आरोग्य

नवजात बाळाच्या अंगावरील लव: कारणे आणि निदान

आता तुम्ही नऊ महिन्यांनंतर एका सुंदर बाळाची आई झाल्या आहात. जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच बाळाला आपल्या हातांमध्ये घेता, तेव्हा ती भावना जादुई आणि स्वप्नवत असते. आता बाळाचे फीचर्स, बाळाची मऊ त्वचा आणि केस देखील तुमच्या लक्षात येतील. काही माता आपल्या नवजात बाळाच्या त्वचेवरचे केस पाहून काळजी करू शकतात, परंतु काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण बाळाच्या शरीरावरचे हे केस लवकरच गळून पडतील. या नैसर्गिक स्थितीस इंग्रजीमध्ये 'लानुगो' असे म्हणतात. चला तर मग विषयामध्ये थोडे अधिक खोलवर डोकावू आणि ह्या केसांच्या उपस्थितीचा अर्थ काय ते जाणून घेऊ आणि नवजात बाळाच्या शरीरावरील केसांशी संबंधित इतर अनेक घटकांवर देखील चर्चा करू.

लानुगो किंवा नवजात बाळाच्या शरीरावरची लव म्हणजे नक्की काय आहे?

नवजात बाळाच्या शरीरावर आढळणारी लव 'लानुगो' म्हणून ओळखले जाते. ह्या शब्दाचे मूळ लॅटिन शब्द "लाना" आहे आणि त्याचा अर्थ लोकर असा आहे. या केसांचा पोत बारीक असतो आणि उघड्या डोळ्यांना तो स्पष्टपणे दिसतो. यापैकी बहुतेक केस बाळाची पाठ, कान, मान, चेहरा आणि खांद्यांवर दिसतात. काही बाळांच्या अंगावरील केस ह्या जगात येण्याआधीच झडतात तर काहींच्या अंगावर जन्माला आल्यावर सुद्धा ती लव असते.

नवजात बाळाच्या शरीरावर लव असणे सामान्य आहे का?

होय! बाळांच्या शरीरावर केस असणे सामान्य गोष्ट आहे. गर्भाशयात असताना शरीरावरील ही लव बाळांसाठी नैसर्गिक इन्सुलेशन म्हणून कार्य करते. बाळांच्या शरीरावरील ही लव काही काळानंतर नाहीशी होत असली तरी बाळाच्या आईला ह्या गोष्टीची खूप चिंता असते. तर, खात्री बाळगा की लानुगो सामान्य आहे आणि बर्‍याच वेळा, ही लव स्वतःहून काढण्याची आवश्यकता नाही. जेव्हा गर्भ १८ ते २० आठवड्यांच्या दरम्यान असते तेव्हा या शरीरावरील केसांचा विकास सुरू होतो. काही बाळे जन्माच्या आधीच अंगावरची ही लव टाकून देतात तर काही बाळांच्या बाबतीत त्यांच्या जन्मापासून ७ महिन्यांच्या आत ही लव नाहीशी होते. केसांचा हा बारीक, बुरसटलेला थर सावळया बाळाच्या अंगावर सुद्धा गडद दिसतो. कधीकधी, बाळाच्या शरीरावरील केस जात नाहीत. यामुळे खाली लेखात दिलेल्या समस्या उद्भवू शकतात. परंतु प्रथम, केस का वाढतात आणि त्यामुळे काय होते यावर एक नजर टाकूया.

नवजात अर्भकांच्या शरीरावरील लव किंवा त्याची भूमिका

बाळाच्या आईच्या गर्भात असताना बाळाच्या लानुगो किंवा शरीरावर असणारी लव ह्याची विशिष्ट भूमिका असते. ते बाळाला खालीलप्रकारे प्रकारे मदत करतेः आधी सांगितल्याप्रमाणे, लानुगो किंवा नवजात बाळाच्या शरीरावरील लव बहुतेक वेळा आपोआप नाहीशी होते. तथापि, विशिष्ट प्रकरणांमध्ये, ते होऊ शकत नाही आणि यामुळे काही समस्या उद्भवू शकतात. चला त्या शोधूया!

नवजात बाळाच्या शरीरावरील लव आणि त्या संबंधित समस्या

जर लानुगो वेळेत पूर्णपणे नाहीसे झाले नाही तर ते पालकांच्या चिंतेचे कारण बनते. आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि शरीरावर अगदी गडद दिसणाऱ्या केसांमागची इतर कारणे जसे की जन्मजात एड्रेनल हायपरप्लासिया (सीएएच), बुलिमिया आणि एनोरेक्झियासारखी पॅथॉलॉजिकल कारणे असू शकतात. एनोरेक्सिया आणि बुलीमिया कुपोषणामुळे उद्भवू शकतात, तर संप्रेरकांच्या कमतरतेमुळे सीएएच उद्भवते. या पॅथॉलॉजिकल आरोग्याच्या स्थितीबद्दल खाली चर्चा केली आहे:
जेव्हा लानुगो स्वतःचे स्वतः नष्ट होत नाही, तेव्हा पालकांना ते काढून टाकण्याचा मोह होऊ शकतो; तथापि, फक्त चोळण्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो आणि पुरळ उठू शकते. आपण लेखाचा पुढील भाग वाचू इच्छित असाल तर तिथे आपण त्यावरच्या उपचारांवर थोडीशी चर्चा केलेली आहे. केसांच्या वाढीवर आणि वैद्यकीय परिस्थितीची उपस्थिती/अनुपस्थितीनुसार परिणाम भिन्न असू शकतात हे लक्षात ठेवा.

लानुगो किंवा नवजात बाळाच्या शरीरावरील लव काढून टाकण्याचे उपाय

नवजात बाळाच्या त्वचेवर लव आणि त्यावर उपचार कसे करावे याबद्दल आपल्याला काळजी वाटत असल्यास आपण खालील उपाय करू शकता; तथापि, हे जाणून घ्या की परिणाम भिन्न असू शकतात. तुमच्या बाळाला ऍलर्जिक प्रतिक्रिया असल्यास तुम्ही उपाय थांबविले पाहिजेत. सहसा, काही आठवड्यांत बाळाच्या शरीरावरची लव नाहीशी होते. जर नाही झाली तर आपण दिलेले उपाय करून पहा. जर हे उपाय करून सुद्धा लव तशीच राहिल्यास बहुधा ते कॉन्जेनिटल ऍड्रिनल हायपरप्लासिया (सीएएच), एनोरेक्झिया किंवा बुलिमियासारख्या समस्यांमुळे होते. आणि म्हणूनच लव कमी होत नाही हे तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही काय करू शकता ते खाली दिले आहे.

बाळाच्या शरीरावरील लव गेली नाही तर काय करावे

आपल्या बाळाच्या शरीरावरील लव सहा महिन्यानंतर सुद्धा गेली नाही तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. केसांच्या रंगावर लक्ष ठेवा. ही लव नैसर्गिकरित्या जाणे हा पहिला पर्याय आहे; तथापि, जर तुमच्या बाळास जन्मजात एड्रेनल हायपरप्लासिया (सीएएच), बुलिमिया किंवा एनोरेक्सियाचा त्रास होत असेल तर त्याला लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घेणे जरुरीचे आहे. बाळाच्या शरीरावरील लव ही जरी फार मोठी समस्या नसली तरी मातांनी बाळाच्या बालरोगतज्ञांशी समस्येविषयी बोलावे, डॉक्टर त्या समस्येवर नक्कीच आवश्यक उपाय सांगून योग्य तो सल्ला देऊ शकतील. दिवसेंदिवस जर ही लव रंगाने गडद होत असेल तर त्वरित बालरोगतज्ञाचा सल्ला घ्या. तसेच, जर मूल काही वर्षांचे होईपर्यंत शरीरावरील लव तशीच राहिली तर ते खाण्याच्या विकारामुळे होऊ शकते आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. स्रोत अणि सन्दर्भ: आणखी वाचा: बाळांना होणारा सनबर्न बाळाच्या त्वचेवरील फोडांवर कसे उपचार करावेत?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved