गर्भधारणेचे आठवडे

गरोदरपणाच्या ९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

अभिनंदन! आता तुमचा गरोदरपणाचा तिसरा महिना सुरु आहे. गरोदरपणाचे दोन महिने उलटून गेले आहेत आणि आता तुम्हाला गरोदरपणाची सवय झाली पाहिजे. आता तुमच्या पोटात बाळ असल्याचे तुम्हाला जाणवणार नाही, परंतु हे छोटंसं बाळ लवकरच छोट्या हालचाली करू लागेल (तुम्हाला त्या जाणवत नसल्या तरीही). तुम्ही तुमच्या बाळाविषयी सर्व काही जाणून घेण्यात उत्सुक असाल ह्यात काही शंका नाही. तुमच्या गरोदरपणाच्या नवव्या आठवड्यात, तुमच्या वाढत्या बाळाचा आकार जाणून घेण्यासाठी तुमचे डॉक्टर अल्ट्रासाऊंडची शिफारस करतील. अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये, तुम्हाला तुमच्या गर्भाशयात एक मांसल गोळा दिसेल त्याचे हृदयाचे ठोके तुम्हाला ऐकू येतील. ९ आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.

तुम्ही गरोदरपणाच्या ९ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड का केले पाहिजे?

पहिल्या अल्ट्रासाऊंड स्कॅनला डेटिंग स्कॅन म्हणतात. हे स्कॅन खालील कारणांसाठी केले जाते.

तुमच्या गरोदरपणातील ९ व्या आठवड्यातील स्कॅनची तयारी कशी करावी?

तुमच्या गरोदरपणातील ९ व्या आठवड्यातील स्कॅन सामान्यतः ट्रान्सव्हॅजिनल स्कॅन (TVS) असेल. याचे कारण म्हणजे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात तुमचे बाळ ओटीपोटात खूप लहान असेल. टीव्हीएस स्कॅन मध्ये डॉक्टर योनिमार्गाद्वारे गर्भाशय स्कॅन करतील. स्कॅनची तयारी करण्यासाठी, सर्वात आधी तुम्हाला तुमचे मूत्राशय रिकामे करावे लागेल. स्कॅन दरम्यान जर मूत्राशय भरलेले असेल तर बाळाची प्रतिमा नीट मिळणार नाही त्यामुळे नर्स तुम्हाला स्कॅन करण्याच्या आधी ला जाऊन येण्यास सांगतील.

योनिमार्गाद्वारे प्रोब घालायचा असल्याने, तुम्हाला कंबरेपासून खाली कपडे उतरवावे लागतील. स्कॅनला जाताना तुम्ही सैल कपडे घाला. लांब टॉप आणि स्लॅक्स/ सैल सलवार सोबत घाला.

अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यासाठी किती वेळ लागतो?

एका सामान्य स्कॅनसाठी सुमारे २० ते ३० मिनिटे लागतील. तथापि, जर डॉक्टरांना स्पष्ट प्रतिमा मिळण्यास त्रास होत असेल तर यास थोडा जास्त वेळ लागू शकतो. परंतु, याबद्दल काळजी करण्याची गरज नाही कारण महिलांना पोटाच्या स्कॅनपेक्षा ट्रान्सव्हॅजिनल स्कॅन अधिक सोयीस्कर वाटतो.

अल्ट्रासाऊंड स्कॅन दरम्यान काय होते?

अल्ट्रासाऊंड स्कॅन दरम्यान, तुम्हाला बेडवर झोपण्यास सांगितले जाईल. तुमच्या पायाचे तळवे बेडवर सपाट राहतील अशा पद्धतीने गुडघे उभे ठेवा. तुमचे पाय एकमेकांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे डॉक्टरांना स्कॅन करणे सोपे जाईल. तुमच्या अंतर्गत तपासणीदरम्यान सुद्धा तुम्हाला हीच स्थिती घ्यावी लागेल.

प्रोब, कंडोम सारख्या दिसणाऱ्या आणि निर्जंतुकीकरण केलेल्या लॅटेक्स शीटने झाकले जाईल आणि त्यावर जेल लावली जाईल जेणेकरून हा प्रोब योनीमार्गातून सहजतेने आत घातला जाईल आणि स्पष्ट चित्रे तयार होतील. स्कॅन करण्यासाठी योनीमध्ये प्रोब दोन ते तीन इंच घातला जाईल. जरी ही प्रक्रिया थोडीशी अस्ताव्यस्त वाटली तरी, तुम्ही आराम केल्यास, तुमच्या डॉक्टरांना तपासणी करणे सोपे होईल. जरी तुमचे स्नायू ताणले गेले तरीसुद्धा तुम्हाला अस्वस्थ आणि वेदनादायी वाटू शकते. त्यामुळे दीर्घ श्वास घेण्याचे लक्षात ठेवा आणि आराम करण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या गरोदरपणाच्या नवव्या आठवड्यातील स्कॅन मध्ये तुम्ही काय पहाल?

तुमच्या ९ आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये तुम्ही काय अपेक्षा करू शकता ते येथे दिलेले आहे.

गरोदरपणाच्या ९व्या आठवड्यात योक सॅक रिकामी असण्याचा अर्थ काय आहे?

योक सॅक गर्भ आणि अम्नीओटिक द्रवपदार्थ व्यापते. योक सॅक गॅस्टेशनल सॅक मध्ये असते आणि गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात तो विकसनशील गर्भासाठी पोषणाचा स्रोत आहे. गर्भावस्थेच्या ५ ते ६ आठवड्यांपर्यंत योक सॅक दिसत नाही, म्हणून त्यावरून गर्भाच्या वयाचे कळते. जेव्हा ६ आठवड्यांच्या आसपास सुद्धा योक सॅक दिसत नाही तेव्हा मासिक पाळीची तारिख लक्षात ठेवण्यात काही तरी चूक झाली असण्याची शक्यता असते. नंतर एक किंवा दोन आठवड्यांत योक सॅक असल्याची खात्री करण्यासाठी डॉक्टर दुसरे स्कॅन करतील. जर गरोदरपणाच्या ९ व्या आठवड्यांनंतरही योक सॅक दिसली नाही, तर हे गर्भपाताचे लक्षण असू शकते. काहीवेळा फॉलो-अप स्कॅन होईपर्यंत वाट बघण्याची गरज नसते, जर ९ आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅन मध्ये गॅस्टेशनल सॅक सुमारे २५ मिमी किंवा त्याहून अधिक दिसत असेल आणि तेथे योक सॅक किंवा भ्रूण नसेल, तर डॉक्टर लगेच गर्भपाताचे निदान करतील.

स्कॅनमध्ये काही विकृती आढळल्यास काय?

स्कॅन काहीवेळा अनिर्णायक असू शकतात, म्हणून कठोर मार्गदर्शक तत्वांचे पालन केले पाहिजे. डॉक्टर या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत असल्याने, त्यांचे निष्कर्ष पूर्णपणे निश्चित आहेत. डॉक्टर मार्कर स्कॅनमध्ये किरकोळ विकृती शोधू शकतात अधिक गंभीर समस्या असल्यास त्या दाखवू शकतात. त्यांना काही असामान्य वाटल्यास, ते तुम्हाला बाळामधील गुणसूत्र सामान्य आहेत की नाही हे तपासण्यासाठी सीव्हीएस किंवा ऍम्नीऑसेन्टेसिस सारख्या चाचण्या करण्यास सांगतील.

गर्भाला गंभीर समस्या असल्यास, तुम्ही निर्णय घेण्यास वेळ घेऊ शकता. त्यामध्ये गर्भधारणा संपुष्टात आणणे, विशेष गरजा असलेल्या बाळाची तयारी करणे किंवा गर्भावर शस्त्रक्रिया करणे यांचा समावेश असू शकतो.

समस्या दूर करण्यासाठी आणि निरोगी गर्भधारणेची खात्री करण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅन अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे कोणतेही अल्ट्रासाऊंड स्कॅन वगळू नका. सर्व तपासण्या करा. तुम्हाला निरोगी आणि सुरक्षित गरोदरपणासाठी शुभेच्छा!

मागील आठवडा: गरोदरपणाच्या ८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन पुढील आठवडा: गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved