आहार आणि पोषण

गरोदरपणात भेंडी (ओकरा) खाणे चांगले आहे का?

गरोदरपणात तुमच्या आहारात ताज्या भाज्यांचा समावेश केल्यास त्याचा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो. गरोदरपणात तुमच्या शरीरात खूप बदल होत असतात. त्यामुळे ह्या बदलांना सामोरे जाण्यासाठी शरीराराला चांगल्या पोषणाची गरज असते. भेंडीसारख्या भाज्या तुमच्या गरोदरपणातील आहारासाठी आदर्श असू शकतात. गरोदरपणात भेंडी किंवा लेडीज फिंगरच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.

भेंडीचे पौष्टिक मूल्य

भेंडीमध्ये भरपूर पौष्टिक मूल्ये असतात. खालील तक्त्यामध्ये भेंडी मधील पौष्टिक घटक दिलेले आहेत

पौष्टिक घटक मूल्य प्रति 100 ग्रॅम
ऊर्जा 28 किलोकॅलरी
कर्बोदके 3.62 ग्रॅम
फायबर 4 ग्रॅम
चरबी 0.22 ग्रॅम
प्रथिने 2.0 ग्रॅम
व्हिटॅमिन ए 11.52 मिग्रॅ
व्हिटॅमिन बी 9 किंवा फोलेट 63.68 ग्रॅम
व्हिटॅमिन सी 22.51 मिग्रॅ
कॅल्शियम 86 मिग्रॅ
मॅग्नेशियम 66 मिग्रॅ

गरोदरपणात भेंडीचे आरोग्यविषयक फायदे

गरोदर स्त्रियांसाठी भेंडीचे अनेक फायदे आहेत. भेंडी ही एक कमी कॅलरीयुक्त भाजी आहे. भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात फोलेट आणि राइबोफ्लेविन असते. ते बाळाच्या निरोगी विकासासाठी आवश्यक आहे. गरोदरपणात भेंडी खाण्याचे काही फायदे आहेत:

. व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी शरीरात लोहाचे शोषण करण्यास मदत करते आणि त्यामुळे बाळाची वाढ चांगली होते. अँटिऑक्सिडंट म्हणून, व्हिटॅमिन सी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि उच्च रक्तदाब देखील प्रतिबंधित करते. व्हिटॅमिन सी तुमच्या बाळाची प्रतिकारशक्ती वाढते. तसेच त्यामुळे त्वचा, केस आणि हाडांचा विकास चांगला होतो.

. फोलेट भरपूर प्रमाणात असते

भेंडीची भाजी म्हणजे फोलेटचा एक चांगला स्रोत आहे: फॉलिक ऍसिड बाळांमध्ये जन्मजात दोषांचा धोका टाळण्यास मदत करू शकते. विशेषतः गरोदरपणाच्या ४ थ्या आणि १२ व्या आठवड्यात भेंडी खाण्याची शिफारस केली जाते, कारण ह्या कालावधीत तुमच्या बाळाचे न्यूरल ट्युब विकसित होतात. भेंडीमधील फॉलिक ऍसिड अशा प्रकारे बाळाच्या विकासास मदत करते.

. अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत

भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. हे अँटिऑक्सिडंट्स तुमच्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतात, बाळाच्या वाढीस चालना देतात आणि तसेच बाळाचे आजार आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग किंवा मधुमेहाचा धोका कमी करतात.

. भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ

गरोदरपणात बद्धकोष्ठता टाळण्यासाठी भेंडी हा एक उत्तम पर्याय आहे. विरघळणारे आणि न विरघळणारे तंतुमय पदार्थ भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात असतात. विरघळणारे तंतुमय पदार्थ मधुमेहाचा धोका कमी करतात आणि तसेच रक्तातील कोलेस्टेरॉल देखील त्यामुळे कमी होते.

. चांगली झोप लागण्यास मदत होते

ट्रिप्टोफॅन सारखी अत्यावश्यक अमीनो आम्ल भेंडीमध्ये असतात, तसेच तेले आणि प्रथिने मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ओळखली जातात आणि चांगली झोप लागण्यास मदत करतात.

या फायद्यांव्यतिरिक्त, भेंडी तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ देखील काढून टाकते, कारण भेंडीमधील श्लेष्मा आणि फायबर रक्तातील साखरेची पातळी स्थिर करतात. गरोदर स्त्रिया देखील त्यांची त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी भेंडी खाऊ शकतात, विशेषतः जर त्यांना पुरळ आणि केस गळतीचा त्रास होत असेल तर भेंडी खाल्ल्याने मदत होऊ शकते.

तुमच्या गरोदरपणाच्या आहारात भेंडीचा समावेश कसा करावा?

भेंडीचे असे अनेक फायदे असल्यामुळे, तुमच्या गरोदरपणाच्या आहारात तुम्ही भेंडीचा समावेश करावा. तुमच्या आहारात भेंडीचा समावेश कसा करावा ह्याविषयीच्या टिप्स खाली दिलेल्या आहेत, तसेच कुठली काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा सांगितलेले आहे.

भेंडीची भाजी हा एक उत्कृष्ट अन्नपदार्थ आहे आणि भेंडी खाण्याने गरोदरपणात तुमच्यावर कोणतेही हानिकारक दुष्परिणाम होत नाहीत. तुमचे आणि तुमच्या बाळाचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही दररोज भेंडी खाऊ शकता. परंतु जर तुम्हाला भेंडीच्या भाजीची ऍलर्जी असेल किंवा भेंडीची भाजी खाल्ल्यानंतर कोणतीही शारीरिक अस्वस्थता जाणवत असेल तर, कोणत्याही गंभीर समस्या उद्भवू नयेत म्हणून तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा:

गरोदरपणात कांदा खाणे सुरक्षित आहे का? गरोदरपणात पेरू खाणे सुरक्षित आहे का?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved