अकाली जन्मलेली बाळे

गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यात जन्मलेले बाळ

गरोदरपणाच्या ३३ आणि ३४ व्या आठवड्यांच्या दरम्यान किंवा गरोदरपणाचे ३७ आठवडे पूर्ण होण्याआधी जन्मलेल्या बाळाला मुदतपूर्व बाळ म्हणतात. मुदतपूर्व किंवा अकाली जन्मलेले बाळ पूर्णपणे विकसित होत नाही आणि त्याला वैद्यकीय काळजीची आवश्यकता असते. एनआयसीयूमध्ये अथवा घरी, दोन्हीकडे त्याच्या तब्येतीत गुंतागुंत होऊ शकते. म्हणून, बाळ सुरक्षित आणि निरोगी राहते आहे ह्याची खात्री करण्यासाठी अतिरिक्त खबरदारी आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे. या लेखात, आपण गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यांत होणाऱ्या प्रसूतीची कारणे आणि मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळाची काळजी कशी घ्यावी याबद्दल चर्चा करू.

३३ व्या आठवड्यात बाळाचा जन्म कशामुळे होतो?

खालील कारणांमुळे बाळाचा जन्म लवकर किंवा गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यांत होऊ शकतो.

गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यांत जन्मलेल्या बाळाला सामोरे जावे लागते अशा समस्या

गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यात किंवा गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यापूर्वी जन्मलेल्या बाळाला अनेक आरोग्यविषयक समस्या असतात. काही जोखमींचा समावेश होतो:

. शरीरातील उष्णता राखण्यास असमर्थता

गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यात जन्मलेल्या बाळाचे वजन १.५ ते ३ किलोग्रॅम दरम्यान असावे. परंतु, जर बाळाचे वजन २-.५ किलोग्रॅमपेक्षा कमी असेल, तर बाळाचे योग्य प्रमाणात वजन वाढेपर्यंत बाळाला जिवंत ठेवण्यासाठी डॉक्टरांना व्यापक उपाय करावे लागतील. वजन वाढणे म्हणजे बाळाच्या शरीरात चरबी तयार झाल्याचे चिन्ह आहे. ही चरबी बाळाच्या शरीराचे तापमान सुरक्षित राखण्यासाठी आवश्यक आहे. रेडिएटिंग वॉर्मर्स, इनक्यूबेटर, इलेक्ट्रिक बेड या सर्वांचा वापर बाळाला उबदार राखण्यासाठी केला जातो . एकदा बाळाचे वजन पुरेसे वाढले की ते काढले जाऊ शकतात.

. वजन वाढण्याची समस्या

बाळाचे शक्य तितक्या लवकर वजन वाढण्यासाठी, आई करू शकते ती गोष्ट म्हणजे बाळाला स्तनपान देणे. तथापि, गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यापूर्वी जन्मलेली बाळे आवश्यकतेनुसार प्रभावीपणे स्तन घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळे तोंडाने दूध पिण्याची शक्यता नाकारली जाते. शिवाय, बाळाला दूध पिता येत नसल्यामुळे त्याचा पचन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो आणि परिणामी अपचन होऊ शकते. त्यामुळे पुढील गुंतागुंत होऊ शकते. अशा परिस्थितीत, बाळाला आवश्यक असलेली सर्व पोषक तत्वे मिळण्यासाठी फीडिंग ट्यूब हा एकमेव मार्ग आहे. ही नळी थेट बाळाच्या पोटात जाते किंवा अगदी इंट्राव्हीनस सुद्धा असू शकते.

. विकासात्मक समस्या

बाळाच्या विकासाचा एक मोठा भाग गर्भाच्या आत घडतो ज्यामुळे त्याला प्रसूतीनंतरचे जग समजण्यास मदत होते. गरोदरपणाच्या ३५ व्या आठवड्यापर्यंत, बाळाचा मेंदू त्याच्या अंतिम वजनाच्या फक्त ६६% इतका असतो. ३३ व्या आठवड्यात अकाली प्रसूती झाल्यामुळे, मेंदू पूर्णपणे विकसित होत नाही, त्यामुळे जीवनात वर्तणुकीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

. संसर्ग

मेंदूप्रमाणेच, रोगप्रतिकारक प्रणाली देखील विकसित होण्यास आणि चांगले कार्य करण्यास वेळ घेते. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात बाळाची प्रतिपिंडे वाढतात त्यामुळे त्याला जिवाणूंच्या संसर्गाचा सामना करता येतो. बाळाला जिवंत ठेवण्यासाठी अकाली प्रसूतीनंतर सतत प्रक्रिया केल्यास संसर्ग आणि पुढील गुंतागुंत होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

. न्यूमोनिया

अकाली जन्मलेल्या बाळाला श्वसनाच्या समस्या असू शकतात त्यामुळे न्यूमोनिया होऊ शकतो. न्यूमोनिया मध्ये फुप्फुसाचा संसर्ग होतो, त्यामुळे हवा आत घेऊन सोडण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. जर बाळाला न्यूमोनिया झाला तर बाळाला ऑक्सिजन अपुरा पडतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. शिवाय, जर या अवस्थेवर उपचार केले गेले नाहीत तर पुढील गुंतागुंत वाढू शकते.

३३ व्या आठवड्यात अकाली जन्मलेल्या बाळाची काळजी कशी घ्यावी?

अकाली जन्मलेल्या बाळांना निरोगी बाळांच्या तुलनेत थोडी अतिरिक्त काळजी आवश्यक असल्याने, त्यांच्या काळजीसाठी काही विशिष्ट प्रोटोकॉल आहे आणि त्याची शिफारस केली जाते.

रुग्णालयात

घरी

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

. ३३ व्या आठवड्यात जन्मलेल्या बालकांचा जगण्याचा दर किती आहे?

गरोदरपणाच्या ३३व्या आठवड्यात जन्मलेल्या बालकांचा जगण्याचा दर ९८ टक्के इतका आहे. त्यामुळे गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यांत जर तुमच्या बाळाचा जन्म झालेला असेल तर तुम्ही आशावादी रहा. योग्य काळजी घेतल्यास, बाळाची व्यवस्थित वाढ होऊ लागते.

. ३३ व्या आठवड्यात जन्मलेल्या बाळाला किती काळ एनआयसीयू मध्ये राहावे लागते?

३३ व्या आठवड्यांत जन्मलेले बाळ बरे असल्याची खात्री डॉक्टरांना होत नाही तोपर्यंत बाळाला एनआयसीयू मध्येच राहावे लागेल. बाळाचा एनआयसीयु मधील कालावधी त्याच्या आरोग्यस्थितीवर (म्हणजे, तो किती चांगला विकसित होत आहे) त्यावर ठरवला जाईल. बहुतेक बाळांचा, एनआयसीयू मधील मुक्काम कमी कालावधीसाठी असतो. श्वासोच्छवासाच्या समस्या सहसा लवकर सुटतात परंतु त्यांना आहार देण्यास थोडा वेळ लागतो. चोखणे आणि गिळण्याच्या प्रतिक्षिप्त क्रियांना थोडी ताकद लागते. जोपर्यंत बाळ चोखण्यास आणि गिळण्यास सक्षम होत नाही तोपर्यंत बाळाला एनआयसीयू मध्ये ठेवावे लागेल. बाळ स्वतःचे स्वतः जगण्यासाठी जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत बाळाला एनआयसीयू मधून डिस्चार्ज दिला जाणार नाही.

जरी बाळाचा जन्म अकाली म्हणजेच गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यांपूर्वी झालेला असेल, तरीही बाळ चांगले जीवन जगण्याची शक्यता खूप जास्त असते. बाळ बरे होत असताना तुम्ही शांत राहिल्यास आणि योग्य ती खबरदारी घेल्यास पुढे जाऊन कुठलीही समस्या निर्माण होणार नाही व तुमचा आणि तुमच्या बाळाचा पुढील प्रवास सुखकर होईल.

मागील आठवडा: गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यात जन्मलेले बाळ

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved