आहार आणि पोषण

गरोदरपणात फणस खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात फळे, भाज्या आणि इतर पौष्टिक पदार्थ खाणे आवश्यक आहे. संतुलित आहार घेतल्यास बाळाला योग्य पोषण मिळू शकते. सकस आहार घेतल्यास आई आणि बाळ दोघेही निरोगी राहू शकतात. परंतु गरोदर स्त्रियांना काही फळे आणि भाज्या टाळण्यास सांगितले जाते. या लेखात, आपण एका विशिष्ट फळाबद्दल बोलणार आहोत आणि ते फळ म्हणजे: फणस. विशेषतः फणसाचे लोणचे आणि चिप्स सर्वांनाच आवडतात. परंतु जर तुम्ही गरोदर असाल, तर फणस खाण्यास सुरक्षित आहे की नाही हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तर, जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

फणसाचे पौष्टिक मूल्य

फणस अतिशय पौष्टिक आहे. त्यामध्ये मध्यम प्रमाणात कॅलरीज असतात: एक कप फणसामध्ये सुमारे १५५ कॅलरीज असतात. पण फणसाच्या चरबीमधून जेमतेम ५ कॅलरीज मिळतात. त्यामुळे तो एक आरोग्यदायी पर्याय आहे. फणसामध्ये फोलेट, थायामिन, नियासिन, रिबोफ्लेविन आणि अगदी व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए समृद्ध प्रमाणात असतात. त्यामुळे तो एक पौष्टिक पर्याय आहे. त्यामध्ये मॅंगनीज, तांबे, पोटॅशियम, लोह आणि कॅल्शियम यांसारखी अनेक खनिजे देखील असतात. तसेच फणसामध्ये संतृप्त चरबी, कोलेस्टेरॉल आणि सोडियम खूप कमी प्रमाणात असते. फणसामध्ये असलेले तंतुमय पदार्थ पचन उत्तेजित करण्यात महत्वाची भूमिका बजावते आणि साखरेचा अभाव असल्याने गर्भावस्थेतील मधुमेह असलेल्या महिलांसाठी तो एक उत्तम पर्याय असतो.

गरोदरपणात फणस खाणे सुरक्षित आहे का?

बर्‍याच स्त्रिया, काही तज्ञ आणि काही डॉक्टर देखील गर्भवती महिलांना फणसाचे सेवन न करण्याचा सल्ला देतात, कारण त्याचे फायदे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. काही स्त्रिया असेही मानतात की गरोदरपणात फणस खाल्ल्यास गर्भपात होतो, परंतु ते खरे नाही. फणस योग्य प्रमाणात खाल्ल्यास, आई किंवा बाळाला कोणतेही नुकसान होत नाही.

गरोदरपणात फणस खाण्याचे फायदे

गरोदरपणात फणस खाण्याबद्दल तुम्हाला शंका असल्यास, त्याचे फायदे वाचा. गरोदरपणात, विशेषत: तिसऱ्या तिमाहीत फणस खाल्ल्यास शरीराला भरपूर फायदे होऊ शकतात. येथे फणसाचे काही फायदे दिलेले आहेत.

. पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो

योग्य प्रमाणात फणस खाल्ल्याने पोटाच्या विविध समस्या, जसे की गरोदरपणात पोटाच्या अस्तरावर अल्सर होण्यास मदत होते.

. बाळाची वाढ आणि विकास होण्यास मदत होते

फणसातून तुम्हाला कॅल्शियम, जस्त, लोह, बीटा-कॅरोटीन इ. खनिजे मिळतात. ही खनिजे तुमच्या बाळाच्या वाढीस मदत करू शकतात. फणस हे व्हिटॅमिन ए आणि सी आणि फोलेट, लोह यांसारख्या विविध जीवनसत्त्वांचा समृद्ध स्रोत आहे. हे सर्व पोषक घटक बाळाच्या आवश्यक अवयवांच्या निर्मितीमध्ये मदत करतात.

. रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत करते

गर्भवती महिलेच्या रक्तदाब पातळीत वाढ होणे हे गर्भासाठी हानिकारक असू शकते आणि परिणामी विविध गुंतागुंत निर्माण होऊ शकते. परंतु, फणसासारखे पौष्टिक फळ खाल्ल्यास रक्तदाब पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. आई आणि बाळ दोघेही निरोगी राहतात.

. थकवा घालवण्यास मदत होते

गर्भारपणात स्त्रीला खूप थकवा येऊ शकतो. तुम्ही गरोदर असल्यास, तुम्हाला आळस किंवा थकवा जाणवू शकतो. पण फणसासारखी पौष्टिक फळे आणि भाज्या खाल्ल्याने तुम्हाला ऊर्जा मिळते आणि थकवा टाळता येतो.

. पचन उत्तेजित करते

गरोदरपणात बद्धकोष्ठता आणि पचनाशी संबंधित समस्या सामान्य आहेत. जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा पचनाच्या समस्या देखील येत असतील तर, पचनाशी संबंधित समस्यांशी लढण्यासाठी तुम्ही फणसासारखी तंतुमय फळे आणि भाज्या खाऊ शकता. फणसामधील तंतुमय पदार्थांमधील प्रमाण दररोजच्या तंतुमय पदार्थाच्या सुमारे १० टक्के इतके असू शकते. ह्यामुळे तुमच्या आतड्याची हालचाल सुव्यवस्थित करण्यासाठी, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आणि पचन प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी मदत होऊ शकते.

. तणाव कमी करण्यास मदत करते

गरोदरपणाचे नऊ महिने तुमच्यासाठी सहज तणावपूर्ण असू शकतात, परंतु ते तुमच्यासाठी किंवा तुमच्या बाळासाठी चांगले नाही. जर तुम्हाला तणाव वाटत असेल तर तुम्ही ध्यान करू शकता किंवा योगाचा प्रयत्न करू शकता. तणाव कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात फणसासारख्या सारख्या काही पदार्थांचा समावेश देखील करू शकता. फणस विशेषतः फायदेशीर आहेत, कारण त्यात प्रथिने आणि इतर विविध सूक्ष्म पोषक घटक असतात, आणि ते मानसिक तणावाचे व्यवस्थापन करण्यास मदत करतात.

. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

गरोदरपणात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. गरोदर असताना, तुम्ही फणसासारखी फळे खाऊ शकता. त्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतात आणि त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढेल.

गरोदरपणात फणस खाण्याचे फायदे

फणसाच्या बिया गरोदरपणात गर्भवती स्त्रीसाठी फायदेशीर असतात. फणसाच्या बियांचे सेवन करण्याचे काही फायदे खाली सांगितलेले आहेत.

1. ऍनिमियाशी सामना करण्यास मदत करते

फणसाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते आणि त्यामुळे सामना करण्यास मदत होते. लाल रक्तपेशींचे उत्पादन होते. गरोदरपणात लोहाची कमतरता ही एक सामान्य समस्या आहे आणि ती बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. गर्भाच्या इष्टतम विकासासाठी लाल पेशी अत्यंत आवश्यक असतात, म्हणूनच गर्भवती महिलांना लोहयुक्त पदार्थ खाण्यास सांगितले जाते. तुम्ही तुमच्या आहारात फणसाच्या बियांचा समावेश करू शकता, कारण फणसाच्या बिया लोहाचा चांगला स्रोत आहे आणि त्या खाल्ल्यास तुमच्या लोहाची पातळी नियंत्रित राहू शकते.

2. त्वचा आणि केसांसाठी चांगले

फणसाच्या बियाणे खाणे हा तुमची त्वचा चमकदार ठेवण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. जर तुम्हाला चांगले केस आणि निरोगी त्वचा हवी असेल, तर फणसाच्या बियांसारखे खनिजांनी समृद्ध असलेले पदार्थ खा.

3. सर्दी आणि विषाणूजन्य संसर्गावर उपचार करण्यास मदत करते

फणसाच्या बिया खाल्ल्याने गरोदरपणात सर्दी आणि विषाणूजन्य संसर्ग बरा होऊ शकतो.

गरोदरपणात फणस खाण्याचे दुष्परिणाम

फणस खाल्ल्याने गरोदर स्त्रीला विविध फायदे होतात. म्हणजेच फणस वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. गरोदरपणात फणस खाण्याचे काही धोके इथे दिलेले आहेत.
  1. फणस खाल्ल्याने कधीकधी स्त्रीच्या साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊ शकतात. त्यामुळे मधुमेही स्त्रियांनी फणस खाणे टाळावे
  2. फणस रक्त गोठण्यास गती देण्यासाठी ओळखले जाते. बहुतेक जणांसाठी ही फायदेशीर गोष्ट आहे परंतु, जर तुम्हाला आधीपासून रक्ताची समस्या असेल तर तुम्ही फणस खाणे टाळले पाहिजे
  3. फणस जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुम्हाला अतिसार आणि उत्सर्जनाच्या समस्या उद्भवू शकतात कारण ते नैसर्गिक रेचक म्हणून कार्य करते
  4. काही स्त्रियांना फणसापासून ऍलर्जी होण्याची शक्यता असते

तुमच्या गरोदरपणाच्या आहारात फणसाचे समावेश करण्याचे वेगवेगळे उपाय

कच्च्या किंवा पिकलेल्या फळापासून भाजी शिजवून फणसाचे सेवन विविध स्वरूपात केले जाऊ शकते. गरोदरपणात फणसाचे चिप्स खाणे देखील चांगले आहे, परंतु तुम्ही ते मर्यादित प्रमाणात खावे. तुम्ही किसलेल्या नारळाने सजवलेले फणसाचे तुकडे देखील खाऊ शकता.

फणसाची निवड आणि साठवणूक कशी करायची?

फणस खरेदी करताना, पिकलेले आणि ताजे आणि जाड, गडद हिरव्या रंगाचे आणि कडक काटेरी फळ निवडा. ताबडतोब खाण्यासाठी, मऊ काटे असलेले एखादे पिकलेले फळ निवडा. जर तुम्ही ते रेफ्रिजरेट केले तर तुम्ही ते जास्त काळ साठवू शकता. फणस हे एक पौष्टिक फळ आहे आणि गरोदरपणात तुम्हाला फणसाचे बरेच फायदे देऊ शकतात. असे म्हटले जात आहे की, तुम्ही फणसाचे जास्त प्रमाणात सेवन करू नये, कारण त्याचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुम्ही फणस खात असल्यास तो मध्यम प्रमाणात खा. शिवाय, तुमच्या गरोदरपणाच्या आहारात कोणत्याही अन्नपदार्थांचा समावेश करण्यापूर्वी, डॉक्टरांचा किंवा पोषणतज्ञांचा सल्ला घ्या म्हणजे तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही. निरोगी गर्भारपणासाठी शुभेच्छा! आणखी वाचा: गरोदरपणात किवी हे फळ खाणे गरोदरपणात सफरचंद खाणे
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved