गर्भारपण

गर्भधारणेदरम्यान योनिमार्गातून रक्तस्त्राव किंवा हलके डाग

योनीमार्गातून होणाऱ्या रक्तस्रावाचे किंवा हलक्या रक्तस्रावाचे कारण माहिती नसते तेव्हा चिंता वाटते. जर तुम्ही गर्भवती असताना हलके डाग दिसले तर ते गंभीर समस्येचे कारण असू शकते. तथापि, ह्यास सामोरे जाण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे ह्या रक्तस्रावाची कारणे, परिणाम आणि गर्भावस्थेदरम्यान होणाऱ्या रक्तस्रावावर उपचारांची माहिती करून घेणे हा होय.

योनीमार्गातून रक्तस्त्राव होणे किंवा हलके डाग पडणे सामान्य आहे काय?

गर्भधारणेदरम्यान हलके डाग किंवा थोडा रक्तस्त्राव होणे हे सामान्य आहे. गर्भधारणेच्या पहिल्या टप्प्यावर ते दिसून येते. (पहिली तिमाही). साधारणपणे २०% महिलांना हलके डाग किंवा रक्तस्रावाचा अनुभव येतो. जरी हलके डाग किंवा योनीमार्गातून होणारा रक्तस्त्राव नॉर्मल असले तरी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधणे जरुरी आहे. काही चाचण्या आणि अल्ट्रासाऊंड करून घेणे जरुरी आहे. त्यामुळे बाळ सुरक्षित असल्याची खात्री होईल तसेच काही गुंतागुंत नाही हे सुद्धा स्पष्ट होईल.

हलके डाग आणि योनीमार्गातील रक्तस्त्राव ह्यामधील फरक

गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव आणि हलके डाग यातील फरक हा रक्तस्रावाचा रंग आणि प्रमाण ह्यावर अवलंबून असतो. जर स्त्रावाचा मासिक पाळी थांबताना जसा तपकिरी असतो तसा असेल तर त्यास हलके डाग म्हणतात आणि जर हा रंग तांबडा असेल तर त्यास रक्तस्त्राव म्हणतात. रक्ताचे प्रमाण सुद्धा दोन्हींमधील फरक दर्शवते. जर प्रमाण जास्त असेल तर सॅनिटरी पॅड संपूर्ण भिजून जाते आणि हलक्या डागांनी तसे होत नाही.

हलक्या डागांची कारणे काय आहेत?

हलके डाग पडण्यामागे काही कारणे आहेत

१. १ ल्या तिमाहीमध्ये

रोपण रक्तस्त्राव - गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात असा रक्तस्त्राव होतो. गर्भाशयाच्या भित्तिकांमध्ये जेव्हा भ्रूणाचे रोपण होते तेव्हा हलके डाग पडतात. साधारणपणे हे पाळीच्या आधी ( किंवा त्याच्या आसपास) होते किंवा गर्भधारणा झाल्यानंतर साधारणपणे ६-१२ दिवसांनी हलके डाग आढळतात. हलक्या डागांचा रंग मासिक पाळीच्या स्त्रावापेक्षा फिकट असतो (फिकट गुलाबी ते तपकिरी रंग) आणि तो काही दिवसांसाठी तसाच राहतो.

२. ३ ऱ्या तिमाहीमध्ये

तुमचा 'म्युकस प्लग' जर समजा निघाला तर तिसऱ्या तिमाहीमध्ये हलके डाग आढळतात.

योनीमार्गातील रक्तस्रावाची कारणे

गर्भधारणेदरम्यान खूप रक्तस्त्राव झाल्यास त्यामागे सौम्य कारण नसते कारण त्यासोबत इतर काही समस्या सुद्धा निर्माण होतात. गर्भधारणेदरम्यान रक्तस्रावाची काही कारणे इथे दिली आहेत.

१. पहिल्या तिमाहीमध्ये

जर भ्रूणाचे रोपण गर्भाशयाच्या बाहेर झाले तर त्यास इंग्रजीमध्ये एकटोपिक प्रेग्नन्सी असे म्हणतात. त्यामुळे पोटदुखीसोबतच खूप रक्तस्त्राव होतो. काही वेळा गुदद्वारावर दाब येतो, चक्कर येऊन बेशुद्ध सुद्धा पडण्याची शक्यता असते. मोलर गर्भधारणा (Molar Pregnancy): ही खूप दुर्मिळ अवस्था आहे. ह्यामध्ये नाळेमध्ये सिस्ट तयार होतात आणि त्यामुळे विकृत भ्रूणाची निर्मिती होते. ह्यामुळे रक्तस्त्राव होतो (लाल ते तपकिरी) आणि तुम्हाला मळमळ, उलट्या आणि पेटके ह्यांचा त्रास होतो. गर्भपात (२० आठवड्यांच्या आधी) हा भ्रूणाच्या गुणसूत्रांमधील दोषांमुळे होतो. संप्रेरकांमधील घटकांमुळे सुद्धा हे होऊ शकते. ह्यामध्ये योनीमार्गातून रक्तस्त्राव होतो आणि पाळीसारख्या गाठी सुद्धा ह्यामध्ये असतात. ह्या स्थितीमध्ये ओटीपोटामध्ये तीव्र पेटके येतात. इतर कारणे जरी तुमचा गर्भपात झाला तरी नंतर तुम्हाला निरोगी बाळ होणार नाही असे नाही. संशोधनामुळे तुमच्या ४०% गर्भधारणांचा अंत गर्भपातात होतो.

२. गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यावर

गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यावर रक्तस्रावाचे सर्वसामान्य कारण म्हणजे नाळेमध्ये दोष असणे. काही वेळा गर्भाशयाच्या मुखामध्ये काही समस्या असतील तरी असे होते.
गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या रक्तस्रावास कारणीभूत काही दुर्मिळ कारणे म्हणजे गर्भाशयाच्या मुखाला जखम होणे, कॅन्सर आणि व्हेरिकोज व्हेन्स होय.

योनीमार्गातून रक्तस्त्राव आणि हलके डाग पडत असतील तर तुम्ही काय केले पाहिजे?

गर्भधारणेदरम्यान रक्तस्त्राव होत असल्यास ५०% स्त्रियांची गर्भधारणा आरोग्यपूर्ण असते आणि त्यांना निरोगी बाळ होते. जर तुम्हाला हलके डाग किंवा योनीमार्गातून रक्तस्त्राव होत असेल तर लक्षणांची चर्चा करण्यासाठी तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे आणि काही गुंतागुंत तर नाही ना ह्या विषयी खात्री करून घेतली पाहिजे. गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यावर खूप रक्तस्त्राव होत असेल तर त्यामुळे बाळाला हानी पोहचू शकते

निदान

गर्भधारणेदरम्यान जर स्त्रीला योनीमार्गातून रक्तस्त्राव होत असेल तर स्त्रीची नीट आणि लगेच तपासणी केली पाहिजे. गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा झाल्यास जी स्थिती निर्माण होते त्यास इंग्रजी मध्ये 'haemorrhagic shock' असे म्हणतात आणि त्यामध्ये तुमच्या शरीरातील एकूण रक्ताच्या २०% रक्तस्त्राव होतो. त्यामुळे हृदयाला सर्व अवयवांना नीट रक्तपुरवठा करता येत नाही आणि त्यामुळे अवयव निकामी होण्याची शक्यता असते. तुमचे डॉक्टर खालील तपासण्या करू शकतात -

उपचार

गर्भधारणेच्या कालावधीवर योनीमार्गातील रक्तस्त्राव आणि हलके डाग ह्यावरील उपचार पद्धती अवलंबून असते

पहिल्या तिमाहीतील उपचारपद्धती

दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीतील उपचार पद्धती

गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यावर जर रक्तस्त्राव झाला तो किती होत आहे ह्यावर लक्ष ठेवले पाहिजे. तुमच्या बाळावर सुद्धा लक्ष ठेवा. उपचारपद्धती किती प्रमाणात रक्तस्त्राव होतो आहे, गर्भवती स्त्रीची स्थिती आणि बाळाचे वय ह्यावर अवलंबून असते. A) गर्भाशयाचे मुख नाळेमुळे झाकले जाणे ( Placenta Previa) ब) नाळ तुटणे
क) गर्भपिशवी फाटणे

प्रतिबंध

खाली काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही गर्भधारणेदरम्यानचा रक्तस्त्राव आणि हलके डाग ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी करू शकता

माझ्या बाळाला धोका पोहोचेल का?

हलके डाग किंवा थोडा रक्तस्त्राव झाल्यास त्याचा बाळाला काहीही धोका नसतो. त्यामुळे तुमचे बाळ सुरक्षित असण्याची शक्यता जास्त असते. रक्तस्रावाची समस्या आली तरी बऱ्याच गर्भधारणा पूर्ण होतात. जर हलके डाग किंवा रक्तस्रावाचा काही धोका नसतो तरी सुद्धा जेव्हा त्यासोबत पोटात दुखून रक्तस्त्राव वाढतो तेव्हा ते गर्भपाताचे लक्षण असते. हलके डाग किंवा रक्तस्त्राव आपोआप थांबतो. तथापि, जर रक्तस्त्राव झाला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved