गर्भारपण

गरोदरपणातील डेटिंग स्कॅन – काय अपेक्षित असते?

गर्भधारणेचे दोन प्रकार आहेत. काही गर्भधारणा नियोजित असतात आणि काही नसतात. नियोजित नसताना, गर्भधारणा केव्हा झाली ह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. नियोजित नसताना गर्भधारणा झाल्यानंतर त्याचे आरोग्याशी संबंधित इतर परिणाम आहेत. उदाहरणार्थ, काही वेळा डॉक्टरांनी अनावश्यकपणे प्रसूती प्रेरित केलेली असते कारण गर्भ किती महिन्यांचा आहे याबद्दल अनिश्चितता असते. ह्याचा परिणाम म्हणून बाळाचा जन्म अकाली होऊ शकतो.

याचा अर्थ असा नाही की ज्यांची नियोजित गर्भधारणा झालेली आहे ते १०० टक्के अचूक असू शकतात. गर्भधारणेच्या अचूक वेळेचा मागोवा घेणे हा एक अंदाज लावण्याच्या खेळ असू शकतो.

डेटिंग स्कॅन म्हणजे काय आणि ते का केले?

डेटिंग स्कॅन ही एक चाचणी आहे. ह्या मध्ये त्रुटींची शक्यता जास्तीत जास्त ३ ते ५ दिवस इतके असू शकते. गर्भाच्या वयाचे विश्वसनीयरित्या मूल्यांकन करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. डेटिंग स्कॅन खालील समस्या असलेल्या महिलांसाठी आहे:

गर्भधारणा डेटिंग स्कॅनची शिफारस कधी केली जाते?

ते कसे केले जाते?

डेटिंग स्कॅन अल्ट्रासाऊंड मशीनच्या मदतीने केले जाते. तुम्हाला तुमचे पोट उघडे ठेवणे गरजेचे असते. त्यावर जेल लावले जाईल. त्यानंतर , मॅपिंग करण्यासाठी ट्रान्सड्यूसर नावाचे उपकरण हळूवारपणे पोटभर फिरवले जाते. ह्या प्रक्रियेस २० ते ३० मिनिटे लागू शकतात. स्कॅन करण्यापूर्वी तुम्हाला पाणी प्यावे लागेल कारण चाचणी करण्यापूर्वी मूत्राशय पूर्ण भरलेले असणे आवश्यक आहे. कारण मूत्राशय पूर्ण भरलेले असताना ते गर्भाशयाला वरच्या दिशेने ढकलते त्यामुळे सोनोग्राफरला गर्भाची चांगली दृश्यमानता मिळते. आवश्यक असल्यास, योनि स्कॅन देखील केले जाऊ शकते.

डेटिंग स्कॅन वरून काय समजते?

७ व्या आठवड्यात डेटिंग स्कॅन केल्यास खालील गोष्टी समजतात.

डेटिंग स्कॅन किती अचूक आहेत?

लवकर डेटिंग स्कॅन करून घेतल्यास तो अचूक असतो. तथापि, प्रणाली अगदी तंतोतंत योग्य नाही आणि काही वेळेला अचूकतेशी तडजोड केली जाऊ शकते. त्यामध्ये खालील परिस्थितीचा समावेश होतो.

तुम्ही एकाच वेळी स्क्रीनिंग चाचण्या आणि डेटिंग स्कॅन करू शकता का?

हे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे परंतु अल्ट्रासाऊंड मशीन कोणत्या प्रकारचे वापरले जात आहे यावर ते अवलंबून आहे. काहींना स्क्रीनिंग चाचण्या करण्याची तरतूद आहे, तर काहींना नाही.

तुमच्या मुलाला डाऊन सिंड्रोम असण्याची शक्यता आहे का हे पाहण्यासाठी तुम्ही स्क्रीन टेस्ट वापरू शकता. रक्ताची तपासणी करून न्यूकल ट्रान्सलुसेन्सी स्कॅनच्या मदतीने ते केले जाते. या दोन्ही चाचण्या एकत्रित स्क्रीनिंग चाचण्या म्हणून ओळखल्या जातात.

एकत्रित स्क्रीनिंग चाचणीसाठी, तुम्ही सर्वत आधी डेटिंग स्कॅन करणे अत्यावश्यक आहे. ह्याचे कारण म्हणे तुमच्या गरोदरपणात तुम्ही कोणत्या अवस्थेत आहात त्यानुसार शरीरातील हार्मोन्स बदलतात.

गरोदरपणात डेटिंग स्कॅन करण्याचे काही तोटे आहेत का?

डेटिंग स्कॅन करण्याचे फायदे स्पष्ट असले तरी, शांत राहणे महत्त्वाचे आहे. गरोदरपणावर परिणाम होणार नाही अशी एखादी किरकोळ समस्या असली तरी त्याचा आईच्या मनस्थितीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गरोदरपणात शांत मनःस्थितीत असल्‍या आईला अनावश्यक चिंता आणि तणाव निर्माण होईल.

जर तुमची अनियोजित गर्भधारणा असेल किंवा तुम्हाला तुमची गर्भधारणा नेमकी कधी झाली याची खात्री नसेल तर डेटिंग स्कॅन तुम्हाला गर्भधारणेची वेळ समजण्यास मदत करते. जर तुम्ही तुमच्या मासिक पाळी चक्राची नोंद ठेवत असाल आणि गर्भधारणेच्या वेळेचा अंदाज लावण्यात सक्षम असाल, तर तुम्ही सुरक्षित आहात. तथापि, तुमच्यापैकी ज्यांनी हे केले नाही त्यांनी घाबरू नका, कारण डेटिंग स्कॅन तुम्हाला ह्याबाबतीत मदत करू शकतो!

आणखी वाचा:

गरोदरपणातील ट्रान्स्व्हजायनल स्कॅन (टीव्हीएस) गरोदरपणातील अल्ट्रासाऊंड स्कॅन – प्रकार, तयारी कशी करावी आणि बरेच काही

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved