गर्भारपण

गरोदरपणातील बधिरता: कारणे आणि उपाय

गरोदरपणामुळे स्त्रीच्या शरीरात बरेच बदल घडतात आणि त्यातील काही बदलांमुळे हात, पाय, पोट किंवा शरीराच्या इतर भागामध्ये बधिरपणा किंवा सुन्नपणा येऊ शकतो. अवयवांना येणारा बधिरपणा हे देखील गरोदरपणाच्या अनपेक्षित लक्षणांपैकी एक आहे आणि बहुधा तो गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीत अनुभवला जातो. जर तुम्ही गर्भवती असाल आणि तुमचे पाय, खांदे किंवा हात बधिर होत असतील तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु त्यासोबतच जर गरोदरपणाची इतर लक्षणे दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा.

गरोदरपणातील बधिरपणा म्हणजे काय?

गरोदरपणात बधिरपणा येणे किंवा मुंग्या येणे म्हणजे हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये संवेदना नष्ट होणे होय. हे गरोदरपणाचे एक सामान्य लक्षण आहे. हार्मोनल व शारीरिक बदलांमुळे सहसा स्त्रिया हे लक्षण अनुभवतात. जेव्हा एखादी स्त्री आपल्या गरोदरपणाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत प्रवेश करते तेव्हा पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेमुळे तिच्या हातापायांना सूज येऊ शकते. ही सूज गरोदरपणातील बधिरतेच्या भावनांना कारणीभूत ठरू शकते. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत बधिरपणा अनुभवणे बर्‍याचदा गरोदरपणाचे लक्षण मानले जाते. आणि जेव्हा दुसऱ्या तिमाहीच्या दरम्यान ह्याचा अनुभव घेतला जातो तेव्हा ते मुख्यतः झोपेच्या अयोग्य स्थितीमुळे होते. तिसऱ्या तिमाहीत लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात कारण या वेळी वाढत्या गर्भाशयामुळे आणि झोपेच्या स्थितीमध्ये बदल झाल्यामुळे रक्तवाहिन्या किंवा नसा संकुचित होतात.

गर्भवती स्त्रियांना कधी आणि कुठे बधिरपणा जाणवतो?

गरोदरपणात, शरीराच्या बऱ्याच भागामध्ये (जीभ आणि चेहऱ्यासह) बधिरपणा जाणवतो. गरोदरपणात तुम्हाला शरीराचे काही भाग सुन्न वाटू शकतात.

गरोदरपणात बधिरपणा किंवा मुंग्या येण्यामागची कारणे काय आहेत?

गरोदरपणात बधिरपणा किंवा मुंग्या येणे यामागची काही कारणे येथे आहेतः

जिभेचा बधिरपणा कसा टाळावा?

मज्जातंतूवर दाब पडल्यास, पाठीचा कणा दाबला गेल्यास, बेल्स पाल्सी किंवा ऍलर्जिक प्रतिक्रियांमुळे जिभेच्या बधिरपणाचा अनुभव येऊ शकतो. ह्या बधिरतेचे नेमके कारण शोधून काढल्यास उपचार करण्यास मदत होते आणि हे कसे करावे याबद्दल काही सूचना येथे आहेत.

पोट किंवा बेंबीकडील भागातील बधिरपणावर कसा उपचार करावा?

जड गर्भाशयामुळे मज्जातंतू वर दाब पडतो तेव्हा पोटावर स्तब्धता येते. हे टाळण्याचे मार्ग येथे आहेतः

पाय आणि पावलांच्या बधिरपणावर कसा उपचार करावा?

गरोदरपणात पायात मुंग्या येणे खूप सामान्य आहे. जर तुम्ही जास्त काळ उभे असाल किंवा बसलात तर तुमचे पाय बधिर होऊ शकतात. हे बहुधा रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाहास प्रतिबंधित करते आणि त्यामुळे मुंग्या येऊ शकतात. गरोदरपणातील बधिरतेवर इथे काही उपाय दिलेले आहेत.

तुम्ही बधिरपणा किंवा सुन्नपणा थांबवू शकता?

गरोदरपणात शरीरात येणारी बधिरता रोखणे शक्य नसले तरी आपल्या रूटीनमध्ये काही बदल करून तुम्हाला बरे वाटू शकते. झोपताना हात वर घेऊन झोपल्यास किंवा हातांच्या मुठी केल्यास बोटांमध्ये मुंग्या येणे आणि मनगटात सूज येणे टाळता येते. आपण बसता, उभे राहता किंवा झोपता तेव्हा योग्य शरीरस्थिती राखल्यास त्याचा चांगला परिणाम होऊन बधिरपणा मोठ्या प्रमाणात कमी होतो. तसेच, सपाट टाच आणि मऊ सोल असलेले आरामदायक शूज घाला. त्यामुळे पायांवर दाब कमी येतो आणि सुन्नपणा दूर होतो.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जरी गरोदरपणात हात आणि पाय बधीर होणे सामान्य असले तरी अचानक तीव्र सुन्नपणा किंवा मुंग्या येणे एखाद्या गंभीर गोष्टीचे सूचक असू शकते. अचानक होणारी इजा किंवा ब्लॉकेजची ती लक्षणे आहेत आणि अशा वेळी त्वरित वैद्यकीय मदत घेणे गरजेचे असते. जर तुम्ही पोटावर किंवा पायांमध्ये सुन्नता दूर करण्यासाठी कोणतेही वैकल्पिक औषध किंवा क्रीम वापरण्याचे ठरविल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशा क्रीममध्ये बहुतेक वेळा अनियमित हर्बल घटक असतात आणि ते गरोदरपणात धोकादायक ठरू शकतात. तसेच, तुम्हाला काही असामान्य लक्षण आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. गरोदरपणात बधिरपणा आणि मुंग्या येणे ह्या संवेदना सामान्य असतात आणि बहुतेकदा त्यामध्ये चिंता करण्याचे कारण नसते. आवश्यक काळजी घ्या आणि आपल्याला बरे वाटत नसल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला निरोगी गर्भधारणेसाठी शुभेच्छा! आणखी वाचा: गरोदरपणात पायांवर सूज येण्याच्या समस्येवर १७ परिणामकारक घरगुती उपचार गरोदरपणात लघवीला वास येणे: कारणे आणि उपचार
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved