दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

मुलांच्या (मुलगा) वाढीचा तक्ता – 0 ते 12 महिने

तुमच्या बाळाचा विकास नीट होतो आहे की नाही, हे बाळांसाठीच्या वाढीच्या तक्त्यावरून समजू शकते. मुलांचा आणि मुलींचा वाढीचा दर भिन्न असतो कारण सरासरी पाहता मुले मुलींपेक्षा किंचित मजबूत आणि उंच असतात. हा वाढीचा तक्ता तुम्हाला तुमच्या बाळाच्या वाढीचा अचूक मागोवा घेण्यास मदत करू शकतो.

मुलांच्या वाढीचा तक्ता

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या बाळाच्या वाढीचा तक्ता येथे दिलेला आहे. ह्या तक्त्यामधून  बाळाची उंची, वजन आणि डोक्याचा घेर इत्यादींचे 3 ते 97 व्या टक्केवारीच्या दरम्यान रिडींग मिळते. तुमच्या बाळाच्या वाढीचा मागोवा घेण्यासाठी, बाळाची मापे आलेखावर नोंदवा आणि त्यांची या तक्त्याशी तुलना करा.
वय (महिने) उंची (सेंमी) - 3 ते 97 पेर्सेन्टाइल वजन (किलो) - 3 ते 97 पेर्सेन्टाइल डोक्याचा घेर (सेंमी) - 3 ते 97 पेर्सेन्टाइल  
0 46.3 – 53.4 2.5 – 4.3 32.1 – 36.9
1 51.1 – 58.4 3.4 – 5.7 35.1 – 39.5
2 54.7 – 62.2 4.4 – 7.0 36.9 – 41.3
3 57.6 – 65.3 5.1 – 7.9 38.3 – 42.7
4 60.0 – 67.8 5.6 – 8.6 39.4 – 43.9
5 61.9 – 69.9 6.1 – 9.2 40.3 – 44.8
6 63.6 – 71.6 6.4 – 9.7 41.0 – 45.6
7 65.1 – 73.2 6.7 – 10.2 41.7 – 46.3
8 66.5 – 74.7 7.0 – 10.5 42.2 – 46.9
9 67.7 – 76.2 7.2 – 10.9 42.6 – 47.4
10 69.0 – 77.6 7.5 – 11.2 43.0 – 47.8
11 70.2- 78.9 7.4 – 11.5 43.4 – 48.2
12 71.3 – 80.2 7.8 – 11.8 43.6 – 48.5

इन्फोग्राफिक्स: 0 ते 12 महिन्यांच्या मुलांच्या वाढीचा तक्ता

वाढीचा तक्ता वाचण्यासाठीच्या टिप्स

उंची आणि वजनाचा तक्ता समजून घेणे सोपे आहे. तुम्ही महिन्यानुसार बाळाच्या वजनाचा तक्ता बघत असल्यास, डावीकडील उभ्या अक्षावर बाळाच्या वाढीचे महिने पाहायला मिळतील. क्षैतिज अक्षावर बाळाचे वजन चिन्हांकित आहे. उदाहरणार्थ, जर तुमचे बाळ 25 व्या पर्सेंटाइलमध्ये असेल, तर याचा अर्थ त्याच्या वयाच्या 24% मुलांचे वजन तुमच्या बाळापेक्षा कमी आणि 75% मुलांचे वजन तुमच्या बाळापेक्षा जास्त आहे. लहान मुलाची उंची आणि डोक्याचा घेर हे वजन तक्त्यासारखेच असतात. लक्षात ठेवा की उंची आणि वजनाची टक्केवारी नेहमी सारखी नसावी. उदाहरणार्थ, तुमच्या बाळाचे वजन 40 पर्सेंटाइल असू शकते, परंतु उंचीच्या 60 पर्सेंटाइलमध्ये असू शकते. बाळ मोठे झाल्यावर हे प्रमाण  बदलू शकते.

घरी आपल्या लहान मुलाचे मोजमाप कसे करावे?

आपण आपल्या बाळाचे मोजमाप घरी सहजपणे करू शकता . कसे ते येथे दिलेले आहे:

मुलांच्या वाढीचा तक्ता असणे महत्त्वाचे का असते?

वाढीचा तक्ता तुम्हाला आणि तुमच्या बाळाच्या बालरोगतज्ञांना बाळाची पोषण स्थिती, उंची आणि वजनाचे मूल्यांकन करण्यात मदत करतो. बाळाच्या आयुष्याच्या पहिल्या सहा वर्षांत योग्य विकास महत्त्वाचा असतो, त्यामुळे या तक्त्याच्या मदतीने तुमच्या मुलाच्या वाढीचा मागोवा घेणे महत्त्वाचे आहे.

तुमच्या बाळाच्या वाढीवर कोणते घटक परिणाम करतात?

तुमच्या बाळाची वाढ अनेक घटकांवर अवलंबून असते जसे की:

1. स्तनपान देणे

तुमच्या बाळाला आवश्यक असलेले सर्व पोषण आहारातून मिळते. बाळाची वाढ त्याच्या आहारावर लक्षणीयरीत्या अवलंबून असते. सहा महिन्यांपर्यंत, बाळ त्याच्या पोषणासाठी आईच्या दुधावर किंवा फॉर्म्युल्यावर अवलंबून असते . पुरेसे स्तनपान घेतल्यास बाळाची वाढ चांगली होते.

2. गरोदरपणात आईचे आरोग्य

तुमचा आहार, वजन आणि जीवनशैली इत्यादींचा बाळाची पोटात वाढ कशी होते ह्यावर मोठा प्रभाव असतो. याचा परिणाम तुमच्या बाळाच्या शरीरात साठलेल्या पोषक तत्वांवर होतो आणि त्यावर बाळाची पहिल्या वर्षीची वाढ अवलंबून.

3. बाळाचे जन्माच्या वेळचे वजन

बाळाचे जन्माच्या वेळचे वजन हे गरोदरपणात तुमच्या बाळाचे पोषण किती चांगले झाले याचे सूचक आहे.

4. जनुके

बाळाच्या विकासात जनुकांची मोठी भूमिका असते. ज्या बाळांचे पालक उंच आणि मजबूत बांध्याचे असतात अश्या बालकांची उंची आणि वजनाची टक्केवारी जास्त असते. आणि माध्यम शरीरयष्टी असलेल्या पालकांची मुले बारीक असतात.

5. किरकोळ आजार

फ्लू आणि कानाच्या संसर्गाचा तुमच्या बाळाच्या वाढीवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो. तो आजारी असताना नीट जेवू शकत नाही. पण तो बरा झाल्यावर त्याने सामान्य स्थितीत परत येतो.

6. गर्भारपणानंतर आईचे आरोग्य

तुम्ही आजारी असाल किंवा प्रसवोत्तर नैराश्यासारख्या परिस्थितीने ग्रस्त असाल, तर तुम्ही बाळाची नीट काळजी घेऊ शकत नाही त्याचा परिणाम बाळाच्या विकासावर होतो. परंतु, तुम्ही आजारातून बऱ्या झाल्यावर बाळाची वाढ आणि विकास नीट होऊ लागेल.

जन्माच्या वेळेच्या वजनाचा बाळाच्या वाढीवर परिणाम होतो का?

खरं तर नाही. बाळाच्या वाढीमध्ये आणि विकासामध्ये जन्मतःच वजन महत्त्वाची भूमिका बजावते. उलट, पालकांकडून आलेली जनुके बाळाची वाढ कशी होते हे ठरवतात. जन्मानंतर,  बाळाच्या वाढीचा दर अनुवंशिकतेवर अधिक अवलंबून असतो. बाळाच्या जीवनाच्या पहिल्या 18 महिन्यांमध्ये  कॅच-अप किंवा कॅच-डाउन ग्रोथ नावाची एक महत्त्वाची घटना घडते.  दोन-तृतीयांश मुलांमध्ये, मूल अनुवंशिकरीत्या अपेक्षित उंचीपर्यंत पोहोचेपर्यंत वाढीच्या दराची टक्केवारी रेषीयपणे बदलते. काही लहान मुले उंच आणि धडधाकट पुरुष बनतात तर काही बाळे मोठी झाल्यावर बारीक होतात.

तुम्ही डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

काही काही मुलांच्या वाढीचा वेग नंतरच्या टप्प्यावर लक्षणीयरीत्या वाढतो . लहान वयात वेगाने वाढणाऱ्या मुलांमध्ये अगदी ह्याच्या विरुद्ध होते.  तुमच्या बाळाची वाढ चांगली होते आहे कि नाही हे जाणून घेण्यासाठी,  त्याच्या उंचीची आणि वजनाची नियमितपणे नोंद करा आणि वाढीच्या तक्त्याशी तुलना करा. परंतु जर तुमच्या मुलाची वाढ नीट होत नसेल तर बालरोगतज्ञांचा सल्ला घेणे चांगले आहे. आणखी वाचा: बाळाच्या विकासाचा तक्ता – १ ते १२ महिने लहान मुलींच्या उंचीचा आणि वजन वाढीचा तक्ता – 0 ते 12 महिने
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved