गर्भारपण

प्रसूतीनंतर होणारी पाठदुखी

गरोदरपणात आणि त्यानंतर सुद्धा स्त्रीचे शरीर बरेच काही सहन करत असते. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा तिचे आयुष्य अगदी संपूर्णतः बदलते. तिची चालण्याची पद्धत, तिच्या खाण्याच्या सवयी, झोपण्याची पद्धत, शारीरिक स्थिती, इत्यादी पूर्णपणे बदलतात. पण निदान प्रसूतीनंतर तिचं आयुष्य पूर्वपदावर येईल या विचाराने ती समाधानी असते. पण तसे होऊ शकत नाही! गरोदरपणाच्या काही समस्या असतात त्यामुळे प्रसूतीनंतरही तिला त्रास होऊ शकतो. पाठदुखी ही अशीच एक समस्या आहे आणि प्रसूतीनंतर सुद्धा कायम राहू शकते. होय, गरोदरपणात पाठ दुखणे खूप सामान्य असते. परंतु प्रसूतीनंतर पाठदुखी कमी होत नाही. प्रसूतीनंतर, तुमची पाठ दुखत असेल आणि पाठीचे स्नायू कडक झालेले असतील, तर प्रसूतीनंतर सुद्धा तुम्हाला पाठदुखीचा त्रास होत राहील.

व्हिडिओ: प्रसूतीनंतर पाठदुखीचा सामना कसा कराल?

https://youtu.be/RX0kGwlnjXo

प्रसूतीनंतर होणारी पाठदुखी म्हणजे काय?

गरोदरपणासोबत येणार्‍या असंख्य बदलांमुळे पाठदुखीची समस्या आणखी वाढू शकते. परंतु, काही स्त्रियांना, पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना होतात. स्नायूंचा कडकपणा आणि वेदना प्रसूतीनंतर सुद्धा कमी होत नाहीत. प्रसूतीनंतरही त्यांना पाठदुखीचा अनुभव येऊ शकतो. प्रसूतीनंतर ही पाठदुखी त्यांच्या पुनर्प्राप्तीमध्ये अडथळा आणू शकते, त्यामुळे त्यांना हालचाल करणे किंवा जास्त वेळ बसणे देखील कठीण होते.

गरोदरपणानंतर होणाऱ्या पाठदुखीची कारणे काय आहेत?

प्रसूतीनंतरही काही महिलांना पाठदुखीचा त्रास तसाच राहतो. जर तुम्हाला नुकतेच बाळ झालेले असेल तर  तुम्हाला पाठदुखीचा अनुभव येत असेल. पाठदुखी कशामुळे होत आहे हे तुम्ही समजून घेणे आवश्यक आहे. प्रसूतीनंतर होणाऱ्या पाठदुखीची काही कारणे खाली नमूद केली आहेत.
  1. प्रसूतीनंतर पाठदुखीचे मुख्य कारण म्हणजे संप्रेरकांच्या पातळीत होणारा बदल होय. गरोदरपणात स्त्रीचे शरीर प्रोजेस्टेरॉन आणि रिलॅक्सिन ही संप्रेरके तयार करत असतात. प्रसूती सुलभ होण्यासाठी तिच्या पेल्विक हाडांच्या जवळील अस्थिबंधन आणि सांधे शिथिल होतात. परंतु ही संप्रेरके आईच्या शरीरात आणखी काही महिने तशीच राहतात आणि त्यामुळे पाठदुखी होऊ शकते.
  2. गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात अनेक शारीरिक बदल होत असल्याने गरोदर स्त्रीला दुसऱ्या तिमाहीपासून पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. आणि प्रसूतीनंतर काही महिने हा त्रास तसाच राहू शकतो.
  3. गरोदरपणात वजन वाढल्याने काहीवेळा पाठीचा खालचा भाग दुखू लागतो. गरोदरपणात, जेव्हा एखाद्या स्त्रीचे वजन वाढते, तेव्हा तिच्या गुडघ्यांवर आणि स्नायूंवर जास्त भार पडतो.  त्यामुळे पाठीच्या खालच्या स्नायूंना चालना मिळते. ही वेदना प्रसूतीनंतरही टिकू शकते.
  4. पाठदुखीचे आणखी एक कारण म्हणजे गरोदरपणात गर्भाशयाचा विस्तार होतो. जसजसे गर्भाशय वाढते, तसतसे गर्भवती स्त्रीच्या ओटीपोटाच्या स्नायूंवर आणि पाठीच्या खालच्या भागावर अतिरिक्त ताण येतो आणि त्यामुळे पाठदुखी होते. प्रसूतीनंतरही ही वेदना कमी होण्यास थोडा वेळ लागू शकतो.
  5. जर एखाद्या स्त्रीची सामान्य प्रसूती झाली असेल, तर बाळाला बाहेर ढकलताना, तिच्या सामान्य जीवनात स्तब्ध झालेले अनेक स्नायू काम करतात आणि तणाव निर्माण करतात. यामुळे गरोदरपणात  आणि नंतरही पाठदुखी होऊ शकते.
  6. प्रसूतीनंतर रात्री झोप न येणे आणि बाळाला घेण्यासाठी वारंवार खाली वाकणे यामुळे वेदनांमध्ये भर पडते आणि पाठदुखी जास्त काळ टिकून राहू शकते.
  7. बाळाला स्तनपान करताना चुकीच्या आसनामुळे पाठीच्या खालच्या स्नायूंवर ताण येतो आणि पाठदुखी होऊ शकते.
  8. जर एखादी स्त्री गरोदरपणात किंवा नंतर शारीरिकदृष्ट्या कठोर काम करत असेल तर त्यामुळे देखील पाठदुखी देखील होऊ शकते.

प्रसूतीनंतर पाठदुखी किती काळ टिकते?

प्रसूतीनंतर बहुतेक शारीरिक कार्ये पूर्वपदावर येतात. जर तुम्हाला नुकतेच बाळ झाले असेल आणि गरोदर असताना पाठदुखीचा अनुभव आला असेल, तर पाठदुखी लगेच थांबणार नाही. खरं तर, प्रसूतीनंतर पाठदुखी तशीच राहते आणि तुमचे शरीर सामान्य स्थितीत येण्यासाठी आणि तुमच्या शरीरातील संप्रेरके कमी होण्यासाठी जवळपास सहा महिने लागू शकतात.  आता तुमची पाठदुखी कमी झालेली असेल. तसेच तुमचे शरीर आणि स्नायू पूर्ववत झालेले असतील, तुमचे सांधे आणि अस्थिबंधन पुन्हा सामान्य झालेले असतील  आणि त्यामुळे पाठदुखी दूर होऊ शकते. परंतु, तुम्ही गरोदरपणानंतर कठोर शारीरिक काम केल्यास, पाठदुखी जवळजवळ एक वर्ष टिकू शकते. लठ्ठपणा किंवा जास्त वजनामुळे देखील बारमाही पाठदुखीचा धोका वाढू शकतो

बाळाच्या जन्मानंतर पाठदुखीपासून मुक्त कसे व्हावे?

गरोदरपणानंतर, आईला काळजी करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. जर तुम्हाला प्रसूतीनंतर पाठदुखीचा त्रास होत असेल, तर तुम्ही आणखी काळजी करू नका. पाठदुखीवर उपचार करण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करू शकता. 1. प्रसूतीनंतर पाठदुखीसाठी तुम्ही अनेक व्यायाम करू शकता. व्यायामामुळे ताणलेले स्नायू आणि अस्थिबंधनांवरचा ताण कमी होण्यास मदत होते. बाळंतपणानंतर, तुम्ही आरामशीर योगासने आणि स्ट्रेचिंग व्यायामाने सुरुवात करू शकता कारण त्यामुळे तुमची लवचिकता आणि सहनशक्ती सुधारेल. जर तुमची सी-सेक्शन प्रसूती झाली असेल, तर चालणे हा सर्वोत्तम व्यायाम असेल. दररोज २०-३० मिनिटे चालल्याने शरीराला आराम मिळतो. किंबहुना, व्यायामास सुरुवात करण्यासाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे. 2. प्रसूतीनंतर लगेच शारीरिक हालचाली करू नका. आणि शक्य तितकी विश्रांती घ्या, विशेषतः जर तुमची शस्त्रक्रिया झाली असेल तर विशेष काळजी घ्या. अनेक महिन्यांच्या तणावानंतर तुमच्या स्नायूंना आणि सांध्यांना विश्रांतीची गरज असते. 3. जड वजन उचलणे किंवा वजन प्रशिक्षण व्यायाम करणे टाळा कारण यामुळे तुमच्या स्नायूंवर आणि सांध्यांवर ताण येऊ शकतो. 4. शारीरिक स्थिती चांगली ठेवा. सरळ बसा आणि स्तनपान करताना तुमच्या बाळाकडे झुकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या लहान बाळाला स्तनपान देताना तुमची पाठ सरळ असावी. स्तनपान करताना तुम्ही त्याच्या शेजारी आरामात झोपू शकता. 5. जर तुम्हाला पाठीच्या खालच्या भागात दुखत असेल, तर खुर्चीवर बसताना पाय जमिनीपासून किंचित वर ठेवण्यासाठी आणि पाठीच्या खालच्या स्नायूंना आधार देण्यासाठी फूटरेस्ट वापरा. तसेच, पाठीला आधार देण्यासाठी तुमच्या खुर्चीवर मऊ उशी ठेवा.
6. तुमच्या बाळाला दीर्घकाळ मांडीवर ठेवल्याने तणाव वाढू शकतो, त्यामुळे प्रवास करताना तुमच्या बाळाला घेऊन जाण्यासाठी सपोर्ट असलेले फ्रंट पॅक वापरणे सुरू करा. 7. प्रसूतीनंतर काही महिने उंच टाचेच्या चपला घालणे टाळा. 8. आरामदायी स्थितीत झोपा. एक मऊ आणि पातळ उशी वापरा त्यामुळे तुम्हाला डोक्याला आधार देता येईल. तसेच, प्रसूतीनंतरही झोपताना तुमच्या पाठीला आधार देण्यासाठी तुम्ही गर्भधारणा उशी किंवा नेहमीच्या दोन उशा वापरा. 9. नियमित अंतराने अनुभवी मसाजरकडून आरामदायी तेलाने  मालिश करा. नियमित मालिश केल्याने तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण वाढण्यास मदत होईल आणि स्नायू दुखीपासून  आराम मिळेल. 10.पाठदुखीपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही गरम किंवा कोल्ड कॉम्प्रेस देखील वापरून पाहू शकता. पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या पाठीखाली गरम पाण्याची पिशवी किंवा थंड पाण्याची पिशवी ठेवू शकता. 11. आपण वेदना कमी करणारे मलम देखील वापरू शकता. मधून मधून एकदा ते पाठीवर लावा. त्यामुळे  तुम्हाला त्वरित आराम मिळेल.
12. प्रसूतीनंतर काही आठवडे किंवा महिने गरम पाण्याने आंघोळ करा. गरम पाण्याने आंघोळ केल्याने ताणलेले स्नायू आणि अस्थिबंधन शिथिल होतील आणि तुम्हाला आराम मिळेल. 13. जमिनीवरून काहीही उचलताना, कंबर नव्हे तर गुडघे वाकवा. कंबर वाकवू नका किंवा हात पसरवू नका कारण यामुळे तुमच्या पाठीवर ताण येऊ शकतो. 14. तुमच्या बाळाला पलंगावरून किंवा जमिनीवरून हाताने उचलताना, त्याच्या जवळ जा आणि नंतर उचला. बाळाला उचलण्यासाठी तुम्ही गुडघे टेकवू शकता. बाळाला दुरून उचलण्यासाठी आपले हात लांब करू नका. 15. प्रसूतीच्या उपचारानंतर पाठदुखीचा एक भाग म्हणून तुमच्या प्रशिक्षकाने सुचवल्यानुसार तुम्ही काही ओटीपोटाचे व्यायाम देखील करू शकता. 16. आपल्या शारीरिक गरजेनुसार पोषणतज्ञांचा सल्ला घ्या आणि पौष्टिक आहाराचे पालन करा. असे केल्याने तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होतील आणि त्यामुळे तुमच्या पाठीच्या स्नायूंवरील ताण कमी होईल. 17. बाळाला दूध पाजताना स्तनपानासाठीच्या उशा वापरा. विशेषत: नर्सिंगच्या सुरुवातीच्या टप्प्यात हे करा, कारण तुम्हाला स्तनपान करताना तुम्ही अवघडून जाल. तुम्ही तुमच्या लहान बाळाला स्तनपान देताना तुमच्या पाठीला आधार दिलेला आहे याची खात्री करा - कोणत्याही परिस्थितीत अवघडलेल्या स्थितीमध्ये बसू नका. वरील टिप्स वापरल्यानंतरही पाठदुखी कायम राहिल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तुमच्या शरीराची सविस्तर तपासणी करून योग्य औषधे आणि फिजिओथेरपी घ्या.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

तुम्ही तुमची शारीरिक स्थिती चांगली ठेवलेली असो वा नसो दिवसा तुम्हाला पाठदुखीचा पाठदुखीचा अनुभव येत नाही. त्याचप्रमाणे, जर तुम्ही शारीरिक हालचाली करत असाल तर तुम्हाला दिवसभरात अस्वस्थता जाणवणार नाही. पण रात्री, तुमचे सांधे सुजतात आणि त्यामुळे रात्री वेदना होऊ शकतात. प्रसूतीनंतरच्या काही महिन्यांनंतर पाठदुखी कमी होणे आवश्यक आहे, परंतु खालील प्रकरणांमध्ये तुम्हाला त्वरित औषधोपचाराची आवश्यकता आहे
  1. पाठदुखी सोबत ताप येत असल्यास
  2. जर तुम्हाला पाठदुखी तीव्र असेल आणि दिवसेंदिवस तीव्र होत असेल.
  3. दोन्ही पाय किंवा एका पायात सुन्नपणाची भावना.
  4. ट्रिपिंग किंवा पडल्यामुळे तुम्हाला पाठदुखीचा त्रास होत असल्यास.
  5. पाठदुखी सहा महिन्यांनंतरही तितक्याच तीव्रतेने सुरू राहिल्यास.
तुमची काळजी घेणे तुमच्यासाठी थोडे कठीण असू शकते. परंतु लक्षात ठेवा की तुमचे आरोग्य देखील महत्त्वाचे आहे. जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या मजबूत नसाल तर तुमच्या बाळाची काळजी घेणे कठीण होईल. म्हणूनच, इतर सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना तुम्ही तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. गरोदर राहणे आणि बाळाला जन्म देणे हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव आहे. आम्‍हाला माहीत आहे की तुमचे तुमच्‍या बाळावर प्रेम आहे आणि त्‍याच्‍या चांगल्या प्रकृतीसाठी तुम्‍ही शक्य ते सर्व करत आहात. पण आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. धीर धरा आणि एकाच वेळी अनेक कामे करून स्वतःला ताण देऊ नका. म्हणून, पालकत्वाचा आनंद घ्या आणि आपल्या शरीराला सामान्य स्थितीत येण्यासाठी थोडा वेळ द्या आणखी वाचा: प्रसूतीनंतर वजन कसे कमी कराल सिझेरियन प्रसूती नंतरची पाठदुखी: कारणे आणि उपचार
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved