गर्भधारणेचे आठवडे

गरोदरपणाच्या ८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

अल्ट्रासाऊंड स्कॅन मध्ये तुम्हाला तुमच्या वाढत्या बाळाची झलक पाहायला मिळते. पहिल्या अल्ट्रासाऊंडच्या नुसत्या विचाराने सुद्धा तुम्हाला चिंता वाटू शकते किंवा तुम्हाला उत्सुकता सुद्धा वाटू शकते. वेळेवर अल्ट्रासाऊंड केल्याने स्त्रीरोगतज्ञांना गर्भाशयात असलेल्या बाळाच्या आरोग्याचे मोजमाप करण्यास आणि निरोगी गर्भधारणेची पुष्टी करण्यास मदत होते. जर तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या ८ व्या आठवड्याच्या जवळ असाल, तर तुम्हाला तुमच्या पुढच्या अल्ट्रासाऊंडची चिंता वाटू शकते. परंतु तुम्ही चिंता करू नका. कारण या लेखात, आम्ही तुम्हाला ८ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅनबद्दल तुम्हाला माहिती असावी अशी प्रत्येक गोष्ट दिलेली आहे.

तुम्ही ८ आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅन का करावे?

आठव्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड करणे आवश्यक नाही. तथापि, तुमचे स्त्रीरोगतज्ज्ञ तुमच्या गर्भाचे आरोग्य तपासण्यासाठी स्कॅन सुचवू शकतात. हे अल्ट्रासाऊंड स्कॅन खालील कारणांसाठी केले जाऊ शकते:

आठव्या आठवड्याच्या स्कॅनची तयारी कशी करावी?

पोटाचे स्कॅन किंवा ट्रान्सव्हॅजिनल स्कॅन ८ व्या आठवड्यात केले जाऊ शकते. दोन्ही स्कॅनच्या आवश्यकता थोड्या वेगळ्या आहेत.

पोटाच्या स्कॅनसाठी मूत्राशय संपूर्ण भरलेले असणे आवश्यक आहे. तुम्ही गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये असल्याने तुमचे बाळ खूप लहान असेल. म्हणून, गर्भाशयाला वर ढकलण्यासाठी संपूर्ण मूत्राशय भरलेले असणे आवश्यक आहे. मूत्राशय भरलेले असल्यास त्यामुळे आपल्या बाळाची चांगली प्रतिमा मिळविण्यात मदत होते. सैल आणि आरामदायी कपडे घाला कारण तुम्हाला तुमचे पोट स्कॅनसाठी उघडे ठेवावे लागेल. या प्रकारच्या स्कॅनमध्ये, एक जेल पोटावर लावून त्यावर हाताने स्कॅनर चालवले जाते. जेलमुळे अल्ट्रासाऊंड लाटा गर्भाशयात जाण्यास मदत होते. मग लाटा परत उसळतात, ह्या वेव्जमुळे गर्भाची झलक पाहायला मिळते.

दुसरीकडे, ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड स्कॅनसाठी, मूत्राशय रिकामे असणे आवश्यक असते. मूत्राशय भरलेले असल्यास प्रतिमा नीट दिसत नाहीत. ह्या प्रकारच्या स्कॅनमध्ये, योनीच्या आत एक प्रोब घातला जातो. स्पष्ट चित्रे मिळविण्यासाठी तो गर्भाशय ग्रीवावर दाबला जातो . काही वेळा, तुम्हाला थोडासा दबाव जाणवू शकतो

अल्ट्रासाऊंड स्कॅनला किती वेळ लागतो?

साधारणपणे, अल्ट्रासाऊंड स्कॅनला सुमारे २० ते ३० मिनिटे लागतात. तथापि, जर गर्भ विचित्र स्थितीत असेल तर यास जास्त वेळ लागू शकतो. काहीवेळा, दाट ऊतकांमुळे बाळाच्या स्पष्ट प्रतिमा मिळवणे कठीण आणि वेळखाऊ बनू शकते.

तुमच्या डॉक्टरांना अल्ट्रासाऊंड स्कॅन मधून काय समजते?

८ आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये तुम्हाला काय दिसेल असा तुम्ही विचार करीत असल्यास आमच्याकडे त्याचे उत्तर आहे! ह्या स्कॅनद्वारे तुमचे डॉक्टर काय ठरवू शकतात ते येथे दिलेले आहे:

आठव्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंडमध्ये तुम्हाला काय दिसू शकते?

८ आठवड्यात गर्भ कसा दिसतो

८ आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅन मध्ये हृदयाचा ठोका ऐकू न आल्यास गर्भपात झालेला असू शकतो का?

काही वेळा, तुम्ही ८ व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड स्कॅन मध्ये हृदयाचे ठोके पाहू किंवा ऐकू शकत नाही. तथापि, त्यामुळे गर्भपात झालेला आहे ह्यास पुष्टी मिळत नाही. तुमचे स्त्रीरोगतज्ञ गर्भपात टाळण्यासाठी आगामी आठवड्यात फॉलो-अप स्कॅन सुचवू शकतात.

गर्भपाताची इतर लक्षणे देखील असतात, त्यामुळे हृदयाचे ठोके जरी ऐकू येत नसले तरीसुद्धा तुम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचू नये.

अल्ट्रासाऊंड स्कॅन हे तुमच्या वाढत्या बाळाचे छायाचित्र घेत असलेल्या कॅमेऱ्यासारखे आहे. परंतु, प्रत्येक बाळ वेगळे आहे हे लक्षात ठेवणे जरुरीचे असते आणि त्यामुळे प्रत्येक बाळाचे अल्ट्रासाऊंड स्कॅनचे अहवाल वेगवेगळे असतात. शंका असल्यास, घाबरू नका, आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मागील आठवडा: गरोदरपणाच्या ७ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन पुढील आठवडा: गरोदरपणाच्या ९ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved