आरोग्य

नवजात बाळाच्या वजनातील वाढ – काय सामान्य आहे आणि काय नाही?

कोणत्याही जिवंत प्राण्याचे आरोग्य समजून घेण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे त्याची वाढ होय. जेव्हा आपली मुलं मोठी होतात, तेव्हा आपल्याला बरे वाटते. वजन वाढणे (उंचीसह) हे नवजात बाळाच्या वाढीचे प्रमुख सूचक असते. त्यामुळे, पालक ह्या नात्याने आपल्या बाळाच्या वजनाचे बारकाईने निरीक्षण करणे आणि त्याचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे.

व्हिडिओ: नवजात बाळाचे वजन वाढणे - काय सामान्य आहे आणि काय नाही?

https://youtu.be/HEYrWAepqzQ

नवजात बाळाचे वजन वाढणे महत्त्वाचे का आहे?

विकासाचे टप्पे वाढण्यासाठी बाळाचे वजन वाढणे महत्वाचे आहे. जागतिक स्तरावर, बालरोगतज्ञ आणि आरोग्य परिचारिका पहिले २४ तास बाळावर जवळून लक्ष ठेवतात. बाळांचे वजन कमी होणे किंवा वाढणे हे बाळाच्या आरोग्याचे स्पष्ट संकेत असतात. जन्मतःच बाळाचे वजन कमी असल्यास, बाळाला रुग्णालयात आणण्याचा सल्ला डॉक्टर देतात. बाळाचे वजन योग्य प्रमाणात वाढण्यासाठी बाळाला पुरेसे पोषण मिळत असल्याची खात्री करा.

नवजात बाळाच्या वजनात योगदान देणारे घटक

नवजात बाळाच्या वाढीदरम्यान त्याच्या वजनात योगदान देणारे काही घटक खालीलप्रमाणे आहेत -

  1. तुमच्या बाळाचे वजन बऱ्याच घटकांवर अवलंबून आहे. मूल ज्या वंशाशी संबंधित आहे त्या वंशातील मुले वजनाने जास्त किंवा कमी असतील त्यानुसार बाळाचे वजन ठरेल.
  2. बाळाच्या वजनात पालकांची जनुके महत्त्वाची भूमिका बजावतात.
  3. तुमचा आहार आणि गरोदरपणातील संवेदनशीलता ह्या घटकांचा देखील वजनावर परिणाम होतो. उदाहरणार्थ, तुमच्या एका तिमाहीतील अन्नाबाबतच्या तीव्र संवेदनशीलतेचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊ शकतो.
  4. लोकांच्या ज्या गोष्टींवर विश्वास असतो त्या विरुद्ध, संशोधन असे दर्शविते की लहान माता लहान मुलांना जन्म देतात तर ३० वर्षांहून मोठ्या स्त्रिया मोठ्या मुलांना जन्म देतात.
  5. बाळाच्या जन्माचा महिना जन्माच्या वजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. पूर्ण नऊ महिने गर्भाशयात असलेल्या बाळापेक्षा अकाली जन्मलेल्या बाळाचे वजन कमी असते.
  6. पहिल्या बाळाचे वजन नंतर झालेल्या इतर बाळांपेक्षा जास्त असते
  7. जुळे/तिळे किंवा त्यापेक्षा जास्त बाळे पोटात असतील तर त्यांना पोषण आपापसात वाटून घ्यावे लागते, त्यामुळे प्रत्येक बाळाचे जन्माचे वजन कमी होते.

नवजात बाळाचे सरासरी वजन किती असते?

नवजात बाळाचे सरासरी वजन २.५ किलो ते ३.५ किलोच्या दरम्यान असते. ह्यापेक्षा कमी किंवा जास्त वजन असामान्य असते आणि आरोग्य परिचारिका त्याचे बारकाईने निरीक्षण करतात.

जन्मानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये नवजात बाळाचे सामान्य वजन कमी होणे

बाळाच्या जन्मानंतर बाळाचे वजन कमी होणे स्वाभाविक आहे. बाळांच्या आयुष्याच्या पहिल्या काही दिवसात त्यांच्या जन्माच्या वजनाच्या १०% पर्यंत वजन कमी होणे हे डॉक्टर सामान्य मानतात. परंतु, दहा दिवस ते दोन आठवड्यांत वजन पूर्ववत होते. स्तनपान करणारी बाळे आणि अकाली जन्मलेल्या बाळांना त्यांच्या जन्माइतके वजन पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो.

जन्मानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये नवजात बाळाचे सामान्य वजन वाढणे

या बाळांचे बाळांचे वजन पुढील तीन महिन्यांत दररोज सरासरी वजन २५ ग्रॅम वाढते. हे वजन पुढील २ तिमाह्यांमध्ये कमी होईल. दुसऱ्या तिमाहीत २० ग्रॅम आणि तिसऱ्या तिमाहीत १५ ग्रॅम असे वजन वाढते. एका महिन्यात नवजात बाळाची सरासरी वाढ दर आठवड्याला १७५ ते २०० ग्रॅम असते. दर महिन्याला ही वाढ ७००- ८०० ग्रॅम (अंदाजे) असू शकते.

पुरेसे पोषण मिळाल्यास पाच किंवा सहा महिन्यांत बाळाचे वजन दुप्पट होऊ शकते. बाटलीतून दूध पिणाऱ्या बाळाला स्तनपान करणाऱ्या बाळापेक्षा कमी फायदा होऊ शकतो.

तुमच्या नवजात बाळाला पुरेसे दूध मिळत असल्याची चिन्हे

बाळाचे पोट भरते आहे की नाही ही पालकांसाठी चिंतेची बाब असते. बाळाचे दररोजचे वजन तपासण्यासाठी दवाखान्यात जाणे शक्य नाही किंवा बाळाचे वजन तपासण्यासाठी वजनाचे मशीन घरी आणणे आवश्यक नाही. बाळांचे पोषण योग्य रीतीने होते आहे कि नाही हे खालील चिन्हे सूचित करतात.

  1. बाळाला दूध पाजल्यानंतर बाळ रडत नाही
  2. चांगली झोप लागते
  3. स्तनपान केल्यानंतर तुमचे स्तन हलके होतात/ बाळ बाटलीतील सर्व दूध संपवते
  4. दिवसातून ८-१२ वेळा बाळाला स्तनपान करा किंवा बाटलीतून दूध द्या
  5. नियमितपणे मलविसर्जन
  6. मल पिवळ्या रंगाचे असणे
  7. लंगोट ओले होणे (दिवसातून ६-८ वेळा) चांगले संकेतक आहेत
  8. दर आठवड्याला वजन वाढणे

जर तुमच्या बाळाचे वजन पुरेसे वाढत नसेल किंवा वजन खूप कमी होत असेल तर तुम्ही काय करावे?

पालक कधी कधी अतिविचार करतात आणि जास्त काळजी करतात. बाळ विकासाचे टप्पे लवकर किंवा उशिरा गाठते का हे बाळाच्या वाढीचे खरे सूचक आहेत. बाळ विकासाचे टप्पे वेळेत गाठत असेल तर याचा अर्थ असा होतो की बाळाला विकासासाठी पुरेसे अन्न आणि पोषण मिळत आहे. परंतु, आयुष्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये बाळाचे जन्माचे वजन १०% पेक्षा जास्त कमी होऊ नये. पोटात असताना बाळामध्ये जास्त प्रमाणात द्रवपदार्थ असतात ते नंतर कमी होतात. कमी झालेले १० % वजन हे त्यामुळेच असते. आणि नवजात बाळे स्तनपान करण्यासाठी लॅचिंग शिकत असताना किंवा बाटलीने दूध पिण्यास शिकत असताना सुरुवातीच्या काळात वजन वाढत नाही. स्तन चोखताना समस्या येऊ शकतात किंवा जबडा समन्वयाच्या समस्या असू शकतात. मद्यपानसाठी ते पुरेसे नाही त्यामुळे वजन कमी होऊ शकते

तुमच्या बाळाचे अतिरिक्त वजन वाढणे किंवा वजन कमी होणे हे कसे व्यवस्थापित कराल?

तुमच्या बाळाचे वजन खूप कमी होत आहे किंवा खूप जास्त वजन वाढत आहे हे जर तुमच्या लक्षात आले तर तुम्ही ते व्यवस्थापित करण्यासाठी खालील गोष्टी तुम्ही करून पाहू शकता.

डॉक्टरांना कधी कॉल कराल?

खाली काही सामान्य चिन्हे आहेत . ही चिन्हे विकासामध्ये असमतोल दर्शवू शकतात:

यामुळे तुम्हाला काळजी वाटत असल्यास, कृपया तुमच्या आरोग्य तपासणी नर्सकडे जा आणि त्यांच्यासोबत बाळाच्या खाण्याच्या सवयी आणि झोपण्याच्या सवयींचे वेळापत्रक पुन्हा एकदा तपासून पहा. ही परिस्थिती तात्पुरती असू शकेल आणि बाळाचे वजन पुन्हा अगदी सहज पूर्ववत होईल.

परंतु, कधीकधी विशिष्ट चिन्हे जास्त धोका दर्शवतात. येत्या काही आठवड्यांमध्ये वजन कमी झाल्यास कावीळ (हायपरबिलिरुबिनेमिया) आणि रक्तातील साखर कमी होणे (हायपोग्लायसेमिया) यासारख्या आरोग्य समस्या उद्भवतील.

यापेक्षा जास्त वजन कमी झाल्यास किंवा तुम्हाला वजनात सरासरी वाढ दिसत नसल्यास, तुम्हाला खालील लक्षणे दिसतील:

  1. दिवसात कमी वेळा लंगोट ओले होणे
  2. कोरडे ओठ किंवा त्वचा
  3. सतत चिडचिड होणे
  4. सैल त्वचा
  5. टाळू खोल जाणे

जन्माचे वजन महत्त्वाचे असले तरी वजन वाढणे किंवा कमी होणे हे बाळाच्या विकासाचे सूचक आहे. बाळाच्या विकासाच्या टप्प्यांसाठी कमी जास्त वेळ लागू शकतो. कधी शंका असल्यास, तुमच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या. त्यामुळे तुम्हाला मदत होईल आणि सर्व काही ठीक असल्याची खात्री होईल.

बाळाच्या असामान्य वर्तन पद्धतींबद्दल काळजी करणे ही पालकांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. वजन कमी होणे हे त्यांच्यातील सर्वात वाईट स्वप्नांपैकी एक आहे. परंतु, कृपया शांत राहा आणि तुम्ही निष्कर्षावर येण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. जरी सर्व काही सामान्य वाटत असले, आणि ते परिपूर्ण संतुलनात असले तरीही डॉक्टरांच्या नियोजित भेटींपैकी कोणतीही भेट चुकवू नका. पालकत्वाच्या अनुभवाचा आनंद घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शांत राहणे, जास्त विचार न करणे आणि योग्य वेळी योग्य गोष्टींबद्दल माहिती देणे. शांत राहणे आणि पालकत्वाचा आनंद घेणे यापेक्षा दुसरे चांगले सूत्र नाही.

आणखी वाचा:

कमी वजनाची बाळे: कारणे, उपचार आणि काळजी बाळाचे वजन का वाढत नाही? – कारणे, लक्षणे आणि उपाय

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved