीच्या रजोनिवृत्तीच्या संक्रमण काळातही ती सामान्य आहे. त्यामागील खरे कारण कळणे आणि फरक करणे आवश्यक आहे. गरोदरपणात होणाऱ्या हार्मोन्समधील बदलांमुळे किंवा उबदार वातावरणामुळे, रात्रीचा घाम येणे सामान्य आहे. परंतु हे मूलभूत आजार किंवा संसर्गामुळे देखील होऊ शकते आणि त्यास उपचारांची आवश्यकता असेल.

गरोदरपणात अत्यधिक घामापासून मुक्त कसे व्हावे?

घामासाठी काहीच उपचार नसले तरी, येथे अशा काही टिप्स आहेत ज्यामुळे त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि तुम्हाला बरे वाटण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल.

तुम्ही डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

अति ताप किंवा हृदयाचे ठोके खूप वेगाने पडत असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. घाम येणे हे कर्करोग किंवा ल्युकेमिया सारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. आपल्याला वाटत असलेल्या कोणत्याही अस्वस्थतेबद्दल आपल्या डॉक्टरांना माहिती द्या. घाम येणे नियंत्रित करण्यासाठी आपल्याला कोणत्याही चाचण्या किंवा औषधाची आवश्यकता असल्यास डॉक्टर निर्णय घेतील. गरोदरपणात घाम येणे असामान्य नाही. ह्यामुळे काही वेळा अस्वस्थ वाटू शकते परंतु ते आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. घाम कमी करण्यासाठी आणि त्याचा तुमच्यावर फारसा परिणाम होणार नाही ह्यासाठी तुम्ही आवश्यक ती खबरदारी घेऊ शकता. आणखी वाचा: गरोदरपणातील मानेचे दुखणे: कारणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध गरोदरपणातील उचकी: कारणे आणि उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved