Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) आरोग्य मुलांना उलट्या होत असल्यास त्यावर १३ परिणामकारक घरगुती उपाय

मुलांना उलट्या होत असल्यास त्यावर १३ परिणामकारक घरगुती उपाय

मुलांना उलट्या होत असल्यास त्यावर १३ परिणामकारक घरगुती उपाय

मुलांना उलट्या होणे ही नेहमीच एक गंभीर समस्या नसते. विषाणू, पचनाच्या समस्या किंवा अन्न विषबाधा झाल्यामुळे उलट्या होऊ शकतात. परंतु जर आपल्या मुलास वारंवार उलट्या होत असतील तर तुम्हाला काळजी वाटू शकते. तुम्ही तुमच्या मुलाला औषधे देण्याचा विचार कराल. परंतु बहुतेक मुले औषधे घेण्यास नकार देतात. तुमच्या लहान मुलाला औषधे घेण्यास आवडत नसतील तर तुम्ही उलट्यांवर घरगुती उपायांचा विचार करू शकता. पुढील लेखात,  मुलांना उलट्या होत असतील तर त्यावर काही घरगुती उपायांची आपण चर्चा करणार आहोत.

मुलांना उलट्या होत असतील तर त्यावर नैसर्गिक उपाय

मुलांना उलट्या होत असतील तर त्यावर परिणामकारक उपाय करण्यासाठी तुम्ही खालील काही घरगुती उपाय वापरू शकता.

१. द्रवपदार्थाचे सेवन वाढवा.

जर तुमच्या मुलास वारंवार उलट्या होत असतील तर तो डिहायड्रेटेड होऊ शकतो आणि त्यास थकवा जाणवू शकतो. तुम्ही त्याच्या शरीरातील कमी झालेल्या द्रवपदार्थांची भरपाई करण्यासाठी त्याचे द्रवपदार्थाचे सेवन वाढविणे महत्वाचे आहे. पाणी किंवा इतर द्रवपदार्थ बाळाला हळूहळू पाजा कारण जास्त प्रमाणात द्रवपदार्थ घेतल्यास बाळाला आणखी उलट्या होऊ शकतात. उलट्या थांबल्यानंतर बाळाला किमान १२ तास कुठलेही घनपदार्थ देऊ नका. तुम्ही त्याला हलके भाज्यांचे सूप देऊ शकता त्यामुळे त्यास बरे वाटेल.

जास्त प्रमाणात पाणी किंवा इतर कोणतेही द्रव पिण्यामुळे त्याला आणखी उलट्या होऊ शकतात. तसेच, उलट्या थांबल्यानंतर आपल्या मुलास किमान १२ तास कोणतेही ठोस आहार देण्याचे टाळा. त्याला बरे वाटण्यासाठी तुम्ही त्याला हलके भाज्यांचे सूप किंवा मटनाचा रस्सा देऊ शकता.

२. थोडासा आल्याचा रस आणि मध वापरून पहा

थोडासा आल्याचा रस आणि मध वापरून पहा

आले मळमळ आणि उलट्यांसाठी उपचाराचे चांगले कार्य करते. आल्याचा एक छोटा तुकडा किसून घ्या. किसलेल्या आल्याचा रस पिळून त्यात काही थेंब मध घाला. दिवसातून दोनदा किंवा तीनदा आपल्या मुलास ते द्या. आल्याचा रस आणि मध यांचे मिश्रण मळमळ दूर करतेच परंतु पचन प्रक्रियेस मदत करते.

३. पुदिन्याच्या रसाची मदत होते

ताजा पुदीना उलट्या आणि मळमळ यासाठी खूप प्रभावी आहे. पुदिन्याची काही ताजी पाने बारीक करून रस काढा. एका भांड्यात साधारण १ चमचा पुदिन्याचा रस घ्या आणि पुदीनाच्या रसामध्ये १ चमचा लिंबाचा रस घाला. या मिश्रणाची चव वाढविण्यासाठी आपण थोडेसे मध घालू शकता. तसेच, तुम्ही तुमच्या मुलास काही पुदिन्याची पाने नुसती चावण्यास देऊ शकता.

४. थोडासा दालचिनीचा चहा दिला तर?

थोडासा दालचिनीचा चहा दिला तर?

५. तुम्ही तांदळाची पेज सुद्धा देऊ शकता

गॅसट्रायटिस मुळे उद्भवणार्‍या उलट्या बऱ्या करण्यास तांदळाची पेज मदत करते. पेज बनवताना पांढरे तांदूळ हे तपकिरी तांदळापेक्षा चांगला पर्याय आहे. एक वाटी पांढरा तांदूळ घ्या आणि दोन कप पाण्यात उकळा. भात अर्धवट शिजल्यानंतर जास्तीचे पाणी किंवा स्टार्च गाळा. उलट्या थांबविण्यासाठी हे पाणी आपल्या मुलास पिण्यासाठी द्या.

६. वेलची

वेलची

मुलांच्या उलट्या होण्यावर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे वेलची दाणे. वेलचीच्या दाण्यांमुळे तुमच्या बाळाच्या पोटाला आराम मिळतो आणि त्यामुळे मळमळ आणि उलट्या कमी होण्यास देखील मदत होऊ शकते. अर्धा चमचा वेलची दाणे बारीक करून घ्या त्यामध्ये थोडी साखर घाला आणि उलट्या कमी होण्यासाठी हे मिश्रण आपल्या मुलाला द्या.

७. लवंगा दिल्यास मदत होते!

लवंगा पचनास मदत करतात आणि उलट्यापासून सुटका होते. जर आपले मूल थोडे मोठे असेल आणि लवंगा चावू शकत असेल तर त्याला त्या चावण्यास द्या. एक कप पाण्यात काही लवंगा उकळवून चहा देखील बनवू शकता. त्यामध्ये एक चमचा मध घालून आपल्या मुलास द्या.

८. बडीशेप वापरून पहा

बडीशेप वापरून पहा

बडीशेप पचनास मदत करते. बडीशेप मध्ये असलेल्या प्रतिजैविक गुणधर्मांमुळे मळमळ आणि उलट्या थांबण्यास मदत होते. एक चमचा बडीशेप सुमारे दहा मिनिटे पाण्यात उकळवा. गाळून ते आपल्या मुलास द्या. दिवसातून ३-४ वेळा देऊ शकता.

९. ऍपल सायडर व्हिनेगर देखील मदत करते!

ऍपल सायडर व्हिनेगरचे प्रतिजैविक गुणधर्म मळमळ आणि उलट्या टाळण्यासाठी खरोखर चांगले कार्य करतात. ऍपल सायडर व्हिनेगर पोट शांत करू शकते  आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास देखील मदत करू शकते. एक ग्लास पाण्यात एक चमचा ऍपल सायडर व्हिनेगर आणि मध मिसळा आणि आपल्या मुलाला दिवसभर द्या.

१०. कांद्याचा रस आणि आल्याचा रस यांचे मिश्रण करून पहा

कांद्याचा रस आणि आल्याचा रस यांचे मिश्रण करून पहा

कांदे हे नैसर्गिक प्रतिजैविकांचा समृद्ध स्रोत आहे. आपण कांद्याच्या रसाने आपल्या मुलाच्या उलट्यांचा त्रास प्रभावीपणे रोखू शकता. एका वाटीत कांदा आणि आल्याचा रस समान प्रमाणात घ्यावा आणि चांगले ढवळावे. आपल्या मुलाला दिवसातून अनेकदा हा रस द्या. तसेच मळमळ आणि उलट्यापासून मुक्त होण्यासाठी कांद्याच्या रसात तुम्ही  सेंद्रीय मध देखील घालू शकता.

११. तुम्ही त्याला जिरेसुद्धा देऊ शकता.

जीरे, स्वादुपिंडातुन निर्माण होणाऱ्या स्रावांच्या निर्मितीस उत्तेजन देतात त्यामुळे पाचक समस्यांपासून आराम मिळू शकतो. उलट्या झाल्यावर जिरे खाल्ल्यास बरे वाटू शकते. एक चमचा जिरे भाजून घ्या आणि त्याची पावडर करून गरम पाण्यात घाला आणि आपल्या मुलास हळू हळू पिण्यास द्या. त्यात तुम्ही थोडी जायफळ पावडर सुद्धा घालू शकता. वेलची आणि मधासोबत सुद्धा तुम्ही जिरे देऊ शकता. हे चाटण हळूहळू आपल्या मुलाला द्या.

१२. त्याला कॅमोमाइल चहा द्या

त्याला कॅमोमाइल चहा द्या

कॅमोमाइल त्याच्या सुखदायक आणि शांत गुणधर्मांकरिता ओळखले जाते. ह्या चहामुळे मळमळ कमी होते  व मुलांची पचनशक्ती वाढविण्यास आणि शांत झोप लागण्यास मदत करते. गरम पाण्यात एक चमचा कॅमोमाइल घाला आणि त्यात मध घाला. दिवसातून दोन ते तीन वेळा आपल्या मुलाला हा चहा द्या.

१३. लव्हेंडर तेल वापरा!

हे सुगंधी तेल आपल्या मुलास ताजेपणा आणेल. ह्या सुवासिक तेलामुळे मळमळीमुळे होणारी डोकेदुखी बरी होते आणि मुलांना शांत झोप लागण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या मुलाच्या उशीवर किंवा नॅपकिनवर काही थेंब लॅव्हेंडर तेल घालू शकता आणि त्याला बरे वाटण्यासाठी त्याचा वास घेऊ द्या.

हे काही सोपे घरगुती उपचार आहेत जे आपण त्वरित आपल्या मुलासाठी वापरण्यास सुरुवात करू शकता. तथापि, जर ह्या उपायांचा त्याला काही उपयोग होत नसेल तर वैद्यकीय मदत घ्या. उलट्या होणे ही एक गंभीर समस्या नाही आणि त्यावर घरी उपचार केले जाऊ शकतात. तथापि, वरीलपैकी कोणत्याही घरगुती उपचारांचा प्रयत्न करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे नेहमीच सुचवले जाते.

आणखी वाचा:

लहान मुलांच्या तापासाठी १४ सर्वोत्तम घरगुती उपाय

मुलांना होणाऱ्या उलट्या – प्रकार, कारणे आणि उपचार

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article