ओवा (कॅरम सीड्स) हा एक भारतीय मसाल्याचा पदार्थ आहे. हा मसाला अनेक पाककृतींमध्ये वापरला जातो. ओवा घातल्यानंतर पदार्थांची चव वाढते. ओवा त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे . ओव्यामुळे पचनाच्या समस्या, पोटशूळ, तीव्र बद्धकोष्ठता तसेच लहान मुले आणि मोठ्या माणसांमधील सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. ओव्यांमध्ये थायमॉल नावाचा घटक असतो. हा घटक एक शक्तिशाली जंतूनाशक आणि बुरशीनाशक म्हणून कार्य करतो आणि रोगजनकांच्या विकासास प्रतिबंध करतो.
बाळांना ओव्याच्या प्रचंड औषधी गुणधर्मांचा फायदा होऊ शकतो. तुम्ही बाळांना ओवा देताना ओव्याचे पाणी करून किंवा चूर्ण स्वरूपात देऊ शकता. परंतु, संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी लहान बाळांसाठी ओवा वापरताना तो मध्यम प्रमाणात वापरण्याचा सल्ला दिला जातो
बाळाला ओवा द्यावा का हा प्रश्न नव्यानेच आई झालेल्या स्त्रियांना पडतो. ह्याचे उत्तर होय आहे, कारण ओव्याचे पाणी बाळांसाठी फायदेशीर आहे:
बाळ ८ महिन्यांचे झाल्यावर तुम्ही त्याला ओव्याची ओळख करून देऊ शकता. सुरुवातीला आपल्या बाळाला ओवा देताना त्याचे प्रमाण अगदी थोडे असणे आवश्यक असते. तसेच, एका वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांसाठी,अगदी साधे पाणी वापरावे आणि त्यात कोणतेही गोड पदार्थ घालणे टाळणे टाळावे. एकदा बाळाने घन पदार्थ खाण्यास सुरुवात केली की,ओव्याची पूड त्याच्या आहारात मर्यादित प्रमाणात घातली जाऊ शकते. हळुहळू तुम्ही पुरी आणि पराठ्यांमध्ये सुद्धा ओवा घालू शकता.
लहान बाळांसाठी भुसा विरहीत ओवा चांगला असतो. लहान बाळांसाठी ओव्याचे पाणी किंवा ओव्याची पावडर तयार करताना, तो स्वच्छ असल्याची खात्री करा. तसेच, रसायने नसलेल्या सेंद्रिय ओव्याचा वापर करण्याचे लक्षात ठेवा.
तुम्ही तुमच्या लहान बाळांसाठी ओव्याचे पाणी कसे तयार करता ते खाली दिलेले आहे -
एक वर्षांपेक्षा कमी वयाच्या बाळांसाठी, अर्धा चमचा ओव्याच्या पाण्याने सुरूवात करा. हळहळू तुम्ही हे प्रमाण १-२ चमचे इतके वाढवू शकता. परंतु बाळांना हे ओव्याचे पाणी आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळा देणे सुरक्षित आहे.
बाळाच्या सर्दी आणि खोकल्यासाठी काही उपयुक्त घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत:
आपण खालीलघटक वापरून काढा तयार करू शकता:
साहित्य
कृती
लहान मुलांमध्ये छातीतील कफ कमी होण्यासाठी आणि चोंदलेल्या नाकाचा सामना करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय असू शकतो. हे सोपे उपचार नवजात बाळांसाठी चांगले कार्य करतात
साहित्य
कृती
ओवा घातलेल्या तेलाने मसाज केल्यास लहान मुलांमधील सर्दी खोकल्याचा त्रास कमी होऊ शकतो. हे तेल कसे तयार करायचे हे खाली दिलेले आहे.
कृती
ओवा आणि गूळ (गुळ) पावडरचे मिश्रण कफ बाहेर काढण्यासाठी आणि खोकला कमी करण्यात मदत करू शकते. कफ आणि खोकल्यामुळे बाळाला रात्रीची झोप नीट लागत नाही.
साहित्य
कृती
लहान बाळे आणि मोठ्या माणसांसाठी ओव्याचे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत. ओव्याचे अनेक उपयोग असल्याने ओवा हा मसाल्याचा एक मौल्यवान पदार्थ आहे तसेच आरोग्याच्या अनेक समस्यांवर प्रभावीपणे उपचार करण्यासाठी ओव्याचा उपयोग होतो.
आणखी वाचा:
बाळांसाठी दालचिनी चांगली आहे का? बाळांसाठी हळद: फायदे आणि दुष्परिणाम