गर्भारपण

गरोदरपणाच्या ९ व्या महिन्यात बाळाच्या गर्भाशयातील हालचाली – काय सामान्य आहे?

बाळाच्या आणि तुमच्या आरोग्याची काळजी तुमच्यावर असल्यामुळे गरोदरपणात तुम्हाला काळजी वाटू शकते. बाळाचे पोषण सर्वस्वीपणे तुमच्या शरीरावर अवलंबून असते. जेव्हा तुम्ही गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये असता तेव्हा बाळाबद्दल आणि गर्भाशयातील बाळाच्या हालचालींबद्दल तुम्हाला चिंता वाटणे साहजिक आहे. ही चिंता कमी करण्यासाठी, गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात बाळाची कोणत्या प्रकारची हालचाल सामान्य आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.

गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात बाळाची हालचाल कशी होते?

विशेषतः नवव्या महिन्यात तुमच्या बाळाने गर्भाशयात सतत हालचाल करावी अशी तुमची अपेक्षा असणे खूप सामान्य आहे. नवव्या महिन्यात बाळाच्या हालचाली कमी झाल्यास बहुतेक पालक घाबरून जातात. लक्षात ठेवण्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशस्वी गर्भधारणेसाठी आईचे आरोग्य चांगले असणे महत्त्वाचे असते. म्हणून, बाळाच्या अनियमित हालचालींमुळे होणारी चिंता कमी करणे आवश्यक आहे. गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात, निरोगी बाळाने दर दोन तासांनी अंदाजे दहा वेळा लाथ मारली पाहिजे. ह्या महिन्यात प्रसूती देखील होऊ शकते, त्यामुळे बहुतेक मातांना बाळाच्या क्रियाकलापांमध्ये वाढ झालेली दिसून येईल. परंतु, काही वेळा हे प्रमाण कमी असते. ह्याचा अर्थ बाळाला काही आजार किंवा धोका असतो असे नाही. जर बाळ दर दोन तासांनी दहा किंवा त्याहून अधिक वेळा लाथ मारत असेल तर तोपर्यंत घाबरण्याची गरज नाही. जर तुमच्या बाळाची पुरेशी हालचाल होत नसेल, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या जेणेकरून डॉक्टर अल्ट्रासाऊंड करू शकतील आणि तुमच्या बाळाचे आरोग्य तपासू शकतील.

नवव्या महिन्यात बाळाची सामान्य हालचाल कोणती मानली जाते?

नवव्या महिन्यात बाळाची हालचाल होणे सामान्य असते, अगदी प्रसूतीच्या काळात सुद्धा बाळाची हालचाल सामान्य असते. या कालावधीतील बाळांच्या सामान्य हालचालींची व्याख्या करणे कठीण असू शकते, कारण बाळ तुमच्या गर्भाशयात जबरदस्तीने त्याचे शरीर ताणण्यासाठी किंवा पालथे पलटण्यासाठी पुरेसे वाढलेले असते. प्रत्येक बाळाची हालचाल करण्याची एक विशिष्ट प्रवृत्ती असते आणि अशा प्रकारे, हालचालींची कोणतीही निश्चित पद्धत नसते.
तुमच्या बाळाच्या सामान्य हालचालींमध्ये जर तीव्र घट दिसली किंवा ओटीपोटात असामान्य वाटणारी एखादी तीक्ष्ण वेदना झाली, तर त्यामुळे काहीतरी विचित्र झाल्यासारखे वाटू शकते. तुमच्या बाळाच्या हालचालींचा ट्रेंड लक्षात घेण्यासाठी दिवसातील काही तास घालवणे चांगले. अशा प्रकारे, हालचाल कधी वेगळी झालेली आहे हे तुम्ही ओळखू शकता. तसे झाल्यास, ताबडतोब डॉक्टरांची भेट घ्या.

बाळाच्या हालचाली कधी आणि कशा मोजायच्या?

तुमच्या बाळाच्या लाथांची संख्या सतत मोजत राहणे ही एक तणावाची गोष्ट असू शकते. तुम्ही तुमच्या बाळाच्या हालचाली कशा मोजू शकता ते इथे दिलेले आहे.

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

तुमच्या गरोदरपणाच्या नवव्या महिन्या लक्षात ठेवण्यासारखी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बाळाच्या हालचाली जास्त प्रमाणात मर्यादित असतील, कारण बाळाचा आकार आता वाढलेला असेल. कमकुवत हालचाली म्हणजे धोक्याचे लक्षण असू शकते. बाळाने काही प्रमाणात स्थिर हालचाली दर्शवणे सामान्य आहे, सामान्यत: प्रत्येक १२० मिनिटांनी किमान दहा हालचाली होणे आवश्यक आहे. जर हालचालींनंतर योनीतून रक्तस्त्राव होत असेल, पोटात पेटके येत असतील, अनियमित हालचाल होत असतील किंवा हालचाली मंदावत असेल तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. गरोदरपणाच्या उत्तरार्धात बाळाच्या हालचाली मंदावतात का?

प्रत्येक बाळाच्या हालचालींचे विशिष्ट नमुने असतात. काही बाळे इतरांपेक्षा जास्त प्रमाणात हालचाली करतात. जोपर्यंत तुमचे बाळ दर दोन तासांनी दहापेक्षा जास्त वेळा हालचाल करत असते तोपर्यंत काळजी करण्याचे कोणतेही कारण नसावे. तुमच्या बाळाची हालचाल मागील महिन्यांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी असल्यास, आणि तरीही दर १२० मिनिटांनी दहापेक्षा जास्त हालचाली होत असल्यास, कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. जेव्हा तुमच्या गरोदरपणाचा शेवटचा टप्पा सुरु होतो. तेव्हा तुमच्या बाळाच्या आरोग्याबाबत सुरक्षित राहणे आवश्यक असते. तुम्हाला काहीतरी असामान्य वाटत असल्यास, कृपया तुमच्या डॉक्टरांची मदत घ्या. तुमच्या तपासण्या नियमित करा आणि तुमची प्रसूतीची बॅग तयार ठेवा, जेणेकरून तुम्ही शक्य तितक्या लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकता. ह्या काळात आईच्या आरोग्यालाही धोका असतो, म्हणून तुमच्या डॉक्टरांच्या सर्व सूचनांचे पालन करून तुम्ही स्वतःची काळजी घ्या. संदर्भ आणि संसाधने:  Livestrong आणखी वाचा: गरोदरपणात बाळाचे पाय मारणे गरोदरपणात रात्रीच्या वेळी पोटातील बाळाची हालचाल किंवा त्याचे पाय मारणे – सुरक्षित आहे का
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved