गर्भधारणेचे आठवडे

गरोदरपणाच्या ६ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

जेव्हा एखादी स्त्री गर्भवती होते तेव्हा आयुष्य खूप बदलते. किंबहुना हे सगळ्याच गरोदर स्त्रियांच्या बाबतीत खरे आहे. तणावाचे प्रमुख कारण म्हणजे गरोदरपणातील पहिल्या काही आठवड्यांमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्यात बहुतांशी वेळ जातो. परंतु यास सामोरे जाण्यासाठी उपाय आहेत. तांत्रिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे गर्भाच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे तसेच बाळंतपणापर्यंतचा अंदाज घेणे शक्य होते आहे. अल्ट्रासाऊंड हा अशाच तंत्रज्ञानाचा एक भाग आहे ज्याचा उपयोग स्त्रीरोगतज्ज्ञ, गर्भवती स्त्रियांची चिंता कमी करण्यासाठी आणि त्यांच्या गर्भारपणाच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करतात. या लेखात, आम्ही गरोदरपणाच्या ६व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन बद्दल बोलणार आहोत. अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख अवश्य वाचा.

गरोदरपणाच्या ६व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन का आवश्यक आहे?

गर्भधारणेच्या ६व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅन का आवश्यक आहे याची काही कारणे आहेत:

सहा आठवड्यांच्या गर्भधारणा स्कॅनसाठी आवश्यक तयारी

अल्ट्रासाऊंड स्कॅनसाठी कोणत्याही विशिष्ट तयारीची आवश्यकता नसते. तथापि, तंत्रज्ञ तुम्हाला अगोदरच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतील. टेक्निशियनला तुमच्या बाळाची स्पष्ट प्रतिमा मिळवण्यासाठी तुमचे मूत्राशय भरलेले असणे आवश्यक आहे. आपले प्रजनन अवयव देखील स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. तुमच्या स्कॅनच्या एक तास आधी चार किंवा पाच ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून मूत्राशय योग्य वेळी संपूर्ण भरलेले असेल. स्कॅन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही लघवी करू शकता.

सहा आठवड्यांच्या अल्ट्रासाऊंडला किती वेळ लागतो?

स्कॅनिंग प्रक्रियेस जास्त वेळ लागत नाही. संपूर्ण प्रक्रिया सहसा काही मिनिटांत संपते. क्वचितच अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

स्कॅन कसे केले जाते?

आधी नमूद केल्याप्रमाणे, अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्याचे दोन मार्ग आहेत. एक ट्रान्सबॉडोमिनल स्कॅन आहे आणि दुसरा ट्रान्सव्हॅजिनल स्कॅन आहे. दोन्ही स्कॅनसाठी, आईला बेडवर तिच्या पाठीवर झोपवले जाते. ट्रान्सबॉडोमिनल स्कॅन दरम्यान, तिच्या पोटाला जेल लावला जातो आणि स्कॅनिंग प्रोब तिच्या पोटाच्या वर घट्ट दाबला जातो. ट्रान्सव्हॅजिनल स्कॅन दरम्यान, योनीमध्ये एक पातळ स्कॅनिंग प्रोब घातला जातो. दोन्ही पद्धतींमध्ये, प्रतिमा संगणकाच्या स्क्रीनवर अभ्यासल्या जातात.

सहसा, ट्रान्सबॉडोमिनल स्कॅन दरम्यान मिळवलेल्या प्रतिमाच्या अनुषंगाने टेक्निशियन ट्रान्सव्हाजाइनल अल्ट्रासाऊंड स्कॅनची आवश्यकता आहे की नाही हे ठरवतात. कारण ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड स्कॅन अधिक स्पष्ट प्रतिमा प्रदान करतात. दोन्ही अल्ट्रासाऊंड स्कॅनसाठी वापरलेले प्रोब अल्ट्रासोनिक ध्वनी लाटा उत्सर्जित करतात, त्या गर्भाच्या आत बाळाची प्रतिमा टिपण्यास मदत करतात. ह्या प्रतिमांच्या आधारे डॉक्टरांना गर्भारपणाची माहिती मिळते.

अल्ट्रासाऊंड स्कॅनद्वारे काय मूल्यांकन केले जाते?

६ व्या आठवड्यात केलेल्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये नेमके काय अपेक्षित आहे असा प्रश्न अनेक गर्भवती स्त्रियांना पडतो. स्कॅनिंग प्रक्रियेचा वापर करून गरोदरपणाचे आणि गर्भातील बाळाच्या वेगवेगळ्या गोष्टींविषयी माहिती मिळते. त्यापैकी काही गोष्टी खालीलप्रमाणे -

६ व्या आठवड्यात केलेला अल्ट्रासाऊंडमध्ये भ्रूण दिसत नाही का?

काही वेळा, अल्ट्रासाऊंड स्कॅन मध्ये गर्भ आणि त्याचे कोणतेही अवयव दिसत नाहीत.हृदयाचे ठोके ऐकू न येणे म्हणजे विशेष काहीही नाही, कारण नंतरच्या स्कॅन मध्ये गर्भाच्या हृदयाचे ठोके निश्चित ऐकू येतात. तुम्ही कदाचित गर्भधारणेच्या वेळेबद्दल विचार करून गर्भ विकसित होण्यास खूप काळ लागत आहे असे तुम्हाला वाटू शकते. परंतु गर्भ विकसित चिन्हे तुम्हाला वाटतात त्यापेक्षा उशिरा दिसू लागतात.

६व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंड मध्ये हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत तर गर्भपाताची शक्यता असते का?

अल्ट्रासाऊंड स्कॅन केल्यानंतर गर्भपात झालेला आहे किंवा नाही हे जरी समजत असले तरीसुद्धा बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू न येणे हे गर्भपाताचे लक्षण नाही. हृदयाचे ठोके अगदी ठळकपणे जरी ऐकू येत नसले तरीसुद्धा एक - दोन आठवड्यांनंतर ते नीट ऐकू येऊ शकतात.

स्कॅनमध्ये इतर काही विकृती आढळल्यास काय?

गरोदरपणाच्या ६ व्या आठवड्यातील स्कॅन मुळे स्त्रीरोगतज्ञांना गरोदरपणातील प्रगती आणि गर्भाच्या वाढीत काही विकृती तर नाही ना ह्याची कल्पना येते . काही समस्या असल्यास डॉक्टर तिचे निराकरण करतात आणि बाळासाठी सर्वोत्तम असे सर्वकाही करण्यात मदत करतात .

६ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन कोणत्याही गर्भवती महिलेसाठी आवश्यक आहे, केवळ मुलाच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठीच नव्हे तर आईच्या आरोग्यासाठी देखील हे आवश्यक आहे. हा स्कॅन करून घेतल्यावर चिंता कमी होते तसेच काही असामान्यता आढळल्यास आवश्यक आणि त्वरित कृती करण्यास मदत होते.

मागील आठवडा: गरोदरपणाच्या ५ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन पुढील आठवडा: गरोदरपणाच्या ७ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved